Final Order / Judgement | (मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्या) (पारित दिनांक :- २४/०९/२०२१) - तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली आहे.
- तक्रारकर्ती ही मौजा दहेली, पो. दुधोली, बामणी, जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून मयत तुळशीराम वारलु राउत यांची पत्नी आहे. मयत तुळशीराम राउत यांचा मृत्यु दिनांक २१/०१/२०१६ रोजी देवाडा, ता. पोंभुर्णा, जि. चंद्रपूर येथे रोड अपघातात झाला. तक्रारकर्तीचा पती हा शेतकरी असल्यामुळे व त्याच्या नावावर मौजा देवाडा बुज, तालुका पोंभुर्णा, जिल्हा चंद्रपूर येथे भुमापन क्रमांक ३३९ ही जमीन असल्यामुळे तक्रारकर्तीने आवश्यक कागदपञासह कृषी विभागाच्या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत दिनांक १४/०४/२०१६ रोजी कृषी अधिकारी यांचेकडे अर्ज सादर केला परंतुत्यानंतर १० महिणे उलटून गेल्यावरही विमा दावा मिळाला नसल्यामुळै दिनांक २७/०२/२०१८ रोजी तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांना वकीलामार्फत नोटीस पाठविली परंतु त्यानंतरही उपरोक्त शेतकरी योजनेचा लाभ रुपये २,००,०००/- न मिळाल्यामुळे तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
- तक्रार दाखल करुन विरुध्द पक्ष यांना नोटीस काढण्यात आली. विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारीत उपस्थित राहून त्याचे उत्तर दाखल केले. तक्रारीत नमूद म्हणणे खोडून काढीत प्राथमिक आक्षेप घेतली की, सदर विमा योजना ही ञिपक्षीय योजना आहे परंतु तक्रारकर्तीने आयुक्त, कृषी यांना सदर तक्रारीत पक्ष केले नाही तसेच तक्रारकर्तीला कागदपञे दाखल करण्यास योग्य ती संधी दिली परंतु ते कागदपञ वेळेत दाखल न झाल्यामुळे तिचा क्लेम योग्यरितीने खारीज करण्यात आला आहे. तसेच तक्रारकर्तीने तक्रारीत दाखल केलेल्या कागदपञांवरुन ही बाब स्पष्ट होत आहे की, तिने सदर प्रस्ताव हा दिनांक१६/०७/२०१७ रोजी पुन्हा सादर केलेला आहे तसेच तक्रारकर्ती ही मोटर वाहन कायद्याअंतर्गत कलम १६६ अन्वये योग्य क्लेम मिळू शकतो. सबब विरुध्द पक्ष क्रमांक १ सदर क्लेम देण्यास जबाबदार नाही. सबब विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी सेवेत ञुटी केली नसून तक्रारकर्तीचा विमा दावा हा योग्य रितीने कागदपञाच्या अभावी नाकारलेला असल्यामुळे तक्रारकर्तीला भरपाईची रक्कम देण्याकरिता विरुध्द पक्ष क्रमांक १ हे जबाबदार नाही.
- विरुध्द पक्ष क्रमांक २ हे तक्रारीत उपस्थित न झाल्यामुळे त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचे आदेश दिनांक २२/०४/२०१९ रोजी पारित करण्यात आला.
- विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांनी तक्रारीत उपस्थित राहून त्याचे लेखी उत्तर दाखल करीत नमूद केले की, तक्रारकर्तीने तिचे पती तुळशीराम वारलु राउत यांचे अपघात विमा प्रकरण दिनांक १६/०४/२०१६ रोजी कार्यालयात सादर केले. त्यानंतर त्यांनी पुढील कार्यवाही करिता वरिष्ठ कार्यालयाला सादर केले. सदर प्रस्तावातील ञुटी संबंधी बजाज कॅपीटल इंन्शुरन्स ब्रोकिंग लिमिटेड ने दिनांक ३०/०५/२०१६ व दिनांक २९/०७/२०१६ तसेच दिनांक १६/०८/२०१७ रोजी पञ पाठवून त्याप्रमाणे त्या पञातील ञुटीची पुर्तता करुन वरिष्ठ कार्यालयास पञ व्यवहार केला.
- तक्रारकर्तीची तक्रार, दस्तावेज, पुरावा शपथपञ तसेच लेखी युक्तिवाद व विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ चे लेखी उत्तर, पुरावा शपथपञ तसेच उभयपक्षांचा तोंडी युक्तिवादावरुन तक्रार निकालीकामी खालिल मुद्दे व त्यावरील निष्कर्ष कायम करण्यात येत आहे.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी ग्राहक तत्वाबाबत विवाद उपस्थित केलेला नाही त्यामुळे विरुध्द पक्ष क्रमांक १ ची तक्रारकर्ती ही निर्विवाद ग्राहक आहे. सदर तक्रारीचे तसेच दाखल कागदपञांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येत आहे की, पतीच्या नावाने शेतजमीन असून त्यांचा रोड अपघातात दिनांक २५/०१/२०१६ रोजी मृत्यु झालेला आहे. तसेच अपघाती मृत्यु झाल्यावर शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्याकरिता अर्ज दिनांक १४/०४/२०१६ रोजी संबंधीत कृषी अधिकारी यांचेकडे केला होता परंतु विमा प्रस्तावास काही कागदपञाची ञुटी असल्यामुळे कृषी अधिकारी, पोंभुर्णा यांनी ञुटीसंबंधी पुर्तता करण्यास तक्रारकर्तीला पञाव्दारे कळविले. सदर दस्तावेज निशानी क्रमांक ४, दस्त क्रमांक १४ वर दाखल आहे. त्यानंतर तक्रारकर्तीने दस्तऐवजाची पुर्तता करुन तालुका कृषी अधिकारी यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांचेकडे प्रस्ताव दिनांक १६/०८/२०१७ रोजी दाखल केला, त्याबद्दलचे पञ दस्त क्रमांक १७ वर दाखल आहे. विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी त्यांच्या उत्तरात तक्रारकर्तीने दस्तऐवजाची पुर्तता पञ पाठवूनही न केल्यामुळे खारीज करण्यात आला, असे नमूद केले आहे. परंतु तक्रारकर्तीने तक्रारीत दाखल केलेल्या दस्तऐवजावरुनअसे सिध्द होते की, तक्रारकर्तीने ञुटीची पुर्तता करुन योग्य दस्तऐवजासह प्रस्ताव विरुध्द पक्ष क्रमांक ३ कडे सादर केला होता परंतु त्यानंतरही विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी कोणत्याही सबळ आधाराशिवाय तक्रारकर्तीचा विक्रीग्राह्य विमा दावा नाकारुन ञुटीपूर्ण सेवा दिल्याचा निष्कर्ष निघतो. परिणामतः तक्रारकर्तीचा विमा दाव्याची रक्कम रुपये २,००,०००/- तसेच तिला झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई दाखल रुपये ५,०००/- व तक्रारीचा खर्चापोटी रुपये ५,०००/- मिळण्यास पाञ आहे.
- विरुध्द पक्ष क्रमांक ३ हे शासकीय कार्यालय असून शेतकरी विमा योजनेसंबंधी शासनाने निर्धारीत किंवा विहीतकरुन दिलेली कार्ये विनामोबदला पार पाडला. सबब विरुध्द पक्ष क्रमांक ३ विरुध्द कोणताही आदेश नाही.
- विरुध्द पक्ष क्रमांक २ यांचे मध्यस्थीचे काम असल्यामुळे निःशुल्क सेवा पुरवितात त्यामुळे त्यांच्यावर क्लेम देण्याची जबाबदारी नाही.
सबब आयोग वरील विवेंचनावरुन खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. अंतिम आदेश - तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ यांना निर्देश देण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा रक्कम रुपये २,००,०००/- तक्रारकर्तीला अदा करावे.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ ला निर्देश देण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारीरिक ञासाकरीता रुपये ५,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- अदा करावे.
- विरुध्द पक्ष क्रमांक २ व ३ यांचे विरुध्द दाखल करण्यात आलेली तक्रार खारीज करण्यात येत आहे.
- उभयपक्षांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
- तक्रारकर्ती यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
| |