Maharashtra

Chandrapur

CC/18/174

Smt Mohanabai Kisana Nimbakar - Complainant(s)

Versus

National Insurance Company Limited through Divisional Manager - Opp.Party(s)

Adv. Hatkar

27 Jun 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/18/174
( Date of Filing : 24 Oct 2018 )
 
1. Smt Mohanabai Kisana Nimbakar
At Post Jambgaon khurd Tah Warora
chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. National Insurance Company Limited through Divisional Manager
Divisional office No 9 comrcial union house Exseler Tiater 9 Welex Strit Foret Mumbai
Mumbai
maharashtra
2. National Insurance Company Limited through Branch Manager
Fidavi towert Mount road Sadar Nagpur
Nagpur
Maharashtra
3. Taluka Krushi Asdhikari Warora
Tah Warora
chandrapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 27 Jun 2019
Final Order / Judgement

::: नि का ल प ञ:::

(मंचाचे निर्णयान्‍वये,  मा. सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्‍या)

(पारीत दिनांक :-(27/06/2019)

  1. अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदाराविरूध्‍द प्रस्‍तूत तक्रार दाखल केली आहे. 
  2. अर्जदार बाई ही वरील पत्त्यावर राहात असून तिचा मुलगा श्री संदीप किसन निमकर हा दिनांक 7. 10. 2006 रोजी अपघातात मरण पावला अर्जदार बाईचा हा मुलगा शेतीचा व्यवसाय करीत असून त्याच्या नावे शेतजमीन होती. सदर शेतीचा भूमापन क्रमांक 97 हा असून सदर शेती ही मौजा जामगाव ( खु ) तहसील वरोरा येथे होती अर्जदार चा मुलगा हा शेतकरी होता व शेतीच्या उत्पन्नावर सगळ्या कुटुंबाचे पालन पोषण करीत होता अर्जदार मुलाच्या शेतकरी अपघात विमा काढला असल्याने अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक तीन कडे रीतसर अर्ज सादर केला होता परंतु अर्जदार बाईला आजतागायत लाभ मिळालेला नसल्याने सदर तक्रार अर्जदाराने दाखल केलेली आहे. शेतकरी विमा बद्दल गैरअर्जदार  क्रमांक तीन कडे जाऊन अर्जदार यांनी वारंवार चौकशी करून सुद्धा तिला तिच्या दाव्याबद्दल कोणतीही माहिती गैरअर्जदार क्रमांक तिने दिली नाही. अर्जदार हिने तिच्या मुलाच्या मृत्युनंतर व मुलगा शेतकरी असल्यामुळे नियमांना अनुसरून दावा गैरअर्जदार क्रमांक तीन यांच्याकडे दाखल करुन अर्जदाराने दाव्याची मागणी केली होती. तसेच अर्जदाराने आवश्‍यक दस्तऐवजांची पूर्तता करुन सुध्‍दा अर्जदाचा विमा दावा मंजूर किंवा नामंजूर केल्याबाबतची कोणतीही माहिती अर्जदाराला देण्‍यात आलेली नाही. तसेच अर्जदाराला दाव्याचे भुगतान न झाल्यामुळे अर्जदार हिला अतिशय हाल-अपेष्टा सहन करावा लागत आहे. अर्जदार ही अशिक्षित असून खेड्यात राहत असल्यामुळे तिला सदर योजने बद्दल काहीही माहिती नव्हती अर्जदाराने जसे तसे करून सर्व कागदपत्रे गोळा करून रीतसर अर्ज दाखल केला सदर योजना ही शेतकर्‍यांच्या वारसांना आधार देण्याकरता निर्गमित केलेली असल्यामुळे गैर अर्जदाराच्या कृत्याने या उद्देशालाच तडा जात आहे.  सदर सेवा ही  त्रुटीपूर्ण सेवा असल्यामूळे अर्जदार बाईने दिनांक 10.9.2018 रोजी तिच्या वकिलामार्फत गैरअर्जदार यांना नोटीस पाठवूनही परंतु  नोटीस मिळूनही गैरअर्जदार कोणतेही उत्तर दिले नाही. सबब अर्जदार बाईने  सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.
  3. अर्जदाराची मागणी अशी आहे कि, ,अर्जदाराची तक्रार मंजूर करुन गैरअर्जदाराने अर्जदाराला विमा द्यावयाची रक्कम रुपये एक लाख विमा दावा गैरअर्जदाराकडे प्रस्ताव दिल्यापासून द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह देण्याचे आदेश व्हावे. तसेच गैर अर्जदाराने अर्जदारास आर्थिक,मानसिक, शारिरिक त्रासापोटी रुपये 20,000/- तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 10,000/- रक्कम देण्याचे विरुद्ध पक्षांना आदेश व्हावेत.
  4. मंचातर्फे गैरअर्जदार क्रमांक 1, 2 व 3 यांना नोटीस पाठविण्‍यात आली.
    गैरअर्जदार क्रमांक एक व दोन यांनी उपस्थित राहून त्यांचे लेखी उत्तर दाखल करत अर्जदाराचे तक्रारीतील म्हणणे खोडून काढत पुढे विशेष कथनात नमूद केले की, गैरअर्जदार क्रमांक एक ह्यांना अर्जदाराचे कोणत्याही दावा किंवा दस्तावेज ब्रोकिंग एजन्सीमार्फत प्राप्त झाले नाही. त्यामुळे अर्जदाराचा विमा दावा मंजूर किंवा नामंजूर करण्याचा प्रश्नच येत उद्धवत नाही. तसेच प्रयोगशाळेचा अहवाल (विषारी साप चावल्याबद्दलचा रिपोर्ट) तक्रारीत दाखल नाही परंतु पीएम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण विषारी साप चावल्याबद्दल नमुद आहे. त्यामूळे सदरचा अहवाल तक्रारीत दाखल करणे आवश्‍यक आहे. वरील सर्व कारणांमुळे सदर तक्रार अर्ज खारीज करण्यात यावा.
  5. गैरअर्जदार क्रमांक तीन त्यांनी उत्तर दाखल करीत नमूद केले की, सदर योजनेअंतर्गत शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबियांचे विमा प्रस्ताव संबंधित तालुक्याचे तहसील कार्यालयात स्वीकारून माननीय तहसीलदार यांच्यामार्फत वरिष्‍ठ यंत्रणेस सादर करण्यात येत होते.  सन २००८-२००९ पासून सदर योजनेची विमा प्रस्ताव तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करण्याबाबत सुरुवात झाली. तरी संबंधित अर्जदाराचे प्राप्त तक्रारीनुसार त्यांच्या विमा प्रस्तावाची कार्यालय नोंदणीनुसार पाहणी केली असता त्यांनी कुठल्याही प्रकारचा विमा प्रस्ताव आमच्या कार्यालयाकडे सादर केलेला नसून त्याची कुठलीही नोंद कार्यालयात नोंद वहीत नाही. तरी त्यांनी त्यांच्या विमा प्रस्ताव त्यावेळी तहसील कार्यालय समोर सादर केलेला असावा कारण संबंधित २००६ ते २००७ तसेच २००७ ते २००८ वर्षात शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा तहसील कार्यालय स्वीकारून संबंधित वरिष्ठ यंत्रणेकडे पाठवायचा होता.
  6. अर्जदाराची तक्रार, दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्‍तीवाद व गैरअर्जदार क्र.1, 2 व 3 यांचे तोंडी म्‍हणणे, पुरावा शपथपत्र लेखी युक्‍तीवाद तसेच अर्जदार व गैरअर्जदार यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्‍यात येत आहे.

 

मुद्दे                                              निष्कर्ष

  1. अर्जदार गैरअर्जदार क्रं. 1 व 2  यांचा  ग्राहक आहे काय ?     होय.
  2. अर्जदार गैरअर्जदार क्रं. 3 यांचा ग्राहक आहे काय ?              नाही.
  3. गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांनी  अर्जदारांस न्‍युनतापूर्ण

सेवा दिली आहे  काय ?                                                  नाही.

  1. आदेश काय  ?                                                       अंतीम आदेशाप्रमाणे.

 

  • मिमांसा

8. मुद्दा क्रं. 1 बाबत :-

अर्जदार हिने निशाणी क्रमांक 4 वर दाखल केलेला 7/12 उतारा, फेरफारपत्रक व शेतीचे दस्‍ताऐवज यांचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते की अर्जदाराचा मुलगा श्री.संदीप किसन निमकर यांच्‍या मालकीची मौजा  -जामगाव (खु)  तह.वरोरा, जि.चंद्रपूर येथे भुमापन क्र.९७ ही शेतजमीन आहे. यावरून मयत विमाधारक संदीप किसन निमकर हे शेतकरी होते व शेतीतील उत्‍पन्‍नावर ते कुटूंबाचे पालन पोषण करीत होते हे सिध्‍द होते.  अर्जदाराच्या मुलगा शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत २००६-२००७  या कालावधी करिता रू.1,00,000/- चा शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा काढण्यात आला होता ही बाब गैर अर्जदार ह्यांनी नाकारलेली नाही.सबब अर्जदार ही मयत विमाधारक शेतक-याची आई असून सदर विम्‍याची लाभधारक आहे. सबब अर्जदार ही गैरअर्जदारक्र.1 व 2 ची ग्राहक आहे हे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्‍तर हे होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

  1. मुद्दा क्रमांक २  बाबत..
  2. तक्रारीत अर्जदाराचा दावा  गैरअर्जदार क्रमाक ३ तर्फे गैरर्जदार क्रमाक १व २ कडे  कोणताही दावा दाखल न केल्यामुळे प्रस्तुत तक्रारीचा गैरअर्जदार क्रमाक ३ यांचा कोणताही संबध नाही.
  3. मुद्दा क्रं. 3 बाबत :-

प्रस्तुत तक्रारीत अर्जदार बाईचे तक्रारीतील कथन तसेच गैरअर्जदार क्रमांक एक व दोन तसेच तीन चे उत्तर, तक्रारीतील दस्तएवजाचे अवलोकन केले. गैरअर्जदार क्रमांक एक यांच्याकडे आवश्यक दस्ताऐवजसह शेतकरी अपघात विमा दाव्याची  मागणी करून सुद्धा दाव्याबद्दल गैरअर्जदार यांनी काही माहिती दिली नाही असे अर्जदारांचे म्हणणे आहे. तसेच गैरहजर क्रमांक 1 व 2 यांनी विशेष कथनात अर्जदाराच्या कोणताही दावा त्यांना मिळालेला नसल्यामुळे त्यांनी तो नामंजूर किंवा मंजूर करण्याबाबत कळविले नाही असे स्पष्ट केलेले आहे. तसेच गैरअर्जदार क्रमांक तीन च्या उत्तराचे अवलोकन केले असता त्यांच्या उत्तरावरून असे दिसून येते की अर्जदार बाई च्या मुलाचा मृत्यू 2006 मध्ये झाला तेव्हा 2006 ते 2007 किंवा 2007 ते 2008 मध्ये सदर योजने अंतर्गत विमा दावा हा तहसीलदार यांच्यामार्फत पाठवण्यात येत होता व त्यानंतर २००८ ते 2009 पासून तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत सादर करण्यास सुरुवात झाली.परंतु अर्जदाराने तहसीलदाराकडे दावा दाखल केला त्याबाबातचे कोणतेही दस्त तक्रारीत दाखल केलेले नाही. सबब मंच निष्कर्षाप्रत पोहोचलेला आहे की, अर्जदाराने जरी तक्रारीत तहसीलदार कडे दावा पाठविला होता याबद्दल कोणताही पुरावा तक्रारीत दाखल केला नसला तरीसुद्धा शासनाच्या योजने अंतर्गत अर्जदार बाईला शेतकरी अपघात विम्याचा लाभ मिळावा यासाठी अर्जदार बाईने पुन्हा दस्तऐवजासह शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा लाभ मिळण्या बाबतचा प्रस्ताव गैरअर्जदाराकडे पाठवावा व गैरअर्जदाराने सदर प्रस्तावावर त्वरीत निर्णय घ्यावा.  सबब हे मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.

                                                            अंतीम आदेश

  1. अर्जदार बाईने आदेश प्राप्त होताच शेतकरी विमा योजनेअंतर्गत तिच्या  मुलाचा अपघात विमा दावा नियमानूसार गैरअर्जदार यांचेकडे संपूर्ण दस्‍तावेजांसह सादर करावा.
  2. गैरअर्जदार यांनी प्रस्‍ताव प्राप्‍त झाल्‍यावर अर्जदार बाईचा दावा त्वरीत निकाली काढावा. 
  3. गैरअर्जदार क्र. 3 विरुध्‍द कोणताही आदेश नाही.
  4. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्‍काळ पाठविण्‍यात यावी.

 

                              

         (श्रीमती.कल्‍पना जांगडे(कुटे))  (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ))  (श्री. श्री.अतुल डी. आळशी)

       सदस्‍या                          सदस्‍या                      अध्‍यक्ष

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.

 

 

 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.