जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/219 प्रकरण दाखल तारीख - 07/09/2010 प्रकरण निकाल तारीख – 06/12/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. पल्लवी पि. रुग्मागंदराव संगनवार वय 23 वर्षे, धंदा व्यवसाय शिक्षण (विद्यार्थीनी) अर्जदार रा. एनडी-42,टी-2,12/3 वैभव नगर, हडको, नांदेड विरुध्द. 1. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. 205 बी/2, ई वर्ड, कॉसमॉस कमर्शिअल कॉम्पलेक्स, न्यू शाहुपूरी स्टेशन रोड,कोल्हापूर-416 001. 2. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. शाखा कार्यालय, नगीना घाट रोड, गैरअर्जदार नांदेड मार्फत व्यवस्थापक. 3. सहकारी महर्षि श्यामरावजी कदम होमिओपॅथीक मेडीकल कॉलेज व संशोधन केंद्र, सिडको नविन नांदेड मार्फत प्राचार्य. अर्जदारा तर्फे वकील - अड.आर.एन.कूलकर्णी गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील - अड.रियाझूला खॉन गैरअर्जदार क्र.3 तर्फे वकील - कोणीही हजर नाही. निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुवर्णा देशमुख, सदस्या ) अर्जदार हा नवीन नांदेड सिडको येथील कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून ती नांदेड येथील रहीवासी आहे. सन 2005-06 या शैक्षणीक वर्षात महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यासाठी संचालक वैद्यकीय शिक्षण महाराष्ट्र राज्य व नॅशनल इन्शुरन्स कंपनी कोल्हापूर यांनी अमृत शिक्षा योजना ही पॉलिसी काढली. त्या पॉलिसीच्या अटीनुसार जर विद्यार्थ्याच्या पालकाचा मृत्यू झाला किंवा कायम अपंगत्व आले तर विद्यार्थ्याच्या शिक्षणाची जबाबदारी ही गैरअर्जदार क्र.1 हे घेतील व पालकाच्या मृत्यूपोटी विद्यार्थ्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी विमा रक्कम रु.5,00,000/- देतील. अर्जदार ही बीएचएमएस प्रथम वर्षात शिकत आहे व ती प्रथम वर्षाला असतानाच तिच्या वडिलांचा Cardio Respiatory Arrest मूळे मृत्यू झाला म्हणून तिने गैरअर्जदार यांचेकडे विमा दावा रक्कम मिळण्यासाठी अर्ज केला पण आजपर्यत तिला विमा रक्कम मिळाली नसल्यामूळे तिला मंचात तक्रार दाखल करावी लागली. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, ती गैरअर्जदार क्र.3 सहकारी महर्षि श्यामरावजी कदम, होमिओपॅथीक मेडीकल कॉलेज व संशोधन केंद्र, सिडको नविन नांदेड यांचेकडे बीएचएमएस प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. तिने सन 2005-06 या शैक्षणीक वर्षात बीएचएमएस प्रथम वर्षासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. दि.20.12.2005 रोजी धन्वंतरी न्यूरो सेंटर नांदेड येथे तिच्या वडिलांचा Cardio Respiatory Arrest मूळे मृत्यू झाला. त्यानंतर तिने गैरअर्जदार क्र.3 मार्फत अमृत शिक्षा योजना अंतर्गत विमा रक्कम रु.5,00,000/- मिळण्यासाठी गैरअर्जदार क्र.1 यांचे कार्यालयात क्लेम दाखल केला. अर्जदार ही विमा रक्कम मिळण्यास पाञ होती तरी गैरअर्जदार कंपनीने दि.8.9.2009 रोजी बेकायदेशीररित्या अर्जदाराचा विमा दावा फेटाळला म्हणून अर्जदार हिने न्याय मंचासमोर तक्रार दाखल केली. अर्जदार हिचा विमा हप्ता गैरअर्जदार क्र.3 यांनी वेळेवर भरला होता व अर्जदारास वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जवळपास रु.1,00,000/- दरवर्षी खर्च येतो. तिला ही रक्कम मिळणे खूप आवश्यक होते तरी देखील गैरअर्जदार यांनी ही रक्कम दिली नाही व ही सेवेत ञूटी आहे अशा प्रकारचे निवेदन अर्जदार हिने केले आहे. अर्जासोबत अर्जदार हिने अमृत शिक्षा योजनेच्या अटी व शर्ती तसेच अर्जदार हिचे वडील Cardop Respiatory Arrest मूळे दि.20.12.2005 रोजी मृत्यू पावले त्या बाबतचे प्रमाणपञ दाखल केले आहे. दि.8.9.2009 रोजीचा गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा विमा दावा फेटाळला त्याबददलचे पञ दाखल केले आहे. तसेच शपथपञ ही दाखल केले आहे. दि.29.9.2008 रोजी गैरअर्जदार यांचेकडे तिने क्लेम मिळण्यावीषयी अर्ज केला होता ते पञही दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्र.3 कॉलेज यांनी बीएचएमएस प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याची यादी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना पाठविली होती. ज्या यादीमध्ये तिचे नांव आहे ती यादी दि.22.11.2005 रोजी अर्जदार हिने गैरअर्जदार क्र.3 कॉलेज यांचेकडे फिस भरल्याची पावती दाखल केली आहे. तसेच वर्ष 2005-06 या वर्षात तिने बीएचएमएस प्रथम वर्षात प्रवेश घेतला होता या बददलचे प्रमाणपञ अर्जदार यांनी दाखल केलेंडर आहे. गैरअर्जदार क्र.3 हे हजर झाले नाही म्हणून त्याचे विरोधात एकतर्फा आदेश करण्यात आला. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी आपले लेखी म्हणणे दिलेले आहे. ज्यामध्ये त्यांचे म्हणण्यानुसार पॉलिसी ही दि.17.10.2006 ते 16.10.2011 या कालावधीसाठी आहे. तसेच अर्जदार हिने रु.663/- पॉलिसीचा हप्ता भरल्याची पावती दाखल केलेली नाही. अर्जदाराच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर पी एम रिपोर्ट, पोलिस रिपोर्ट, डेथ कॉज, एफ.आय.आर., कूठलेही पोलिस पेपर्स दाखल केलेले नाहीत. त्यांचा मृत्यू हा पॉलिसी कालावधी झालेला नाही. तसेच सदरचा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू आहे म्हणून अर्जदाराचा क्लेम नामंजूर केलेला आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी शपथपञ दाखल केलेले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपञानुसार खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार ही ग्राहक आहे काय होय. 2. गैरअर्जदार हे अर्जदारास विमा रक्कम देण्यास बांधील आहेत काय नाही. 3. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- सन 2005-06 या शैक्षणीक वर्षात सर्व वैद्यकीय कॉलेमध्ये प्रथम वर्षात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यासाठी संचालक वैद्यकीय शिक्षण महाराष्ट्र राज्य व नॅशनल इन्शुरन्स कंपनी कोल्हापूर यांनी अमृत शिक्षा योजना ही पॉलिसी काढली होती व यांच कालावधीमध्ये अर्जदार हिने गैरअर्जदार क्र.3 यांचे कॉलेजमध्ये बीएचएमएस प्रथम वर्षाला प्रवेश घेतला होता. कॉलेज मधून विम्यासाठी योग्य अशा विद्यार्थ्याची यादी गैरअर्जदार यांचेकडे पाठविली होती. त्या यादीमध्ये अर्जदार हिचे नांव आहे म्हणून अर्जदार ही गैरअर्जदार यांची ग्राहक आहे करिता मूददा क्र.1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. मूददा क्र.2 ः- अर्जदार हिने वर्ष 2005 मध्ये बीएचएमएस कॉलेज नांदेड येथे फिस भरुन प्रवेश दि.22.11.2005 रोजी घेतल्याची पावती दाखल केली आहे. यावरुन तिने वर्ष 2005-06 या वर्षात प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला आहे स्पष्ट होते. गैरअर्जदार यांनी आपल्या लेखी म्हणण्यात असे म्हटले आहे की, सदरची पॉलिसी ही दि.17.6.2006 ते दि.16.10.2011 या वर्षासाठी कव्हर होती व अर्जदार हिने वर्ष 2005-06 या वर्षात प्रवेश घेतला होता. यावरुन असे स्पष्ट होते की, जून 2006 ते मे 2007 व त्यानंतर दि.16.10.2011 या कालावधीसाठी जे प्रथम वर्षात शिकत होते ते विद्यार्थी या योजनेस पाञ होते. अर्जदार ही वडिलांच्या मृत्यूमूळे नापास होऊन तिचा प्रवेश वर्ष 2005 -06 या वर्षात असला तरी परत वर्ष 2006-07 ला देखील ती प्रथम वर्षात होती हे स्पष्ट होते. अर्जदार हिने दाखल केलेले मृत्यू प्रमाणपञ पाहिले असता त्यावर दि.20.12.2005 हा दिनांक आहे. म्हणजे त्या दिवशी तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. म्हणजेच अर्जदार वर्ष 2005-06 मध्ये प्रवेश घेतला त्यावेळी तिचे वडील गेले. सदरील योजना ही वर्ष 2006-2011 अशी लागू झाली. अर्जदार हिच्या वडिलांचा मृत्यू पॉलिसी कालावधीत झालेला नाही हे कागदपञावरुन सिध्द होते. त्यामूळे अर्जदार ही विमा दावा रक्कम मिळण्यास पाञ नाही या नीर्णयापर्यत हे मंच आलेले आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खारीज करण्यात येतो. 2. पक्षकारांना आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकारांना निकाल कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |