Maharashtra

Nanded

CC/11/71

Yeshodabai Shivaji Pujarwad - Complainant(s)

Versus

National Insurance company - Opp.Party(s)

P.G.Narwade

20 May 2011

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/11/71
1. Yeshodabai Shivaji PujarwadKharatwadi Tq.HadgaonNandedMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. National Insurance companySterling Cinema Building Second floor, 65, Marjban Road, D.O. 14 Kha Fort, Mumbai-01MumbaiMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HON'BLE MR. President B.T.Narwade ,PRESIDENTHON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh ,MEMBER
PRESENT :P.G.Narwade, Advocate for Complainant

Dated : 20 May 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :- 2011/71
 
                                   प्रकरण दाखल तारीख -                 01/03/2011     
                                   प्रकरण निकाल तारीख              20/05/2011
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील,           - अध्‍यक्ष
        मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख.              -   सदस्‍या
 
यशोदाबाई भ्र. शिवाजी पुंजरवाड,
वय वर्षे 40,धंदा घरकाम,
रा.खरटवाडी ता.हदगांव जि.नांदेड. जि.नांदेड.                   अर्जदार.
 
      विरुध्
1.     व्‍यवस्‍थापक,
         नॅशनल इंशरन्‍स कंपनी लि,
        स्‍टरलिंग सि‍नेमा बिल्‍डींग, दुसरा मजला,65,
               मर्जबान रोड, डि.ओ. 14 ख फोर्ट, मुंबई – 400001.     
2.         नॅशनल इंशुरन्‍स कंपनी लि,
मार्फत शाखा व्‍यवस्‍थापक,                           गैरअर्जदार
शाखा नगीना घाट रोड,नांदेड.
3.    कबाल इशुरन्‍स सर्व्‍हीसेस प्रा.लि.   
दिशा अलंकार शॉप नं.2, टाऊन सेंटर,     
सिडको,कॅनॉट प्‍लेस, औंरगाबाद.
 
अर्जदारा तर्फे                    -   अड.पी.जी.नरवाडे.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील –    अड. रियाझुल्‍हाखॉन
गैरअर्जदार क्र. 3                 -  स्‍वतः
                                          निकालपत्र                                                
                    (द्वारा- मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख,सदस्‍या)
 
      अर्जदार नामे कमलबाई ही मयत शिवाजी पुंजरवाड यांची पत्‍नी आहे.  दि.18/10/2006 रोजी मयत शिवाजी   आपल्‍या शेतातील कापसाला पाणी देण्‍यासाठी शिवाजी यांचा मेहूना व नामे आनंदराव शेंबटवार हे दोघे गेले असता त्‍यांची बाहेर असलेली विद्युत मोटर विहीरीत सोडत असतांना विहीरीत सोडत असलेल्‍या मोटारीस बांधलेलेले अल्‍युमीनिअमच्‍या रोपने विहीरीलगत असलेल्‍या खांबाजवळील विद्युत प्रवाहित वायरला घर्षण झल्‍याने विजेचा जबर शॉक लागून दोघांचाही जागीच मृत्‍यु झाला. अर्जदाराने एफ.आय.आर., इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा दोषारोपपत्र, पी.एम.रिपोर्ट इ.कागदपत्र सादर केले आहेत. त्‍याबद्यल अर्जदाराने पी.एम.रिपोर्ट, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, मृत्‍युसंबंधी सर्व कागदपत्र दाखल केलेले आहे. सदरी घटनेबाबत पोलिस स्‍टेशन मनाठा ता.हदगांव जि.नांदेड यांनी कलम 279, 304 भा.द.वि. नुसार गुन्‍हा क्र.207 नोंदविला व साक्षीदाराचे बयान घेतले. अर्जदाराचे पती शिवाजी   हे व्‍यवसायाने शेतकरी होते, त्‍यांच्‍या नांवे मौजे  कोंडुर ता.हदगाव जि.नांदेड येथे गट नं 86  मध्‍ये क्षेत्रफळ 1 हेक्‍टर, 61 आर एवढी जमीन होती व त्‍या जमीनीचे ते मालक व ताबेदार होते, ते 7/12 धारक शेतकरी होते. अर्जदाराने 7/12 चा उतारा, नमुना नं. 8 चा उतारा व 6 क चा उतारा दाखल केला आहे. महाराष्‍ट्र शासनाने महाराष्‍ट्रातील शेतक-याचे, शेतक-यांना विमा संरक्षण देण्‍यासाठी शेतक-याचे शेतकरी अपघात विमा योजना गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे काढले व त्‍याचे प्रिमीअम गैरअर्जदार क्र. 1 यांनी विमा घेते वेळेस सर्व प्रकारची जोखीम स्विकारली व विमा शेतक-याच्‍या हक्‍कात दिला. अर्जदाराचे पती हे शेतकरी होते व त्‍याचे प्रिमीअम महाराष्‍ट्र शासनाने भरलेले आहे व तो लाभार्थी आहे म्‍हणून अर्जदाराचे पती हे गैरअर्जदार क्र. 1 यांचे ग्राहक आहेत. सदरील पॉलिसीचा कालावधी हा 15/08/2008 ते 14/08/2007 असा आहे व घटना ही दि.18/10/2006 ची आहे व हा त्‍याच दिवसी म्‍हणजे मृत्‍यु दि.18/10/2006 आहे. त्‍यामुळे गैरअर्जदार हे अर्जदारास नुकसान भरपाई देण्‍यास पात्र आहेत. अर्जदाराने आपल्‍या पतीच्‍या मृत्‍युनंतर क्‍लेम दाखल केल्‍यानंतर गैरअर्जदार क्र. 1,2 व 3 यांचेकडे क्‍लेम दाखल केल्‍यापासुन विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी अनेक वेळा तोंडी विनंती केली पण गैरअर्जदार यांनी आज या, उद्या या म्‍हणुन नेहमी टाळाटाळ करीत राहीले व अर्जदाराने गैरअर्जदाराकडे चकरा मारुन सुध्‍दा आजपर्यंत विम्‍याची नुसान भरपाई दिलेली नाही जे की, नियमानुसार एक महिन्‍याच्‍या आत देणे बंधनकारक आहे तरीपण त्‍यांनी दिली नाही. गैरअर्जदारांनी अर्जदारास नुकसान भरपाई दिली नाही म्‍हणुन अर्जदाराने तक्रारअर्ज दाखल केला आहे. त्‍यांची मागणी आहे की, अर्जदारास शेतकरी अपघात विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/-, 12 टक्‍के व्‍याजाने सन 2006 पासून अर्जदारास द्यावेत. तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व दावा खर्च रु.5,000/- अर्जदारास द्यावेत.
            गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे वकीला मार्फत हजर झाले त्‍यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. त्‍यांचे म्‍हणणे की, अर्जदारास प्रस्‍तुत अर्ज दाखल करण्‍याचा कोणताही कायद्याने अधिकार नाही. अधिकार नसतांना सुध्‍दा प्रस्‍तुत तक्रारअर्ज मा.न्‍यायमंचासमोर दाखल करुन मंचाची दिशाभूल करीत आहे. जे की, कायद्याने चुक असल्‍यामुळे तक्रारअर्ज रु.25,000/- दंड लावून फेटाळण्‍यास योग्‍य आहे. प्रस्‍तुत तक्रारअर्ज अपरिपक्‍व (Premature) आहे कारण अर्जदाराने प्रस्‍तुत दावा गैरअर्जदार क्र. 3 यांच्‍या मार्फत गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचेकडे दाखल केलाच नाही. जर क्‍लेम दाखलच केला नसेल तर गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी सादर न दाखल केलेला क्‍लेम नामंजूर करण्‍याचा किंवा क्‍लेम देण्‍यास टाळाटाळ करण्‍याचा किंवा विलंब करण्‍याचा किंवा सेवेत त्रुटी देण्‍याचा प्रश्‍नच उदभवत नाही. असे असतांना सुध्‍दा अर्जदार प्रस्‍तुत न्‍यायमंचासमोर सत्‍य परिस्‍थीती लपवून मंचाचे दिशाभूल करीत आहे आणी खोटा दावा दाखल केलेला आहे. म्‍हणून अर्जदाराचा अर्ज गैरअर्जदार क्र. 1 व 2 च्‍या विरुध्‍द खर्चासह फेटाळण्‍यात यावा असे म्‍हटले आहे. प्रस्‍तुत तक्रारअर्जातील मधील सर्व मजकूर निखालस खोटे असून गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना मान्‍य नाही कारण सदर अपवघातासंबंधी किंवा सदर विमा क्‍लेम संबंधी कोणताही कागदोपत्री पुरावा गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्‍याकडे अर्जदाराने किंवा गैरअर्जदार क्र. 3 यांनी दाखल केले नाही. त्‍यामुळे सदर अपघाती विमा संबंधी गैरअर्जदार क्र. 1 व 2   यांच्‍या अर्जदाराप्रती कोणतेही जिम्‍मेदारी नाही जोपर्यंत अर्जदार यांनी विमा पॉलिसीच्‍या नियम व अटी अनसरुन कागदोपत्री पुरावा प्रतिवादी क्र. 1 व 2 यांच्‍याकडे रितसर अर्जासहीत दाखल करत नाही व आवश्‍यक बाबीचे पुर्तता करत नाही तोपर्यंत कसल्‍याही प्रकारची जिम्‍मेदारी राहत नाही. गैरअर्जदारास हे मान्‍य नाही की, दि.18/10/2006 रोजी अर्जदाराचे पती नामे शिवाजी  विहीरीत विद्युत तार पडल्‍यामुळे व जबर शॉक लागल्‍यमुळे त्‍यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्‍मात मृत्‍यू नोंदणी म्‍हणुन नोंद केली नाही व पंचनामा केला नाही. प्रस्‍तुत तक्रारअर्जातील सर्व मजकूर खोटी असून प्रतीवादी क्र. 1 व 2 यांना मान्‍य नाही. अर्जदाराचे पती सदर विमा पॉलिसीच्‍या अटी व नियमानुसार दि.18/10/2006 रोजी किंवा मयताचे मृत्‍युपूर्वी ते शेतकरी असल्‍याबद्यल व त्‍यांच्‍या मृत्‍यु दि.18/10/2006 रोजी झाल्‍याबद्यल व सदर विमा क्‍लेम प्रतीवादी क्र. 1 व 2 यांच्‍याकडे सर्व सत्‍यप्रती कागदपत्रासहीत प्रतीवादी क्र. 3 यांनी दाखल केल्‍याबद्यल व ते प्राप्‍त झाल्‍याबद्यल व कागदोपत्री पुराव्‍याच्‍या आधारे सिध्‍द करण्‍यात आला नाही. म्‍हणून अर्जदाराचे अर्ज प्रतीवादी क्र. 1 व 2 यांच्‍या विरुध्‍द फेटाळण्‍यात यावा असे म्‍हटले आहे. अर्जदाराने विमा पॉलिसीच्‍या अटी व नियमाचे पालन न केल्‍यामुळे व आवश्‍यक ते कागदपत्रांची पुर्तता केली नसल्‍यामुळे व त्रुटीची पुर्तता केली नसल्‍यामुळे अर्जदारास प्रतीवादी क्र.1 व 2 यांच्‍याकडुन कोणताही विमा रक्‍कम रु.1,00,000/- व त्‍यावर दि.2006 पासुन 12 टक्‍के व्‍याज व रु.25,000/- मानसिक व शारिरीक त्रासापोटी व दावा खर्च म्‍हणून रु.5,000/- मागता येणार नाही. वरील सर्व गोष्‍टीचा विचार करुन अर्जदाराचा अर्ज प्रतीवादी क्र. 1 व 2 यांचे विरुध्‍द फेटाळण्‍यात यावा असे म्‍हटले आहे.
            गैरअर्जदार क्र.3 हे हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. अपघात हा दि.20.12.2010 रोजी झाला व त्‍यांना क्‍लेम हा झाला. पण तो क्‍लेम सोबत काही कागदपञ कमी असल्‍याचे कळवले. क्‍लेम हा नॅशनन इंशुरन्‍स कंपनी मुंबई कडे पाठविले. क्‍लेम इंशरन्‍स कंपनीने फेटाळलेला आहे. त्‍यांचे सेवेमध्‍ये कोणतीही ञूटी नाही म्‍हणून त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार ही फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.              
              अर्जदार व गैरअर्जदार क्र. 1, 2 व 3   यांनी दाखल केलेला लेखी जवाब व कागदपञ पाहून खालील मूददे उपस्थित होतात.
 
     मूददे                                               उत्‍तर
1.     अर्जदार ग्राहक आहेत काय ?                             होय.
2.    गैरअर्जदार हे अर्जदारानी मागितलेली विमा रक्‍कम देण्‍यास
      बांधील आहेत काय ?                                    होय.
3.    काय आदेश  ?                                    अंतिम आदेशाप्रमाणे
मूददा क्र.1
                  अर्जदार यांनी इन्‍वेस्‍ट पंचनामाचे मृत्‍यू प्रमाणपञ दाखल केलेले आहे तसेच गाव नमूना सहा क वारसा प्रमाणपञाची नोंदवही यामध्‍ये मृत भोगवटदाराचे नांव यशोदाबाई शिवाजी पुंजरवाड दाखवलेले आहे. ज्‍यामध्‍ये यशोदाबाई ही  शिवा‍जी यांची पत्‍नी आहे असे लिहीलेले आहे. त्‍यामूळे गैरअर्जदार यांनी काढलेला मूददा अर्जदार हे गैरअर्जदार यांचे वारस नाहीत, हा याठिकाणी अर्जदाराने खोडलेला आहे व अर्जदार हे मयत शिवाजी यांचे वारस आहेत हे सिध्‍द झालेले आहे. अर्जदार ही मयत शिवाजी यांची पत्‍नी आहे हे सिध्‍द होत असल्‍यामूळे मूददा क्र.1 चे उत्‍तर सकारात्‍मक देण्‍यात येते.
मूददा क्र.2 
                  अर्जदार ही मयत शिवाजी यांचे नांवावर शेती असल्‍याबददल 7/12 चा उतारा दाखल केलेला आहे. ज्‍यामध्‍ये मयत शिवाजी यांचे नांवावर शेत जमीन असल्‍याबददल पूरावा मंचासमोर आलेला आहे. तसेच मयत शिवाजी हे दि.18/10/2006 रोजी विहीरीतील तारेचा शॉक लागल्‍यमुळे अपघाती मृत्‍यू झाला, हा मूददा गैरअर्जदार यांनी जवाबामध्‍ये मृत्‍यूबदल पूरावा दाखल केला नाही म्‍हणून अमान्‍य आहे. अर्जदार यांनी घटनेची फिर्याद दिली व त्‍यामध्‍ये अर्जदाराचा मृत्‍यू हा झाला अशी माहीती पोलिस स्‍टेशन मनाठा ता.हदगांव जि.नांदेड यांनी अपघाती नोंद घेतली आहे. त्‍याबददलचे कागदपञ अर्जदाराने दाखल केल्‍यामूळे मयत शिवाजी यांचा विहीरीतील तारेचा जबर शॉक लागल्‍यामुळे अपघाती मरण पावले हे सिध्‍द झालेले आहे. सन 2006-07 मध्‍ये औरंगाबाद महसूल विभागात येणा-या सर्व शेतक-यासाठी व्‍यक्‍तीगत अपघात विमा गैरअर्जदार क्र.1 यांचेंकडून काढलेली आहे व त्‍यांचा विमा हप्‍ता महाराष्‍ट्र शासनाने भरला आहे. यामध्‍ये शिवाजी यांचा सहभाग असल्‍यामूळे व अर्जदार ही त्‍यांची पत्‍नी असल्‍यामूळे ती प्रत्‍यक्षरित्‍या जरी नाही तरी अप्रत्‍यक्षरित्‍या अर्जदार ही ग्राहक आहे. त्‍यामूळे अर्जदार ही विमा रक्‍कम रु.1,00,000/- गैरअर्जदार यांचे कडे मागू शकते. अर्जदार हीने मृत्‍यू दाखला प्रमाणपञ, वारसा प्रमाणपञ, 7/12, इत्‍यादी कागदपञासह गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे अर्ज दाखल केला आहे. त्‍याबददलची पोहच पावती अर्जदाराने दाखल केली आहे. दि.18.10.2006 रोजी घटना घडली आहे व त्‍याबददलची कागदपञे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना पाठविले आहेत. कंपनीने ते कागदपञे नॅशनल  इन्‍शूरन्‍स कंपनी यांना सेंटलमेंट साठी दिलेले आहेत पण अद्यापपर्यत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी विम्‍याची रक्‍कम दिली नाही हे सिध्‍द होते. वरील सर्व कागदपञ सिध्‍द झाल्‍याने गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास नूकसान भरपाई पोटी रक्‍कम रु.1,00,000/- एक महिन्‍याचे आंत दयावेत. तसेच मानसिक ञासापोटी रु.5,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.2,000/- दयावेत या निर्णयापर्यत हे मंच आलेले आहे.
                  वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                                                                                    आदेश
 
1.                                          अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येतो.
2.                                          गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी हा निकाल कळाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना रु.1,00,000/- पूर्ण रक्‍कम दयावी.
3.                                          मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.2,000/- मंजूर करण्‍यात येतात.
4           वरील सर्व रक्‍कम एक महिन्‍याचे आंत न दिल्‍यास, एक 
महिन्‍यानंतर संपूर्ण रक्‍कमेवर 9 टक्‍के व्‍याज पूर्ण रक्‍कम  
फिटेपर्यत गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी अर्जदारास दयावे लागेल.
5.               पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                      श्रीमती सुवर्णा देशमूख          
     अध्‍यक्ष                                   सदस्‍या                                               
 
 
 
गो.प.निलमवार.लघुलेखक
 
 
 
 
 

[HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE MR. President B.T.Narwade] PRESIDENT