Maharashtra

Wardha

CC/128/2011

SMT PRAMILABAI GULABRAO INGOLE - Complainant(s)

Versus

NATIONAL INSURANCE COM. THRU.MGR - Opp.Party(s)

P.P.HAJARE

22 Aug 2014

ORDER

DIST. CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM
SEWAGRAM ROAD
NEAR YASHWANT COLLEGE
WARDHA-442001
MAHARASHTRA (PH.NO.07152-243550 )
 
Complaint Case No. CC/128/2011
 
1. SMT PRAMILABAI GULABRAO INGOLE
R/O NANDORA TQ. DEOLI WARDHA
WARDHA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. NATIONAL INSURANCE COM. THRU.MGR
MUMBAI
MUMBAI
MAHARASHTRA
2. TAHSILDAR DEOLI
DEOLI WARDHA
WARDHA
MAHARASHTRA
3. CABAL INSURANCE SEVISES PVT.LTD. NAGPUR
SHIVAJI NAGAR NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Milind R. Kedar PRESIDING MEMBER
 HON'BLE MS. Smita N. Chandekar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

( पारीत दिनांक :22/08/2014 )

( द्वारा प्रभारी अध्‍यक्ष श्री.मिलींद भि.पवार(हिरुगुडे) )

01.       अर्जदार यांनी प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये गैरअर्जदार यांच्‍या विरुध्‍द दाखल केली असून, तीद्वारे पुढील प्रमाणे मागण्‍या केलेल्‍या आहेत.

1.   गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी ‘शेतकरी व्‍यक्तिगत अपघात        विमा’ योजने अंतर्गत मिळणारी राशी रु.1,00,000/- ही

   18 टक्‍के व्‍याजदराने द्यावी.

2.  मानसिक व शारिरीक त्रासाकरीता रु.10,000/-

3.  तक्रारीचा खर्च रु.5000/-

 

अर्जदाराच्‍या तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालीलप्रमाणे आहे.

 

अर्जदारानी सदर तक्रार अर्जामध्‍ये नमुद केले आहे की, अर्जदार, मयत गुलाब शामराव इंगोले यांची पत्‍नी असून   मयत मयत गुलाब शामराव इंगोले यांचे नावे मौजा नांदोरा, ता.आष्‍टी, जि.वर्धा येथे भुमापन क्र.120 अंतर्गत  शेतजमीन आहे. शासनाने अपघातग्रस्‍त शेतक-यांस व त्‍याच्‍या कुटुंबियास लाभ देण्‍याकरीता 15 जुलै 2007 ते 14 ऑगस्‍ट 2007 या कालावधीकरिता ‘शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजना’ काढली.

1.   अर्जदार यांनी नमुद केले आहे की, मयत गुलाब शामराव इंगोले यांचा दिनांक 10/08/2007 रोजी जनावरांना पाणी पाजण्‍यास गेला असता पाय घसरुन पाण्‍यात पडल्‍याने पाण्‍यात बुडून मृत्‍यु झाला. अर्जदार यांनी पुढे नमुद केले आहे की, त्‍यानी ‘शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजना’ अंतर्गत राशी मिळण्‍याकरीता  गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचे मार्फत गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीला विमा दाव्‍यासोबत सर्व कागतपत्रे सादर केले. मात्र गैरअर्जदार क्र.1 यांनी सदर विमा दावा मंजुर की नामंजुर केला हे आजतागायत कळविलेले नाही. सदर बाब ही गैरअर्जदार यांच्‍या सेवेतील त्रृटी असुन त्‍यांनी अनुचित व्‍यापार प्रणालीचा अवलंब केलेला आहे. त्‍यामुळे अर्जदारांनी गैरअर्जदारांविरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार मंचामध्‍ये दाखल केली आहे व वरीलप्रमाणे मागणी केली आहे.

02.    गैरअर्जदार क्र. 1/विमा कंपनी यांनी अर्जदार हिचे विलंब माफी अर्जाचे म्‍हणणे हेच प्रस्‍तुत तक्रारीचे म्‍हणणे आहे अशी पुरसीस दिली. गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारीतील विपरित विधाने / आरोप अमान्‍य करुन पुढे असे नमुद केले की, अर्जदार हिने विमा दाव्‍यासाठीआवश्‍यक दस्‍तावेज सादर केलेले नाही. तसेच प्रस्‍तुतची तक्रार मदतीत नाही. अर्जदाराने विमा दाव्‍यासाठी कागदपत्रे दिली हे खोटे आहे. गैरअर्जदार क्र.1 यांच्‍या तर्फे काहीही चुक झालेली नसल्‍यामुळे अर्जदाराची त्‍यांच्‍या विरुध्‍दची प्रस्‍तुत तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी अशी प्रार्थना गैरअर्जदार क्र.1 यांनी त्‍यांच्‍या लेखी उत्‍तरा्द्वारे मा.मंचास केलेली आहे.

03.   गैरअर्जदार क्र.2 तहसीलदार देवळी यांनी त्‍याचा लेखी जवाब दाखल केला असुन त्‍यांनी नमुद केले आहे की, अर्जदार हिने विमा दावा मिळण्‍यासाठी अर्ज दाखल केला, सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन घेवुन विमा दावा गैरअर्जदार क्र.1 यांना पाठविण्‍यात आली. गैरअर्जदार क्र.2 यांनी पुढे नमुद केले आहे की, गैरअर्जदार क्र.2 यांच्‍या तर्फे प्रस्‍तुत प्रकरणात काहीही चुक झालेली नसल्‍यामुळे अर्जदाराची त्‍यांच्‍या विरुध्‍दची प्रस्‍तुत तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी अशी प्रार्थना गैरअर्जदार क्र.2 यांनी त्‍यांच्‍या लेखी उत्‍तरा्द्वारे मा.मंचास केलेली आहे.

04.   गैरअर्जदार क्र.3 कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकींग कंपनी यांनी त्‍याचा लेखी जवाब दाखल केला असुन तक्रारीतील विपरित विधाने / आरोप अमान्‍य करुन पुढे असे नमुद केले की, कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि. ही बीमा विनियामक आणी विकास प्राइज़ भारत सरकार यांची अनुज्ञत्पि प्राप्‍त विमा सल्‍लागार कंपनी आहे. गैरअर्जदार क्र.3 यांनी पुढे असे नमुद केले आहे की, ते महाराष्‍ट्र राज्‍य शासनाला सदरील विमा योजना राबवण्‍यासाठी विना मोबदला सहाय्य करतात. यामध्‍ये मुख्‍यत्‍वे शेतक-यांचा विमा दावा अर्ज तालुका कृषी अधिकारी/तहसीलदार याच्‍यामार्फत आल्‍यानंतर त्‍याची सहानिशा व तपासणी केल्‍यानंतर योग्‍य त्‍या विमा कंपनीकडे पाठवून देणे व विमा कंपनीकडुन दावा मंजूर होवुन आलेला धनादेश संबंधीत वारसदारांना देणे ऐवढेच काम गैरअर्जदार क्र.3 यांचे आहे. गैरअर्जदार क्र.3 यांनी पुढे नमुद केले आहे की, वरील सर्व कामांकरीता ते राज्‍य शासन किंवा शेतकरी यांच्‍याकडुन कोणताही मोबदला घेत नाही तसेच यासाठी कोणताही विमा प्रिमीअम घेतलेला नाही. सदर बाब ही मा.राज्‍य ग्राहक आयोग, औरंगाबाद खंडपीठ यांनी आमचे म्‍हणणे ग्राहय धरले असुन तसा आदेशही पारीत केलेला असल्‍याचे गैरअर्जदार क्र.3 यांचे म्‍हणणे आहे. गैरअर्जदार क्र.3 यांनी पुढे नमुद केले आहे की, मयत गुलाब शामराव इंगोले यांचा दिनांक 10/08/2007 रोजी पाण्‍यात बुडून मृत्‍यु झाला व सदरील  प्रस्‍ताव त्‍यांच्‍याकडे प्राप्‍त झाला. त्‍यानंतर सदर प्रस्‍ताव हा पुढील कार्यवाहीकरीता गैरअर्जदार क्र.1/विमा कंपनीकडे पाठविण्‍यात आला. गैरअर्जदार क्र.1/विमा कंपनीने सदरील प्रस्‍ताव नामंजुर केला असुन त्‍याबाबत अर्जदार यांना दिनाक 06/06/2009 चे पत्राने कळविण्‍यात आलेले आहे. गैरअर्जदार क्र.3 यांनी नमुद केले आहे की, त्‍यांनी त्‍यांच्‍या सेवेत कुठलीही चुक केलेली नसल्‍यामुळे सदरची अर्जदाराची त्‍यांच्‍याविरुध्‍दची तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी अशी प्रार्थना गैरअर्जदार क्र.3 यांनी त्‍यांच्‍या लेखी उत्‍तरा्द्वारे मा.मंचास केलेली आहे.

03.       अर्जदाराने प्रस्‍तुत तक्रार प्रतिज्ञापत्रावर दाखल केली असून, सोबत घटनास्‍थळ पंचनामा, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, फेरफार, गाव नमुना 7/12,गांव, क्‍लेम फॉर्म, परिपत्रक, मृत्‍यु प्रमाणपत्र इत्‍यादी एकुण 9 दस्‍तावेंजांच्‍या छायांकीत प्रती दाखल केलेल्‍या आहे. नि.क्र.24 कडे दोन कागदपत्रे दाखल केली आहे. गैरअर्जदार क्र.3 यांनी नि.क्र.6 कडे लेखी उत्‍तर, परीपत्रक, गैरअर्जदार क्र.1 यांचे विमा दावा फेटाळलेली पत्र  इत्‍यादी तिन कागदपत्रे दाखल केली आहेत.

गैरअर्जदार 1 ते 3 यांनी त्‍यांचा लेखी जवाब प्रतिज्ञापत्रावर दाखल केला आहे.

-: कारणे व निष्‍कर्ष :-

            प्रस्‍तुत प्रकरणात दोन्‍ही पक्षांतर्फे दाखल करण्‍यात आलेले सर्व दस्‍तावेज व प्रतिज्ञालेख बारकाईने पाहण्‍यात आले.

4.   सदर प्रकरणातील विमा पॉलिसी ही महाराष्‍ट्र शासनाने राज्‍यातील शेतक-यांकरिता " गृप पर्सनल अक्‍सीडेंट पॉलिसी " अंतर्गत अपघाती मृत्‍यू किंवा अपंगत्‍व आल्‍यास शेतकरी व त्‍यांच्‍या वारसास नुकसान भरपाई मिळावी, या हेतुने महाराष्‍ट्र शासनाने विमा पॉलिसी काढली व सदर योजनेनुसार गैरअर्जदार क्र. 1 विमा कंपनीने उपरोक्‍त विमायोजनेनुसार जोखीम स्विकारली, या बद्दल वाद नाही.

 

5.   अर्जदाराचे निवेदन तथा दाखल दस्‍तावेजांवरुन असे स्‍पष्‍ट दिसून येते की, अर्जदार यांनी, मयत गुलाब शामराव इंगोले यांचे वारसदार या नात्‍याने, विमाधारक मयत गुलाब शामराव इंगोले यांचा दिनांक 10/08/2007 रोजी पाय घसरुन पाण्‍यात पडल्‍याने मृत्‍यु झाला व या कारणाने अर्जदार यांनी विमाधारकाचा अपघाती मृत्‍यू झाला या सदरा खाली शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत विमा रक्‍कमेची मागणी केलेली आहे. अर्जदारातर्फे नि.क्र.2/1 ते 2/4 वरील दाखल दस्‍तऐवजांवरुन असे दिसून येते की, विमाधारक मयत गुलाब शामराव इंगोले यांचा दिनांक 10/08/2007 रोजी पाण्‍यात पाय घसरुन पडल्‍याने मृत्‍यु झाला हे सिध्‍द होते.   

06.  मयत गुलाब शामराव इंगोले हे शेतकरी होते या  पुष्‍ठर्थ भुमापन क्र.12 मध्‍ये नांदोरा,ता.देवळी येथील 7/12 उतारा     निशानी क्र..2/5 कडे दाखल करण्‍यात आला आहे. यावरुन मयत गुलाब शामराव इंगोले हे शेतकरी होते व त्‍यांचा, शासन  निर्णया नुसार दिनांक 15 जुलै 2007 ते 14 ऑगस्‍ट 2007 या  कालावधी करीता शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा काढण्‍यात आला होता ही बाब स्‍पष्‍ट दिसुन येते.

07.  गैरअर्जदार क्र.3 कबाल इंश्‍युरन्‍स यांचे लेखी उत्‍तरावरुन मयत गुलाब शामराव इंगोले यांचा अपघाती मृत्‍यु झाला व   त्‍यांच्‍या वारसांना  कृषि विमा अपघात योजने अंतर्गत विमा अर्ज त्‍यांना प्राप्‍त झाला व सदर प्रस्‍ताव त्‍यांचे गैरअर्जदार क्र.1 यांचे कार्यालयास सादर केला. परंतु सदर प्रस्‍ताव मयतचे नावे शेतजमीन नाही म्‍हणुन गैरअर्जदार क्र.1 यांनी नामंजुर केला आहे. मात्र सदर बाब गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनी यांनी सुध्‍दा त्‍यांचे लेखी जवाबामध्‍ये नमुद केले नाही. मात्र गैरअर्जदार क्र.1 यांनी आपले पुर्ण लेखी जवाबामध्‍ये सदर प्रस्‍ताव विमा कंपनीस मिळालाच नाही असे नमुद केले आहे. जेंव्‍हा सदर प्रस्‍ताव गैरअर्जदार क्र.3 मार्फत त्‍यांना मिळुन तो दि.6/6/2003 रोजी नामंजुर झालेला होता. मात्र गैरअर्जदार विमा कंपनी यांनी याबाबत कोणताही खुलासा केला नाही व उलट पक्षी प्रस्‍ताव मिळाचाल नाही व तक्रार मुदतीत नाही असा बचाव केला आहे. सदर तक्रार मुदतीत नाही करीता अर्जदार यांनी विलंब माफीचा अर्ज नि.क्र.4 कडे दाखल केला होता. सदरचा अर्ज गुणदोषावर चालवुन मंजुर करण्‍यात आला व झालेला विलंब माफ करण्‍यात आला. त्‍यामुळे तक्रार मुदतीत नाही असा गैरअर्जदार क्र.1 चा बचाव निरर्थक ठरतो.

08.   गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीने मयत गुलाब शामराव इंगोले यांचे नावे 7/12 वर नाही असे समजुन अर्जदाराचा विमा प्रस्‍ताव नाकारला आहे. मात्र सदर नि.क्र.24/1 मयत गुलाब शामराव इंगोले चा 7/12 पाहता त्‍यावर मयताचे नांव 2003/2004 पासुन नाव 7/12 वर आहे असे दिसुन येते. म्‍हणजेच मयताचे नावे मृत्‍युचे वेळी शेत जमीन होती हे दिसुन येते व ते शेतकरी होते हे दिसुन येते. त्‍यामळे गैरअर्जदार क्र.1 यांनी विमा दावा चुकीचे पध्‍दतीने नाकारला हे सिध्‍द होते.         

09.    प्रस्‍तुत प्रकरणातील हकीकत व परिस्थितीवरुन असे दिसुन येते की, मयत गुलाब शामराव इंगोले यांचा अपघाती मृत्‍यु    झालेला आहे. या शिवाय गैरअर्जदार क्र.1 यांच्‍याकडे अर्जदाराचा विमा प्रस्‍ताव योग्‍य मार्गाने गैरअर्जदार क्र. 2 व 3 मार्फत पोहचविण्‍यात आला तरीही गैरअर्जदार क्र.1 यांनी तो असमर्थनिय कारणास्‍तव नामंजुर केला व त्‍यामुळे अर्जदार यांना विमा लाभ मिळाला नाही. म्‍हणुन अश्‍या परिस्थितीत, अर्जदारास विमा योजनेतील लाभापासुन वंचित ठेवणे हे न्‍यायोचित होणार नाही.

 

10.  उपरोक्‍त सर्व दस्‍ताऐवज, पुरावे व प्रतिज्ञालेखावरील पुरावे ग्राहय धरुन आम्‍ही या निर्णयास आलो आहोत की, अर्जदार महाराष्‍ट्र शासनामार्फत राबविण्‍यात येणा-या वैयक्तिक शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत मिळणारे लाभ रु.1,00,000/-      (रुपये एक लाख)  मिळण्‍यास पात्र आहे, असे मंचास वाटते.

11.  गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी अर्जदाराचा प्रस्‍ताव वेळेत गैरअर्जदार क्र.1 यांच्‍याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला व आपले कर्तव्‍य पार पाडले आहे, त्‍यामुळे गैरअर्जदार क्र.2 व 3 यांना प्रस्‍तुत प्रकरणातुन मुक्‍त करणे न्‍यायोचित ठरेल.

12.  गैरअर्जदार क्र.1 यांनी आपल्‍या कर्तव्‍यात निष्‍काळजीपणा व हलगर्जीपणा केला, म्‍हणुन अर्जदारास विमा योजनेतील लाभांपासुन वंचित राहावे लागले, तसेच सदर प्रकरण दाखल करावे लागले ही बाब ग्राहय धरुन आम्‍ही या निर्णयास आलो आहोत की, अर्जदार, गैरअर्जदार क्र.1 कडुन मानसिक व शारीरीक त्रासापोटी रुपये 1500/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- मिळण्‍यास पात्र आहे.

     उपरोक्‍त सर्व विवेचनांवरुन आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहोत.

// आदेश //

  1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजुर  करण्‍यात येते.
  2. गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनी यांनी अर्जदार यांना  

     विमा रक्‍कम रुपयेः 1,00,000/- ( रुपये एक लाख फक्‍त )     

     सदर निकालाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासुन 30 दिवसांच्‍या आंत 

     द्यावे,  तसेच   या रक्‍कमेवर दिनांक 21/03/2013 (तक्रार

     दाखल दिनांक) पासून ते पुर्ण रक्‍कम अदा करे पर्यंत

     दरसाल दरशेकडा 12 टक्‍के दराने होणा-या व्‍याजाची रक्‍कम

     अर्जदार यांना देण्‍यात यावी.

3)   वरील आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्‍त झालेल्‍या 

     दिनांकापासुन 30 दिवसांच्‍या आंत करावे. मुदतीत आदेशाचे

     पालन न केल्‍यास, मुदतीनंतर उपरोक्‍त रुपये 1,00,000/-

     व या रक्‍कमेवर दिनांक 21/03/2013 (तक्रार दाखल

     दिनांक)  पासून ते पुर्ण रक्‍कम प्राप्‍त होईपर्यंत दरसाल

     दरशेकडा 18 टक्‍के दराने दंडणीय व्‍याजासह रक्‍कम देण्‍यास

     गैरअर्जदार  क्र.1 जवाबदार राहतील.                                

  1. अर्जदार यांना झालेल्‍या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल 

     गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास रुपये 1500/- ( रुपये

     एक हजार पाचशे फक्‍त) व तक्रारीचा खर्च रुपयेः 1000/-

     ( एक हजार फक्‍त)  सदर निकाल प्राप्‍ती पासून तीस

     दिवसांचे आंत द्यावे.

5)   मा.सदस्‍यांसाठीच्‍या ‘ब’ व ‘क’ फाईल्‍स संबंधीतांनी परत

     घेवुन जाव्‍यात.

  1. निकालपत्राच्‍या प्रति सर्व संबंधीत पक्षांना माहितीस्‍तव व

     उचित कार्यवाहीकरीता पाठविण्‍यात याव्‍यात. 

  1. गैरअर्जदार क्र. 2 3 विरुध्‍द आदेश नाही.

            

 
 
[HON'BLE MR. Milind R. Kedar]
PRESIDING MEMBER
 
[HON'BLE MS. Smita N. Chandekar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.