Maharashtra

Nagpur

CC/288/2018

SMT. PRAGYA WD/O VINIT MODI - Complainant(s)

Versus

NATIONAL INSURANCE COMPANY LTD., THROUGH BRANCH MANAGER - Opp.Party(s)

ADV. KAUSHIK MANDAL

24 Aug 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/288/2018
( Date of Filing : 10 Apr 2018 )
 
1. SMT. PRAGYA WD/O VINIT MODI
R/O. C/O. DR. SANTOSH KUMAR MODI PARWAR PURA, ITWARI, NAGPUR-440002
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. NATIONAL INSURANCE COMPANY LTD., THROUGH BRANCH MANAGER
10, WARDHMAN NAGAR, OLD BHANDARA ROAD, NAGPUR-440008
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. KAUSHIK MANDAL, Advocate for the Complainant 1
 ADV. B.B. RAIPURE, Advocate for the Opp. Party 1
Dated : 24 Aug 2021
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये -

  1.     तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, तक्रारकर्तीने तिचे वाहन इनोव्‍हा कार क्रं. MH.31 CR 9459 याचा विरुध्‍द पक्ष विमा कंपनीकडे दि. 21.08.2012 ते 20.08.2013 या कालावधीकरिता विमा मुल्‍य रक्‍कम रुपये 6,15,000/- करिता पॉलिसी क्रं. 281108/31/12/6100003675 अन्‍वये 8 अनोळखी व्‍यक्‍तींचा रुपये 1,00,000/- पर्यंतचा आणि चालक-मालकाचा रुपये 2,00,000/- रक्‍कमेचा अतिरिक्‍त विमा प्रिमियम भरुन वैयक्तिक अपघाताकरिता विमा काढला होता.
  2.      तक्रारकर्तीने पुढे नमूद केले की, तिचे पती डॉ.विनीत मोदी, तिचा पुतन्‍या आणि त्‍यांच्‍या वडिलांचे कम्‍पाऊंडर आणि ड्रायव्‍हर हे दि. 31.05.2013 ला नागपूर वरुन बरेली येथे वाहनाने मध्‍यरात्री 12.00 वा. प्रवासाला निघाले. तामया घाट आणि त्‍यानंतर टोल टॅक्‍स बुथ ओलांडल्‍यानंतर सुमारे सकाळी 6.30 वा. वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि  वाहन चालकाने रस्‍त्‍याच्‍या बाजुला असलेल्‍या झाडाला धडक दिली, त्‍यामुळे डॉ. विनीत मोदी यांच्‍या डोक्‍याच्‍या डाव्‍या बाजुला गंभीर जखम झाली व त्‍यातून रक्‍तस्‍त्राव होत असल्‍यामुळे वाहन चालकाने तात्‍काळ वाहन वळून परासिया येथील दवाखान्‍यात तक्रारकर्तीच्‍या पतीला कंम्‍पाऊंडरसह घेऊन गेला आणि वाहन चालकाने पेशंट व वाहनासह परासिया पोलिस स्‍टेशन येथे स्‍वतः ला स्‍वाधीन केले. त्‍यानंतर पोलिसांनी तात्‍काळ घटनास्‍थळाला भेट दिली व घटनास्‍थळ पंचनामा नोंदविला. तसेच वाहन चालक व कम्‍पाऊंटरचा जबाब नोंदविला आणि तेथून बॉडीला सी.एच.सी.परासिया येथे पोस्‍टमॉर्टम (शवचिकित्‍सा)  करिता पाठविले व त्‍याठिकाणी सिव्हिल सर्जन यांनी तक्रारकर्तीचे पती Due to haemorrhage to vital organ of brain in

       road traffic accident ने निधन झाल्‍याचे नमूद केले. त्‍यानंतर तक्रारकर्ती व तिचे नातेवाईक हॉस्‍पीटलला पोहचले आणि त्‍यांनी बॉडीची ओळख पटवून संपूर्ण औपचारिक प्रक्रिया पूर्ण केल्‍यावर बॉडी ताब्‍यात घेऊन अंतविधीकरिता नागपूरला परत आले. तसेच सदरच्‍या घटनेची माहिती विरुध्‍द पक्षाला देण्‍यात आली होती आणि त्‍यानंतर विरुध्‍द पक्षाकडे विमा दावा सादर करण्‍यात आला.

  1.      तक्रारकर्तीने पुढे नमूद केले की, तिने विरुध्‍द पक्षाच्‍या मागणीनुसार सर्व दस्‍तावेजाच्‍या प्रमाणित प्रती कोर्टातून तसेच इतर ठिकाणाहून प्राप्‍त करुन विरुध्‍द पक्षाकडे सादर केल्‍या व सादर केलेला विमा दावा मिळण्‍याकरिता वारंवांर विचारणा करुन ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीचा विमा दावा मंजूर अथवा नामंजूर ही केला नाही व त्‍याबाबत कळविले नाही. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीचा विमा दावा निकाली न काढल्‍यामुळे तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन आय.आर.डी.ए.रेग्‍युलेशन नुसार वैयक्तिक अपघात विमा अंतर्गत अनोळखी प्रवाशाला विमाकृत करण्‍याकरिता घेतलेल्‍या विमा प्रिमियम पोटी विमा रक्‍कम रुपये 1,00,000/-, द.सा.द.शे. 14.5 टक्‍के दराने दि. 31.05.2013 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगी पर्यंत व्‍याजासह देण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश द्यावा अशी मागणी केलेली आहे.
  2.      विरुध्‍द पक्षाने आपल्‍या लेखी जबाबात नमूद केले की,  तक्रारकर्तीने  तिच्‍या पतीचे दि. 31.05.2013 ला अपघातात निधन झाल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाच्‍या कार्यालयात वैयक्तिक अपघात अंतर्गत मिळणा-या विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये एक लाखाकरिता विमा दावा कधीही सादर केलेला नाही आणि विरुध्‍द पक्षाने त्रुटीपूर्ण सेवा दिल्‍याबद्दल सरळ आयोगात तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडे विमा दावा सादर केल्‍याबाबतचा कुठलाही पुरावा अभिलेखावर दाखल केलेला नाही. तक्रारकर्तीचा  पती हा घटनेच्‍या दिवशी वाहन क्रं. एम.एच.31 सी.आर. 9459 या इनोव्‍हा कारमध्‍ये एक अनोळखी व्‍यक्‍ती होता आणि तो वाहनाचा मालक नव्‍हता. त्‍यामुळे वाहनाचे मुळ मालक श्रीमती सुधा मोदी यांनी ओन डैमेज मोटर इन्‍श्‍योरेन्‍स क्‍लेम अंतर्गत विमा फॉर्म सादर केला होता व तक्रारकर्तीचे पती  हे वाहनातील अनोळखी व्‍यक्‍ती असल्‍यामुळे सदरचा विमा फॉर्म तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या मृत्‍युच्‍या विमा दाव्‍याकरिता लागू होत नाही.
  3.       विरुध्‍द पक्षाने आपल्‍या विशेष कथनात नमूद केले की, तक्रारकर्ती  ही अपघातग्रस्‍त वाहनाची मालकीन नाही. तक्रारकर्तीने काळजीपूर्वक विमा दावा विरुध्‍द पक्षाकडे सादर केलेला नाही. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला त्रुटीपूर्ण सेवा दिल्‍याचा अथवा विमा दावा नाकारल्‍याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही.  तसेच तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडे विमा दाव्‍याबाबत स्‍वतंत्र पत्रव्‍यवहार केल्‍याचा कुठलाही दस्‍तावेज अभिलेखावर दाखल केलेला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केलेली आहे.
  4.      उभय पक्षांनी दाखल केलेले दस्‍तावेजाचे अवलोकन केले असता  व त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर आयोगाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

   मुद्दे                                        उत्‍तर

  1. तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे काय ?        होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिली काय?       होय
  3. काय आदेश?                            अंतिम आदेशानुसार

 

निष्‍कर्ष

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत -  इनोव्‍हा कारची मुळ मालकीन सुधा मोदी यांनी तिचे वाहन क्रं. एम.एच.31 सी.आर. 9459 या वाहनाचा विरुध्‍द पक्ष विमा कंपनीकडे  दि. 21.08.2012 ते 20.08.2013 या कालावधीकरिता विमा मुल्‍य रक्‍कम रुपये 6,15,000/- करिता पॉलिसी क्रं. 281108/31/12/6100003675 अन्‍वये  8 अनोळखी व्‍यक्‍तींचा रुपये एक लाखा पर्यंतचा आणि चालक-मालकाचा रुपये 2,00,000/- रक्‍कमेचा अतिरिक्‍त विमा प्रिमियम भरुन वैयक्तिक अपघाताकरिता विमा काढला होता. दिनांक 31.05.2013 ला तक्रारकर्तीचे पती डॉ.विनीत मोदी, तिचा पुतन्‍या आणि त्‍यांच्‍या वडिलांचे कम्‍पाऊंडर आणि वाहन चालक हे सदरच्‍या वाहनाने नागपूर वरुन बरेली येथे मध्‍यरात्री 12.00 वा. प्रवासाला निघाले व तामया घाट आणि त्‍यानंतर टोल टॅक्‍स बुथ ओलांडल्‍यानंतर सुमारे सकाळी 6.30 वा. सदरच्‍या वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि त्‍याने रस्‍त्‍याच्‍या बाजुला असलेल्‍या झाडाला धडक दिली व त्‍यात तक्रारकर्तीच्‍या पतीचे निधन झाले, हे नि.क्रं. 2 वर दाखल पोलिस पंचनामा, प्रथम खबरी अहवाल, पोलिस  अधिका-यांचे बयाण, पोस्‍टमॉर्टम (शवविच्‍छेदन) अहवाल व दाखल  मृत्‍युप्रमाणपत्रावरुन दिसून येते. तसेच तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु इनोव्‍हा वाहनाने नागपूर वरुन बरेली येथे जात असतांना तामिया घाटाजवळ सकाळी 6.30 वा. झालेल्‍या अपघातात निधन झाले. तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या मोटर क्‍लेम फॉर्म मधील स्‍तंभ क्रं. 7 मध्‍ये  Third party injury / Property damage या मथळयाखाली अपघातामध्‍ये जखमी झालेल्‍या   तिस-या व्‍यक्‍तीची माहिती भरायची असते. तसेच स्‍तंभ क्रं. 8 मध्‍ये injury to driver/ occupant बाबत विस्‍तृत माहिती द्यावयाची असते.  तक्रारकर्तीने दि. 31.05.2013 ला झालेल्‍या घटनेनंतर विरुध्‍द पक्षाकडे मोटर क्‍लेम फॉर्म अन्‍वये विमा दाव्‍याबाबत विस्‍तृत माहिती सादर केलेली आहे व विरुध्‍द पक्षाने विमाकृत वाहनाचा विमा दावा रक्‍कम वाहनाच्‍या मुळ मालकाला अदा केलेली आहे. परंतु वाहनाच्‍या मुळ मालकाने सदर वाहनाचा दि. 21.08.2012 ते 20.08.2013 या कालावधीकरिता पॉलिसी क्रं. 281108/31/12/6100003675 अन्‍वये 8 अनोळखी व्‍यक्‍तींचा रुपये एक लाखाकरिता वैयक्तिक अपघात अंतर्गत विमा काढला होता त्‍याप्रमाणे दि. 31.05.2013 रोजी सदर वाहनाने झालेल्‍या अपघातात तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु झालेला आहे हे दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. त्‍यामुळे तक्रारकर्ती ही मृतकची पत्‍नी या नात्‍याने सदरचा वैयक्तिक अपघाता अंतर्गत मिळणा-या रक्‍कमेकरिता लाभार्थी ठरते. यावरुन तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाची ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तसेच नि.क्रं. 2 वर दाखल पॉलिसीप्रमाणे  तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडे सदर विमा पॉलिसी प्रमाणे वैयक्तिक अपघात अंतर्गत मिळणारी रक्‍कम रुपये 1,00,000/- मिळण्‍याकरिता विमा दावा फॉर्म सादर केल्‍यानंतर ही विरुध्‍द पक्षाने सदरचा दावा मंजूर अथवा नामंजूर ही केला नाही किंवा सदरच्‍या दाव्‍याबाबत तक्रारकर्तीला कळविलेले नाही ही विरुध्‍द पक्षाची सेवेतील त्रुटी असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते. तक्रारकर्तीला इनोव्‍हा कारच्‍या मालकाने अनोळखी व्‍यक्‍तीकरिता काढलेल्‍या वैयक्तिक अपघात पॉलिसीप्रमाणे झालेल्‍या अपघातात तक्रारकर्तीच्‍या पतीचे दि. 31.05.2013 रोजी निधन झाले, त्‍यामुळे तक्रारकर्ती सदरच्‍या पॉलिसीप्रमाणे रक्‍कम रुपये 1,00,000/- मिळण्‍यास पात्र आहे असे आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे. तसेच तक्रारकर्तीने मोटर वाहन लवादा समक्ष थर्ड पार्टी इन्‍श्‍युरन्‍स क्‍लेम घेतल्‍याबाबतचा कुठलाही पुरावा विरुध्‍द पक्षाने दाखल केलेला नाही.  

 

      सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला तिच्‍या पतीचे वैयक्तिक अपघात विमा अंतर्गत देय असलेली रक्‍कम रुपये 1,00,000/- व त्‍यावर दि. 03.04.2018 म्‍हणजेच तक्रार दाखल तारखेपासून तर प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगी पर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम अदा करावी.
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 20,000/-  तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- द्यावा.
  4. विरुध्‍द पक्षाने वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत करावी.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  6. तक्रारकर्तीला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.