::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्या) (पारीत दिनांक :- 29/4/2019
1. अर्जदार हिने ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदाराविरूध्द प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे . ही वरील पत्त्यावर राहात असून अर्जदाराचे प्रति श्री मनोहर सदाशिव कारमवार हे दिनांक २७.०१.२०१६ रोजी रोड अपघात मृत्यू पावले .अर्जदाराच्या पतीचा व्यवसाय हा शेती असून शेतजमीन त्यांच्याकडे शेतजमीन होती. सदर शेतीचा भूमापन क्रमांक १८ असून सदर शेती ही मौजा मोहगाव तालुका मुल येथे होती. शेतीच्या उत्पन्नावर सगळ्या कुटुंबाचे पालन पोषण अर्जदाराचे पती करीत होते. अर्जदाराच्या पतीचा शेतकरी अपघात विमा काढला असल्याने अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक तीन कडे रीतसर अर्ज सादर केला सदर पोलिसाच्या नियमानुसार गैरअर्जदार क्रमांक तीन हे सर्व कागदपत्रांची शहानिशा करून द्यावे स्वीकारतात व ते पुढे इन्शुरन्स ॲडव्हायझर यांच्याकडे पाठवतात व इन्शुरन्स ॲडव्हायझर सदर दावा गैरअर्जदार क्रमांक एक यांच्याकडे पाठवतात सदर योजने प्रमाणे पती यांचा विमा महाराष्ट्र सरकारतर्फे काढण्यात आला होता. विमा योजनेप्रमाणे अर्जदाराची पत्नीने कागदपत्रांसह क्रमांक दावा तीन कडे सादर केलेला होता. परंतु सर्व आवश्यक दस्तऐवज दाखल करून सुद्धा गैरअर्जदार क्रमांक एक व दोन यांनी त्या संदर्भात कोणतीही माहिती तिला दिली नाही .गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी दावा प्राप्त झाला तरी अजून पर्यंत सदर द्यावयाचे भुगतान न करता अकारण प्रलंबित ठेवून अर्जदाराची फसवणूक केली आहे. सबब दिनांक ४.१२.२०१७ रोजी अर्जदाराने वकिलामार्फत गैरअर्जदार यांना नोटीस पाठवली नोटीस मिळवून सुद्धा गैर अर्जदाराने कोणतीही उत्तर अर्जदाराला दिले नाही.सबब गैरअर्जदाराची सदर कृतीह निश्चितच न्युन्तापूर्ण सेवा आहे त्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदारा विरुद्ध सदर तक्रार दाखल केलेलि आहे.
२. अर्जदारांची मागणी अशी आहे की गैरअर्जदाराने अर्जदाराला विमा दाव्याची रक्कम २,००,०००/- गैर अर्जदाराकडे प्रस्ताव दाखल झाल्यापासून दसादशे १८ टक्के व्याजासह देण्याचे आदेश व्हावेत .तसेच शारीरिक आर्थिक त्रासापोटी रुपये २०,०००/-व तक्रारीचा खर्च १०,०००/- रक्कम देण्याचे आदेश व्हावेत.
3. अर्जदाराची तक्रार स्वीकृत करून गैरअर्जदार यांना नोटीस काढण्यात आली
गैरअर्जदार क्रमांक एक व दोन यांनी तक्रारीत उपस्थित राहून अर्जदारा हिच्या तक्रारीतील म्हणणे खोडून काढत नमूद केले की, तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्तावेज क्रमांक 1 ते 4 यावरून स्पष्ट होते की सदर दस्तावेज गैरअर्जदार क्रमांक एक व दोन पर्यंत तक्रार दाखल करून पोहोचले नाहीत. तसेच या प्रकरणात अर्जदार यांनी इन्शुरन्स ॲडव्हायझर कंपनी म्हणजे मेसर्स कबाल बुकींग सर्व्हिस प्रायव्हेट li लिमिटेड यांना पार्टी बनवले नाही. तसेच महाराष्ट्र शासन व मृतक यांच्यात झालेल्या तथाकथित विमा कराराची प्रत दाखल नाही. सदर मूळ कागदपत्रांच्या अभावी प्रस्तुत तक्रारी असंयुक्तिक विचाराधीन आहे. सदर तक्रार दाखल केलेल्या कार्याची माहिती अर्जदार यांनी गैरअर्जदार क्रमांक तीन कडे सादर केलेला तथकथित दावा गैरअर्जदार क्र. १व २ कडे क्रमांक पोहचल्याचे संबंधी कोणतेही दस्तावेज रेकॉर्डवर सादर झालेले नाही. अभावी अर्जदार यांनी गैरअर्जदार क्रमांक एक व दोन चे विरुद्ध केलेले कथन दखलपात्र आहे जोपर्यंत पॉलिसीच्या आवश्यक दस्तावेज गैरअर्जदार क्रमांक एक पुढे सादर होत नाही तोपर्यंत सदर दाव्याचा निकाल करण्याची संधी त्यांना उपलब्ध होत नाही. म्हणून याप्रकरणी गैरअर्जदार क्रमांक एक व दोन विरुद्ध केलेले कथ्सन व मागणी अदखलपात्र व बेकायदेशीर आहे. गैरअर्जदार क्रमांक एक व दोन विरुद्धची तक्रार खारीज करण्यात यावी.तसेच अर्जदार यांनी दि. 4. 12. 2017 रोजी पाठवलेल्या नोटीसचे पोचपावती रेकॉर्ड सादर करण्यात आली नाही तर नोटीस गैरअर्जदार ह्यांना प्राप्त झाली ही बाब सिद्ध होत नाही. तसेच मृतकाचा मृत्यू अपघात झाला मात्र त्या गाडीचा चालक मालक व विमा कंपनी विरुद्ध मोटार अपघात दावा सदर नुकसान भरपाई मागणी क्रमप्राप्त होते त्यानुसार सदर कारवाई अर्जदारांनी गाडीचा चालक मालक व विमा कंपनी विरुद्ध केलेली असावी. त्यामुळे अर्जदाराचे झालेले सदर वाहनाचा चालक मालक व विमा कंपनीकडून मिळू शकेल म्हणून वरील कारणांनी सुद्धा अर्जदाराची तक्रार दाखल पात्र व बेकायदेशीर असून खारीज करण्यात यावी.
४. अर्जदार क्रमांक तीन यांना मंचतर्फे नोटीस प्राप्त होऊन सुद्धा गैरअर्जदार क्रमांक तीन हजर न झाल्यामुळे दिनांक 24 .10. 2018 रोजी गैरअर्जदार क्रमांक तीन विरुद्ध एकतर्फा प्रकरण चालवण्याचे आदेश पारित करण्यात आले. ५.. तक्रारकर्तीची तक्रार दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व गैरअर्जदार क्र. 1 व २ यांचे लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र लेखी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ती व वि. प क्र.१ व 2 यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे.
मुद्दे निष्कर्ष
1. तक्रारकर्ती ही गैरअर्जदार क्र. 1 व 2 ची ग्राहक आहे काय ? होय
2. तक्रारकर्ती ही गैरअर्जदार क्र. 3 ची ग्राहक आहे काय ? नाही
3. गैरअर्जदार क्र.1 व २ ने तक्रारकर्तीस त्रुटीपूर्ण सेवा दिली आहे
काय ? होय
4. आदेश काय ? अंशत: मान्य
कारण मिमांसा
मुद्दाक्र.१बाबत
6. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता निदर्शनास येते कि दिनांक 27 .1. 2016 रोजी अर्जदाराचे पतीचा अपघाती निधन झाले. अर्जदाराचे पती हे शेतकरी असून त्यांनी शेतकरी अपघात विमा काढलेला असल्यामुळे लाभार्थी म्हणून अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक तीन कडे दस्तावेज यासह लाभ मिळण्याकरता दावा दाखल केला यात वाद नाही. हे गैर अर्जदार क्रमांक एक व दोन यांनी त्यांचे उत्तर नमूद केले की अर्जदाराचा विमा दावा त्यांना प्राप्त न झाल्यामुळे त्यांना कोणताही निर्णय घेता आला नाही. पंतप्रधान दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता निशाणी क्रमांक 4 दस्त क्रमांक 11 वर अर्जदाराने अर्जदार क्रमांक एक कडे दाखल केलेला क्लेम फॉर्म तसेच दस्त क्रमांक 12 वर कृषी अधिकारी ह्यांनी कबाल इन्शूरन्स यांना लिहिलेले पत्र जोडलेले असून त्यात अर्जदाराकडून त्यांना दस्तावेजांसह वीमादावा प्राप्त झाल्याचे नमूद केले आहे. यावरून अर्जदाराचा विमा दावा गैरअर्जदार क्र. ३ यांना प्राप्त झाला आहे असे दिसून येते. महाराष्ट्र शासनाचे परिपत्रकाप्रमाणे तालुका कृषी अधिकारी यांना ज्या तारखेला विमा दावा प्राप्त होतो त्याच तारखेला विमा कंपनीला देखील विमा दावा प्राप्त झाल्याचे समजण्यात यावे व विमा कंपनी पर्यंत विमा दावा पोचला नाही या कारणास्तव विमा दावा न करता येणार नाही असे निर्देश देण्यात आलेले आहेत. सबब अर्जदाराचा विमा दावा प्राप्त झाला नाही हे गैरअर्जदार क्रमांक एक चे म्हणणे ग्राह्य धरता येत नाही. तक्रार करतील विमा लाभापासून वंचित ठेवून अर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी सेवेत न्यूनता केली आहे असे मंचाचे मत आहे सबब क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 2 बाबत ः-
7. गैरअर्जदार क्र.३ यांनी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शेतक-यांचा विमा काढला व सदर विमा काढण्याकरीता वि.प.क्र.2 यांनी विनामोबदला मदत केली असल्याने तक्रारकर्ती ही गैरअर्जदार.क्र.३ यांची ग्राहक नाही. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यांत येते.
मुद्दा क्रमांक 2 बाबत ः-
8. विरूध्द पक्ष क्र. 2 यांनी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शेतक-यांचा विमा काढला व सदर विमा काढण्याकरीता वि.प.क्र.2 यांनी विनामोबदला मदत केली असल्याने तक्रारकर्ती ही वि.प.क्र.2 यांची ग्राहक नाही. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यांत येते.
मुद्दा क्रमांक 3 बाबत ः-
मुद्दा क्रमांक 1 ते 3 च्या विवेचनावरून खालील आदेश पारित करण्यात येतो.
अंतिम आदेश
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2. गैरअर्जदार र्क्रमांक 1 व २ ह्यांनी शेतकरी अपघात विमा दावा
योजनेअंतर्गत विमादावा रक्कम रुपये 2,00,000/- तक्रारकर्तीस द्यावी.
3. विरूध्द पक्ष क्रमांक 3 विरुद्ध कोणतेही आदेश नाहीत.
४. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी
चंद्रपूर
दिनांक – २९/०४/२०१९.
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर. | |