जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/306 प्रकरण दाखल तारीख - 15/12/2010 प्रकरण निकाल तारीख – 19/03/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या स्वप्नील श्रीकांत म्हेञे वय वर्षे 19, धंदा शिक्षण रा. महावीर चौक, नांदेड. अर्जदार. विरुध् नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. वीभागीय कार्यालय, गैरअर्जदार नगिना घाट रोड, नांदेड अर्जदारा तर्फे वकील - अड.वाय.एस.अर्धापूरकर गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.एम.बी.टेळकीकर निकालपत्र (द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष ) 1. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हा विद्यार्थी असून त्याचं सहकारी तंञनिकेतनमध्ये सिव्हील इंजिनिअरींगच्या शाखेत शिक्षण चालू आहे. अर्जदाराने आपले वाहन हिरो होंडा प्लेशर नंबर एम.एच.-20-एस-3400 चा गैरअर्जदार यांचेकडे विमा दि.5.3.2010 रोजी रु.1,00,000/-चा घेतला होता. पॉलिसी नंबर 272000/31/9/62000032 असून त्यांचा कालावधी 5.3.2010 ते 4.3.201 पर्यत विमा होता. दि.26.03.2010 रोजी दूपारी 1.30 वाजता अर्जदार तंञनिकेतन कॉलेजमधून स्कूटी नंबर एम.एच.-26-53400 या वाहनाने आपल्या घरी येत होता, त्यावेळेस साविञीबाई फूले मूलीची शाळेच्या समोर आला असता एक लहान मूलगा अचानक आल्याने ब्रेक लावले ज्यात अर्जदार खाली पडल्यामूळे अर्जदारास मार लागला. प्रथम शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, नंतर अर्जदाराने खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेतला. अपघातामूळे अर्जदाराचे उजवा पाय तोडावा लागला. त्यामूळे त्यांला उजवा पाय गमवावा लागला. उपचारावेळी पोलिस स्टेशन भाग्यनगर येथे अपघात नंबर 9/10 नोंदविण्यात आला. नांदेड येथील सरकारी दवाखान्यातील मेडीकल बोर्डने हॅन्डीकॅप झाल्याचे प्रमाणपञ अर्जदारास दिले. अपघातामूळे अर्जदाराचे नांदेड येथील कञूवार हॉस्पीटल येथे रु.32,000/- व हैद्राबाद येथील केयर हॉस्पीटलमध्ये रु.71,675/- असे एकूण रु.1,03,875/- इलाजासाठी खर्च लागला. अर्जदाराच्या वडिलांने दि.1.4.2010 रोजी पॉलिसीप्रमाणे मिळणा-या रक्कमेची मागणी केली संपूर्ण कागदपञ दाखल करुन केली. परंतु विमा रक्कम दिली नाही म्हणून अर्जदाराने दि.27.08.2010 रोजी वकिलामार्फत रु.1,00,000/- ची मागणी करणारी नोटीस दिली गैरअर्जदाराने नोटीसला उत्तर अथवा रक्कमही दिली नाही. पाय गमवावा लागल्यामूळे अर्जदारास कॉलेजला जाणे व अभ्यासावर दुष्परीणाम झाला आहे. असे करुन गैरअर्जदार यांनी सेवेत ञूटी केली आहे म्हणून अर्जदाराची मागणी आहे की, अर्जदारास रु.1,00,000/- व त्यावर दि.27.08.2010 पासून 18 टक्के व्याजाने मिळावेत तसेच मानसिक ञासापोटी रु.50,000/- मिळावेत. 2. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराचा दावा खोटा, निराधार व कायदयाशी विसंगत आहे म्हणून तो खर्चासह खारीज करावा असे म्हटले आहे. शालेय दप्तर नोंदीनुसार अर्जदाराची जन्म तारीख दि.31.03.1993 आहे. दावा दाखल करतेवेळी अर्जदाराचे वय हे 18 वर्षापेक्षा कमी आहे. यावरुनअसे दिसते की, अर्जदार हा सज्ञान नसल्यामूळे कायदयाप्रमाणे मान्यवर न्यायालयात दावा करता येणार नाही. अर्जदाराचा एक पाय गमवावा लागला व त्यासाठी दवाखान्यात रु.1,03,875/- खर्च आला व इतर खर्च रु.1,00,000/- हे मान्य नाही ते सिध्द करणे अर्जदाराची जबाबदारी आहे. कोणतेही कारण नसताना गैरअर्जदारास चूकीची नोटीस पाठविली आहे. अर्जदारास मानसिक ञास झाला हे म्हणणे चूकीचे आहे. दावा दाखल करण्यासंबंधी कोणतेही कारण घडलेले नाही, अर्जदार अज्ञान असून सदरील प्रकरण दाखल करण्यास कारण घडावे म्हणून दि.27.08.2010 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठविली व गेरअर्जदाराविरुध्द बेकायदेशीर दावा दाखल करण्यात आला. अर्जदाराचे संपूर्ण कागदपञे पाहिल्यानंतर गैरअर्जदार यांनी बंधपञ व पॉलिसीच्या शर्ती व अटीनुसार रु.50,000/- अर्जदारास देणेसंबंधी मंजूर करण्यात आले. अर्जदार सज्ञान नसल्यामूळे सदरील रक्कमेचा धनादेश अर्जदाराच्या वडिलांच्या नांवे श्रीकांत हिरालाल म्हेञे यांच्या नांवे काढणेसंबंधी अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दि.09.12.2010 रोजी अर्ज दिला. त्याप्रमाणे गैरअर्जदराने रु.50,000/- चा धनादेश क्रमांक 097049 दि.21.12.2010 बँक ऑफ इंडिया शाखा नांदेड अर्जदाराच्या पत्यावर नोंदणीकृत डाकेने दि.13.01.2011 रोजी पाठविण्यात आला आहे. असे करुन गैरअर्जदार यांनी कोणतीही ञूटीची सेवा दिली नाही म्हणून सदर तक्रार ही खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. 3. . अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेला लेखी जवाब व कागदपञ पाहून व दोन्ही पक्षकारातर्फे युक्तीवाद ऐकून जे मूददे उपस्थित होतात ते मूददे व त्यावरील सकारण उत्तरे खालील प्रमाणे, मूददे उत्तर 1. अर्जदार ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार हे अर्जदारानी मागितलेली विमा रक्कम देण्यास आता बांधील आहेत काय ? नाही. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे मूददा क्र.1 ः- 4. गैरअर्जदार हे पॉलिसी घेतल्याचे मान्यच करतात त्यामूळे अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे हे त्या पॉलिसीवरुन सिध्द होते म्हणून मूददा क्र.1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येत आहे. मूददा क्र. 2 व 3 ः- 5. गैरअर्जदारांनी या तक्रारीमध्ये त्याचे म्हणण्यासोबत महत्वाचे कागदपञही दाखल केलेले आहेत, ज्यामध्ये पॉलिसीच्या अटी, अर्जदाराचे शाळा सोडल्याचे प्रमाणपञाची नक्कल, अर्जदाराने स्वतःहून गैरअर्जदाराकडे तो 18 वर्षापेक्षा कमी वयाचा असल्यामूळे यामधील क्लेमची रक्कम त्यांचे वडिल श्रीकांत हिरालाल म्हेञे यांचे नांवे देण्यास हरकत नसल्याचे पञही आहे. एकंदर कागदपञावरुन असे दिसते की, अर्जदाराची जन्म तारीख दि.31.03.1993 अशी आहे. अर्जदाराने ही तक्रार त्यांचे वकिलामार्फत दि.15.12.2010 रोजी दाखल केली आहे. त्यामध्ये अर्जदाराने स्वतःचे वय 19 वर्ष लिहीलेले आहे जे सकृतदर्शनी चूक आहे. ही केस दाखल केली त्यावेळी अर्जदाराचे वय 18 वर्षाचे आंतच होते म्हणून अर्जदाराला मूळातच ही तक्रार दाखल करण्याजोगी नव्हती तरी अर्जदाराने स्वतःचे वय खोटे लिहून ही केस दाखल केली आहे ? वास्तविक पाहता ही तक्रार त्यांचे पालक/पिता श्रीकांत हिरालाल म्हेञे यांचे तर्फे दाखल करावयास पाहिजे होती तसे न करता ती अज्ञानाचे नांवे दाखल करुन चूक केली आहे त्यामूळे ती तक्रार खारीज होण्या योग्य आहे. 6. गैरअर्जदार यांनी त्यांचे म्हणण्याच्या परिच्छेद नंबर 12 मध्ये स्पष्ट लिहीलेले आहे की, अर्जदारास सदरी अपघातामूळे त्यांचे शरीराचा एकच अवयव म्हणजे पाय अपंग झाल्यामूळे अंपगत्व आलेले आहे. अर्जदाराने अंपगत्वाचे जे प्रमाणपञ दाखल केलेले आहे त्यावरुनही असे दिसते की, अर्जदाराचा एकच पाय कापावा लागला त्यामूळे त्यांना 55 टक्के अपंगत्व आलेले आहे. गैरअर्जदारांनी पॉलिसीच्या शर्ती व अटी दाखल केलेल्या आहेत. त्यावरुन जर एक पाय किंवा एक डोळा जर निकामी झाला असेल तर 50 टक्के पर्यतच नूकसान भरपाई मिळू शकते. गैरअर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे अर्जदाराचा एकच पाय अंपग झालेला असल्यामूळे तो फक्त रु.50,000/- घेण्यास पाञ आहे. गैरअर्जदाराचे लेखी म्हणणे असे आहे की, सदरी नूकसान भरपाईचा धनादेश क्रमांक 097049 दि.21.12.2010 चा रु.50,000/- चा बँक ऑफ इंडिया, शाखा नांदेड चा अर्जदाराच्या पत्त्यावर नोंदणीकृत डाकेने दि.13.01.2011 रोजी पाठविण्यात आला जो अर्जदारास मिळाला म्हणून गैरअर्जदाराने कोणतीही सेवेत ञूटी केलेली नाही. गैरअर्जदाराच्या वरील कथनावरुन व यूक्तीवादावरुन असे दिसते की, अर्जदाराने स्वतःच गैरअर्जदाराला लेखी अर्ज करुन कळविले होते की, तो वयाने 18 वर्षाचे आंत असल्यामूळे नूकसान भरपाईची रक्कम त्यांचे वडिलांचे नांवे पाठविण्यात यावी. त्यावरुन असे दिसते की, गैरअर्जदाराने सदरी धनादेश रु.50,000/- अर्जदाराच्या पत्त्यावर पंजीकृत डाकेने पाठविला आहे, तरीही अर्जदाराने ही तक्रार उचलून न घेण्याचे सौजन्य दाखविलेले नाही ? अथवा त्यांला सदरी रु.50,000/- चा धनादेश मिळाला तेही या मंचास कळविले नाही ? एंकदर कागदपञावरुन असे दिसते की, अर्जदाराला सदरील नूकसान भरपाईची पूर्ण रक्कम रु.50,000/- चा धनादेश क्रमांक 097049 दि.21.12.2010 रोजी मिळाला आहे. त्यामूळे अर्जदार आंता गैरअर्जदाराकडून कोणतीही रक्कम मागण्यास हक्कदर नाही. गैरअर्जदाराने सदरी पॉलिसीच्या अटीची पूर्तता केल्यामूळे आता ते कोणतीही रक्कम देण्यास बाध्य नाहीत. म्हणून ही तक्रार खारीज करण्या योग्य आहे. 7. गैरअर्जदाराच्या वकिलांनी यूक्तीवादाचे वेळी असे सांगितले की, अर्जदारावर या तक्रारीचा खर्च लावावा कारण त्यांनी ही तक्रार अज्ञान असून देखील सज्ञान दाखवून खोटी तक्रार दाखल केली आहे व पैसे उकळण्याचा प्रयत्न केला आहे. अर्जदाराचे त्या वेळचे वय पाहता असे दिसते की, त्यांला योग्य व बरोबर सल्ला मिळाला नसल्यामुळे त्या अज्ञानामध्येच ही घोडचूक केलेली असावी म्हणून त्यांचेवर या तक्रारीचा खर्च लावणे उचित होणार नाही असे आम्हाला वाटते. एकंदर वरील चर्चेवरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराची तक्रार ही विनाखर्च खारीज करण्यात येते. 1. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 2. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |