Maharashtra

Nagpur

CC/235/2015

Rajesh Pannalal Kambhale - Complainant(s)

Versus

NATIONAL INSURANCE COMPANY LTD., THROUGH DIVISIONAL MANAGER - Opp.Party(s)

Kaushik Mandal

31 Jan 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/235/2015
( Date of Filing : 11 May 2015 )
 
1. Rajesh Pannalal Kambhale
R/o Gajrak Complex New Panjara Koradi Tah. Kamptee, Nagpur-441111
Nagpur
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. NATIONAL INSURANCE COMPANY LTD., THROUGH DIVISIONAL MANAGER
D.O. 1, Firdos Chamber, Ramdaspeth Nagpur-12
Nagpur
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:Kaushik Mandal , Advocate for the Complainant 1
 ADV. C. A. ANTHONY, Advocate for the Opp. Party 1
Dated : 31 Jan 2022
Final Order / Judgement

आदेश

                                

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, त्‍याने ट्रक क्रमांक MH31 CB 9395 चा दिनांक 23.07.2011 ते 22.07.2012 या कालावधीकरिता विमा मुल्‍य रक्‍कम रुपये 8,12,500/- करिता विमा पॉलिसी क्रमांक 282200/31/11/6300002956 अन्वये विरुध्‍द पक्षाकडून विमा उतरविला होता आणि तक्रारकर्त्‍याला एक पानाची पॉलिसी निर्गमित केली होती. परंतु सदरच्‍या विमा पॉलिसी सोबत कोणत्याही शर्ती व अटी असलेले दस्तऐवज संलग्न करून पाठवले नव्हते, त्यामुळे विमा पॉलिसीच्या शर्ती व अटी सदर प्रकरणात लागू नाही आहेत.
  2.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, तो दि. 01.12.2011 ला त्‍याच्‍या ट्रकने सावनेरवरुन घरी परत आला असता तक्रारकर्त्याने त्याचे वाहन त्याच्‍या राहत्‍या घरासमोरील गजराज आपार्टमेंट समोर पार्क केले व वाहनाचा (ट्रकचा) दरवाजा लॉक केले होते. परंतु काही अज्ञात व्‍यक्‍तीने तक्रारकर्त्‍याचे वाहन दिनांक 01.12.2011 च्‍या मध्‍यरात्री व 02.12.2011 च्‍या पहाटे  दरम्‍यान वाहन चोरले. त्‍यानंतर तक्रारकर्ता व त्याच्‍या भावाला वाहन चोरीला गेल्याची घटना दिनांक 02.12.2011 ला कळल्‍या बरोबर त्‍यांनी वाहनाबाबतची माहिती संबंधित पोलीस स्टेशनला दिल्‍यानंतर कोराडी पोलिस स्‍टेशनच्‍या अधिका-यांनी तात्काळ वायरलेस मेसेज फ्लॅश केला आणि वाहनाचा शोध घेणे सुरू केले. परंतु वाहनाचा शोध न लागल्‍यामुळे दिनांक 03.12.2011 ला IPC च्‍या कलम 379 अंतर्गत FIR नोंदविला आणि वाहन चोरिला गेल्‍याबाबतची विरुध्‍द पक्षाला तात्काळ लेखी सूचना दिनांक 02.12.2011 ला दिली असून त्‍याबाबतची पोच सुध्‍दा देण्‍यात आलेली आहे.
  3.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे विमा दावा प्रस्‍ताव आवश्‍यक सर्व दस्‍तावेजाच्‍या प्रतीसह सादर केला, त्‍या सोबत 2 चाबी, पोलीस अंतिम अहवाल जे.एम.एफ.सी. कोर्टकडून प्राप्त झाल्यानंतर सादर केला. त्‍यानंतर विरुद्ध पक्षाने मेसर्स एल.एम.असोसिएट यांची प्रकरणाची चौकशी करिता नेमणूक केली आणि इन्व्हेस्टिंगेटरणे तक्रारकर्त्‍याच्‍या घरी  जाऊन तक्रारकर्त्याचा व वाहन चालकाचा जबाब नोंदविला आणि तक्रारकर्त्याला संपूर्ण मूळ दस्तऐवज सादर करण्यास सांगितले. इन्‍व्‍हस्‍टीगेटरने दाखविलेल्‍या अधिकार पत्रानुसार तक्रारकर्त्याने एफ.आय.आर.प्रत,  आर.सी बुक, फिटनेस सर्टिफिकेट, परमिट, टॅक्स, ड्रायव्हिंग लायसनच्या वाहन चोरीबाबत आर.टी.ओ खात्याला पाठविलेले पत्र, ओरीजनल पॉलिसी, लेटर ऑफ सब्रोगेशन, इंडेमनिटी आणि इतर आवश्यक मूळ दस्तावेज सादर केले आणि विमा दावा लवकरात लवकर निकाली काढण्‍याबाबत इन्‍व्‍हेस्‍टीगेटरला विनंती केली. विरुद्ध पक्षाने इन्‍व्‍हेस्‍टीगेटरची नेमणूक घटनेच्‍या पाच महिन्याच्या कालावधीनंतर केली. इन्‍व्‍हेस्‍टीगेटरने प्रकरणाची चौकशी केली आणि  कोराडी पोलीस स्टेशनला भेट दिली व त्‍याप्रमाणे विरुद्ध पक्षाला आपला अहवाल सादर केला.
  4.      तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्षाकडे सादर केलेल्या मूळ दस्तऐवजाची मागणी केली असता विरुद्ध पक्षाने तक्रारकर्त्याला मूळ दस्तऐवज परत केले नाही. तसेच तक्रारकर्ता आणि त्याचे भावाने विरुध्‍द पक्षाच्‍या कार्यालयात जाऊन अनेक वेळा विमा दावा लवकरात लवकर निकाली काढण्याबाबत पाठपुरावा करुन ही विरुद्ध पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा मंजूर अथवा नामंजूर ही केला नाही. त्‍यामुळे  तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करून खालील प्रमाणे मागणी केली आहे.

अ.   विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याला त्रुटी पूर्ण सेवा दिल्याचे घोषित करावे

आ.   विरुध्‍द पक्षाने वाहनाची विमा मूल्य रक्कम रुपये 8,12,500/- वाहन चोरीला गेल्‍याच्‍या दिनांकापासून म्‍हणजेच दिनांक 02.12.2011 पासून व्‍याजासह अदा करावी.

इ.    तसेच विरुध्‍द पक्षाने मानसिक, शारीरिक त्रासा करिता नुकसान भरपाई  व  तक्रारीचा खर्च ही देण्‍याचा आदेश द्यावा.

 

  1.      विरुद्ध पक्षाने आपल्‍या लेखी जबाबात नमूद केले की,  विरुद्ध पक्षाचे कार्यालयीन अभिलेखानुसार तक्रारकर्त्याने त्याचा विमा दावा सादर केलेला नाही. विरुद्ध पक्षाला सदर प्रकरणात नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरुद्ध पक्षाकडे वाहन क्रमांक MH31/CB9395 या वाहन चोरीचा विमा दावा सादर केला होता का याचा शोध घेतला आणि प्रयत्न केल्यानंतर सदर वाहनाचा विमा दावा प्रस्‍ताव आढळून आला नाही. ओन डॅमेज क्‍लेम्‍स निकाली काढण्याकरिता एक स्वतंत्र विभाग आहे आणि जेव्हा एखादा विमा दावा दाखल केला जातो, त्यावेळी फाईल तयार करून त्याला अनुक्रमांक आणि वाहनाचा क्रमांक ओळखण्‍याकरिता दिला जातो आणि विभागामार्फत केलेले सर्व पत्रव्यवहार, दस्तऐवज आणि विमा धारकाने दिलेले सर्व पत्र फाईल मध्‍ये सलंग्‍न असतात. तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्षाला दिलेले पत्र तसेच विरुद्ध पक्षाने तक्रारकर्त्याला निर्गमित केलेले व त्याला प्राप्त झालेले प्रकरणात दाखल केले नाही की, ज्यामुळे फाईल चा शोध घेता येईल. त्यामुळे तक्रारकर्त्याने विमा दावा सादर केल्याचा एक पुरावा सादर केल्याशिवाय विमा  दावा प्रस्‍ताव सादर केल्याचे निश्चित करता येणार नाही. जोपर्यंत तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे विमा दावा प्रस्‍ताव सादर केल्याबाबतचा पुरावा सादर करीत नाही, तो पर्यंत सदर प्रकरण मंचासमक्ष चालू शकत नाही, म्‍हणून सदर प्रकरण खारीज करण्‍यात येते. तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचे तक्रारीतील इतर परिच्‍छेद नाकारलेले आहेत.
  2.      उभय पक्षांनी दाखल केलेले दस्तऐवज, लेखी युक्तिवाद व तोंडी युक्तिवाद ऐकल्यावर निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.

 

1    तक्रारकर्ता विरुद्ध पक्षाचा ग्राहक आहे काय?                 होय

 

2    विरुद्ध पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय?         होय

 

3.   काय आदेश ?                             अंतिम आदेशानुसार

 

कारणमीमांसा

  1. मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत – तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून ट्रक क्रमांक MH31 CB 9395 चा दिनांक 23.07.2011 ते 22.07.2012 या कालावधीकरिता विमा मुल्‍य रक्‍कम रुपये 8,12,500/- करिता विमा पॉलिसी क्रमांक 282200/31/11/6300002956 अन्वये विमा उतरविला होता हे नि.क्रं. 2 वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्याने निशाणी क्रमांक 2 वर दाखल केलेला ब्रोट ब्रॉडकास्टिंग मेसेज, एफ.आय.आर. प्रत, प्रथम खबरी अहवाल, घटनास्थळ पंचनामा, परिवहन अधिकाऱ्याला दिलेले पत्र, निशाणी क्रमांक 2(19) वर दाखल केलेले शपथपत्र इत्‍यादी सर्व दस्‍तावेजावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारकर्त्याने त्‍याचे वाहन गजराज अपार्टमेंटसमोर व्‍यवस्थितीत रित्‍या लॉक करुन पार्क केले असतांना सुध्‍दा काही अज्ञात व्‍यक्‍तीने सदरचे वाहन दिनांक 01.12.2011 च्‍या मध्‍यरात्री व  दिनांक 02.12.2011 चे पहाटे दरम्‍यान चोरी केले व याबाबतची तक्रारकर्त्‍याने कोराडी पोलीस स्‍टेशनला तसेच विरुध्‍द पक्षाला तात्‍काळ सूचना दिली होती. त्‍यानंतर ही विरुध्‍द पक्षाने आपल्‍या कथनाच्‍या समर्थनार्थ कोणतेही दस्‍तावेज दाखल केलेले नाही. यावरुन तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे ग्राहय धरण्‍या योग्‍य आहे असे आयोगाचे मत आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे ट्रक चोरिला गेल्‍याबाबतची माहिती दिली होती हे नि.क्रं. 2 (3) वर दाखल दस्‍तावेजावर असलेल्‍या पोच वरुन स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे विमा दावा प्रस्‍ताव आवश्‍यक सर्व दस्‍तावेजासह दाखल केल्‍यानंतर ही विरुध्‍द पक्षाने तो निकाली न काढता प्रलंबित ठेवला, ही विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रुटी असल्‍याचे दिसून येते.

      सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुद्ध पक्षाने तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या वाहनाची विमा मुल्‍य रक्‍कम रुपये 8,12,500/- आणि त्‍यावर दि. 02.12.2011 पासून तर प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 7 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्त्‍याला अदा करावी.
  3.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या मानसिक, शारीरिक त्रासा करिता नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.
  4. विरुध्‍द पक्षाने वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आत करावी.
  5.    उभय पक्षानां आदेशाची प्रत निःशुल्क देण्‍यात यावी.
  6.    तक्रारकर्त्याला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.