Maharashtra

Bhandara

CC/17/76

Smt. Jayashri W/o Jaydev Belkhode - Complainant(s)

Versus

National Insurance Company Ltd. - Opp.Party(s)

Adv. DR.Nirwan

20 Apr 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/17/76
( Date of Filing : 21 Jul 2017 )
 
1. Smt. Jayashri W/o Jaydev Belkhode
Mengapur post. palandur tah.lakhani
bhandara
maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. National Insurance Company Ltd.
bhandara
Bhandara
maharashtra
2. Laxmi HP Gramin Vitrak
Plot.Survey No580.2,Post.Palandur Tah.Lakhani
Bhandara
maharastra
3. Hindustan Petroleum Corporation Ltd.
17,Jamshedji Tata Road.Mumbai 400020
Mumbai
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
For the Complainant:Adv. DR.Nirwan, Advocate
For the Opp. Party: MR. V. M. DALAL, Advocate
Dated : 20 Apr 2019
Final Order / Judgement

                  (पारीत व्‍दारा श्रीमती वृषाली गौरव जागीरदार मा.सदस्‍या)

                                                                              (पारीत दिनांक – 20 एप्रिल, 2019)   

01.   तक्रारकर्तीने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रारकर्तीच्‍या तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालीलप्रमाणे-

02.  तक्रारकर्ती उपरोक्‍त नमुद पत्‍त्‍यावर राहत असून ती विरुध्‍द पक्ष क्रं. 3 गॅस वितरक कंपनीची विरुध्‍द पक्ष क्रं.2 यांचेमार्फत दिनांक 01/10/2015 पासून गॅस कनेक्‍शन धारक आहे. विरुध्‍द पक्ष क्रं.3 ही गॅस वितरक करणारी मुख्‍य यंत्रणा आहे. विरुध्‍द पक्ष क्रं. 2 हे विरुध्‍द पक्ष क्रं. 3 चे पालांदुर तालुका लाखनी जिल्‍हा भंडारा येथील अधिकृत गॅस वितरक आहे. तक्रारकर्तीचा गॅस कनेक्‍शनचा ग्राहक क्रमांक 605211 असा असुन तक्रारकर्तीचे गॅस कनेक्‍शन घरगुती वापराकरीता आहे. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष क्रं. 3 कंपनीचे गॅस कनेक्‍शन विरुध्‍द पक्ष क्रं. 2 कडून विकत घेतल्‍यामुळे ती विरुध्‍द पक्ष क्रं. 2 व 3 ची ग्राहक आहे. विरुध्‍द पक्ष क्रं. 2 ने स्‍वतःच्‍या व ग्राहकांच्‍या सुरक्षेसाठी विरुध्‍द पक्ष क्रं. 1 कडे गॅस गळतीमुळे होणा-या अपघाताची नुकसान भरपाई करण्‍यासाठी विमा पॉलीसी काढली असुन तिचा पॉलीसी क्रं. 281303/48/15/2000002206 आहे. सदर पॉलीसीचा कालावधी दिनांक 18/03/2016 ते दिनांक 17/03/2017 होता. सदर पॉलीसी अंतर्गत तक्रारकर्तीची Risk Covered असल्‍यामुळे तक्रारकर्ती ही विमा पॉलीसीची लाभधारक आहे असे तक्रारकर्तीने तक्रारीत नमुद केले आहे.

तक्रारकर्ती पुढे असे कथन करते की, दिनांक 27 जानेवारी 2017 रोजी सायंकाळी 7.30 वाजता तक्रारकर्ती स्‍वयंपाक करीत असतांना गॅसचे रेग्‍युलेटर जवळून गॅस गळती होवून गॅसने पेट घेतला व तिच्‍या घराला आग लागली. सदर आगीमध्‍ये तक्रारकर्तीचे घर तसेच घरातील अनेक मौल्‍यवान घरगुती वापराच्‍या वस्‍तु व धान्‍य जळाले.  शेजा-यांच्‍या मदतीने आग विझविण्‍यात आली, परंतु सदर अपघातामुळे तक्रारकर्तीच्‍या कुटुंबाला आर्थिक नुकसान, मानसिक व शारीरीक त्रास सहन करावा लागला.  सदर अपघात हा विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी गॅस सिलेंडर व्‍यवस्थित सिलबंद व सुरक्षिततेची खात्री न करता दिल्‍यामुळे त्‍यांचे निष्‍काळजीपणामुळे झाला असे तक्रारकर्तीने तक्रारीत नमुद केले आहे.    

      तक्रारकर्तीने पुढे असे नमुद करते की, तिने सदर अपघाताची माहिती विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांना दिली तसेच पोलीस स्‍टेशन पालांदुर ता. लाखनी जिल्‍हा भंडारा यांचेकडे तक्रार दाखल केली. पोलीस स्‍टेशन पालांदुर यांनी घटनेची चौकशी करुन स्‍टेशन डायरी क्रं. 27/2017 अन्‍वये दिनांक 27/01/2017 नुसार तक्रार नोंदविली.  त्‍याचप्रमाणे मौजा पालांदुर येथील तलाठी यांनी घटनास्‍थळाला प्रत्‍येक्ष भेट देवून तक्रारकर्तीच्‍या व इतर साक्षदारांसमक्ष नुकसानीबद्दल दिनांक 28/01/2017 रोजी पंचनामा करुन एकूण नुकसानीचे रुपये 1,75,800/- एवढे व्‍हॅलुएशन काढले. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीला पॉलीसीनुसार नुकसान भरपाई न दिल्‍याने तक्रारकर्तीने  विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 3 यांना आपल्‍या वकीलामार्फत दिनांक 31/03/2017 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 3 यांनी सदर नोटीसचे उत्‍तर देवून तक्रारकर्तीचे म्‍हणणे मान्‍य केले नाही. तक्रारकर्तीला नुकसान भरपाईची रक्‍कम न मिळाल्‍यामुळे तक्रारकर्तीने सदर तक्रार विरुध्‍द पक्षाविरुध्‍द दाखल केली असुन विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला पॉलीसीनुसार नुकसान भरपाईची रक्‍कम न देवून सेवेत त्रुटीपुर्ण व्‍यवहार कला व अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला असे घोषित करावे तसेच विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 3 ने तक्रारकर्तीला अपघाताचे दिनांक 27/01/2017 पासून प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत रुपये 1,75,800/- नुकसान भरपाईची रक्‍कम द.सा.द.शे. 12 टक्‍के व्‍याजासह द्यावी, शारीरीक मानसिक त्रासाकरीता रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- देण्‍याचे आदेशित व्‍हावे अशी विनंती केली आहे.

03.   मंचाद्वारे विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 3 यांना नोटीस पाठविण्‍यात आली असता विरुध्‍दपक्ष क्रं- 1 ने त्‍यांचे लेखी उत्‍तर अभिलेखाचे पृष्‍ठ क्रं. 45 वर दाखल केले आहे. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ने तक्रारकर्तीच्‍या तक्रारीस सक्‍त विरोध नोंदविला असुन तक्रारीस मंचाचे अधिकार क्षेत्र व Maintainability बाबत प्राथमिक आक्षेप नोंदविला आहे. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ने त्‍यांचे प्राथमिक आक्षेपात असे नमुद केले आहे की, विमा कंपनीने विरुध्‍द पक्ष क्रं. 2 लक्ष्‍मी एच. पी. गॅस ग्रामीण वितरक पालांदुर, ता. लाखनी, जिल्‍हा भंडारा यांच्‍या नावाने एल.पी.जी. गॅस व्‍यवसायिकास सामायिक विमा पॉलीसी दिली आहे. सदर पॉलीसी ही विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांचे नावे असुन त्‍याअंतर्गत निर्माण होणारे दावे हे सार्वजनिक दायीत्‍व स्‍वरुपाचे असल्‍याने सदर दावे चालविण्‍याचा अधिकार अपीलेट अॅथारीटी यांना आहे. त्‍यामुळे सदरचा दावा चालविण्‍याचा अधिकार या न्‍यायमंचास नसल्‍याने सदरची तक्रार Maintainability व अधिकार क्षेत्राच्‍या मुद्यावर खारीज करण्‍यात यावी असा प्राथमिक नोंदविला आहे. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीच्‍या तक्रारीतील परिच्‍छेद निहाय कथन नाकबुल केले आहे.

      विरुध्‍द पक्ष यांनी आपल्‍या विशेष कथनात नमुद केले आहे की, सदरहु प्रकरणांत घेटनेची माहिती मिळाल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष यांनी त्‍यांचे नोंदणीकृत सर्व्‍हेअर श्री. संतोष कुलकर्णी यांची नुकसानीची किंमत ठरविण्‍यासाठी सर्व्‍हेअर म्‍हणून नियुक्‍ती केली. सदर सर्व्‍हेअर यांनी मोक्‍यावर जाऊन घटनास्‍थळ पंचनामा तसेच बिलाचे कागदपत्र यांची योग्‍य चौकशी व पडताळणी करुनच आपला सर्व्‍हे अहवाल दिनांक 03/09/2017 रोजी विरुध्‍द पक्ष यांना सादर केला. सदर सर्व्‍हे अहवालानुसार एकूण नुकसानीची रक्‍कम रुपये 51,575/- नमुद केलेली आहे. त्‍या सर्व्‍हे अहवालानुसार विरुध्‍द पक्ष यांनी क्‍लेम डिसचार्ज व्‍हाऊचर हा तक्रारकर्तीच्‍या स्‍वाक्षरीसाठी विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांनी दिनांक 16/01/2018 रोजी पाठविले, परंतु तक्रारकर्ती यांची सदरहु व्‍हाऊचर स्‍वाक्षरी करुन आजपावेतो विरुध्‍द पक्ष यांना परत पाठविले नाही. विरुध्‍द पक्ष यांनी पुढे असे नमुद केले की, त्‍यांनी नियुक्‍त केलेले सर्व्‍हेअर हे अॅप्रुव्‍ड व्‍हॅलुयर असुन ते तांत्रीक दृष्‍टया अर्हता असलेले सर्व्‍हेअर आहे, त्‍यामुळे त्‍यांनी दिलेला सर्व्‍हे अहवाल योग्‍य आहे. विरुध्‍द पक्ष हे आजही सर्व्‍हेअर श्री. कुलकर्णी यांनी दिलेल्‍या सर्व्‍हे अहवालानुसार नुकसानीची रक्‍कम रुपये 51,575/- आजही तक्रारकर्तीस देण्‍यास तयार आहेत. विरुध्‍द पक्ष यांची प्रकरणांत कोणतीही चुकी नाही, त्‍यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्‍याची विनंती विरुध्‍द पक्ष यांनी केली आहे.

04.   विरुध्‍द पक्ष क्रं. 2 व 3 यांना मंचाची नोटीस मिळूनही ते प्रकरणांत हजर न झाल्‍याने त्‍यांचेविरुध्‍द प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचा आदेश पारीत करण्‍यात आला.

05.  तक्रारकर्तीने तक्रारीचे पृष्‍टयर्थ दस्‍तऐवज यादी पृष्‍ट क्रं- 15 नुसार एकूण-10 दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍या असून, पृष्‍ठ क्रं- 49 वर तक्रारकर्तीने शपथपत्र दाखल केले असून, पृष्‍ठ क्रं- 65 नुसार तक्रारकर्तीने लेखी युक्‍तीवाद दाखल केला आहे.

06.  विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे लेखी उत्‍तर दाखल करण्‍यात आले. विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे भंडारा येथील वरिष्‍ठ शाखा प्रबंधकांनी पुराव्‍या  दाखल पान क्रं- 54 वर शपथपत्र दाखल केले असुन, पृष्‍ठ क्रं- 69 वर विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ने लेखी युक्‍तीवाद दाखल केला आहे.

07.  तक्रारकर्तीची तक्रार, शपथपत्र, लेखी युक्तिवाद, विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे लेखी उत्‍तर, शपथपत्र व लेखी युक्तिवाद तसेच उभय पक्षाने दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांचे मंचातर्फे अवलोकन करण्‍यात आले. तक्रारकर्ती तर्फे वकील श्री डी. आर. निर्वाण आणि विरुध्‍दपक्ष  क्रं. 1 विमा कंपनी तर्फे वकील श्री व्‍ही.एम.दलाल यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला, त्‍यावरुन मंचाचा निष्‍कर्ष पुढील प्रमाणे.      

                                               :: निष्‍कर्ष ::

08.  तक्रारकर्ती दिनांक 27 जानेवारी 2017 रोजी सायंकाळी 7.30 वाजता आपल्‍या घरी स्‍वयंपाक करीत असतांना गॅस गळती होवून गॅसने पेट घेतला व तिच्‍या घराला आग लागली ही बाब उभय पक्षात वादातीत नाही. सदरहु घटना विमा कालावधीत घडलेली असल्‍याने ही बाब सुध्‍दा  उभय पक्षात वादातीत नाही.  

विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी असा आक्षेप घेतला की, विमा कंपनीने विरुध्‍द पक्ष क्रं. 2 लक्ष्‍मी एच. पी. गॅस ग्रामीण वितरक पालांदुर, ता. लाखनी, जिल्‍हा भंडारा यांच्‍या नावाने एल.पी.जी. गॅस व्‍यवसायिकास सामायिक विमा पॉलीसी दिली आहे आणि सदर पॉलीसी ही विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांचे नावे असुन त्‍याअंतर्गत निर्माण होणारे दावे हे सार्वजनिक दायीत्‍व स्‍वरुपाचे असल्‍याने सदर दावे चालविण्‍याचा अधिकार अपीलेट अॅथारीटी यांना असल्‍याने तक्रारकर्तीची तक्रार Maintainability व अधिकार कक्षेच्‍या बाहेर असल्‍यामुळे तक्रार खारीज करावी असा आक्षेप घेतला आहे.  मंचाचे मते विरुध्‍द पक्ष क्रं. 2 व 3 यांनी तक्रारकर्तीला गॅस कनेक्‍शन दिलेले आहे व विरुध्‍द पक्ष 1 यांनी विमा उतरविला आहे. सदर विम्‍याची तक्रारकर्ती लाभार्थी असल्‍याकारणाने विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांची ग्राहक आहे तसेच एल.पी.जी गॅस ट्रेडर कम्‍बाइन्‍ड पॉलीसी काढली आहे. सदर पॉलीसीची तक्रारकर्ती इतर गॅस धारका समवेत लाभार्थी असल्‍याने सदरची तक्रार चालविण्‍याचा अधिकार मंचास आहे, त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रं.1 यांनी घेतलेल्‍या आक्षेपाला काहीही तथ्‍य उरत नाही.

09.   तक्रारकर्तीच्‍या म्‍हणण्‍यानुसार मौजा पालांदुर येथील तलाठी यांनी घटनास्‍थळाला प्रत्‍यक्ष भेट देवून तक्रारकर्तीच्‍या व इतर साक्षदारांसमक्ष नुकसानीबद्दल दिनांक 28/01/2017 रोजी पंचनामा केला व नुकसानीचे एकूण रुपये 1,75,800/- एवढे व्‍हॅलुएशन काढलेले आहे. या उलट विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांचे म्‍हणण्‍यानुसार विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी नियुक्‍ती केलेले सर्व्‍हेअर श्री. संतोष कुलकर्णी यांनी मोक्‍यावर जाऊन घटनास्‍थळ पंचनामा तसेच बिलाचे कागदपत्रांची योग्‍य चौकशी व पडताळणी करुन आपला सर्व्‍हे अहवाल दिनांक 03/09/2017 रोजी विरुध्‍द पक्ष यांना सादर केला व सदर सर्व्‍हे अहवालानुसार विरुध्‍द पक्ष क्रं. 1 हे तक्रारकर्तीस आजही नुकसानीची एकूण रक्‍कम रुपये 51,575/- देण्‍यास तयार आहेत. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी तयार केलेले व्‍हाऊचर तक्रारकर्तीकडे करीता पाठविले होते व सदर व्‍हाऊचर वर तक्रारकर्तीने स्‍वाक्षरीकरुन आजपावेतो पाठविलेले नसल्‍याने विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ने मंजूर केलेली रक्‍कम तक्रारकर्तीला देता आली नाही.  

मंचाद्वारे अभिलेखावर दाखल दस्‍ताऐवजांचे काळजीपूर्वक अवलोकन करण्‍यात आले. तक्रारकर्तीतर्फे तलाठी यांचा अहवाल व विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी पृष्‍ठ क्रं. 59 ते 62 वर सर्व्‍हेअरचा अहवाल दाखल करण्‍यात आला आहे. सदर अहवालाचे अवलोकन केले असता सदरचा सर्व्‍हे अहवाल Approved Surveyor यांनी तयार केला असल्‍याचे दिसून येते, परंतु सदरचा सर्व्‍हे अहवाल सर्व्‍हेअर यांच्‍या शपथपत्राशिवाय दाखल करण्‍यात आल्‍याचे दिसून येते. या अनुषंगाने मंचाने आपली भिस्‍त मा. राष्‍ट्रीय आयोग यांनी दिलेल्‍या National Insurance Co. Ltd V/s Mohd. Ishaq 2012 (1) CPR 386 (NC) या न्‍याय निवाडयावर ठेवली आहे.

सदरच्‍या न्‍याय निवाडयामध्‍ये खालीलप्रमाणे नमुद केले आहे. “6 Therefore, in our view, the district forum as well as the State Commission have very rightly rejected the report of the surveyor on the ground it is not supported by the affidavit of its author”

हातातील प्रकरणामध्‍ये सुध्‍दा विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांचे Approved Surveyor यांचा सर्व्‍हे अहवाल शपथपत्राशिवाय दाखल केलला आहे, त्‍यामुळे सदरचा सर्व्‍हे अहवाल ग्राहय धरता येणार नाही असे मंचाचे मत आहे.

Reliance General Ins. Co. Ltd. V/s Sunit Kuma Saha & Anr.

As there is no provision in the Insurance act for a Surveyor to be appointed by the Complainant/policy holder and only provision is that the insurance co. can appoint the Surveyor for accessing the loss.

हातातील प्रकरणांत तक्रारकर्तीने तलाठी यांचा अहवाल दाखल केला आहे. सदरचा अहवाल नुकसान भरपाईची रक्‍कम देतांना ग्राहय धरता येणार नाही.

विरुध्‍द पक्ष क्रं. 2 व 3 यांनी आप आपले कर्तव्‍य योग्‍य रितीने पार पाडल्‍याचे दिसून येत असल्‍याने त्‍यांचेविरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

10.   मंचाचे मते सदर प्रकरणांत पृष्‍ठ क्रं. 17 ते 19 वर दाखल विमा पॉलीसीच्‍या प्रतीचे अवलोकन केले असता, Section X नुसार Excess: 0.75% of Public liability Limit subject to maximum Insured Value of Rupees 1 lakh नुसार रुपये 99,250/- (1,00,000 – 0.75% = 99,250) घटना घडलेल्‍या दिनांकापासून म्‍हणजेच दिनांक 27/01/2017 पासून तक्रारकर्ती विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांचेकडून द.सा.द.शे. 9% व्‍याजदाराने मिळण्‍यास पात्र आहे तसेच सदर प्रकरणांत तक्रारकर्तीला मानसिक व शारीरीक त्रास सहन करावा लागला असल्‍यामुळे मानसिक व शारीरीक त्रासापोटी रुपये 10,000/- आणि तक्रार खर्चा दाखल रुपये 5,000/- विरुध्‍द पक्ष यांचेकडून मिळण्‍यास पात्र आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

11.   उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

                                       ::आदेश::

(01)  तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

(02)  विरुध्‍दपक्ष क्रं-(1) विमा कंपनीला आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्तीला विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई पोटी रुपये 99,250/-(अक्षरी रुपये नव्‍यानऊ हजार दोनशे पन्‍नास फक्‍त) घटना घडलेल्‍या दिनांकापासून म्‍हणजेच दिनांक 27/01/2017 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्‍याजासह तक्रारकर्तीला द्यावी.

(03) विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष क्रं-(1) विमा कंपनीने तक्रारकर्तीला  द्यावेत.

(04)  विरुध्‍दपक्ष क्रं. (2) व (3) यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं-(1) यांनी निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत अदा करावे.

(06) निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध       करुन देण्‍यात याव्‍यात.

(07)  तक्रारकर्तीला “ब” व “क” फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.