Maharashtra

Nagpur

CC/287/2018

SATISH RAMESHWARDAS GOYAL - Complainant(s)

Versus

NATIONAL INSURANCE COMPANY LTD., THROUGH DIVISIONAL MANAGER - Opp.Party(s)

ADV. KAUSHIK MANDAL

16 Apr 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/287/2018
( Date of Filing : 10 Apr 2018 )
 
1. SATISH RAMESHWARDAS GOYAL
1127, CENTRAL AVENUE, NEAR HOTEL HARMONY, GANDHIBAGH, NAGPUR-440002
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. NATIONAL INSURANCE COMPANY LTD., THROUGH DIVISIONAL MANAGER
PAUL COMMERCIAL COMPLEX, D.O.II ND AJNI SQUARE, WARDHA ROAD, NAGPUR-15
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. KAUSHIK MANDAL, Advocate for the Complainant 1
 ADV. C. A. ANTHONY, Advocate for the Opp. Party 1
Dated : 16 Apr 2021
Final Order / Judgement

   आदेश

मा. सदस्‍या, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या सदस्‍या -

 

  1.             तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात नमूद केले की,  त्‍याचा ट्रक क्रं. CG-04,JC-6037 या वाहनाचा विरुध्‍द पक्षाकडून दि. 15.03.2014 ते 14.03.2015 या कालावधीकरिता विमा मुल्‍य रक्‍म रुपये 18,50,000/- करिता पॉलिसी क्रं. 281100/31/13/6300006329 अन्‍वये विमा काढला होता. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला विमा पॉलिसी निर्गमित केली परंतु त्‍यासोबत अटी व शर्ती नमूद नव्‍हत्‍या, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला पॉलिसीच्‍या शर्ती व अटी माहिती नव्‍हत्‍या.  

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याच्‍या वाहन चालकाने वाहन सनफॅलग आर्यन स्‍टील कंपनी लि. भंडाराला कोळसा पोहचवून आल्‍यावर त्‍याचे वाहन दि. 07.11.2014 ला रात्री 9.00 वा.  लॉक करुन सुर्यानगर राजीव गांधी शाळेसमोर, लता मंगेशकर ग्राऊंडवर पार्क केले व वाहनाला लॉक करुन तो आंघोळ व जेवणाकरिता आपल्‍या घरी गेला. रात्री 11.30 वा. वाहन चालक वाहन बघण्‍याकरिता परत आला असता त्‍याला वाहन तिथे दिसले आणि त्‍यानंतर तो झोण्‍याकरिता गेला. त्‍यानंतर दि. 08.11.2014 ला सकाळी 4.30 वा. वाहन चालक ट्रक घेण्‍याकरिता गेला असता त्‍याला तिथे ट्रक  आढळून न आल्‍याने वाहन चालकाने सर्वत्र ट्रकचा शोध घेतला, परंतु ट्रक मिळाला नाही, म्‍हणून त्‍याने तक्रारकर्त्‍याला ट्रक चोरीबाबत कळविले. तक्रारकर्त्‍याने  वाहन चालकाला संबंधित पोलिस स्‍टेशनला माहिती देण्‍याबाबत कळविले व त्‍यानंतर तक्रारकर्ता व त्‍याच्‍या मित्राने घटनास्‍थळाला भेट दिली व वाहनाचा शोध घेतला. चालकाच्‍या मते ट्रक मध्‍ये कमी डिझेल असल्‍यामुळे चोर वाहन दूरवर चालवू शकत नाही. परंतु बराच वेळ शोध घेऊन ही वाहन मिळाले नाही. म्‍हणून तक्रारकर्ता वाहनचालकासोबत कळमना पोलिस स्‍टेशनला गेला. त्‍यानंतर पोलिस अधिकारी, तक्रारकर्ता व त्‍याच्‍या मित्राने वाहनाचा शोध घेतला, परंतु तरी ही वाहन न मिळाल्‍यामुळे दि. 08.11.2014 ला आय.पी.सी.चे कलम 379 अंतर्गत गुन्‍हा दाखल केला  व B & C Massage Flash करण्‍यात आला आणि एफ.आय.आर.क्रं. 357/2014 अन्‍वये गुन्‍हा दाखल करुन घटनास्‍थळ पंचनामा करण्‍यात आला.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याने तात्‍काळ दि. 08.11.2014 ला मोबाईल फोनवरुन कळमना पोलिस स्‍टेशनमधून श्री. घाटोळे, (विकास अधिकारी) डेव्‍हल्‍पमेंट अधिकारी यांना ट्रक चोरीबाबत माहिती दिली व विरुध्‍द पक्ष विमा कंपनीला सूचित करण्‍याबाबत सांगितले. त्‍यांनतर तक्रारकर्ता दि. 10.11.2014 ला विरुध्‍द पक्षाच्‍या कार्यालयाला आवश्‍यक कागदपत्रासह व एफ.आय.आर.च्‍या प्रतिसह भेट दिली आणि वाहन चोरीबाबत सूचना दिली तसेच क्‍लेम फॉर्म पुरविण्‍याबाबत सांगितले. विरुध्‍द पक्षाने मुंबई वरुन चौकशी अधिका-याची नेमणूक केली. सदरच्‍या  चौकशी अधिका-याने  तक्रारकर्त्‍याची  भेट घेतली व वाहन चालकाच्‍याबाबत (जबाब) स्‍टेटमेंट देण्‍याबाबत व चोरीबाबत माहिती देण्‍यास सांगितले व ती तक्रारकर्त्‍याने दि. 26.11.2014 ला पुरविली. विरुध्‍द पक्षाने नेमणूक केलेल्‍या चौकशी अधिका-याने कळमना पोलिस स्‍टेशनला व घटनास्‍थळाला भेट दिली व वाहनचालका सोबत चर्चा केली आणि तक्रारकर्त्‍याला दस्‍तावेज सादर करण्‍याबाबत सांगितले. त्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने वाहनाचे सर्व दस्‍तावेज,  दोन चाबीसह, एन.सी.आर.बी. अहवाल आणि पोलिस अंतिम अहवाल सादर केला आणि विरुध्‍द पक्षाला विमा दावा लवकर निकाली काढण्‍याबाबत विनंती केली.

 

  1.       तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याने विरुध्‍द पक्षाला त्‍याच्‍या निर्देशानुसार विमा दावा फॉर्मसह, एफ.आय.आर.वाहनाची कागदपत्रे सादर केली. तसेच चौकशी अधिका-याला त्‍याच्‍या मागणीच्‍या यादीनुसार वाहनाच्‍या मुळ कागदपत्राच्‍या प्रती सादर केलेल्‍या आहेत. तसेच सबगोरेशन, इन्‍टीम्निटी (उपराज्‍यतील नुकसानभरपाई)  व इतर आवश्‍यक दस्‍तावेज सादर केले होते. त्‍याचप्रमाणे तक्रारकर्त्‍याने आवश्‍यक दस्‍तावेज, चोरीच्‍या ठिकाणाचे सी.सी.टी.व्‍ही.फुटेज पाठवून ही आणि अनेक वेळा दूरध्‍वनीवरुन विमा दावा निकाली काढण्‍याकरिता संदेश देऊन ही प्रत्‍येक वेळी विरुध्‍द पक्षाने विमा दावा प्रोसेस मध्‍ये असल्‍याचे कळविले परंतु तक्रारकर्त्‍याचा विमा दावा मंजूर अथवा नामंजूर ही केला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन मागणी केली की, तक्रारकर्त्‍याची  तक्रार मंजूर करण्‍यात यावी व विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाची (ट्रक) विमामुल्‍य रक्‍कम रुपये 18,50,000/- व त्‍यावर दि. 18.11.2014 पासून 14 टक्‍के दराने व्‍याजासह  रक्‍कम देण्‍याचा आदेश द्यावा.  तसेच शारीरिक व मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश द्यावा.

 

  1.      विरुध्‍द पक्षाने आपला लेखी जबाब दाखल नमूद केले की,  तक्रारकर्त्‍याने त्‍याचा विमा दावा माहे नोव्‍हेबंर 2014 ला सादर केला असून त्‍याने जुलै 2016 पर्यंत विमा दावा निकाली काढण्‍याकरिता लागणारे आवश्‍यक दस्‍तावेज सादर केले नाही. तक्रारकर्त्‍याला दस्‍तावेज सादर करण्‍याकरिता अनेक स्‍मरणपत्रे पाठविली, परंतु तक्रारकर्त्‍याने त्‍याला प्रतिसाद दिला नाही, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची सदरची तक्रार दाखल होण्‍यास पात्र नाही. तक्रारकर्त्‍याने मंचासमक्ष तक्रार दाखल करण्‍यापूर्वी विरुध्‍द पक्षाला विमा दावा निकाली काढण्‍याबाबत नोटीस दिली नाही किंवा विरुध्‍द पक्षाशी संपर्क ही  साधला नाही. तसेच विरुध्‍द पक्षाच्‍या प्रश्‍नाचे उत्‍तर न देता  मा. मंचासमोर विमा दावा मिळण्‍याबाबतचा तक्रार दाखल केली. तक्रारकर्त्‍याने ट्रक चोरीला गेल्‍याची वर्णन केलेली कथा ही चुकिची आहे.  तक्रारीमध्‍ये तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनचालकाने वाहनाच्‍या सुरक्षेच्‍या दृष्‍टीने वाहन जिथे पार्क केले होते तिथे काय काळजी घेतली होती. तसेच तक्रारीच्‍या समर्थनार्थ वाहन चालकाचे किंवा घटनास्‍थळावरील राहणा-या व्‍यक्‍तीचे प्रतिज्ञापत्र दाखल केले नाही. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या निर्णयापूर्वी प्रस्‍तुत तक्रार मा. मंचासमोर  दाखल केली आहे.  

 

  1.      विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की, जर सदरची तक्रार चालविण्‍यात आली तर तर या ठिकाणी इंडिया मोटर टेरिफचे कलम 5 प्रोव्‍हीजनचे उल्‍लंघन होईल. तक्रारकर्त्‍याने विमाकृत वाहनाचे नोंदणीकृत प्रमाणपत्र (दस्‍तावेज क्रं. 4) हे (एच.पी.लीज अॅग्रीमेन्‍ट ) बॅंकेकडे गहाण ठेवण्‍यात आलेले आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने अलाहाबाद बॅंकेला आवश्‍यक पक्षकार करणे आवश्‍यक होते. तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले ना हरकत प्रमाणपत्र हे दि. 22.06.2014 ची असून ती पूर्णतः चुकिचे आहे. ना हरकत प्रमाणपत्र मिळालेल्‍या तारखेला तक्रारकर्त्‍याकडे किती रक्‍कम शिल्‍लक होती हे कळत नाही. बॅंकेकडून माहे मार्च 2014 ला प्राप्‍त करण्‍यात आलेल्‍या विवरणपत्रामध्‍ये शिल्‍लक रुपये 4,32,478/- दाखवित आहे. बॅंकेला तीन महिन्‍यात उर्वरित शिल्‍लक रक्‍कम अदा केल्‍याचे एक ही दस्‍तावेज तक्रारकर्त्‍याने आपल्‍या कथनाच्‍या समर्थनार्थ दाखल केलेले नाही. बॅंकेने दिलेले स्‍टेटमेंट बघितले तर तक्रारकर्त्‍याने बॅंकेकडे नियमितपणे कर्ज हप्‍ते भरलेले नाही. तक्रारकर्त्‍याला बॅंकेचे विवरणपत्र सादर करण्‍याकरिता आणि आर.टी.ओ.ला माहिती देऊन त्‍यावरील हायपोथिकेशन चार्जेस रिमूव्‍ह करण्‍याकरिता कळविले होते. वाहनाच्‍या नोंदणी प्रमाणपत्रावरील हायपोथिकेशन चार्जेस जो पर्यंत रिमूव्‍ह होत नाही, तो पर्यंत incused does not become entitle for any mount if allowed . विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला कोणत्‍याही प्रकारची दोषपूर्ण सेवा दिलेली नाही व अनुचित व्‍यापारी पध्‍दतीचा अवलंब केलेला नाही. त्‍यामुळे सदरची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केलेली आहे. 

 

  1.       उभय पक्षाने दाखल केलेल्‍या दस्‍तावेजाचे अवलोकन केले असता व उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेतले व त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

                  अ.क्रं.    मुद्दे                                                         उत्‍तर

 

1 तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?        होय

 

2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा निकाली न

काढून सेवेत त्रुटी केली काय ?                      होय 

 

  1.   काय  आदेश ?                                अंतिम आदेशाप्रमाणे

 

  •        निष्‍कर्ष                       

 

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत - तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून   ट्रॅक क्रं. CG-04, JC-6037 या वाहनाचा दि. 15.03.2014 ते 14.03.2015 या कालावधीकरिता विमामुल्‍य रक्‍कम रुपये 18,50,000/- करिता पॉलिसी क्रं. 281100/31/13/6300006329 अन्‍वये विमा काढला होता हे नि.क्रं. 2 (1) वरुन दिसून येते, यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍याचे वाहन दि.07.11.2014 च्‍या रात्री 11.30 ते दि. 08.11.2014 च्‍या सकाळी 4.15.मि. च्‍या दरम्‍यान राजीव गांधी शाळा सुर्यनगर, लता मंगेशकर गार्डन जवळ, नागपूर येथून चोरीला गेल्‍याबाबतची तक्रार कळमना पोलिस स्‍टेशन येथे दि.08.11.2014 ला दिली असल्‍याचे नि.क्रं. 2(3) वरुन व कळ‍मना पोलिस स्‍टेशन यांनी दि. 08.11.2014 ला एफ.आय.आर.नं. 357/14 अन्‍वये गुन्‍हा दाखल केल्‍याची पहिली खबर रिपोर्ट नोंदविल्‍याचे दस्‍तावेज नि.क्रं. 2(4) वर दाखल असून घटनास्‍थळ पंचनामा केल्‍याचे दस्‍तावेज नि.क्रं. 2 (5) वर दाखल आहेत. तसेच दि. 11.11.2014 च्‍या नवभारत या वृत्‍तपत्रातून ट्रक चोरीबाबतची जाहीर सूचना प्रसिध्‍दी केली असल्‍याचे कात्रन नि.क्रं. 2 (7) वर दाखल केलेले आहे. तक्रारकर्त्‍याने त्‍याचा विमा दावा प्रस्‍ताव विरुध्‍द पक्षाकडे नोव्‍हेबंर 2014 ला सादर केला होता. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला जुलै 2016 पर्यंत आवश्‍यक दस्‍तावेज सादर करण्‍याबाबत अनेक स्‍मरणपत्र विमा दावा निकाली काढण्‍याकरिता दिले असल्‍याचे कथन सिध्‍द करण्‍याकरिता कोणतेही दस्‍तावेज अभिलेखावर दाखल केलेले नाही. विरुध्‍द पक्षाला वाहन चोरीची माहिती प्राप्‍त झाल्‍यावर त्‍याने  सर्वेअरची नेमणूक केली होती व सर्वेअरच्‍या मागणीनुसार तक्रारकर्त्‍याने सर्व आवश्‍यक दस्‍तावेज पुरविलेले होते. विरुध्‍द पक्षाने आय.आर.डी.ए.च्‍या नियम 15(5)(i). नुसार सर्वेअरचा अंतिम तपासणी अहवाल प्राप्‍त झाल्‍यावर   तक्रारकर्त्‍याचा विमा दावा 30 दिवसाच्‍या आंत निकाली काढणे आवश्‍यक होते, परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा निकाली न काढता जाणूनबुजून प्रलंबित ठेवल्‍याचे दिसून येते व ही विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रुटी असून त्‍याने अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केल्‍याचे स्‍पष्‍ट होते असे आयोगाचे मत आहे.  

 

  •             सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

ंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा रक्‍कम रुपये 18,50,000/- व त्‍यावर तक्रार दाखल दि. 03.04.2018 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 7 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्त्‍याला अदा करावी.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसानभरपाई म्‍हणून रुपये 30,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 20,000/- द्यावे.

 

  1. विरुध्‍द पक्षाने वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक महिन्‍याच्‍या आत करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.