जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/88 प्रकरण दाखल तारीख - 19/03/2010 प्रकरण निकाल तारीख – 30/10/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. अजयया अगयया कनपरती वय 52 वर्षे, धंदा व्यवसाय अर्जदार रा.सराफा लाईन,उदगीर ता. उदगीर जि.लातूर विरुध्द. 1. नॅशनल इन्शुरन्स कंपनी नगीना घाट,गुरुद्वारा चौरस्ता,नांदेड. गैरअर्जदार 2. रेखा नागोराव पांढरे वय,34 वर्षे, धंदा नौकरी, रा.ज्युडीशियल क्वार्टर, सोलापुर वर्गी नाका, सोलापुर. अर्जदारा तर्फे वकील - अड.ए.व्ही.चौधरी. गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील - अड.एस.ए.पाठक गैरअर्जदार क्र.2 तर्फे वकील - कोणीही हजर नाही. निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती.सुवर्णा देशमूख, सदस्या ) गैरअर्जदारांनी ञूटीची सेवा दिली म्हणून अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे दाखल केली आहे. अर्जदार हे उदगीर येथील राहणार असून व्यवसायाने सराफ होते. त्यांने स्वतःच्या व्यवसायासाठी व कूटूंबासाठी गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून दि.15.7.2008 रोजी मारोती अल्टो कंपनीची कार विकत घेतली. ज्यांचा वाहन नंबर एम.एच.-24-सी 5065 असे असून इंजिन नंबर एमएसडीएन 3185569 असा आहे. सदरील कार अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडून रु.1,95,000/- रुपयात खरेदी केली होती व त्यामध्ये त्यांस लागणारी इतर सर्व वस्तू खरेदी करुन बसविलेल्या होत्या. सदरील कार अर्जदाराने दि.19.9.2008 रोजी स्वतःचे नांवावर करुन घेतली. या गाडीवर शेखर कुनंदकर नांवाचा ड्रायव्हर होता. गाडी ठेवण्यासाठी घरा समोर मोकळी जागा नसल्यामुळे अर्जदार त्यांचे मिञ संग्राम पाटील रा.हावगी स्वामी कॉलनी बिदर रोड, उदगीर यांचे घरा समोर मोकळया जागेत ठेवत असे. दि.3.1.2009 रोजी संध्याकाळी 5 वाजताचे सुमारास सदरील कार अज्ञात चोरटयांनी चोरुन नेली. ती आजपर्यत सापडलेली नाही म्हणून अर्जदाराने सदरील गाडीचा इन्शुरन्स क्लेम गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे मागितला. तो आजपर्यत न मिळाल्यामुळे अर्जदाराने सदरील तक्रार दाखल केली व विमा रक्कम रु.2,50,000/- , तसेच मानसिक, शारीरिक ञासापोटी नूकसान भरपाई पोटी रु.50,000/- व दावा खर्च रु.5,000/- देण्याची मागणी केली आहे. अर्जदाराने अर्जासोबत शपथपञ व इतर कागदपञ दाखल केलेले आहेत. ज्यामध्ये सदरची गाडी ही गैरअर्जदार क्र.2 यांचे नांवावर होती व त्या बददल त्यांची कागदपञे दाखल केली आहेत. तसेच गैरअर्जदार क्र.2 च्या नांवाचेच इन्शुरन्स कंपनीची पॉलिसी व गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून गाडी विकत घेतल्याबददलचा बॉंड दाखल केला आहे. गैरअर्जदार क्र.1 हे हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे व शपथपञ दाखल केलेले आहे. तसेच लेखी यूक्तीवाद ही दाखल केलेला आहे. ज्यामध्ये त्यांनी एक मूददा मांडलेला आहे की, अर्जदार यांनी सदरील कारची पॉलिसी त्यांचे नांवावर ट्रान्सफर करुन घेतलेली नसल्यामुळे अर्जदार हे क्लेम रक्कम मागण्यास पाञ नाहीत. गैरअर्जदार क्र.2 यांचे नांवे नोटीस काढली पण ते हजर झाले नाही, अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.2 त्यांचे विरुध्द कोणतीही स्टेप्स घेतली नाही त्यामुळे गैरअर्जदार क्र.2 यांना सदरील तक्रारीमधून वगळण्यात आले. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपञ तपासले असता खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार हे ग्राहक आहेत काय व सदरील कारची क्लेम रक्कम मागण्यास पाञ आहेत काय नाही. 2. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी दि.15.7.2008 रोजी गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून वाहन खरेदी केले त्या बाबतचा लेखी करारनामा दाखल केलेला आहे. पण सदरील कार अर्जदाराने दि.19.09.2008 रोजी स्वतःच्या नांवावर करुन घेतली म्हणजे जवळपास दोन महिन्यानंतर अर्जदाराने हे वाहन स्वतःचे नांवावर करुन घेतले. पण त्यांच वेळी गाडीची असलेली विमा संरक्षण पॉलिसी अर्जदाराने स्वतःच्या नांवावर करुन घेतली नाही. दि.3.1.2009 रोजी अर्जदाराची गाडी चोरीला गेल्यानंतर दोन दिवस अर्जदाराने पोलिसा मार्फत बराच तपास केला व त्यानंतर दि..5.1.2009 रोजी गून्हा दाखल केला. परंतु तरी गाडीचा तपास लागला नाही व त्यानंतर अर्जदारास विमा संरक्षण पॉलिसीची आठवण झाली. गाडीची रक्कम मिळण्यासाठी जेव्हा अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे अर्ज दिला. त्यावेळी गैरअर्जदाराचे म्हणण्याप्रमाणे गाडी खरेदी केल्या बददलचा करारनामा ज्या बॉंन्ड वर केला होता तो बॉंन्ड रजिस्ट्रर नसल्यामुळै कायदेशीर तो बॉंन्ड विचारात घेण्याजोगा नाही. तसेच गैरअर्जदार क्र.2 यांचेही त्यावर सही नाही. म्हणून अर्जदाराची गाडीची कोणतीही पॉलिसी त्यांचे नांवावर नसल्यामुळे विमा रक्कम मागण्यास पाञ नाही. विमा कंपनीच्या नियमाप्रमाणे 14 दिवसांचे आंत विमा पॉलिसी ट्रान्सफर करण्याचे कागदपञ गाडी खरेदीदाराने त्यांचे कार्यालयात देणे आवश्यक होते पण तसे त्यांने केले नसल्यामुळे सदरील गाडीची पॉलिसी रक्कम ते अर्जदारास देऊ शकत नाहीत. अर्जदाराचे नांव पॉलिसीवर कूठेच आलेले नसल्यामुळे अर्जदार हा कंपनीचा नियमाप्रमाणे ग्राहक होऊ शकत नाही. अर्जदाराला अनेक संधी देऊनही मंचासमोर यूक्तीवाद केला नाही म्हणून दाखल केलेल्या कागदपञानुसार नीर्णय देण्यात येत आहे. अर्जदार हा विमाधारक नसल्यामुळे गैरअर्जदार यांचा ग्राहक होऊ शकत नाही. म्हणून तो विमा रक्कम मागण्यासही पाञ नाही. या कारणास्तव अर्जदाराचा अर्ज फेटाळण्यात येत आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा.. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |