Maharashtra

Nanded

CC/08/247

Santosh Dasrao Padalkar - Complainant(s)

Versus

National insurance company Limited. - Opp.Party(s)

ADV.S.R.Padal

22 Oct 2008

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/08/247
1. Santosh Dasrao Padalkar R/o.Lyahari tq.Hadgaon Dist.NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. National insurance company Limited. Nagina Ghat Road.NandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 22 Oct 2008
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  247/2008.
                           प्रकरण दाखल तारीख   - 16/07/2008
                           प्रकरण निकाल तारीख - 22/10/2008
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे,                 - अध्‍यक्ष
         मा.श्रीमती सुजाता पाटणकर              -  सदस्‍या
                 मा.श्री.सतीश सामते                  - सदस्‍य
 
संतोष पि. दासराव पाडळकर                           अर्जदार.
रा. वय, 32 वर्षे, धंदा, व्‍यापार
रा. लहरी, ता.हदगांव हल्‍ली मुक्‍काम
आखाडा बाळापूर ता. कळमनूरी
जि. हिंगोली.
     विरुध्‍द.
 
नॅशनल इन्‍शूरन्‍स कंपनी लि.
मार्फत वीभागीय व्‍यवस्‍थापक,                         गैरअर्जदार शाखा नगिना घाट रोड, नांदेड.
 
अर्जदारा तर्फे वकील             - अड. संजय आर.पडोळे
गैरअर्जदार तर्फे वकील           - अड. जी.एस. औंढेकर.
 
                            निकालपञ
             (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे, अध्‍यक्ष )
 
              गैरअर्जदार नॅशनल इन्‍शूरन्‍स कंपनी लि. यांच्‍या सेवेच्‍या ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे.
              अर्जदार हे एम.एच.-26-एल-2565 ओमिनी मारुती या वाहनाचे मालक आहेत. त्‍यांनी हे वाहन गाडीची मूळ मालक मोहनसिंग गूलाबसिंग बायस रा. नांदेड यांचेकडून दि.13.9.2007 रोजी खरेदी केले. याप्रमाणे वाहन नोंदणी प्रमाणपञामध्‍ये तक्रारदाराच्‍या नांवे नोंद घेण्‍यात आली आहे. परंतु सदर बदलाची नोंद ही विमा पॉलिसीमध्‍ये गैरअर्जदाराकडून करण्‍यात आलेली नाही. विमा पॉलिसी मूळ मालक मोहनसिंग बायस यांचेच नांव आहे. तक्रारदाराने गैरअर्जदारांना त्‍यांचे नांव नोंद करण्‍याची मागणी केली होती. वाहनाच्‍या पॉलिसीचा क्रमांक 2031062 असा असून तो दि.13.4.2007 ते 12.4.2008 या कालावधीसाठी रु.1,96,750/- अशी वाहनाची किंमत ठरवून पॉलिसी घेतली आहे. दि.2.4.2008 रोजी उमरखेड जवळ नांदेड रोडवर गाडीला अपघात झाला व त्‍यामूळे रु.2,00,000/- चे वाहनाचे नूकसान झाले. पोलिस स्‍टेशन उमरखेड येथे फिर्याद दिली. याप्रमाणे गाडी चालक संतोष पाडळकर यांचे विरुध्‍द गून्‍हा रजिस्‍टर नंबर 40/2008 नोंदविला गेला व पोलिसांनी घटनास्‍थळाचा पंचनामा केला. दि.3.4.2008 रोजी विमा कंपनीला यांची सूचना दिली व गाडी मारुती शोरुम नांदेड येथे गैरअर्जदार यांचे सांगण्‍यावरुन लावण्‍यात आली. त्‍यांनी सर्व्‍हेअरला श्री.जी. आर.उत्‍तरवार यांना पाठवून गाडीचा सर्व्‍हे करुन गाडीच्‍या नूकसानीचा जायजा घेतला. कोणतेही कागदगपञ अर्जदारास देण्‍यात आले नाही. दि.11.6.2008 रोजी अर्जदारांना एक लेखी पञ मिळाले त्‍यात त्‍यांनी क्‍लेम नामंजूर केला व त्‍यांचे कारण की, अपघाताचे वेळी तक्रारदार पॉलिसीधारक नव्‍हता व तक्रारदारा ऐवजी मोहनसिंग बायस यांचे नांवे पॉलिसी होती. व आर. सी. बूक प्रमाणे मोहनसिंग बायस हा गाडीचा मालक आहे. त्‍यामूळे विमा पॉलिसीच्‍या शर्ती व अटीचा भंग झाल्‍यामूळे रक्‍कम देऊ शकत नाही असे कळविले. गैरअर्जदाराचा नीर्णय चूक आहे वास्‍तविक पाहता इंडियन मोटर ट्रफिक रेग्‍यूलेशन प्रमाणे एका व्‍यक्‍तीकडून दूस-या व्‍यक्‍तीकडे वाहन हस्‍तांतरीत झाले असेल तर विमा पॉलिसी सूध्‍दा हस्‍तांतरीत झाली आहे असे समजण्‍यात यावे.  परंतु या नियमाचा व परिपञकाचा भंग गैरअर्जदाराने केला आहे. सबब अर्जदाराची मागणी आहे की, वाहनाच्‍या नूकसानीसाठी रु.1,96,750/- व मानसिक व शारीरिक ञासापोटी रु.50,000/- व त्‍यावर 12 टक्‍के व्‍याज मिळावे.
              गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. याप्रमाणे गैरअर्जदारांनी कोणतीही सेवेतील ञूटी केलेली नाही. अपघाताच्‍या दिवशी म्‍हणजे दि.2.4.2008 रोजी अर्जदार यांचे नांवाने विमा पॉलिसी नव्‍हती त्‍यामूळे अर्जदार व त्‍यांचेत कूठलाही करार अस्तित्‍वात नव्‍हता. अपघातग्रस्‍त वाहन एम.एच.-26-एल-2565  हे अपघाताच्‍या दिवशी अर्जदाराच्‍या नांवाने होते व मूळ मालक मोहनसिंग बायस यांचे नांवाने विमा पॉलिसी होती. महाराष्‍ट्र मोटार वाहन कायदा कलम 157(2) ऑफ एम. व्‍ही. अक्‍ट प्रमाणे एखादे वाहन विकत घेणा-याचे नांवाने दि.13.9.2007 रोजी ट्रान्‍सफर झाल्‍यानंतर गैरअर्जदार विमा कंपनी यांना सूचना त्‍यांनी 14 दिवसांचे आंत दिली पाहिजे व गैरअर्जदार यांचा फॉर्म व फिस भरुन ती ते वाहन व विमा पॉलिसी आपल्‍या नांवावर करुन घेतली पाहिजे. प्रस्‍तूत प्रकरणात वाहनाचे हस्‍तांतरण झाल्‍याबददलची रक्‍कम अर्जदार किंवा मूळ मालक दोघानांही दिली नाही. गैरअर्जदार यांना सूचना मिळाल्‍यानंतरचे त्‍यांचे सर्व्‍हेअर श्री.उत्‍तरवार यांना पाठविले. उत्‍तरवार यांनी सर्व्‍हे करुन अपघातग्रस्‍त वाहनाचे किती नूकसान झालेले आहे, यांचा जायजा घेतला. यानंतर दि.11.6.2008 रोजी अर्जदार यांना पञ लिहून त्‍यांचा दावा नामंजूर केला आहे असे कळविले. विमा पॉलिसीच्‍या नियम, अटी व शर्ती प्रमाणे गैरअर्जदाराने हा क्‍लेम नामंजूर केला आहे. म्‍हणून अर्जदार यांचा दावा खर्चासह फेटाळण्‍यात यावा अशी मागणी केली आहे.
              अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ दाखल केले आहे. दोन्‍ही पक्षकारानी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्‍थित होतात.
          मूददे                                  उत्‍तर
1.   गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्‍द
     करतात काय ?                                होय.
2.   अर्जदार किती रक्‍कम मिळण्‍यास पाञ आहेत ?
3.   काय आदेश ?                       अंतिम आदेशाप्रमाणे.
                             कारणे
मूददा क्र. 1 ः-
              अर्जदार यांनी विमा पॉलिसी नंबर 2031062 दाखल केलेली आहे. पॉलिसी बददल वाद नाही. वाहनाचा अपघात दि.2.4.2008 रोजी झाला या बददल देखील वाद नाही. वाद आहे तो फक्‍त पॉलिसी ही अपघाताच्‍या दिवशी अर्जदार यांच्‍या नांवाने नव्‍हती. अपघाताबददल एफ.आय.आर., घटनास्‍थळ पंचनामा दाखल केलेला आहे. विमा पॉलिसी पाहिली असता ती मोहनसिंग बायस यांचे नांवाने आहे असे दिसते परंतु वाहनाचे आर.सी. बूक पाहिले असता त्‍यावर दि.13.9.2007 रोजी अर्जदार संतोष पाडळकर यांच्‍या नांवाने वाहन ट्रान्‍सफर झालेले आहे. म्‍हणजेच अपघात होण्‍यापूर्वीच हे वाहन अर्जदाराच्‍या नांवाने ट्रान्‍सफर झाले परंतु विमा कंपनी त्‍यांचे नांवाने ट्रान्‍सफर झाली नव्‍हती. गैरअर्जदार यांचे मते वाहन ट्रान्‍सफर झाल्‍याची सूचना अपघातापासून 14 दिवसांचे आंत दयायला पाहिजे असा नियम आहे, तसे अर्जदाराने सूचना दिली आहे. परंतु दि.11.6.2008 रोजी गैरअर्जदार यांनी पाठविलेल्‍या पञानुसार मोटार वाहन कायदा,1978 कलम 51 (2) याप्रमाणे तूमचा क्‍लेम नामंजूर केला आहे असे अर्जदारास कळविले आहे. विमा पॉलिसीच्‍या नियम व अटीप्रमाणे गैरअर्जदार यांनी केलेली कारवाई बरोबर आहे असे गृहीत जरी धरले तरी मा.राष्‍ट्रीय आयोग यांनी जे यासंबंधी निकाल दिलेला आहे याप्रमाणे असा नियम असून शकत नाही. कारण विमा हा वाहनाच्‍या सूरक्षतेसाठी आहे व वाहनाचा काढलेला असतो तेव्‍हा वाहन जर एखादया दूस-या व्‍यक्‍तीने विकत घेतले व ते त्‍यांचे नांवाने ट्रान्‍सफर झाले तर पॉलिसी देखील आपआप वाहना बरोबर त्‍यांचे नांवाने ट्रान्‍सफर व्‍हायला पाहिजे. अपघातात समजा वाहन मालकाचे नूकसान झाले, त्‍यांना विमा पॉलिसी ही एक पैसाही नूकसान भरपाई देणार नाही परंतु अपघातात सापडलेल्‍या वाहनाची पूर्ण नूकसान भरपाई देण्‍यास गैरअर्जदार कंपनी हीच जबाबदार आहे. म्‍हणून अपघाताच्‍या दिवशी दि.2.4.2008 रोजी पॉलिसी अर्जदाराचे नांवाने नव्‍हती व आर.सी. बूक प्रमाणे वाहन हे अर्जदाराच नांवाने दि.13.7.2008 रोजी ट्रान्‍सफर झाले आहे, हे जरी खरे असले तरी दि.13.9.2007 रोजी आपोआप पॉलिसी अर्जदाराच्‍या नांवाने ट्रान्‍सफर व्‍हायला पाहिजे. त्‍यामूळे गैरअर्जदार यांनी आपली जबाबदारी टाळता येणार नाही. असे करुन गैरअर्जदाराने आपल्‍या सेवेत ञूटी केली आहे. हे अर्जदार सिध्‍द करतात.
              मा. राष्‍ट्रीय आयोगाने सन 2008 (1)   पान 237 (एनसी) नारायणसिह विरुध्‍द न्‍यू इंडिया इन्‍शूरन्‍स कंपनी लि. या केस लॉचा आपल्‍याला आधार घेता येईल.
          Consumer Protection Act, 1986, section 14(1)(d)---Motor Vehicles Act, 1988, section 157---Motor insurance---Transfer of vehicle---Automatic transfers of policy---Indian Motor Tariff Regulations---Circular issued in 1994 with regard to transfer of vehicles fand transfer of insurance benefits automatically ---Contention of Insurance Cpmpany that transferee was not entitled to get relief in case of contemplated perial as policy was not transferred in favour of transferee---Insurance Cpmpany could not justify its plea---Insurance Company ought not to have rejected claim on ground that avehicle was not transferred in favour of complainant---Highly improper and unjustified act on part of Insurance Company to reject claim on such ground and harass complainant for years together---Order ot State Commission set aside and order of District Forum restored---Insurance Company directed to pay Rs.1.40,000/- with interest at 12% p.a. after six months from date of accident to complainant---Insurance Company further directed to pay punitive costs of Rs.one lakh for taking unjustified stand in not disclosing India Motor Tariff Regulation which was applicable.
 
मूददा क्र. 2 ः-
              अर्जदाराचे वाहन टोटल लॉस मध्‍ये केलेले आहे त्‍यामूळे अर्जदाराची मागणी रु.1,96,750/- ची आहे परंतु सव्‍हेअर श्री.उत्‍तरवार यांनी अपघातग्रस्‍त वाहनाचा सर्व्‍हे करुन दि.5.5.2008 रोजी तो अहवाल दिलेला आहे.   याप्रमाणे वाहन हे टोटल लॉस मध्‍ये दाखवलेले आहे. गाडीची आयडीव्‍ही रु.1,96,750/- आहे, नेट लॉस बेसिस रु.1,22,000/- देण्‍याची जबाबदारी गैरअर्जदार यांचेवर राहील असे म्‍हटले आहे. यात त्‍यांनी सालव्‍हेज कॉस्‍ट म्‍हणून रु.74,250/- कमी केलेले आहेत व गाडीच्‍या दूरुस्‍तीसाठी त्‍यांनी इस्‍टीमेट रु.1,95,161/- यातून एक्‍सेस क्‍लाज कॅम्‍पलसरी रु.500/- कमी केलेले आहेत व सालव्‍हेज कॉस्‍ट रु. 9000/- व दूरुस्‍तीचा खर्च रु.1,86,361/- जर वाहन दुरुस्‍त केले तर रिपेरिंग बेसिसवर सालव्‍हेज ची रक्‍कम देण्‍याची जबाबदारी गैरअर्जदार यांचेवर राहील असे दाखवलेले आहे. टोटल लॉस या बेसिसमध्‍ये रु.1,22,000/- असे म्‍हटले असताना रिपेरिंग बेसिस रु.1,86,361/- गैरअर्जदार यांची जबाबदारी राहील असे ठरविले असेल तर यात अर्जदार यांनी टोटल लॉस का घ्‍यावा, कारण अर्जदार यांनी रिपेरिंग बेसिसरवर रु.1,86,361/- देण्‍यात यावेत हेच न्‍यायाच्‍या दृष्‍टीने उचित राहील. म्‍हणून अर्जदार आन रिपेरिंग बेसिस रु.1,86,361/- मिळण्‍यास पाञ आहे. गैरअर्जदारांनी पॉलिसी देताना रु.1,96,750/- एवढी किंमत ठरवली असताना जेव्‍हा टोटल लॉसमध्‍ये वाहन येते तेव्‍हा त्‍यांचे किंमत रु.1,22,000/- करणे हे सर्व अर्थाने चूक आहे. परंतु गैरअर्जदारांनी जे काही कृत्‍य केलेले आहे ते पॉलिसीच्‍या नियमाना धरुनच केलेले आहे. म्‍हणून त्‍यांना व्‍याज, मानसिक ञास देण्‍या‍वीषयी आम्‍ही आदेश करणार नाही.
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                             आदेश
1.                                         अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येतो.
 
2.                                         गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्‍यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना रु.1,86,361/- वाहन नंबर एम.एच.-26-एल-2565 यांचे अपघातातील दूरुस्‍तीसाठी देण्‍यात यावेत., असे न केल्‍यास निकालाच दिनांकानंतर 30 दिवसांनी म्‍हणजे दि.23.11.2008 रोजी पासून दंडणीय व्‍याज म्‍हणून 12 टक्‍के व्‍याजासह पूर्ण रक्‍कम मिळेपर्यत व्‍याजासह अर्जदाराला दयावेत.
 
3.                                         मानसिक ञासाबददल आदेश नाही.
 
4.                                         दावा खर्च म्‍हणून रु.2,000/- मंजूर करण्‍यात येतात.
 
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे          श्रीमती सुजाता पाटणकर      श्री.सतीश सामते     
   अध्‍यक्ष                             सदस्‍या                            सदस्‍य
 
 
जे. यु. पारवेकर
लघूलेखक.