Maharashtra

Gadchiroli

CC/36/2017

Smt. Sunanda Prabhakar Chouthale - Complainant(s)

Versus

National Insurance Company Limited Through Divisional Manager, Mumbai & Other 1 - Opp.Party(s)

Adv. Lalit Limaye

03 Aug 2018

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Gadchiroli.
M.I.D.C. Road, T - Point, Navegaon,
Tah. Dist. Gadchiroli.
Pin No. 442605.
Maharashtra
 
Complaint Case No. CC/36/2017
( Date of Filing : 26 Dec 2017 )
 
1. Smt. Sunanda Prabhakar Chouthale
At-Post-Asti, Tah-Chamorshi
Gadchiroli
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. National Insurance Company Limited Through Divisional Manager, Mumbai & Other 1
Divisional Office No. 9, Commercial Union House, Behind Excelsior Theartre, 9, Wallace Street, Fort, Mumbai - 400001.
Mumbai
Maharashtra
2. Taluka Krishi Adhikari, Chamorshi
At-Post-Tah-Chamorshi
Gadchiroli
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MS. Roza F. Khobragade PRESIDENT
 HON'BLE MR. Sadik M. Zaveri MEMBER
 
For the Complainant:Adv. Lalit Limaye, Advocate
For the Opp. Party:
Dated : 03 Aug 2018
Final Order / Judgement

(मंचाचे निर्णयान्‍वयेरोझा फुलचंद्र खोब्रागडेअध्‍यक्षा (प्र.))

            तक्रारकर्तीने सदरची तक्रार विरुध्‍द पक्षाविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्‍वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्‍यात येणे प्रमाणे... 

1.    तक्रारकर्ती ही राह. पोस्‍ट आष्‍टी, तह. चामोर्शी,जिल्‍हा गडचिरोली येथील रहीवासी असुन तिचे पती श्री. प्रभाकर रघुनाथ चौथाले यांच्‍या मालकीची मौजाः आलापल्‍ली, ता. चामोर्शी, जिल्‍हा- गडचिरोली येथे भूमापन क्र.22, ही शेतजमीन होती. तक्रारकर्तीचे पती शेतीचे काम करीत असे व शेतीच्‍या उत्‍पन्‍नावर आपल्‍या कुटूंबाचे पालन पोषन करीत होते. विरुध्‍द पक्ष क्र. 1 ही विमा कंपनी असून शासनाच्‍या वतीने विरुध्‍द पक्ष क्र.2 हे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दावे स्विकारतात. तसेच शासनाचे वतीने विरुध्‍द पक्ष क्र.2 व्‍दारे तक्रारकर्तीचे पतीने  रु.1,00,000/- चा विमा उतरविला होता. त्‍यामुळे तक्रारकर्ती ही मयत श्री. प्रभाकर रघुनाथ चौथाले यांची पत्‍नी असल्‍याने सदर विम्‍याची लाभधारक आहे. तक्रारकर्तीचे पतीचा मृत्‍यू दि.20.08.2006 रोजी रोड अपघातात झाला असल्‍याने तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष क्र.2 कडे रितसर अर्ज दाखल केला आहे.

2.    विरुध्‍द पक्षांकडे रितसर अर्ज केल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष क्र.2 यांनी तक्रारकर्तीला पतीच्‍या विमा दाव्‍याबाबत आजपर्यंत कोणतीही माहीती दिली नाही. तसेच शासनाने मृत शेतक-यांच्‍या पत्‍नी व मुलांसाठी ही योजना ज्‍या उद्देशाने सुरु केली त्‍या उद्देशालाच विरुध्‍द पक्ष तडा देत असल्‍याने सदरची कृति ही विरुध्‍द पक्षांची सेवेतील कमतरता आहे.  म्‍हणून तक्रारकर्तीने सदरची तक्रार मंचात दाखल करुन खालिल प्रमाणे मागणी केली आहे. 

3.    तक्रारकर्तीने आपल्‍या तक्रारीत विमा दाव्‍याची रक्‍कम रु.1,00,000/- विरुध्‍द पक्षाकडे प्रस्‍ताव दिल्‍यापासुन द.सा.द.शे. 18% व्‍याजासह मिळावी तसेच तक्रारकर्तीस झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाईची रक्‍कम रु.20,000/- व तक्रारीचा खर्च रु.10,000/-  मिळावा अश्‍या मागण्‍या केलेल्‍या आहेत. 

4.    तक्रारकर्तीने निशाणी क्र.3 नुसार 7 झेरॉक्‍स दस्‍तावेज दाखल केले. तक्रारकर्तीची तक्रार नोंदणीकरुन विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांना नोटीस काढण्‍यांत आली. विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांना नोटीस प्राप्‍त झाल्‍याचे प्रकरणात दाखल पोष्‍टाचे अहवालावरुन सिध्‍द होते. तसेच विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांना वारंवार संधी देऊनही ते प्रकरणात हजर झाले नाही त्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश मंचाने दि.13.07.2018 रोजी पारित केला.

5.  तक्रारकर्तीतर्फे मंचात दाखल तक्रार तसेच दाखल दस्‍तावेज यांचे अवलोकन केले असता मंचासमक्ष विचारार्थ खालिल मुद्दे येतात. 

 

              मुद्दे                                                                     निष्‍कर्ष 

1)    तक्रारकर्ती  ही विरुध्‍द पक्षांची ग्राहक आहे काय ?                    होय

2)    विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्तीप्रती सेवेत न्‍युनतापूर्ण                      होय

      व्‍यवहार केला आहे काय ?

3)    अंतिम आदेश काय ?                                               अंतिम आदेशाप्रमाणे  

 

                          - // कारणमिमांसा//  - 

 

6.    मुद्दा क्रमांक 1 बाबतः-   तक्रारकर्ती राह. पोस्‍ट आष्‍टी, तह. चामोर्शी,जिल्‍हा गडचिरोली येथील रहीवासी असुन तिचे पती श्री. प्रभाकर रघुनाथ चौथाले यांच्‍या मालकीची मौजाः आलापल्‍ली, ता. चामोर्शी, जिल्‍हा- गडचिरोली येथे भूमापन क्र.22, ही शेतजमीन होती. तक्रारकर्तीचे पती शेतीचे काम करीत असे व शेतीच्‍या उत्‍पन्‍नावर आपल्‍या कुटूंबाचे पालन पोषन करीत होते ही बाब निशाणी क्र.3 वर दाखल दस्‍त क्र.4 वरुन सिध्‍द होते. तसेच शासनातर्फे तक्रारकर्तीच्‍या पतीने शेतकरी अपघात विमा काढला असल्‍याने व तो शेतकरी असल्‍याने विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 ची ग्राहक आहे ही बाब सिध्‍द होते. म्‍हणून मुद्दा क्र. 1  चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे. 

7.  मुद्दा क्रमांक 2 बाबतः-   विरुध्‍द पक्षांकडे रितसर अर्ज केल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीला पतीच्‍या विमा दाव्‍याबाबत कोणतीही माहीती दिली नाही व विमा दावा निकाली काढला नाही. तसेच  मंचाव्‍दारे पाठविलेला नोटीस विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांना प्राप्‍त झाली असतांना व मंचाने वारंवार संधी देऊन सुध्‍दा ते हजर झाले नाही. व तक्रारकर्तीचे तक्रारीस उत्‍तर दाखल करुन तक्रारकर्तीचे म्‍हणणे खोडून काढले नाही. यावरुन शासनाने मृत शेतक-यांच्‍या पत्‍नी व मुलांसाठी ही योजना ज्‍या उद्देशाने सुरु केली त्‍या उद्देशालाच विरुध्‍द पक्ष तडा देत असल्‍याने सदरची कृति ही विरुध्‍द पक्षांची सेवेतील कमतरता आहे व हजर न राहून तक्रारकर्तीची मागणी मान्‍य असल्‍याचे सिध्‍द होते. सबब खालिल प्रमाणे अंतिम आदेश पारित करण्‍यांत येतो. 

 

- // अंतिम आदेश // -

1.    तक्रारकर्तीची ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल  विरुध्‍द पक्षांविरुध्‍दची तक्रार अंश‍तः मंजूर करण्‍यांत येते.

2.   विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्तीस शेतकरी अपघात विमा दाव्‍याची रक्‍कम रु.1,00,000/- तक्रार दाखल दि.26.12.2017 पासुन ते प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द.सा..शे. 9% व्‍याजासह परत करावी.

3.   विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्तीस झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.10,000/-  व तक्रारीचा खर्च रु. 5,000/- अदा करावा.

4.   वरील आदेशाची अंमलबजावणी विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक किंवा संयुक्‍तपणे आदेशाची प्रत मिळाल्‍याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.

5.   दोन्‍ही पक्षांना आदेशाची प्रथम प्रत विनामुल्‍य द्यावी. 

6.  तक्रारकर्तीस प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

  

 
 
[HON'BLE MS. Roza F. Khobragade]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Sadik M. Zaveri]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.