::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्या))
(पारीत दिनांक :-२८/५/२०२०)
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
अर्जदार ही मुक्काम पोस्ट चांदापूर पोस्ट फिस्कुटी जिल्हा चंद्रपूर येथे राहत असून अर्जदाराचे अति शेतकरी होते व त्यांच्या नावे मौजा जूनासुरला मूळ जिल्हा चंद्रपूर येथे शेती असून तिचा भुमापन क्र सर्वे क्रमांक 119 आहे. अर्जदार शेतकरी होते व ते दिनांक 31.12.2015 रोजी सर्पदंशाने झालेल्या अपघातामुळे मृत्यू पावले. मयत यांच्या अपघाती मृत्यूमुळे अर्जदार गोपीनाथ मुंडे विमा योजनेअंतर्गत तलाठी प्रमाणपत्रासह आवश्यक सर्व कागदपत्रे दोन प्रती देऊन प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक ३ यांना अर्जदाराने सादर केला त्यानंतर अर्जदार विमा रक्कम मिळण्यासाठी वारंवार प्रयत्न करीत राहिली पर्यंत विमा रक्कम न मिळाल्याने विमा रक्कम वापरायला मिळाले नाही.अर्जदाराच्या पतीच्या नावाने शेती असून ते सदस्य जमिनीतून उत्पन्न घेत होते. महाराष्ट्रातील शेतकरी अर्जदाराचे पती महाराष्ट्रातील शेतकरी असून उपरोक्त शेतकरी विमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाई मिळण्यास पात्र आहेत. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे शेतकरी विमा काढलेला आहे व प्रीमियमची संपूर्ण रक्कम गैरअर्जदार क्रमांक एक कंपनी कडे भरून सदर मयत याचा विमा काढलेला आहे करिता अर्जदार हिला गैरअर्जदार विम्याचे रुपये २,००,०००/-देण्यास गैरअर्जदार क्रमांक एक जबाबदार आहे. अर्जदाराने गैरअर्जदारकडे मुदतीत संबंधित योजनेअंतर्गत संपूर्ण कागदपत्रे देऊन सुद्धा गैरअर्जदार क्रमांक तीन यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठवले परंतु आजपर्यंत अर्जदाराला रक्कम मिळाले नसल्यामुळे अर्जदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.
2. अर्जदारांची मागणी अशी आहे की अर्जदार यांना शेतकरी विमा अपघात योजनेअंतर्गत रुपये २,००,०००/- गैरअर्जदार क्रमांक एक कडून दसादशे 18 टक्के व्याजासह मिळण्याचा आदेश अर्जदाराच्या बाजूने व्हावा तसेच अर्जदाराला आलेला शारीरिक-मानसिक त्रासापोटी ८५,०००/- खर्च व इतर किरकोळ खर्च व मंचाला योग्य वाटेल तेवढी टक्के व्याजासह मिळण्याचा आदेश करण्यात यावा
3 . गैरअर्जदार क्रमांक यांनी लेखी उत्तर दाखल करून गैरअर्जदाराने अर्जदाराने तक्रारीत दाखल केलेले म्हणणे खोडून काढत नमूद केले की गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत सदरील दाखल केलेला असून अर्जदाराची खरी माहिती व दस्तावेज विद्यमान मंचापासून लपवून केवळ खोट्या माहितीच्या आधारे गैरअर्जदारापासून पासून विम्याची रक्कम मिळण्याच्या दृष्टीने सदरील अर्ज समक्ष दाखल केलेला आहे. महाराष्ट्र शासनाने सन 2015 मध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली सदरील योजनेत चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर गडचिरोली वर्धा इत्यादी जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. अर्जदाराने दाखल केलेल्या सदरील अर्ज ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत नमूद कोणताही वाद उत्पन्न होत नाही त्यामुळे अर्जदाराचासादर अर्ज खारीज होण्यास पात्र आहे. ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2 अंतर्गत सेवा सर्विस अंतर्गत गैरअर्जदाराने अर्जदाराच्या कोणत्याही सेवेत त्रुटी अथवा कमतरता झालेली असल्यास अर्जदारास मागणी पात्र असतो. मात्र अर्जदाराने तिच्या अर्जात कुठेही गैरअर्जदाराने दिला दिलेल्या सेवेत त्रुटी दिल्याचे आढळून येत नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदारास सेवेत त्रुटी दिली ही बाब अर्जदारांना सिद्ध करता आलेले नाही. सदर मामल्यात पूर्णता पॉलिसीला अधीन राहून नियमानुसार कृती केलेली आहे. सदर प्रकरणात अर्जदाराने नियमाप्रमाणे आवश्यक दस्तावेज म्हणजेच फॉर्म नंबर 6 चा नमुना सादर केलेला नाही या करण्याकरता गैरअर्जदाराने एखादा कराराची किंवा त्या अनुषंगाने एखाद्या सेवेची पूर्तता करताना सेवेत कमतरता वा त्रुटी बाबतचे गुणवत्ता स्वरूप आणि त्याचा प्रकार यात कोणताही चूक दोष अपुरेपणा आढळून आल्याशिवाय लावता येणार नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी अर्जदाराची आहे सध्याच्या मामल्यात अर्जदाराच्या पतीचे दिनांक 31.12.2015 रोजी मृत्यू झाल्याने तिने गैरअर्जदार क्रमांक 3 च्या मदतीने गैरअर्जदार क्रमांक एक कडे धरमपेठ शाखेत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत क्लेम अर्ज जमा केला. अर्ज जमा झाल्यानंतर गैरअर्जदारा कडून अर्जदाराने जमा केलेल्या सर्व दस्तावेजांची पडताळणी करण्यात आली त्यात अर्जदाराच्या पतीचे मृत्यूचे कारण कळू शकले नाही महादेव बनकर यांच्या मृत्यूनंतर दिनांक 31.12. 2015 रोजी डॉक्टरांनी त्यांच्या पोस्टमार्टम केला मात्र डॉक्टरांनी अर्जदाराच्या पतीचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला याचे कारण स्पष्ट केले नाही डॉक्टरांनी पोस्टमार्टम अहवाल तयार करताना अर्जदाराच्या पतीचा पुढील केमिकल तपासणी करता पाठवण्यात आल्याचे नमूद केले सदरील क्लेम दाखल केल्यानंतर अर्जदाराने फॉर्म नंबर 6 चा नमुना सादर न केल्याचे गैरअर्जदार यांना आढळून आले त्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराला दिनांक 30. 3. 2017 रोजी पत्र पाठवून फॉर्म नंबर 6 ची कच्ची प्रत सादर करण्यास सांगितले मात्र अर्जदाराने त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे 18. 7. 2017 रोजी गैरअर्जदाराने अर्जदाराला फॉर्म नंबर 6 दाखल करण्याची शेवटची संधी देत असल्याचे पत्राद्वारे कळवले अर्जदाराने अर्जदारास सोबत पत्रव्यवहार केल्या बाबतचे दस्तावेज गैरअर्जदाराने दस्तावेज क्रमांक दोन ते पाच रेकॉर्डवर दाखल केलेल्या आहेत. तसेच सोबतच मामल्यात कंपनी व महाराष्ट्र शासनाचे मध्ये झालेल्या कराराची प्रत व पोलिसी देखील रेकॉर्ड दाखल आहे हे सर्व दस्तावेज गैरअर्जदार ह्यांनी त्यांच्या लेखी उत्तरा सोबत दाखल केलेल्या आहेत. अर्जदाराने नियम 6 व 5 प्रमाणे नमुना जोडलेला नाही व सदरील दस्तावेज सर्व प्रकारचे क्लेम निकाली काढण्यासाठी आवश्यक आहे मात्र अर्जदाराने तो न पुरवल्यामुळे अर्जदाराला नामंजूर करण्यात आला व त्याबाबत अर्जदाराला दिनांक 12 .9 .2017 रोजी कळविण्यात आले गैर अर्जदाराने अर्जदाराला तिची बाजू मांडण्याची किंवा प्रस्ताव दाखल करायची कुठलीही संधी दिलेली नाही असेही अर्जदाराच्या तिच्या तक्रारी अर्जामध्ये म्हणणे नाही शिवाय अर्जदाराचा अर्ज कोणत्या कारणाकरिता मंजूर करण्यात आला नाही याची संपूर्ण माहिती अर्जदाराला देण्यात आलेली आहे. गैरअर्जदाराने मागणी केल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे व तिचे पती महादेव बनकर यांचा फॉर्म नंबर 6 नमुना सादर केलेला नाही. सबब गैरअर्जदाराने कोणत्याही प्रकारे सेवेत त्रुटी किंवा निकृष्ट दर्जाची सेवा अर्जदारास दिले नाही सबब मागणीप्रमाणे अर्जदार प्रमाणे विमा रक्कम व भरपाई व शारीरिक-मानसिक रक्कम व्याजासह मिळण्यास पात्र नाही केवळ पैशाच्या लोभाने विद्यमान मंचासमक्ष खोटी केस दाखल केलेली असल्यामुळे सदर तक्रार खारिज करण्यात यावी
4. गैरअर्जदार क्रमांक दोन बजाज कॅपिटल यांनी उपस्थित राहून तक्रार अर्ज तक्रार येथील म्हणणे खोडून काढत विशेषत नमूद केले की अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक एक यांच्याविरुद्ध दावा रक्कम न दिल्याबाबत सदर तक्रार दाखल केलेली असून गैरअर्जदार क्रमांक 2 हा गैरअर्जदार 1 व अर्जदार यांच्यातला दुवा आहे. दावा मंजूर वा नामंजूर करण्याबाबत गैर अर्जदार क्रमांक दोन चा काही संबंध नसतो, तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 व बजाज कॅपिटल हे दोन्ही वेगवेगळ्या कंपनी असून एका कंपनीच्या सेवेत न्यूनते बद्दल दुसऱ्या कंपनीला जबाबदार ठरू शकत नाही .ही बाब मान्य आहे की विमा दावा महाराष्ट्र सरकारतर्फे गैरअर्जदार क्रमांक एक कडे पॉलिसीची रक्कम भरली गेली होती परंतु सदरच्या गैरअर्जदार क्रमांक दोन ने अर्जदारकडून कोणतीही रक्कम स्वीकारलेली नाही. सदर तक्रार गैरअर्जदार क्रमांक दोन विरुद्ध खारिज करण्यात यावे
5. गैरअर्जदार क्रमांक तीन यांना सदर प्रकरणात नोटीस प्राप्त होऊन सुद्धा गैरअर्जदार क्र॰3 प्रकरणात उपस्थित न राहिल्यामुळे सदर तक्रार गैरअर्जदार क्रमांक दोन विरुद्ध एकतर्फा चालवण्याचे आदेश निशाणी क्रमांक एक वर करण्यात आले
6. अर्जदार व गैरअर्जदार यांच्या परस्परविरोधी वरील विधानावरून खालील कारणमीमांसा व त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत.
7. अर्जदार हिने निशाणी क्रमांक 4 वर दाखल केलेल्या दस्त क्र.4 वर दाखल केलेला 7/12 उतारा, फेरफारपत्रक व शेतीचे दस्ताऐवज या दस्तएवजाचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते की, अर्जदाराचे पती महादेव रघुनाथ बनकर याचे मोजा जुनासुर्ला तह. मुल जि. चंद्रपूर येथे भूमापन क्रमांक 199 ही शेतजमीन आहे. यावरून मयत विमाधारक अर्जदाराचा पती हा शेतकरी होता व शेतीतील उत्पन्नावर तो कुटूंबाचे पालन पोषण करीत होते हे सिध्द होते. शासन निर्णयानुसार अपघातग्रस्त शेतक-यांचे कुटूंबीयांस लाभ देण्याकरीता काढलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत अर्जदाराचे पतीचा 2015-16 या कालावधीकरता रू.2,00,000/- चा शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा काढण्यात आला होता ही बाब स्पष्ट दिसून येत आहे. अर्जदार हि मयत विमाधारक शेतक-यांची पत्नी असून सदर विम्याचे लाभधारक आहेत. सबब अर्जदार हा गैरअर्जदारक्र.1 चा ग्राहक आहे हे सिध्द होते.अर्जदार हिच्या मयत पतीचा महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत शेतक-यांचा गैरअर्जदार क्र.1 कडे विमा काढला व सदर विमा काढण्याकरीता विरूध्द पक्ष क्र. 2 व 3 ने विना मोबदला मदत केली सदर प्रकरणात महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत मयत विमाधारकाची सन 2015-16 करीता विमा पॉलिसी काढण्यांत आलेली आहे. अर्जदाराचे निवेदन तथा त्याने नि.क्र.4 वर दाखल शवविच्छेदन अहवाल व घटनास्थळ पंचनामा या दस्तऐवजांवरून असे स्पष्ट दिसून येते की अर्जदाराच्या पतीचे श्री. महादेव रघुनाथ बनकर हे दिनांक 31.12.2015 रोजीसर्प दंशाने झालेल्या अपघातामुळे मरण पावले. मय्याताची पत्नी यांनी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दाखल केलेला विमा दावा गैरअर्जदार क्र.1 ला प्राप्त झाला हे त्यांनी मान्य केले आहे. तसेच गैरअर्जदार क्र.2 कडे ज्या तारखेला विमादावा दाखल केला त्याच दिवशी तो गैरअर्जदार क्र.1 कडे दाखल झाला असे समजण्यांत यावे अशीदेखील त्यात तरतूद आहे.गैर अर्जदार क्र. १ ह्यांनी अर्जदाराने गाव नमुना 6 क न दिल्यामुळे अर्जदाराचा विमा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला असे नमूद केले आहे.परंतु अर्जदाराने दाखल केलेल्या निशाणी क्र. 4 नुसार दस्त क्र. १६ वर तालुका कृषी अधिकारी ह्यांनी गैर अर्जदार क्र. १ ह्यांना पत्र लिहून कळविले कि त्यंनी अर्जदाराचा 6 क चा नमुना दिनाक २२.०९.२०१७ च्या पत्रासोबत गैर अर्जदार क्रमाक. १ ला पाठविला आहे.असे असूनसुद्धा गैरअर्जदार क्र. १ ह्यांनी अर्जदाराचा विमा प्रस्ताव नाकारला.. सबब अर्जदाराचा विमादावा योग्यरीत्या दाखल झाला असून त्यांनी आवश्यक दस्तावेजांची पुर्तता केली आहे मात्र असे असूनही गैरअर्जदार क्र.1 ने, आवश्यक दस्तावेजांची पुर्तता केली नाही या कारणास्तव सदर विमा दावा नामंजुर करणे व अर्जदाराला विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणे न्यायोचीत नाही. तसेच गैरअर्जदार क्र. २ ह्यांनी सुद्धा अर्जदाराला विमा रक्कम मिळाली कि नाही हे बघायची जवाबदारी असतानाही त्यात कसूर केलेली आहे असे मंचाचे मत आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 व २ यांची कृती ही न्यूनता पूर्ण सेवा या संज्ञेत मोडत असून ते अर्जदाराला विमा दाव्याची रक्कम व्याजासह देण्यास जबाबदार ठरतात.
8. वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र.152/2018 अंशतः मजूर करण्यात येते.
(2) गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारांस गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत विमादाव्याची रक्कम रू.2,00,000/- व गैरअर्जदार क्र. २ ह्यांनी अर्जदारास १०,०००/- रुपये द्यावे.
३. गैरअर्जदार क्र. 3 विरुद्ध कोणताही आदेश नाही
४. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
.
(श्रीमतीकल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.