निकालपत्र तक्रारदाखलदिनांकः- 10/02/2010 तक्रारनोदणीदिनांकः-05/03/2010 तक्रारनिकालदिनांकः- 20/07/2010 कालावधी04 महिने 15 दिवस जिल्हाग्राहकतक्रारनिवारणन्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांतबी. पांढरपट्टे,B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाताजोशीB.Sc.LL.B. सौ.अनिताओस्तवालM.Sc. गंगासागर ज्ञानोबा शिंदे . अर्जदार वय वर्षे.धंदा घरकाम रा.नावलगांव, अँड.एम.ए.भोसले ता.पालम जि.परभणी. विरुध्द नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमीटेड गैरअर्जदार. मार्फत मॅनेजर, अँड.अतूल पालीमकर . हजारीया चेंबर्स रेल्वे स्टेशन रोड, औरंगाबाद. ------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाताजोशी. सदस्या. 3) सौ.अनिताओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्रपारितव्दाराश्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष ) शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विम्याची नुकसान भरपाई मयताच्या वारसास विमा कंपनीने दिली नाही म्हणून प्रस्तुतची तक्रार आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात हकीकत. अर्जदार रा.नावलगांव ता.पालम जिल्हा परभणी येथील रहिवासी आहे तिचा पती मयत ज्ञानोबा तात्याराव शिंदे खातेदार शेतकरी होता.त्याचे मालकीची गट नं 34/बी नावलगांव येथे शेतजमीन आहे. दिनांक 24/11/2006 रोजी ज्ञानोबा मोटार सायकलवरुन अहमदपूर येथून गावाकडे जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघातात जागेवरच त्याचा मृत्यू झाला. गंगाखेड पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदला. त्यानंतर सरकारी हॉस्पिटल गंगाखेड येथे प्रेताचे पोस्टमार्टम केले. अर्जदाराने त्यानंतर तहसिलदार पालम यांचेकडे तिच्या मयत पतीच्या अपघाती मृत्यूची शेतकरी विम्याची नुकसान भरपाई रु.1,00,000/- मिळणेसाठी क्लेम केला. त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे पाठविली होती. तरी देखील 18.09.2009 चे पत्र पाठवून आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता केली नाही म्हणून क्लेम नामंजूर केला असल्याचे कळविले. अशा रितीने गैरअर्जदाराने सेवात्रुटी करुन नुकसान भरपाई मिळणे पासून वंचित ठेवले आहे म्हणून अर्जदाराने ग्राहक मंचात प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल करुन गैरअर्जदाराकडून शेतकरी अपघात विम्याची नुकसान भरपाई रु.1,00,000/- द.सा.द.शे. 18 % दराने व्याजासह मिळावी. याखेरीज मानसिकत्रासापोटी रु 10,000/-,सेवात्रुटी व अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदारचे शपथपत्र ( नि.2 ) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि.6 लगत एकुण 7 कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करणेसाठी गैरअर्जदारास मंचातर्फे नोटीस पाठविल्यावर गैरअर्जदार यानी दिनांक 06.07.2010 रोजी प्रकरणात लेखी जबाब (नि.15) दाखल केला. त्यामध्ये सुरुवातीलाच असा आक्षेप घेतला आहे की, अर्जदाराने मोटार अपघात ट्रायबूनल कडे पतीच्या अपघाती मृत्यूची नुकसान भरपाई मिळण्यासाठी क्लेम केलेला असल्यामुळे ग्राहक मंचाला प्रस्तूतचे प्रकरण चालविण्याचे अधिकारक्षेत्र येत नाही तो फेटाळावा तसेच मयताचा सर्व कायदेशीर वारसाना पार्टी केलेले नाही. ज्ञानोबा शिदे शेतकरी होता त्याच्या मालकीची गट नं. 34/ब शेत जमिन आहे हा तक्रारी अर्जातील मजकूर मान्य केला आहे तसेच अपघाताची खबर गंगाखेड पोलीस स्टेशनला दिल्याचा व पोस्टमार्टेम केल्याचा मजकूर मान्य केला आहे. व शेवटी तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा.अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाचे पुष्टयर्थ गैरअर्जदारचे शपथपत्र (नि.16) दाखल केले आहे. तक्रार अर्जाचे अंतिम सुनावणीचे वेळी अर्जदारातर्फे अँड.मीरा.भोसले यांनी युक्तीवाद केला.गैरअर्जदार तर्फे अँड अतूल पालीमकर यांनी युक्तीवाद सादर केला. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे. मुद्दे. उत्तर. 1 गैरअर्जदार यांने अर्जदारच्या मयत पतीच्या अपघाती निधनाची शेतकरी अपघात विमा क्लेमची नुकसान भरपाई रु.1,00,000/- देण्याचे दिनांक 18.02.2009 च्या पत्राव्दारे बेकायदेशीररित्या नाकारुन सेवा त्रुटी केली आहे काय ? होय. 2 निर्णय ? अंतिम आदेशा प्रमाणे. मुद्दा क्रमांक 1 व 2 ः- अर्जदाराचा मयत पती ज्ञानोबा तातेराव शिदे हा शेतकरी अपघात विमा पॉलीसीचा लाभार्थी होता हे अर्जदाराने पुराव्यात सादर केलेल्या कागदपत्रातील नि.6/1 वरील शेत जमीनचा 7/12 उतारा, नि.6/2 वरील नमुना नं. 8-अ चा उतारा नि.6/3 वरील फेरफार उतारा, नि.18/2 वरील तलाठयाचे प्रमाणपत्र या कागदपत्रातील नोंदीतून शाबीत झाले आहे. दिनांक 24/11/2006 रोजी मयत ज्ञानोबा शिंदे याचा याचा मोटार सायकलवरुन जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघातात जागेवरच मृत्यू झाला होता ही वस्तुस्थिती देखील पुराव्यात दाखल केलेल्या नि.6/5 वरील पोस्टमार्टेम रिपोर्ट, .नि.5/2 वरील पोलीस ठाणे गंगाखेड यांनी अपघाती मृत्यू कामी केलेला घटनास्थळाचा पंचनामा व एफ.आय.आर नि..6/6 वरील ग्रामविकास अधिकारी नावलगांव यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र या कागदपत्रातून शाबीत केले आहे. मयत ज्ञानोबा शिंदे हा शेतकरी वैयक्तिगत अपघात विम्याचा लाभार्थी असल्यामुळे त्याच्या अपघाती मृत्यूची नुकसान भरपाई रु.1,00,000/- मिळणेसाठी अर्जदारने ( मयताची वारस पत्नीने ) वर नमुद केलेल्या आवश्यकत्या कागदपत्रांसह तहसिलदार पालम यांचेकडे नुकसान भरपाई क्लेम दाखल केलेला होता .व ती कागदपत्रे गैरअर्जदारास मिळालेली होती हे नि. 18 सोबत दाखल केलेल्या क्लेम फॉर्मच्या छायाप्रतीवरुन शाबीत झाले आहे. अर्जदार तर्फे प्रस्तुत प्रकरणात नि.4 लगत जी कागदपत्रे दाखल केलेली आहे.त्या सर्व कागदपत्रांवरुन अर्थातच मयत ज्ञानोबा शिंदे याचा नुकसान भरपाईचा क्लेम मंजूर करण्या इतपत शासनाच्या परिपत्रकातील पान क्रमांक 15 वर नमूद केलेप्रमाणे ती सर्व कागदपत्रे क्लेम फॉर्म सोबत दिलेली होती हे स्पष्ट दिसते असे असतानाही आवश्यकत ती कागदपत्रे पाठविली नाहीत या कारणास्तव गैरअर्जदार विमा कंपनीने दिनरंक 18.02.2009 च्या पत्राव्दारे विमा क्लेम नामंजूर केल्याचे कळविले असे तक्रार अर्जात म्हटले आहे परंतू नामंजूरीचे पत्र अर्जदार अथवा विमा कंपनीने ही दाखल केलेला नाही गैरअर्जदारास कोणत्या जादा कागदपत्राची आवश्यकत होती या संबंधी गैरअर्जदाराने देखील लेखी जबाबामध्ये अगर त्यासोबत दाखल केलेल्या पुराव्यातील कागदपत्रामध्ये खुलासा केलेला नाही. गैरअर्जदाराने लेखी जबाबात ग्राहक मंचात दाखल केलेल्या प्रस्तूत प्रकरणाबाबत आक्षेप घेऊन अर्जदाराने मोटार अपघात क्लेम ट्रायबूनल कडे मयत ज्ञानोबा शिदेच्या अपघाती निधनाच्या नुकसान भरपाईसाठी क्लेम केला असल्यामुळे ग्राहक मंचातील तक्रार अर्ज चालविण्याचे मचास अधिकारक्षेत्र नाही असा आक्षेप घेतला आहे परंतू तो आक्षप ग्राहय धरता येणार नाही कारण एम.ए.सी.पी. क्लेम हा ज्या वाहनाने अर्जदाराच्या पतीला ठोकरुन अपघाता झाला होता त्या वाहनाच्या मालक , ड्रायव्हर व विमा कंपनी विरुध्द अर्जदाराला नुकसान भरपाई मागता येवू शकते शिवाय शेतकरी विमा पॉलीसी हमीप्रमाणे प्रस्तूत प्रकरणातील विमा कंपनी विरुध्द देखील वेगळी नुकसान भरपाई मागता येते दोन्ही क्लेमसना स्वतंत्र अस्तित्व आहे त्यामुळे हा आक्षेप ग्राहय धरता येणार नाही.. विमा कंपनीने विमा कंपनीने दुसरा असा आक्षेप असा घेतला आहे की, प्रकरणात अर्जदारा खेरीज मयताचे इतर कायदेशीर वारस दाखल केलेले नाहीत अर्जदाराने तहशीलदारकडे मयत पतीच्या विमा क्लेम दाखल केल्यावर तहशीलदारकडे यापूर्वी कोणाही कायदेशीर वारसाने आजपर्यंत हरकत घेतेलेली नाही तसेच प्रस्तूतच्या प्रकरणात ग्राहक मंचात दाखल केल्यानंतरही वारसानी हरकत घेतलेली नसल्यामुळे याबाबतीत घेतलेला आक्षेपही ग्राहय धरण्याजोगा नाही. शासनाने राज्यातील सर्वस्वी निसर्गावर अवलंबुन असणा-या व कुटूंबातील कर्ता शेतक-याचे अपघातामध्ये निधन अथवा कायमचे अपंगत्व आले तर कुटूंबाला आर्थिक हातभार देण्यासाठी शासनाने स्वतः विम्याचे हप्ते भरुन शेतक-याला रु.1,00,000/- नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकरी वैयक्तिक अपघात विमा पॉलीसी उतरविलेली आहे. या कल्याणकारी विमा योजनेव्दारे लाभार्थी शेतक-याच्या अपघाती निधनाची त्याच्या वारसांना नुकसान भरपाई मंजूर करण्यासाठी परिपत्रकात जी आवश्यक कागदपत्रे नमुद केलेली आहेत किंवा त्याला पर्यायी असलेली इतर कागदपत्रे क्लेमंटने दिली असतील तर कोणत्याही तांत्रिक कारणास्तव अडवणुक न करता क्लेम मंजूर केला पाहिजे अर्जदाराच्या प्रस्तुत प्रकरणाच्या बाबतीतही हीच वस्तुस्थिती दिसते.क्लेम मंजूर होण्याच्या दृष्टीने अर्जदारने पुराव्यात दाखल केलेली आवश्यकती सर्व कागदपत्रे दिलेली असतांना आजतगायत नुकसान भरपाई अर्जदाराला दिलेली नाही त्यामुळे याबाबतीत गैरअर्जदार कडून निश्चितपणे सेवात्रुटी झालेली आहे हा निष्कर्ष निघतो. सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आदेश 1 अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदार यांनी अर्जदारच्या मयत पतीच्या डेथक्लेमची नुकसान भरपाई रु.1,00,000/- आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत द.सा.द.शे.9 % दराने तक्रार अर्ज दाखल तारखे पासून म्हणजे दिनांक 05/03/2010 पासून व्याजासह द्यावी. 3 याखेरीज मानसिकत्रास व सेवात्रुटी बद्दल रु.1,500/- व अर्जाचा खर्च रु.1,000/- आदेश मुदतीत द्यावा. 4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष. मा.दोंन सदस्यानी दिलेल्या निकालपत्रातील आदेशाशी मी सहमत नाही म्हणून मी वेगळे निकालपत्र देत आहे. सौ. अनिता ओस्तवाल सदस्या मुद्ये उत्तर 1 सदरचा वाद या ग्राहक मंचासमोर चालण्यास पात्र आहे काय ? नाही 2 आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 - अर्जदाराचा पती ज्ञानोबा तातेराव शिंदे हा दिनांक 24.11.2006 रोजी मोटार सायकलवरुन अहमदपूर येथून नवलगांवकडे जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघातात जागेवरच त्याचा मृत्यू झाला. अर्जदाराने त्यानंतर तहसीलदार पालम यांच्याकडे तिच्या मयत पतीच्या अपघाती मृत्यूची शेतकरी विम्याची नुकसान भरपाई रक्कम रुपये 100000/- मिळण्यासाठी क्लेम दाखल केला होता परंतू क्लेम फॉर्मसोबत आवश्यक ती कागदपत्रे पाठविली नसल्याचे कारणास्तव दिनांक 18.02.2009 रोजीच्या पत्राव्दारे गैरअर्जदाराने तीचा वाजवी क्लेम नाकारला अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे. यावर माझे असे मत आहे की, अर्जदाराने दिनांक 18..02.2009 रोजीचे क्लेम नामंजूर केलेले पत्र मंचासमोर दाखल करावयास हवे होते परंतू अर्जदाराने ते मंचासमोर दाखल केलेले नाही. अर्जदाराने पालम तहसीलदाराकडे क्लेम दाखल करताना त्यासोबत कोणते कागदपत्रे जोडले होते त्याचाही तपशील देण्यात आलेला नाही. क्लेम फॉर्म दाखल केल्यानंतर ते मंचासमोर तक्रार अर्ज दाखल करेपर्यंतच्या कालावधीमध्ये तहसीलदार, अर्जदार व गैरअर्जदार विमा कंपनी यामध्ये कोणताही पत्रव्यवहार झालेला दिसत नाही वास्तविक पाहता तहसीलदार सदर प्रकरणात आवश्यक पक्षकार होते परंतू अर्जदाराने त्याला सदर प्रकरणात पक्षकार केलेले नसल्यामुळे ही तक्रार योग्य पक्षकारा अभावी अयोग्य टरते तसेच माझया मते ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 24(अ) मधील तरतूदीनुसार अर्जदाराने कायदेशीर मुदतीत दाद मागितली नसल्यामुळे प्रस्तूतच्या तक्रार अर्जास निश्चीतपणे मुदतीची बाधायेते तसेच गैरअर्जदाराने त्रूटीची सेवा दिल्याचे अर्जदारास ठोस रित्या शाबीत करता आलेले नाही म्हणून वरील सर्व विवेचनावरुन मुद्या क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देवून मी खालील प्रमाणे आदेश देत आहे. आ दे श 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. 2 संबंधीताना आदेशाच्या प्रती मोफत पुरावाव्यात सौ. अनिता ओस्तवाल सदस्या
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |