(मंचाचे निनर्णयान्वये, अनिल एन. कांबळे, अध्यक्ष,प्रभारी)
(पारीत दिनांक : 6 एप्रिल 2009)
अर्जदाराने, सदरची दरखास्त ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 27 नुसार, गैरअर्जदाराचे विरुध्द दाखल केलेली आहे. अर्जदार हिने, गैरअर्जदाराचे विरुध्द ग्राहक तक्रार क्र. 7/2002 दाखल केली. त्यामध्ये दिनांक 9/2/2004 ला आदेश पारीत करुन, अर्जदाराची तक्रार मंजुर करण्यात आली. परंतु, गैरअर्जदार यांनी आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे, गैरअर्जदाराचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 27 नुसार कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी आपले दरखास्तमध्ये केली आहे.
... 2 ...
... 2 ...
अर्जदाराची दरखास्त नोंदणी करुन, गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होऊन आदेशानुसार रक्कम रुपये 3,17,658/- निशाणी 18 नुसार चेक जमा केला. गैरअर्जदार यांनी तक्रारीतील आदेशानुसार रक्कम जमा केली असल्यामुळे, अर्जदाराने दरखास्त मधील वाद मिटला असल्याचे निशाणी 21 नुसार पुरसीस दाखल केलेली आहे. अर्जदारास पुरसीस मधील मजकुराबाबत विचारणा केली असता, दरखास्त काढून टाकण्यात यावी असे सांगीतले. आदेशानुसार रक्कम जमा झालेली असल्यामुळे दरखास्त काढून टाकण्याची पुरसीस अर्जदाराने निशाणी 21 दाखल केली असल्यामुळे, दरखास्त अंतिमतः निकाली काढून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची दरखास्त खारीज.
(2) उभयतांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :–6/4/2009.