:: नि का ल प ञ ::
(मंचाचे निर्णयान्वये, श्री मनोहर गो. चिलबुले, मा अध्यक्ष )
(पारीत दिनांक : 20/07/2013)
1) अर्जदाराने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
संक्षेपाने तक्रारदाराचे म्हणणे असे की, मृतक कु. शितल दिलीप कांदिकुरवार ही त्याची मुलगी होती. कु. शितल ही शैक्षणिक सञ 2009-10 या कालावधीत गै.अ.क्र 2 जनता विद्यालय, पोंभूर्णा येथे 9 व्या वर्गात शिक्षण घेत होती. गै.अ.क्र. 1 नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. कडे वरील शाळेत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांचा अपघात विमा राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजनेअंतर्गत पॉलिसी क्र. 260600/09/9500000087 प्रमाणे 28/08/2009 ते 27/08/2010 या कालावधीसाठी काढला होता.
अर्जदाराची मुलगी कु. शितल ही दिनांक 28/03/2010 रोजी दुपारी 2 वाजता घरी चहा बनवीत असतांना स्टोव्ह चा भडका होऊन गंभीररित्या जळाली आणि तिला उपचारासाठी चंद्रपूर येथे शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान शितल ही दिनांक 01/04/2010 रोजी शासकीय रुग्णालय, चंद्रपूर येथे मरण पावली.
अर्जदाराची मुलगी कु. शितल हिचा वरील अपघाती मृत्यु झाल्यामुळे राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजनेअंतर्गत रुपये 30,000/- मिळावे म्हणुन अर्जदारनी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे दिनांक 14/08/2010 रोजी क्लेम फॉर्मसोबत सर्व आवश्यक कागदपञ पाठविले, परंतु गै.अ.क्र 1 यांनी अर्जदारास कु. शितलच्या अपघाती मृत्युबद्दल नुकसान भरपाई रुपये 30,000/- दिली नाही. किंवा सदर विमा भरपाई मिळण्यासाठी कोण-या ञुटी आहेत हे देखील कळविले नाही. अर्जदारनी, गै.अ.क्र. 1 व 2 यांना दिनांक 01/03/2012 रोजी अधिवक्ता विनय लिंगे यांचेमार्फत रजिस्टर पोस्ट ने नोटीस पाठवून विम्याच्या दाव्याची रक्कम रुपये 30,000/- व्याजासह मागणी केली परंतु गै.अ. नी सदर मागणी पूर्ण केली नाही. त्यामुळे गै.अ. नी अर्जदारास कु.शितल हिच्या अपघाती मृत्युबद्दल राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजनेअंतर्गत रुपये 30,000/- दिनांक 14/08/2010 पासुन द.शा.द.शे. 18 टक्के व्याजासह द्यावे तसेच मानसिक व शारीरीक ञासाबद्दल रुपये 10,000/- आणि तक्रार खर्चाबद्दल रुपये 5,000/- द्यावे अशी गै.अ. विरुद्ध मागणी केली आहे.
गै.अ.क्र.1 नॅशनल इंन्शुरन्स कंपनी यांना सदर प्रकरणाचा नोटीस निशानी क्र. 11 निशानी क्र. 13 प्रमाणे बजावणी होऊनही ते गैरहजर राहीले, त्यामुळे त्यांचे विरुद्ध एकतर्फा चालविण्यात आले. गै.अ.क्र. 2 यांनी त्यांचा लेखी जबाब निशानी क्र. 8 प्रमाणे दाखल केला आहे. त्यांनी अर्जदाराची मुलगी कु. शितल ही जनता विद्यालय पोंभूर्णा येथे शैक्षणिक सञ 2009-10 मध्ये नवव्या वर्गात शिकत होती हे मान्य केले आहे. तसेच मयत कु. शितल हिचा विमा राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजनेअंतर्गत गै.अ.क्र. 1 कडे काढला होता व तिचा मृत्युनंतर अर्जदाराने केलेल्या अर्जानूसार कु. शितल हिच्या मृत्युबद्दल नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यासाठीचा प्रस्ताव अर्ज अर्जदाराकडे दिला होता हे कबुल केले आहे. त्यांचे म्हणणे असे की, तो प्रस्ताव गै.अ.क्र. 1 कडुन मंजूर करुन घेण्याची जबाबदारी गै.अ. क्र. 2 ची नसून अर्जदाराची आहे. तसेच गै.अ.क्र.2 ने सदरचा विमा काढला नसून सदर अपघात विम्याच्या दाव्याची पूर्तता करण्याची पूर्ण जबाबदारी कु. शितल हिचा विमा काढणा-या गै.अ.क्र. 1 ची असल्याचे म्हटले आहे. गै.अ.क्र. 2 यांचा या तक्रारीशी कोणताही संबंध येत नसल्याने त्यांचे विरुद्ध तक्रार खारीज करावी असे म्हटले आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालिल मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील मंचाचे निष्कर्ष आणि त्या बाबतची कारणमिमांसा पुढीलप्रमाणे.
मुद्दा क्र. 1
मुद्दे निष्कर्ष
1) कुमारी शितल दिलीप कांदिकुरवार हिच्या अपघाती होय
मृत्युबद्दल राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजनेअंतर्गत रुपये
30,000/- नुकसान भरपाई मिळण्यास अर्जदार पाञ आहे
काय?
2) अंतिम आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे मंजूर
कारणमिमांसा
अर्जदार दिलीप श्रीहरी कांदिकुरवार यांनी शपथेवर दाखल केलेली तक्रार हीच त्याची साक्ष समजावी म्हणुन निशानी क्र. 13 प्रमाणे पुर्सिस दाखल केली आहे. तसेच गै.अ.क्र. 2 यांनी देखील त्यांचा लेखी जबाब हीच त्यांची साक्ष समजावी अशी पुर्सिस निशानी क्र. 13 (अ) प्रमाणे कळविले आहे. गै.अ.क्र. 1 विरुद्ध प्रकरण एकतर्फा चालविण्यात आले असून त्यांचेवतीने कोणतीही साक्ष किंवा युक्तीवाद दाखल केला नाही.
अर्जदार दिलीप श्रीहरी कांदिकुरवार यांनी शपथेवर सांगितले की, मयत कुमारी शितल दिलीप कांदिकुरवार ही त्याची मुलगी होती. सदर शितल ही जनता विद्यालय पोंभूर्णा येथे शैक्षणीक सञ 2009-10 मध्ये 9 व्या वर्गात शिकत होती असेही तक्रार अर्जात शपथेवर नमुद केले आहे, आणि त्याच्या पृष्ठर्थ दस्तऐवजाची यादी निशानी क्र. 4 सोबत दस्त क्र. 4 प्रमाणे मुख्याध्यापक, जनता विद्यालय, पोंभूर्णा यांनी दिलेल्या बोनाफाईड प्रमाणपञाची सत्य प्रत जोडली आहे. त्याने शपथपञावर कथन केले आहे की, त्याची मुलगी कु. शितल ही दिनांक 28/03/2010 रोजी दुपारी 2 वाजता घरी चहा करीत असतांना स्टोव्ह चा भडका होऊन जळाली व तिला उपचारासाठी जनरल हॉस्पीटल, चंद्रपूर येथे भरती केले असता सदर अपघातातील जखमामुळे दिनांक 01/04/2010 रोजी मरण पावली. अर्जदाराने त्याच्या म्हणण्याचा पृष्ठर्थ यादी निशानी क्र. 4 सोबत दस्त क्र. 8 प्रमाणे पोलिस स्टेशन पोंभूर्णा येथील गुन्हयाचा तपशिलाचा नमुना दाखल केला आहे. त्यात 28/03/2010 ला दुपारी 2 वाजता चहा करीत असतांना स्टोव्ह चा भडका होऊन कु. शितल जळाल्याने तिला उपचारासाठी जनरल हॉस्पीटल, चंद्रपूर येथे दाखल केल्याचे व उपचारादरम्यान दिनांक 1/04/2010 चे सायंकाळी 6.24 वा. मरण पावल्याचे म्हटले आहे. दस्त क्र. 6 वर पोलिस स्टेशन पोंभूर्णा येथे नोंदलेला आकस्मीक मृत्यु खबरी क्र. 01/2010, कलम 174, फौ.प्र.संहिता दाखल आहे. त्यात देखील वरील बाबींचा उल्लेख आहे. दस्त क्र. 7 वर मरणान्वेशन प्रतिवृत्त दाखल असून दस्त क्र. 9 वर शवविच्छेदन अहवाल दाखल आहे. त्यात कु. शितल हिचा मृत्यू जळाल्यामुळे झाल्याचे म्हटले आहे. कु शितल हिच्या मृत्युचे प्रमाणपञ दस्त क्र. 5 वर आहे. वरील सर्व पुराव्यावरुन कु. शितल दिलीप कांदिकुरवार हिचा अपघाती मृत्यु चहा करतांना स्टोव्ह चा भडका होऊन जळाल्यामुळे झाल्याचे सिद्ध होते.
दस्त क्र. 2 वर अर्जदाराने राजीव गांधी विद्यालय सुरक्षा योजनेअंतर्गत गै.अ.क्र.1 कडे पाठविलेल्या क्लेम फॉर्मची प्रत आहे. सदर क्लेम फॉर्मवर विमा पॉलिसी क्र. 260600/09/9500000087 आणि विम्याचा कालावधी 28/08/2009 ते 27/08/2010 असा नमुद केला असून कु. शितल ही जनता विद्यालय, पोंभूर्णा 9 व्या वर्गात शिकत असल्याचे आणि तिचा अपघाती मृत्यु झाल्याचे नमुद असून त्यावर शाळेचे मुख्याध्यापक तसेच गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती पोंभूर्णा यांच्या सहया आहेत. दस्त क्र. 1 वर राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजनेबाबत प्रपञ दाखल असून त्यात प्रपञ ‘ड’ मध्ये सदर योजनेअंतर्गत अपघातानंतर विद्यार्थ्याला देय होणा-या बाबनिहाय रकमा नमुद केल्या आहे. अनुक्रमांक 1 प्रमाणे अपघाती मृत्युबाबत मिळणारी विम्याची रक्कम रुपये 30,000/- आहे. वरीलप्रमाणे कु. शितल हिच्या अपघाती मृत्युमुळे विमा दाव्याची रक्कम रुपये 30,000/- मिळण्यास कु. शितल हिचे पिता म्हणून अर्जदार पाञ आहे. त्याने गै.अ.क्र.1 नॅशनल इंन्शुरन्स कंपनी लि. कडे सदर विमा दाव्याची मागणी करुनही आणि त्याबाबत दस्त क्र. 12 प्रमाणे पाठविलेली नोटीस निशानी क्रमांक 14 प्रमाणे प्राप्त होऊनही गै.अ.क्र.1 ने न्याय्य विमा दाव्याची रक्कम अर्जदारास दिली नाही. गै.अ.क्र1 ने अर्जदाराने पाठविलेल्या नोटीसला किंवा या मंचासमोर दाखल केलेल्या तक्रार अर्जास उत्तर देऊन कु. शितल हिच्या अपघाती मृत्युबद्दल रुपये 30,000/- ची नुकसान भरपाई मिळण्यास अर्जदार का पाञ नाही असे सांगितलेले नाही आणि अर्जदाराचा नुकसान भरपाईचा दावा देखील नाकारलेला नाही.
गै.अ.क्र.1 नॅशनल इंन्शुरन्स कंपनी लि. ही राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांचा विमा उतरविणारी कपंनी असून तिने जनता विद्यालय, पोंभूर्णा येथे शैक्षणीक सञ 2009-10 मध्ये 9 व्या वर्गात शिक्षण घेणारी कु. शितल हिचा अपघाती विमा उतरविला होता. त्यामुळे कु. शितल हिच्या अपघाती मृत्युबाबत अर्जदारास नुकसान भरपाई देण्याची कायदेशिर जबाबदारी असतांना देखील विमा ग्राहकाप्रती सेवेत गै.अ.क्र. 1 ने टाळाटाळ केली आहे व ही बाब सेवेतील ञुटी तसेच अनुचीत व्यापार पद्धतीचा अवलंब ठरणारी आहे. म्हणून मंचानी मुद्दा क्र.1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
गै.अ.क्र.2 ही शैक्षणीक संस्था असून कु. शितल ही केवळ त्या शाळेत शिकत होती म्हणून सदर संस्थेवर अपघात विमा रक्कम देण्याची कोणताही कायदेशिर जबाबदारी येत नसल्याने सदरच्या तक्ररीतुन गै.अ.क्र.2 ला मुक्त करणे न्यायोचित होईल.
गै.अ.क्र. 1 ने अर्जदारकडून कुमांरी शितल हिच्या मृत्युबाबत प्राप्त झालेल्या मृत्यु दाव्याची पूर्तता केली नाही म्हणून गैरअर्जदारास झालेल्या मानसिक व शारीरीक ञासाबद्दल नुकसान भरपाई रुपये 3,000/- आणि या प्रकरणात कारवाईचा खर्च रुपये 2,000/- मंजूर करणे न्यायोचित होईल असे या मंचाचे मत आहे.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालिलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) गै.अ.क्र. 1 नॅशनल इंन्शुरन्स कंपनी लि. यांनी अर्जदारास कु. शितल दिलीप कांदिकुरवार हिचा अपघाती मृत्यु दाव्याची रक्कम रुपये 30,000/- दिनांक 14/08/2010 पासुन रक्कम अर्जदाराचे हातात पडेपर्यंत द.शा.द.शे. 9 टक्के व्याजासह आदेशाचे तारखेपासून 1 महिण्याचे आत अदा करावी.
2) गैरअर्जदार क्र. 1 ने अर्जदारास शारीरीक व मानसिक ञासाबाबत रुपये 3,000/- आणि या तक्रार अर्जाच्या कारवाईबाबत चा खर्च रुपये 2,000/- आदेशाच्या तारखेपासुन 1 महिण्याच्या आत अदा करावा.
3) अर्जदारास विम्याची रक्कम देण्याची कोणतीही कायदेशिर जबाबदारी गै.अ.क्र 2 जनता विद्यालय, पोंभूर्णा यांचेवर नसल्यामुळे त्यांना या तक्रारीतुन मुक्त करण्यात येत आहे.
4) गै.अ. ने दिलेल्या मुदतीत आदेशाची पूर्तता न केल्यास ग्राहक हक्क संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 25 व 27 अन्वये होणा-या कारवाईस पाञ राहील.
5) सदर आदेशाची प्रत विनामोबदला सर्व संबंधीतांना पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 20/07/2013