::: नि का ल प ञ:
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्या))
(पारीत दिनांक :- 28/०5/2020)
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. अर्जदार हे भवराळा पोस्ट राजगड तहसील मूल जिल्हा चंद्रपूर येथे राहत असून अर्जदार यांचे पती शेतकरी होते व ते दिनांक 16.10.2016 रोजी इलेक्ट्रिक शॉक लागून झालेल्या अपघातामुळे मृत्यू पावले मयत यांच्या अपघाती मृत्यूमुळे अर्जदार गोपीनाथ मुंडे विमा योजनेअंतर्गत तलाठी प्रमाणपत्रासह आवश्यक सर्व कागदपत्रे दोन प्रतीत विहित नमुन्यात सादर केला व गैरअर्जदार क्रमांक ३ यांना विमा रक्कम मिळण्यासाठी वारंवार प्रयत्न करीत होती परंतु विमा रक्कम न मिळाल्यामुळे नाईलाजाने अर्जदार यांना विद्यमान ग्राहक यांच्यासमक्ष तक्रार दाखल करावे लागली. अर्जदाराच्या नावाने शेती असून ते सदर शेती जमिनीतून उत्पन्न घेत होते. अर्जदाराच्या पती महाराष्ट्रातील शेतकरी असून उपरोक्त शेतकरी विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतकरी विमा काढलेला आहे व प्रीमियमची संपूर्ण रक्कम गैरअर्जदार कंपनीकडे भरून सदर मयत याचा विमा उतरविला आहे करिता अर्जदार यांना विम्याचे रुपये २,००,०००/-देण्यास गैरअर्जदार क्रमांक एक जबाबदार आहे. अर्जदाराच्या पतीचा मौजा भवराळा तहसील मोजा जिल्हा चंद्रपूर येथे शेती असून तिचा भुमापन सर्वे क्रमांक १३७ आहे. अर्जदार यांनी संपूर्ण कागदपत्रे गैरअर्जदार क्रमांक तीन यांना दिली व गैरअर्जदार क्रमांक तीन यांनी नुकसानभरपाईसाठी गैरअर्जदार क्रमांक एक व दोन यांच्याकडे पाठवलेली होती सदर कागदपत्रे गैरअर्जदार क्रमांक तीन यांना देऊन सुद्धा अजून पर्यंत अर्जदाराला विमा रक्कम न मिळाल्यामुळे अर्जदाराने मंचासमक्ष तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदारांची मागणी अशी आहे की अर्जदार यांना शेतकरी विमा अपघात योजनेअंतर्गत रुपये २,००,०००/- गैरअर्जदार क्रमांक एक कडून दसादशे 18 टक्के व्याजासह मिळण्याचा आदेश अर्जदाराच्या बाजूने व्हावा तसेच अर्जदाराला आलेला शारीरिक-मानसिक त्रासापोटी रुपय ८५,०००/- हजार खर्च व इतर किरकोळ खर्च योग्य वाटेल तेवढी व्याजासह मिळण्याचा आदेश करण्यात यावा
3. गैरअर्जदार क्रमांक एक यांनी तक्रारीत उपस्थित राहून अर्जदार यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हणेणे खोडून काढत त्यांच्या उत्तरात नमूद केले की अर्जदाराने गैरअर्जदारविरुद्ध गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत सदरील तक्रार अर्ज दाखल केलेला असून अर्जदाराने खरी माहिती दस्तावेज विद्यमान मंचापासून लपवून केवळ खोट्या माहितीच्या आधारे विम्याची रक्कम मिळविण्याच्या दृष्टीने सदर अर्ज दाखल केलेल आहे. महाराष्ट्र शासनाने सन 2015 मध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना योजना सुरु केली. सदरील अर्ज ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत नमूद कोणताही वाद पण होत नाही त्यामुळे अर्जदाराचा तक्रार अर्ज खारीज करण्यात यावा प्रकरणात अर्जदार यांनी दिनांक 23 .1 .2017 रोजी गैरअर्जदारास तिचा अर्ज सादर केल्याचे तिच्या अर्ज कुठे नमूद केलेले आहे. वास्तविक दिनांक १/4/२०१७ रोजी गैरअर्जदार क्रमांक तीन अर्जदाराच्या संबंधित अर्ज गैरअर्जदार क्रमांक कडे एक कडे सादर केला. अर्जदाराने दाखल केलेल्या दस्तावेज यावरून असे लक्षात येते की अर्जदाराच्या पतीचा मृत्यू दिनांक 16 .10. 2016 रोजी झालेला होता महाराष्ट्र सरकारने दिनांक 1. 12. 2015 ते 30. 12 .2016 या एका वर्षाच्या कालावधीत सदर शेतकरी विमा पॉलिसी आणलेली होती त्यामुळे अर्जदाराने सदरील पॉलिसीच्या शेवटच्या दिनांकापासून किमान 90 दिवसांच्या आत तिचा दावा दाखल करणे आवश्यक होते मात्र अर्जदाराने तिचा दावा दिनांक 23/१/2017 रोजी दाखल केल्याचे खोटे नमूद केलेले आहे वास्तविक अर्ज दाखल केलेला अर्जदराने हा गैरअर्जदाराच्या कार्यालयात दिनांक १/4/२०१७ रोजी मिळाला हे गैरअर्जदाराने दस्त क्रमांक नुसार दाखल केलेल्या दस्तावेज यावरून लक्षात येते.अर्जदाराने दाखल केलेला अर्ज त्रुटीपूर्ण असल्याने गैरअर्जदार क्रमांक तीन अर्जदाराला दिनांक 23.१.2017 रोजी त्रुटीची पूर्तता करून नव्याने प्रस्ताव दाखल करण्यास सांगण्यात आले. अर्जदाराने त्रुटीची पूर्तता केली नसल्याने गैरअर्जदार क्रमांक तीन नव्याने दिनांक 17. 3. 2017 रोजी कागदपत्रे सादर करण्याबाबत दस्त क्र.6 चे अवलोकन केल्यास आपण लक्षात येते अर्जदाराचा प्रस्ताव वेळेत दाखल न झाल्याने नामंजूर करण्यात आला याची पूर्ण कल्पना अर्जदाराला 22.9.2017 देण्यात आल्यावर गैरअर्जदाराने दिनांक 22/०९/2017 रोजी नव्याने प्रस्ताव पाठविण्यात आला एकदा क्लेम नामंजूर करण्यात आल्यानंतर पुन्हा तोच प्रस्ताव स्वीकारणे कायद्याच्या परीकक्षेत बसणारा नाही, त्यामुळे अर्जदराचा अर्ज मुदतबाह्य असल्यामुळे नामंजूर करण्यात आला.
5. गैरअर्जदार क्रमांक दोन बजाज कॅपिटल यांनी उपस्थित राहून तक्रार अर्ज तक्रार येथील म्हणणे खोडून काढत विशेषत नमूद केले की अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक एक यांच्याविरुद्ध दावा रक्कम न दिल्याबाबत सदर तक्रार दाखल केलेली असून गैरअर्जदार क्रमांक 2 हा गैरअर्जदार 1 व अर्जदार यांच्यातला दुवा आहे. दावा मंजूर वा नामंजूर करण्याबाबत गैर अर्जदार क्रमांक दोन चा काही संबंध नसतो, तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 व बजाज कॅपिटल हे दोन्ही वेगवेगळ्या कंपनी असून एका कंपनीच्या सेवेत न्यूनते बद्दल दुसऱ्या कंपनीला जबाबदार ठरू शकत नाही .ही बाब मान्य आहे की विमा दावा महाराष्ट्र सरकारतर्फे गैरअर्जदार क्रमांक एक कडे पॉलिसीची रक्कम भरली गेली होती परंतु सदरच्या गैरअर्जदार क्रमांक दोन ने अर्जदारकडून कोणतीही रक्कम स्वीकारलेली नाही. सदर तक्रार गैरअर्जदार क्रमांक दोन विरुद्ध खारिज करण्यात यावे
6. गैरअर्जदार क्रमांक तीन यांना सदर प्रकरणात नोटीस प्राप्त होऊन सुद्धा गैरअर्जदार क्र॰3 प्रकरणात उपस्थित न राहिल्यामुळे सदर तक्रार गैरअर्जदार क्रमांक दोन विरुद्ध एकतर्फा चालवण्याचे आदेश निशाणी क्रमांक एक वर करण्यात आले
6. अर्जदार व गैरअर्जदार यांच्या परस्परविरोधी वरील विधानावरून खालील कारणमीमांसा व त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत.
कारण मिमांसा
. अर्जदार हिने निशाणी क्रमांक 4 वर दाखल केलेला 7/12 उतारा, फेरफारपत्रक व शेतीचे दस्ताऐवज यांचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते की अर्जदाराचे पती प्रकाश विठोबा नन्नावरे यांच्या मालकीची मौजा भवराला, तह.मुल, जि.चंद्रपूर येथे भुमापन क्र.137 ही शेतजमीन आहे. यावरून मयत विमाधारक श्री.प्रकाश नन्नावरे हे शेतकरी होते व शेतीतील उत्पन्नावर ते कुटूंबाचे पालन पोषण करीत होते हे सिध्द होते. अर्जदाराचे पतीचा शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत 20१5-16 या कालावधीकरता रू.२,00,000/- चा शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा काढण्यात आला होता ही बाब स्पष्ट दिसून येत आहे. अर्जदार ही मयत विमाधारक शेतक-याची पत्नी असून सदर विम्याची लाभधारक आहे. सबब अर्जदार ही गैरअर्जदारक्र.1 ची ग्राहक आहे. गैरअर्जदार क्रं. 2 यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत शेतक-यांचा गैरअर्जदार क्र.1 कडे विमा काढला व सदर विमा काढण्याकरीता गैरअर्जदार क्र. 2 ने विना मोबदला मदत केली.अर्जदाराने तक्रारीत दाखल केलेले दस्तावेज व गैरअर्जदार क्र.1 हयांनी दाखल केलेले उत्तर हयांचे अवलोकन केले असता निदर्शनांस येते की अर्जदाराचे पतीचा दिनक १६.१०.२०१६ रोजी इलेक्ट्रिक शक लागल्यामुळे अपघाती मृत्यु झाला असून सदर अपघाताबाबत नोंदविण्यांत आलेला एफ.आय.आर.तसेच घटनास्थळ पंचनामा, पि.एम.रिपोर्ट इत्यादि दस्तावेज प्रकरणांत दाखल आहेत. गैरअर्जदार क्र.1 ने, अर्जदाराकडून प्राप्त विमादावा हा दस्तावेज दाखल केलेला आहे. अर्थातच गैरअर्जदार क्र.1 यांना गैरअर्जदार क्र.2 तसेच नोडल एजंसीमार्फत अर्जदाराचा विमादावा प्राप्त झाला होता हे सिध्द होते. गैरअर्जदार क्र.1 ने सदर विमादावा कधी प्राप्त झाला याबाबत कोणताही दस्तावेज प्रकरणांत दाखल केलेला नाही. मात्र सदर विमादावा अर्जदाराने विमाधारकाच्या अपघाती मृत्युनंतर 90 दिवसांपेक्षा जास्त कालावधीनंतर दाखल करण्यांत आला असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र या कारणास्तव गैरअर्जदार क्र.1 यांनी सदर विमादावा फेटाळला किंवा कसे याबाबत गैरअर्जदार क्र.1 यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही. महाराष्ट्र शासनाने शेतकरी अपघात विमादाव्यांबाबत मार्गदर्शक तत्वे घालून दिली असून त्यांत विमादावा 90 दिवसांच्या मर्यादेत दाखल न होता विलंबाने दाखल झाला तरीदेखील तो स्विकारावा असे दिशानिर्देश दिलेले आहेत, असे स्पष्ट निर्देश असूनही गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराच्या विमादाव्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. गैरअर्जदार क्र.1 यांची सदर कृती त्यांचे सेवेतील न्युनता दर्शविते या निष्कर्षाप्रत मंच पोहचले आहे.तसेच गैरअर्जदार क्र. २ ह्यानिसुधा करारनुसार अर्जदाराला विमा रक्कम प्राप्त झाली कि नाही हे पाहण्याची जवाबदारी असूनसुद्धा त्या कडे दुर्लक्ष केलेले आहे.सबब मंच खालील निर्णय पारित करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र. 150/2018 अंशतःमंजूर करण्यात येते.
(2) गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदार हिला विमा दाव्याची रक्कम रू.२,००,०००/- द्यावी व गैरअर्जदार क्र. २ नि १०,०००/- अर्जदारास द्यावे
(4) गैरअर्जदार क्र. 3 विरुद्ध कोणताही आदेश नाही.
(5) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी..
(श्रीमतीकल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.