Maharashtra

Nagpur

CC/580/2018

M/S HELIWAL KRUSHI SHEET GRUH NAGPUR PVT. LTD., THROUGH DIRECTOR SHRI. SANJAY HELIWAL - Complainant(s)

Versus

NATIONAL INSURANCE COMPANY LIMITED, THROUGH REGIONAL MANAGER - Opp.Party(s)

ADV. MRS. S.K. PAUNIKAR

22 Jan 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/580/2018
( Date of Filing : 27 Sep 2018 )
 
1. M/S HELIWAL KRUSHI SHEET GRUH NAGPUR PVT. LTD., THROUGH DIRECTOR SHRI. SANJAY HELIWAL
OFF. AT, 12KM. MILESTONE, BHANDARA ROAD, KAPSI, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. NATIONAL INSURANCE COMPANY LIMITED, THROUGH REGIONAL MANAGER
OFF. AT, FIDVI TOWERS, 5TH FLOOR, OPP. SARAF CHAMBERS, MOUNT ROAD, SADAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. NATIONAL INSURANCE COMPANY LIMITED, THROUGH BRANCH MANAGER
BLOCK NO. 102, II FLOOR, SHRI SAI COMPLEX, BALAGHAT ROAD, GONDIA
GONDIA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. MRS. S.K. PAUNIKAR, Advocate for the Complainant 1
 C.A.Anthony / Collin C. Anthony, Advocate for the Opp. Party 1
Dated : 22 Jan 2021
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण अंतर्गत दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले की,  तो (Heliwal Krushi Sheet Gruh)हेलीवाल कृषी शीतगृह नागपूर प्रा.लि. या नोंदणीबध्‍द कंपनीचा संचालक असून त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून त्‍याच्‍या शीतगृहातील अनेक मशीनचा दि. 30.07.2015 ते 29.07.2016 या कालावधीकरिता विमा पॉलिसी क्रं. 281301/44/15/52000020 अन्‍वये रुपये 11,95,000/- चा  विमा उतरविला होता. दि. 02.02.2016 ला तक्रारकर्त्‍याचे हेलीवाल कृषी शीतगृहातील चेंबर-बी मध्‍ये स्‍थापित करण्‍यात आलेले Air Conditioner ना-दुरुस्‍त झाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने  Air Frost Services च्‍या (Technician) तंत्रज्ञला Air Conditioner ची तपासणीकरिता बोलाविले. दि. 03.02.2016 ला (Technician) तंत्रज्ञ याने Air Conditioner   ची तपासणी केली व सांगितले की, Air Conditioner चे कॉम्‍प्रेसर जळाले आहे आणि ते जळाल्‍याच्‍या कारणाने दुरुस्‍त होऊ शकत नसल्‍यामुळे बदलविणे आवश्‍यक आहे. त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने काम्‍प्रेसर खरेदीची निविदा पुरविण्‍याबाबत (Technician) तंत्रज्ञला सांगितले. Air Frost  Services ने नविन कॉम्‍प्रेसर युनिटची पूर्ण स्‍थापितीसह रक्‍कम रुपये 1,42,840/- ची निविदा तक्रारकर्त्‍याला दिली.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याने सदर कॉम्‍प्रेसरची किंमत इतर ठिकाणी बाजारात बघितली आणि त्‍यानंतर Bitzer Germany यांनी उत्‍पादित केलेले Semi Hermatic reciprocating  compressor Model No. – 2 DC -22-40S crank case Heater & Ester Oil अधिकृत विक्रेता D H sales यांच्‍याकडून दि. 05.02.2016 ला वॅटसह एकूण रक्‍कम रुपये 99,197/- मध्‍ये विकत घेतला व सदर कॉम्‍प्रेसर मध्‍ये Air frost  Services यांच्‍याकडून गॅस भरण्‍यात आला आणि दि. 15.02.2016 ला सदर कॉम्‍प्रेसर स्‍थापित करण्‍याचे एकूण रुपये 17,840/- लावले व  Air frost  Services कंपनीला दि. 20.02.2016 ला सदरची रक्‍कम अदा करण्‍यात आली.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याने मशीन ब्रेक डाऊन क्‍लेम फॉर्म आवश्‍यक दस्‍तावेजासह दि. 20.02.2016 ला वि.प.कडे सादर केला. वि.प.ने त.क.च्‍या विमा दाव्‍याचा विचार न करता त.क.चा विमा दावा रुपये 33,000/- इतका मंजूर केला. त.क.ने वि.प. कंपनीला विमा दाव्‍याबाबत पुनर्विचार करण्‍याबाबत विनंती केली, परंतु वि.प.ने त्‍याकडे दुर्लक्ष केले व तक्रारकर्त्‍याची फाईल नो क्‍लेम म्‍हणून दि. 23.03.2017 ला बंद केली. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष तक्रार दाखल करुन मागणी केली की, वि.प. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्‍याचा विमा दावा रुपये 1,17,037/-,   18 टक्‍के व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला देण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश द्यावा.
  2.      विरुध्‍द पक्षाने आपल्‍या लेखी जबाबात नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 2 यांच्‍याकडून मशिनरीकरिता दि. 30.07.2015 ते 29.07.2016 या कालावधीकरिता इन्‍श्‍युरन्‍स पॉलिसी क्रं. 281301/44/15/52000020 अन्‍वये विमा उतरविला होता. सदर विमा पॉलिसी द्वारे अनेक मशिनला विमा संरक्षण प्रदान करण्‍यात आले होते.  दि. 02.02.2016 ला शीतगृहातील एअर कंडिशनर कॉम्‍प्रेसर काम करीत नसल्‍यामुळे Air frost Services टेक्निशनला (तंत्रज्ञाला) बोलविण्‍यात आले व त्‍यांनी Air Conditioners ची तपासणी केली व कॉम्‍प्रेसर जळले असल्‍यामुळे ते बदलविण्‍याबाबत तक्रारकर्त्‍याला सांगितले. तसेच याबाबत विरुध्‍द पक्ष विमा कंपनीला ही कळविले. त्‍यामुळे  विरुध्‍द पक्षाने सर्व्‍हेअर व लॉस असेसर,(मूल्‍यनिर्धारक)  श्री. संतोष कुळकर्णी यांची सर्व्‍हे करण्‍याकरिता व अहवाल सादर करण्‍याकरिता नेमणूक केली. सर्व्‍हेअरने सर्व्‍हेक्षण केल्‍यानंतर दि. 11.07.2016 ला दस्‍तावेज प्राप्‍त  झाल्‍यानंतर आपला सर्व्‍हे अहवाल सादर केला व त्‍यात नमूद केले की, Air conditioner compressor high voltage supply fluctuation विद्युत पुरवल्‍यामुळे (जळले) निकामी झाले.सर्व्‍हेअरने ए.सी. चे वय लक्षात घेता म्‍हणजे त.क.च्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे ए.सी. हा सन 2001 म्‍हणजे 15 वर्षे जुना असल्‍यामुळे मशिनचा घसारा काढून सॅलव्‍हेज काढून विमा दावा नुकसान भरपाई रुपये 33,518/- काढली. सर्व्‍हेअरने दिलेल्‍या अहवालानुसार विरुध्‍द पक्षाने निकाली काढलेला विमा दावा रुपये 33,000/- चे डिसचार्ज व्‍हाऊचर तक्रारकर्त्‍याला दि. 21.03.2016 ला ई-मेल द्वारे पाठविले व सदर व्‍हाऊचर स्‍वाक्षरी करुन तक्रारकर्त्‍याला परत पाठविण्‍याबाबत कळविले. जेणे करुन सदरची नुकसान भरपाई रक्‍कम त्‍वरित तक्रारकर्त्‍याला देता येईल, परंतु तक्रारकर्त्‍याने त्‍याचा  स्‍वीकार न केल्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने विमा दावा No Claim म्‍हणून बंद केला. तक्रारकर्त्‍याने विमा कंपनीचे सर्व्‍हे रिपोर्टवर आक्षेप नोंदविला नाही, त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष विमा कंपनी तक्रारकर्त्‍याला सर्व्‍हे रिपोर्ट पेक्षा जास्‍त रक्‍कम देण्‍यास बाध्‍य नाही. तक्रारकर्त्‍याने कंपनीच्‍या सर्व्‍हेअरने काढलेल्‍या  मुल्‍यनिर्धारणाप्रमाणे नुकसानीची विमा रक्‍कम घेण्‍यास नकार दिला. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्‍याच्‍या कारणाने तक्रारकर्त्‍याची तक्रार दंडासह खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली.

 

  1.      उभय पक्षांनी दाखल केलेल्‍या दस्‍तावेजाचे अवलोकन केले असता व उभय पक्षांच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

       अ.क्रं.        मुद्दे                                                  उत्‍तर

1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?होय

2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय? होय

3 काय आदेश ?अंतिम आदेशाप्रमाणे

 

  •                                                                                           निष्‍कर्ष
  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून दि. 30.07.2015 ते 29.07.2016 या कलावधीकरिता रुपये 11,95,000/- इतक्‍या रक्‍कमेकरिता विमा पॉलिसी क्रं. 281301/44/15/52000020 अन्‍वये शीतगृहातील अनेक मशिनचा विमा उतरविला होता, याबाबत उभय पक्षात वाद नाही. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.
  2.      दि. 02.02.2016 ला शीत गृहातील एअर कंडिशनर कॉम्‍प्रेसर काम करीत नसल्‍यामुळे Air Frost  Services च्‍या तंत्रज्ञला (टेक्शिनला)  बोलविले असता त्‍यांनी एअर कंडिश्‍नरची तपासणी केली व कॉम्‍प्रेसर जळले असल्‍यामुळे ते बदलविण्‍याबाबत तक्रारकर्त्‍याला सांगितले व याबाबत विरुध्‍द पक्ष विमा कंपनीला ही कळविले असल्‍याचे नमूद आहे. विरुध्‍द पक्षाने  सर्व्‍हेअर व मूल्‍यनिर्धारक (लॉस असेसर) श्री. संतोष कुळकर्णी यांची सर्व्‍हे करण्‍याकरिता व अहवाल सादर करण्‍याकरिता नेमणूक केली. सर्व्‍हेअरने सर्व्‍हेक्षण केल्‍यानंतर उशिराने दि. 11.07.2016 ला दस्‍तावेज प्राप्‍त झाल्‍यानंतर आपला सर्व्‍हे अहवाल सादर केला व त्‍यात नमूद केले की, Air conditioner compressor high voltage supply fluctuation विद्युत पुरवल्‍यामुळे (जळले) निकामी झाले, हे विरुध्‍द पक्षाला मान्‍य असल्‍याचे दिसून येते. सदरहू पॉलिसीप्रमाणे A.C. साठी रक्‍कम रुपये 2,00,000/- चा विमा संरक्षण असल्‍याचे पॉलिसीत नमूद आहे. तक्रारकर्त्‍याने टेक्निशयनच्‍या (तंत्रज्ञच्‍या) म्‍हणण्‍यानुसारच शीतगृहातील निकामी झालेल्‍या मशिनचे कॉम्‍प्रेसर बदलविले आणि मशिनमध्‍ये गॅस भरुन ती स्‍थापित करण्‍याकरिता तक्रारकर्त्‍याला एकूण रुपये 1,17,037/-  इतका खर्च आला असतांना विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या शीतगृहातील कॉम्‍प्रेसर निकामी झाल्‍यापोटी आलेल्‍या एकूण खर्चाची रक्‍कम मंजूर न करता विरुध्‍द पक्षाने त्‍यांच्‍या कंपनीतील अधिकृत सर्व्‍हेअरने दिलेल्‍या अहवालाप्रमाणे एकूण रुपये 33,518/- इतका मंजूर केला. विरुध्‍द पक्ष कंपनीने तक्रारकर्त्‍याच्‍या शीतगृहातील निकामी झालेल्‍या कॉम्‍प्रेसरची तपासणी करण्‍याकरिता दुस-या तज्ञांची (टेक्‍नीशयनची) नेमणूक केली नाही.  विरुध्‍द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याने निविदा द्वारे खुल्‍या मार्केटमधून विकत घेतलेल्‍या कॉम्‍प्रेसरला हरकत न घेता व स्‍वतः मार्केटमधून त्‍याच कॉम्‍प्रेसरच्‍या किंमतीचे दर न बघता सर्व्‍हेअरच्‍या तपासणी अहवालावर विसंबून राहून तक्रारकर्त्‍याचा योग्‍य असलेला विमा दावा मंजूर न करता त्‍याएैवजी तक्रारकर्त्‍याला सर्व्‍हेअरच्‍या अहवालानुसार विमा दावा रक्‍कम रुपये 33,518/- मंजूर करुन तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली असल्‍याचे दिसून येते. तक्रारकर्त्‍याने आपल्‍या कथनाच्‍या समर्थनार्थ Revision petition No. 1649/2015, National Insurance Co. Vs. Rama Nanda , Dt. 23.02.2016 या प्रकरणातील  घेतलेला न्‍यायनिवाडयाचा आधार योग्‍य आहे असे आमचे मत आहे.

 

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या शीतगृहातील मशिनच्‍या विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये 1,17,037/- व त्‍यावर दिनांक 21.03.2016 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्त्‍याला अदा करावी.
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक , मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.
  4. विरुध्‍द पक्षाने उपरोक्‍त आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक महिन्‍याच्‍या आत करावी.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क  फाईल परत करावी.  
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.