Maharashtra

Chandrapur

CC/18/63

Smt Wachhala Natthu Bodhe At Ekarjuna - Complainant(s)

Versus

National Insurance Company Limited through Divisional Manger - Opp.Party(s)

Adv. Kshirsagar

06 Sep 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/18/63
( Date of Filing : 17 Apr 2018 )
 
1. Smt Wachhala Natthu Bodhe At Ekarjuna
At Ekarjuna Tah WArora
chandrapur
maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. National Insurance Company Limited through Divisional Manger
Divisioanal office No 9 comercial Union House 1 floor Woles Stet Fort Mumbai
Mumbai
Maharashtra
2. National Insurance Company Limited through Kshatriy Vyavasthapak
Keshatriya office Fidavi Tower 5 floor nagapur
Nagpur
maharashtra
3. Tahasildar Warora
Tah Warora
chandrapur
maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 06 Sep 2021
Final Order / Judgement

(मंचाचे निर्णयान्‍वये, मा. सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्‍या)

(पारित दिनांक :- ०८/०९/२०२१)

 

  1. तक्रारकर्तीने  सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्तीचे पती श्री नथ्‍थु महादेव बोढे यांच्‍या मालकीची मौजा रा.एकोना, ता. वरोरा, जिल्‍हा चंद्रपूर येथे भुमापन क्रमांक २७ ही शेतजमीन आहे. तक्रारकर्तीचा पती हा शेतातील उत्‍पन्‍नावर त्‍याचे कुटुंबाचे पालनपोषन करीत होता. तक्रारकर्तीचा पतीचा मृत्‍यु दिनांक २७/९/२००६ रोजी भावाने मारहाण केल्‍याने जखमी होऊन झाला. तक्रारकर्तीचा पती हा शेतकरी असल्‍यामुळे त्‍याचा शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविला होता. तक्रारकर्ती ही मय्यत श्री नथ्‍थु महादेव बोढे यांची पत्‍नी असल्‍याने सदर विम्‍याची लाभधारक आहे. तिने सर्व कागदपञांची शहानिशा करुन विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ कडे अर्ज केला परंतु पतीच्‍या दाव्‍याबाबत बारा वर्षे उलटून गेले तरी मंजूर अथवा नामंजूर न कळविल्‍याने दिनांक ७/३/२०१८ रोजी कायदेशीर नोटीस विरुध्‍द पक्ष क्रमांक १  व ३ यांना पाठविले परंतु विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांनी नोटीसला उत्‍तर दिले नाही. सबब तक्रारकर्तीला तिच्‍या मय्यत पतीच्‍या विम्‍याबाबतची नुकसान भरपाई न मिळाल्‍यामुळे तिने सदर तक्रार या आयोगासमोर रुपये १,००,०००/- मिळण्‍याकरिता तसेच मानसिक व शारीरिक ञासापोटी व तक्रारीचा खर्च मिळावा या करिता दाखल केली आहे.
  3. सदर प्रकरणाची नोटीस विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांना बजावली असता विरुध्‍द पक्ष क्रमांक १  हे हजर होऊन यांनी प्रकरणात लेखी उत्‍तर दाखल केले. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ व ३ यांना नोटीस प्राप्‍त होऊन सुध्‍दा तक्रारीत उपस्थित न झाल्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द तक्रार एकतर्फा चालविण्‍याचा आदेश दिनांक २१/८/२०१८ रोजी करण्‍यात आला.
  4. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी त्‍यांच्‍या उत्‍तरामध्‍ये तक्रारीवर आक्षेप उपस्थित करुन असे नमूद केले की, मृतक श्री नथ्‍थु महादेव बोढे यांचा मृत्‍यु दिनांक २७/२/२००६ रोजी कौटुंबीक संपत्‍तीच्‍या वादापोटी मृतक श्री नथ्‍थु महादेव बोढे यांचेसोबत त्‍याचे भावाने भांडण करुन त्‍याचे डोक्‍यावर मारहाण केल्‍यामुळे झाला. त्‍या संदर्भात कलम ३०२ भांदवी अंतर्गत गुन्‍हा  क्रमांक ०७१९/२००६ नोंद झाला आहे. एकंदरीत संपत्‍तीच्‍या वादावरुन तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु  झाल्‍याचे दस्‍तऐवजावरुन दिसून येत असल्‍यामुळे महाराष्‍ट्र सरकार व विमा कंपनी यांचेमध्‍ये व्‍यक्तिगत विमा योजनेचे ‘प्रपञ – क’ प्रमाणे शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत समाविष्‍ट नसलेल्‍या संरक्षण बाबीप्रमाणे गुन्‍ह्याचे उद्देशाने कायद्याचे उल्‍लंघन करतांना झालेला अपघात ही बाब विमा संरक्षण मध्‍ये मोडत नाही, या कारणाने सदर विमा योजनेअंतर्गत अदखलपाञ आहे. तसेच तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ कडे विमा रकमेसंबंधी प्रस्‍ताव पाठविला नाही. तसेच तक्रारकर्तीने विलंबाने म्‍हणजेच घटनेच्‍या १२ वर्षानंतर त्‍याचे वकीलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवून भरपाईची मागणी केलेली असल्‍यामुळे सदर तक्रार मुदतबाह्य तसेच बेकायदेशीर असल्‍यामुळे खारीज करण्‍यात यावी.
  5. तक्रारकर्तीची तक्रार, दस्‍तऐवज, शपथपञ पुरसिस तसेच विरुध्‍द पक्ष क्रमांक १ चे उत्‍तर, शपथपञ पुरसिस तसेच दोन्‍ही पक्षाचे परस्‍परविरोधी कथनावरुन तक्रार निकालीकाढण्‍याकरिता खालील कारणमिमांसा व त्‍यावरील निष्‍कर्षे कायम करण्‍यात येत आहे.
  6. तक्रारकर्तीने तक्रारीत दाखल केलेल्‍या निशानी क्रमांक ४ मधील दस्‍त क्रमांक २ वरुन तिचा पती  हा शेतकरी होता व त्‍याचे नावाने शेतजमीन आहे ही  बाब सिध्‍द होत आहे परंतु तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष क्रमांक  १ व ३ यांचेकडे नुकसान भरपाई मिळण्‍याबाबत अर्ज व दस्‍तऐवज पाठविल्‍याबाबत कोणताही पुरावा तक्रारीत दाखल नाही तसेच विमा दाव्‍यासंबंधी जर तक्रारकर्तीने अर्ज विरुध्‍द पक्ष क्रमांक १ कडे दाखल केला ही बाब त्‍यांनी नाकारलेली आहे. शिवाय सदर शेतक-याचा मृत्‍यु पासून घटनेच्‍या १२ वर्षानंतर दिनांक ७/३/२०१८ रोजी तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष यांना नोटीस पाठविली आहे. त्‍यामुळे तक्रारकर्तीला तक्रारीचे कारण नव्‍याने प्राप्‍त होत नाही व सन २००६ साली झालेल्‍या  घटनेकरिता तक्रार दाखल करण्‍याची मुदत व्‍यपगत झाली असून त्‍या  कारणास्‍तव सदर तक्रार खारीज होण्‍यास पाञ आहे.  तसेच उभयपक्षाच्‍या  परस्‍परविरोधी बयानाचा विचार करता आयोगाच्‍या मते एखाद्या व्‍यक्‍तीने विमा दावा दाखल केल्‍यानंतर दावा प्राप्‍त करण्‍यासाठी ११ ते १२ वर्षे वाट पाहणार नाही आणि दावा मिळण्‍याकरिता तिचे प्रयत्‍न  सतत चालू  राहतील परंतु सदर प्रकरणात असा कोणताही पञव्‍यवहार किंवा पाठपुरावा केल्‍याचे दाखल दस्‍तऐवजावरुन दिसून येत नाही. तसेच प्रकरणात दावा दाखल केल्‍यानंतर फक्‍त दावा नाकारण्‍याचे पञ विरुध्‍द पक्षाकडून प्राप्‍त झाले नाही म्‍हणून तक्रार दाखल करण्‍याचे कारण सतत घडत आहे ही बाब ग्राह्य धरण्‍यासारखी नाही. सबब सदर तक्रार मुदतीत नाही, ही बाब सिध्‍द होत आहे. सबब आयोग वरील विवेंचनावरुन खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.

 

अंतिम आदेश

  1. तक्रार क्रमांक सी.सी.१८/६३ खारीज करण्‍यात येते.
  2. उभयपक्षांनी आपआपला तक्रार खर्च सहन करावा.
  3. उभयपक्षांना आदेशाची प्रत तात्‍काळ निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  4. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.