जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्र. 192/2008. प्रकरण दाखल तारीख. – 22/05/2008. प्रकरण निकाल तारीख. –16/07/2008. समक्ष - मा.विजयसिंह राणे - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते. - सदस्य श्रीमती सुजाता पाटणकर, - सदस्या श्रीमती उषा भ्र.परशराम राठोड अर्जदार. वय, 35 वर्षे, धंदा घरकाम रा. सुभाषनगर किनवट ता.किनवट जि.नांदेड. विरुध्द. शाखा व्यवस्थापक गैरअर्जदार नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. वीभागीय कार्यालय, नगीनाघाट रोड नांदेड. अर्जदारा तर्फे वकील – अड.आर.डी.राठोड गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.रियाजुल्लाखान. निकालपत्र (द्वारा - मा.श्री.विजयसिंह राणे,अध्यक्ष ) अर्जदार हे किनवट येथील रहिवाशी असून त्यांच्या पतीने त्यांच्या हयातीमध्ये गैरअर्जदार यांच्याकडे जनता वैयक्तीक अपघात विमा रु.1,00,000/- चा ज्यांचा पॉलिसी क्रंमाक 272000/47/03/9600117 नंबरने उतरविला होता, पॉलिसीचा कालावधी दि.11.6.2003 ते 12.6.2008 असा होता. अर्जदाराचे पती सहशिक्षक जिल्हा परीषद हायस्कूल बोथडी बू. येथे कार्यरत असताना शीक्षक पतसंस्थेमार्फत विमा काढला होता. अर्जदाराचे पती हे दि.16.9.2005 रोजी अपघातामध्ये मरण पावले. पतीच्या मृत्यूनंतर अर्जदाराने गैरअर्जदाराकडे विम्याच्या रक्कमेची मागणी केली. परंतु त्यांनी अद्यापपावेतो रक्कम दिली नाही. दि.02.12.2005 व 13.09.2007 रोजी चिटणीस सहकारी पतपेढी शिक्षण वीभाग, म. जि. प. नांदेड यांच्या मार्फत गैरअर्जदाराना पतीच्या अपघाती मृत्यूबददल विम्याच्या रक्कमेची लेखी मागणी केली. तसेच दि.17.6.2007 रोजी गैरअर्जदाराकडे त्यांनी मागितलेली सर्व कागदपञ देऊन विमा रक्कमे बाबत लेखी अर्ज देऊन मागणी केली तरी त्यांनी रक्कम दिली नाही. अर्जदार ही वीधवा असल्यामुळे कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे, तसेच लहान मूले शिक्षण घेत असल्यामुळे त्यांचा खर्च करणे अवघड झाले आहे. त्यामुळे अर्जदाराने अशी मागणी केली आहे की, तिला तिच्या पतीच्या अपघाती मृत्यूबददलची विम्याची रक्कम रु.1,00,000/- व मानसिक व आर्थिक ञासापोटी रु.20,000/- व दाव्याचा खर्च रु.5000/- गैरअर्जदाराकडून मिळावेत. गैरअर्जदार वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे सादर केले आहे.अर्जदार यांनी सहकारी पतपेढी शिक्षण वीभाग म. जि. प. नांदेड यांच्या मार्फत विमा पॉलिसी घेतलेली आहे त्यामुळे त्यांना पार्टी करणे आवश्यक आहे म्हणून ही तक्रार खारीज करावी अशी मागणी केली आहे. पतपेढीने जि. प. नांदेड यांनी अर्ज गैरअर्जदाराकडे दाखल केल्याप्रमाणे त्यात अर्जदारांनी मृत्यू प्रमाणपञाची मूळ प्रत, शवविच्छेदन मूळ अहवाल, क्लेम फॉर्म, एम.आय. आर. व पंचनाम्याची मूळ प्रत, संबंधीताचे ड्रायव्हींग लायसन्स, निवडणूक ओळखपञ/ओळखपञाची मूळ प्रत व वारस/नॉमीनीचे मूळ प्रत दाखल केलेली नाही. तसेच सलग गैरअर्जदाराने दि.20.2.2006, दि.24.2.2006 व 17.3.2006 या पञाने सतत वरील कागदपञाची मागणी केली परंतु अर्जदाराने आजपर्यत मूळ कागदपञ दाखल केलेले नाहीत. यासाठी हे प्रकरण प्रलंबित आहे. अर्जदाराने मयताचे वारस म्हणून अर्ज केला आहे परंतु वारस प्रमाणपञाच्या प्रतीमध्ये त्यांची दोन मूले असून त्यांना या दाव्यात पार्टी केलेले नाही, अर्जदारांनी सोसायटीमार्फत विमा पॉलिसी काढलेली आहे त्यामुळे गैरअर्जदारांनी मागितलेल्या कागदपञाची पूर्तता केलेली नसल्यामुळे दि.21.3.2006 रोजी त्यांची मागणी नामंजूर केली. विमा पॉलिसीप्रमाणे अपघात घडल्यापासून एक महिन्याचे आंत विमा कंपनीला कळवीणे आवश्यक होते तसेच घटना घडल्यापासून एक महिन्याचे आंत विमा कंपनीकडे मागणी अर्ज सादर केला नाही म्हणून पॉलिसीचे खंडन केले म्हणून तक्रार खारीज करावी अशी मागणी करतात. तसेच ही पॉलिसी ही ब्रिच ऑफ कंडीशन झालेली आहे व गैरअर्जदांरानी मागितलेले कागदपञ अर्जदाराने पूरविलेले नाहीत. अर्जदाराचे पती हे दि.16.9.2005 रोजी मरण पावले असल्यामुळे सदरचा दावा हा दोन वर्षाचे आंत दाखल करणे आवश्यक असल्यामुळे सदरचा दावा मूदतबाहय असलयामुळे तो चालण्याजोगा नाही. तसेच गैरअर्जदाराने मागणी केलेले कागदपञ अर्जदाराने दिलेले नसल्यामुळे त्यांचा विमादावा निकाली काढता आला नाही. त्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराला कोणतीही ञूटीची सेवा दिलेली नाही. त्यामुळे त्यांची तक्रार खर्चासह फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदार करतात. अर्जदारानी स्वतःची साक्ष शपथपञा द्वारे नोंदविली, तसेच एफ.आय.आर., पॉलिसीचे प्रमाणपञ, पतपेढीने दि.2.12.2005 रोजी व दि.13.09.2007 रोजी गैरअर्जदारास दिलेले पञ, मृत्यू प्रमाणपञ, अर्जदाराने गैरअर्जदारास दिलेले पञ, गैरअर्जदारातर्फे रामनारायण रामप्रसाद बंग यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केले, गैरअर्जदारानी अर्जदारास दिलेले पञ, पॉलिसी, तहसिलदार किनवट यांचे वारसा प्रमाणपञ दाखल केलेले आहेत. दोन्ही पक्षानी दाखल केलेला दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकूण खालील मूददे उपस्थित होतात. 1.अ. प्रकरण मुदतीत आहे काय ? होय. 1. सहकारी पतसंस्था यात आवश्यक पक्षकार आहे काय ? नाही. 2. विमा कंपनीने विम्याची रक्कम नाकारुन सेवेत ञूटी ठेवली आहे काय ? होय. 3. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 अ ः- विमा कंपनीने नाकारल्याचे जबाबात नमुद केले आहे परंतु कोणताही दस्ताऐवज क्लेम नाकारल्याबददल दाखल केला नाही. सबब कारण सतत घडणारे आहे. मूददा क्र.1 ः- सदरील प्रकरणात मृत हे सहकारी पतसंस्थेचे सभासद आहे व सहकारी पतसंस्थेमार्फत वैयक्तीक अपघात विमा योजना यात ते सहभागी झाले आहेत, केवळ एवढयाच कारणासाठी सहकारी पतसंस्था यात आवश्यक पक्षकार केले नाही म्हणून तक्रार गैरकायदेशिर ठरत नाही. म्हणून मूददा क्र.1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. मूददा क्र. 2 ः- गैरअर्जदाराचा मूख्य आक्षेप असा आहे की, विमा प्रकरणत हे एक महिन्याचे आंत दाखल केले पाहिजे अन्यथा तो क्लेम विमा कंपनीस लागू होत नाही. वास्तविक पाहता विमा संबंधीचा मूळ करार कधीही रदद करु शकत नाही फार तर सोयीच्या दृष्टीने अट आहे आणि विमा पॉलिसीमध्ये सूध्दा एक महिन्याचे नंतर क्लेम दाखल केला तर तो नामंजूर करण्यात येईल अशा स्वरुपाची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. दूसरे असे की, विमा कंपनीने पतसंस्थे सोबत सतत पञव्यवहार करुन कागदपञाची मागणी केलेली आहे. त्यामुळे त्यांनी वरील प्रकरणाचा उजर हा सोडून दिलेला आहे हे स्पष्ट होते. यातील तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्ताऐवजावरुन असे दिसते की, मृत यांचा मृत्यू अपघाती झालेला आहे आणि तक्रारकत्याने सर्वप्रथम आपली मागणी सहकारी पतसंस्थेकडे केली आणि सहकारी पतपेढीने या संबंधीचे दस्ताऐवज विमा कंपनीला जावक क्र. 7230/2005 दि.02.12.2005 प्रमाणे दि.09.12.2005 रोजी दिलेले आहेत. ही मागणी मृत्यूनंतर तिन महिन्याचे आंत करण्यात आलेली आहे, पूढे असेही दिसते की, सदरील पतसंस्थेने विमा कंपनीला दि.14.09.2007 रोजी सर्व आवश्यक ती कागदपञ दिलेली आहेत. त्यामध्ये घटनास्थळ, इन्क्वेस्ट पंचनामा, व पहिली खबर, पोलिस निरीक्षकास दिलेला अर्ज, पोस्ट मार्टम रिपोर्ट, नामनिर्देशन फॉर्म, व्हिसारा रिपोर्ट, मृत्यू प्रमाणपञ, वारस प्रमाणपञ, शाळा सोडल्याचे प्रमाणपञ, मयताचे ओळखपञ, वारसाचे ओळखपञ, इन्शूरन्स प्रमाणपञ, निवडणूक ओळखपञ, सर्व्हीस बूकचा उतारा, घटनेच्या जागेचे वर्णन इत्यादी कागदपञ देण्यात आलेले आहेत. विमा कंपनीला मनापासून क्लेम दयायचा असता तर त्यांनी एवढया दस्ताऐवजावर क्लेम मंजूर केला असता परंतु त्यांना मूळात क्लेम देणे नव्हते आणि त्यामुळे त्यांनी खोटया सबबी सांगून क्लेमचे प्रकरण बंद केले आहे ही त्यांच्या सेवेतील ञूटी आहे. यास्तव आम्ही खालील प्रमाणे आदेश करीत आहोत. आदेश 1. तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारकर्ते यांना पॉलिसीची रक्कम म्हणून रु.1,00,000/- नूकसान भरपाई बददलची तिवर तक्रार दाखल दि.17.5.2008 पासून रक्कमेच्या प्रत्यक्ष अदापावेतो द.सा.द.शे. 9% मिळून येणारी रक्कम दयावी, सदरची रक्कम आदेश प्राप्त झाल्यापासून एक महिन्याचे आंत दयावा, न दिल्यास ती 9 % ऐवजी 12 % व्याज देण्यास विमा कंपनी जबाबदार राहील. 3. तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक व आर्थिक ञासापोटी रु.10,000/- व तक्रार खर्चाबददल रु.1,000/- गैरअर्जदारांनी दयावेत. 4. पक्षकाराना निकाल कळविण्यात यावा. श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते श्री.विजयसिंह राणे सदस्या सदस्य अध्यक्ष जे. यु. पारवेकर लघूलेखक. |