Maharashtra

Chandrapur

CC/13/4

Shri Chadda Roadlines Through Shri Anuj Kishankumar Chadda - Complainant(s)

Versus

NAtional Insurance Company Limited Through Branch Maneger - Opp.Party(s)

Adv.A.U.Kullarwar

20 Jan 2015

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/13/4
 
1. Shri Chadda Roadlines Through Shri Anuj Kishankumar Chadda
r/0-Shastri Nagar Mul Road Chandrapur
Chandrapur
Maharshtra
2. Shri Chadda Roadlines Through Mohit Satiskumar Chadda
r/0-Shastri Nagar Mul Road Chandrapur
Chandrapur
Mahrashtra
...........Complainant(s)
Versus
1. NAtional Insurance Company Limited Through Branch Maneger
Infront Of Zila Parishad Chandrapur
Chandrapur
Maharshtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vijay C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. Kalpana Jangade MEMBER
 HON'BLE MRS. Kirti Gadgil MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

::: नि का :::

(मंचाचे निर्णयान्‍वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्‍यक्ष)

(पारीत दिनांक :- 20/01/2015 )

 

अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्‍वये दाखल केली आहे.

अर्जदाराच्‍या तक्रारीचा आशय थोडक्‍यात खालील प्रमाणे.

 

1.    अर्जदाराने आापल्‍या तक्रारीत असे कथन केले आहे कि, अर्जदाराने त्‍याच्‍या ट्रक करीता गैरअर्जदाराकडून दि. 6/11/10 ते दि. 5/11/11 या कालावधीकरीता विमा प्रिमियम रक्‍कम भरुन विमा काढला होता. सदर कालावधीमध्‍ये दि. 25/12/10 ला अर्जदाराचा ट्रक वर्धा येथून आर्यन भरुन घुग्‍गुस येथे आला त्‍या राञी खाली करुन लायड मेटल घुग्‍घुस चे ग्राऊंड मध्‍ये कुलुप बंद करुन उभा केला होता. दि. 26/12/10 रोजी सकाळी 8 वाजता ट्रक चालकचे असे निर्देशनास आाले कि, सदर ट्रक तेथे उभा नव्‍हता त्‍यानंतर इतर ट्रक चालकांकडून चौकशी करुन शोध घेऊन सुध्‍दा ट्रकची काही माहीती नाही मिळाली म्‍हणून सदर ट्रक चोरी झाला याबाबत दि. 4/2/11 ला अर्जदाराच्‍या सुपरवायझरने पोलिस स्‍टेशन घूग्‍गुस येथे रिपोर्ट केली त्‍याप्रमाणे घटनेची माहीती गैरअर्जदाराला व आरटीओ चंद्रपूरला सुध्‍दा दिली. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे ट्रक चोरीबाबतचा विमा दावा सादर केला. गैरअर्जदाराने अर्जदाराला पञाव्‍दारे असे कळविले कि, अर्जदाराचा विमा दावा गैरअर्जदार कंपनीने नामंजूर केलेला आाहे. गैरअर्जदार कंपनीने कोणताही योग्‍य कारण नसतांना अर्जदाराचा विमा दावा खारीज केला म्‍हणून अर्जदाराने सदरा तक्रार मंचासमक्ष दाखल केली.  

 

2.    अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, अर्जदाराला गैरअर्जदाराकडून सदर ट्रकचा विमा रक्‍क्‍म 5,50,000/- व्‍याजासह देण्‍याचा आदेश व्‍हावे तसेच अर्जदाराला झालेल्‍या शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडून मिळण्‍याचा आदेश व्‍हावे.

 

3.    अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्‍द नोटीस काढण्‍यात आले. गैरअर्जदार हजर होवून नि. क्रं.  11 वर दाखल केले आाहे. गैरअर्जदाराने आपल्‍या लेखीउत्‍तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराने तक्रारीत लाावलेले सर्व आरोप खोटे असून नाकबुल केले आहे. अर्जदाराच्‍या चालक यांनी कोणतीही सुरक्षेची काळजी न घेता सदर ट्रक तालेबंद करुन निघून गेला. सदर ट्रकच्‍या चोरीबाबत पोलिस रिपोर्ट चाळीस दिवसाच्‍या नंतर दाखल करण्‍यात आली. तसेच दि. 4/2/11 पोलिस रिपोर्टच्‍या आधाराने असे कोठेही रिपोर्ट मध्‍ये नोंदविले नाही कि, ट्रक चोरी झाल्‍यानंतर पोलिसांना त्‍याची माहीती देण्‍यात आली होती आणि पोलिसांच्‍या निर्देशनानुसार चोरीबाबत रिपोर्ट चाळिस दिवसानंतर दाखल करण्‍यात आले. वास्‍तविक चोरीची रिपोर्ट सुपरवायझरनी दि. 4/2/11 ला पहिल्‍यांदा दिली. याच्‍या अतिरिक्‍त ट्रक खाली झाल्‍यानंतर सदर ट्रक अर्जदाराचे आवारात का नेण्‍यात आले नाही. म्‍हणून गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा क्‍लेम नाकारुन कोणतीही चूक केलेली नाही.

 

4.    अर्जदाराचा अर्ज, दस्‍ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्‍तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्‍तर, दस्‍ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्‍तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्‍पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्‍या विचारार्थ घेण्‍यात आले. त्‍यावरील निष्‍कर्ष आणि त्‍याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.

मुद्दे                                                    निष्‍कर्ष

 

  (1)   अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ?                          होय.      

 

         

  (2)  गैरअर्जदाराने अर्जदारास न्‍युनतापूर्ण सेवा दिली आहे         

काय ?                                                        नाही.                                                           

  (3) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला

आहे काय ?                                                        नाही.                                         

                               

  (4) आदेश काय ?                                         अंतीम आदेशाप्रमाणे.

                         कारण मिमांसा

मुद्दा क्रं. 1 बाबत ः- 

 

5.    अर्जदाराने त्‍याच्‍या ट्रक करीता गैरअर्जदाराकडून दि. 6/11/10 ते दि. 5/11/11 या कालावधीकरीता विमा प्रिमियम रक्‍कम भराफन विमा काढला होता. ही बाब दोन्‍ही पक्षांना मान्‍य असल्‍याने अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक होते असे सिध्‍द होत असल्‍याने मुद्दा क्रं. 1 चे उत्‍तर हे होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

 

मुद्दा क्रं. 2 व 3 बाबत ः- 

 

6.    अर्जदाराने दाखल नि. क्रं. 4 वर प्रथम खबरी रिपोर्ट दस्‍त क्रं. अ- 4 ची पडताळणी करतोंना असे दिसले कि, अर्जदाराचे सुपरवायझर याने प्रथम खबर देतांना असे कुठेही नमुद केले नव्‍हते कि, अर्जदाराचे चालकाने दि. 25/12/10 ला ट्रक उभा असतांना त्‍यावर तालाबंदी केली होती तसेच अर्जदाराने हे सिध्‍द करण्‍यासाठी कि, दि. 25/12/10 ला चालकाने ट्रक उभा करतेवेळी ट्रकला कुलुप बंद केला होता व ट्रक उभा करुन घरी जातांना ट्रकच्‍या सुरक्षेबाबत काळजी घेतली होती, याबद्दल कोणताही साक्षिपुरावा मंचा समक्ष सादर केलेला नाही तसेच अर्जदाराने सदर वादातील ट्रकचे चालक यांचा किंवा सुपरवायझरचा साक्षिपुरावा मंचासमक्ष घेतला नाही.

मा.राष्‍ट्रीय आयोगाच्‍या न्‍यायनिर्णयाचा आधार घेता.

 

2013(4)CPR 4 (NC)

M/s New India Assurance Company Ltd. & Anr Vs. Shri. Ajit Kumar Decided on 4.9.13

 

Consumer Protection Act 1986 – Section 15, 17, 19 And 21- Insurance – Theft of car – Awarded amount of Rupees 2.65 Lakhs by District Forum was reduce by  5% by State Commission on Account of depreciation of Value of Vehicle – Complainant has violated terms And Condition of policy by leaving car unlock on road side in late hours of night – When complaint had left vehicle unattended an unlocked, it amounted to violation of terms and condition of policy and claimant was not liable to be paid compensation – There is clear contradiction in stand taken by complainant in his complaint and in his statement made before investigator – Order passed by District Forum And state Commission set Aside and Complaint dismissed.

 

सदर प्रकरणात सुध्‍दा ट्रकचे चालकाने ट्रक उभा करुन घरी निघून गेले व त्‍याची सुरक्षेबाबत कोणतीही काळजी घेतली नाही वरील न्‍यायनिर्णयाचा अधार घेतांना मंचाच्‍या मताप्रमाणे गैरअर्जदार कंपनीने अर्जदाराचे चालकाच्‍या निष्‍काळजीमूळे ट्रक चोरी गेला म्‍हणून गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा क्‍लेम नाकारुन न्‍युनतापूर्ण सेवा किंवा अनुचित व्‍यवहार पध्‍दतीचा अवलंब केलेला नाही. सबब मुद्दा क्रं. 2 व 3 चे उत्‍तर हे नकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

 

मुद्दा क्रं. 4 बाबत ः- 

 

7.    मुद्दा क्रं. 1 ते 4 च्‍या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

//अंतीम आदेश//

             (1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.

             (2) दोन्‍ही पक्षांनी आापआपला खर्च सहन करावा.

             (3) उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्‍य पाठविण्‍यात यावी.

 

चंद्रपूर

दिनांक -  20/01/2015

 
 
[HON'BLE MR. Vijay C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Kirti Gadgil]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.