Maharashtra

Nagpur

CC/10/440

RAJESKUMAR HANUMANPRASAD PANDE - Complainant(s)

Versus

NATIONAL INSURANCE CO.LTD - Opp.Party(s)

ADV. KAUSIK MANDAL

17 Feb 2011

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Complaint Case No. CC/10/440
1. RAJESKUMAR HANUMANPRASAD PANDEPLOT NO.46, KHOLE LAYOUT, KHADGAON ROAD, NAGPURNAGPURMAHARASHTRA ...........Appellant(s)

Versus.
1. NATIONAL INSURANCE CO.LTDDIVISIONAL OFFICE NO.4 DURGA SADAN, 40 BALRAJ MARG, DHANTOLI, NAGPURNAGPURMAHARASHTRA ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MR. MILIND KEDAR ,MEMBER
PRESENT :ADV. KAUSIK MANDAL, Advocate for Complainant
ADV.A.K.SOMANI, Advocate for Opp.Party

Dated : 17 Feb 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

मंचाचे निर्णयान्‍वये - श्री. मिलींद केदार, सदस्‍य
//- आदेश -// 
(पारित दिनांक – 17/02/2011)
 
1.     तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्‍वये दाखल केलेली असून तक्रारीचा आशय असा आहे की, तो एल पी टी 1612 या वाहनाचा मालक असून सदर वाहनाचा नोंदणी क्र.एम एच 04/सी यु 6414 आहे. तक्रारकर्त्‍याने सदर वाहन हे गैरअर्जदाराकडून 29.01.2009 ते 29.01.2010 या कालावधीकरीता विमा पॉलिसी क्र.281800/31/08/6300018681 अन्‍वये रु.7,50,000/- विमा मुल्‍याकरीता विमाकृत केले होते. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याला पॉलिसीची एका पृष्‍ठाची प्रत पुरविली होती व अटी व शर्ती पुरविण्‍यात आल्‍या नव्‍हत्‍या.
      तक्रारकर्त्‍याचे वाहन हे चालकाला हिंडल्‍को मौदा येथून अल्‍युमिनियम शिट्स भरण्‍याकरीता दिले आणि त्‍यानंतर मे.ए.आर.लॉजिस्‍टीक, खडगाव रोड येथे उभे करण्‍यात आले. दि.10.12.2009 रोजी 2-30 वाजता सदर वाहन हे युनिक ट्रेडिंग येथून कापसाचे बंडल घेऊन परत मे.ए.आर.लॉजिस्‍टीक, खडगाव रोड येथे 8-30 ला परत आले. त्‍यानंतर सदर वाहनामध्‍ये 24 रीकामे सीलेंडर व 2, 3 ऑटो पार्टस् चे खोके, अल्‍युमिनीयम शिट्स घेऊन निघाले. भिवंडी येथे जाऊन इतर सामान उतरवावयाचे असल्‍याने व वाहन भिवंडी येथे वेळेवर न पोहोचल्‍याने तक्रारकर्त्‍याने चालकाच्‍या भ्रमणध्‍वनीवर संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न केला असता तो असफल झाला. चार दिवसानंतर चालकाने तक्रारकर्त्‍याला फोनवर संपर्क साधून असे सांगितले वाहनाच्‍या बॅटरीमध्‍ये बिघाड निर्माण झाल्‍यामुळे वाहन चालणे अशक्‍य आहे व ते नाशिक येथे उभे आहे. तक्रारकर्त्‍याने वाहन उभे असलेल्‍या ठिकाणाचा पत्‍ता बॅटरी तात्‍काळ पोहोचविण्‍याकरीता मागितला असता चालकाने एका तासात वाहन हे भिवंडी येथे पोहोचविण्‍याचा प्रयत्‍न करतो असे सांगितले. यावर तक्रारकर्त्‍याने वाहन हे विक्रोळी येथे अल्‍युमिनीय शिट्स या गोदरेज कंपनीमध्‍ये पोहोचविणे अत्‍यंत गरजेचे असल्‍याचे सांगितले. वाहन हे निर्धारित अवधीपेक्षा जास्‍त अवधी झाल्‍यावर न पोहोचल्‍याने तक्रारकर्त्‍याने भिवंडी शाखेतील कर्मचा-यांना त्‍याचा शोध व माहिती काढण्‍यास सांगितले. परंतू वाहनाचा शोध लागला नाही, म्‍हणून दि.16.12.2009 रोजी पोलीस स्‍टेशन, मौदा येथे तक्रार नोंदविण्‍यास गेला असता तेथील अधिका-यांनी आधी वाहनाचा शोध घ्‍या, नाही सापडून आले तर तक्रार नोंदवा असे सांगितले. सदर विवादित वाहनाचा शोध मौदा ते मुंबई या मार्गावर घेण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतू वाहन न सापडल्‍याने शेवटी दि.21.12.2009 रोजी पोलीस स्‍टेशन, मौदा येथे तक्रार नोंदविण्‍यास गेला असता तेथील अधिका-याने तक्रारकर्त्‍याला पकडून जेलमध्‍ये टाकले. तेथून बेलवर सुटून आल्‍यावर तक्रारकर्त्‍याने चालकाविरुध्‍द 02.01.2010 रोजी वाडी पोलीस स्‍टेशन येथे गुन्‍हा नोंदविला. तसेच दि.06.01.2010 रोजी गैरअर्जदाराचे अभिकर्त्‍याला भेटून एफ.आय.आर.च्‍या प्रतीस वाहन चोरी गेल्‍याचे कळविले. वाहनाचा दावा निकाली काढण्‍याचे दृष्‍टीने संबंधीत सर्व दस्‍तऐवज गैरअर्जदाराला 23.03.2010 रोजी पाठविण्‍यात आले. परंतू गैरअर्जदाराने दस्‍तऐवज व वाहन सापडत नसल्‍याची माहिती ही 23.03.2010 रोजी म्‍हणजे उशिरा दिली, तसेच यामध्‍ये वाहन चालकाचा समावेश आहे, म्‍हणून विमा दावा नियमामध्‍ये बसत नाही, याकरीता नाकारला.
 
      तक्रारकर्त्‍याच्‍या मते, गैरअर्जदाराने त्‍याला पॉलिसीच्‍या अटी व शर्ती पुरविल्‍या नसल्‍याने आता त्‍याचा आधार घेऊन गैरअर्जदार तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारीत आहे आणि ही बाब अनुचित व्‍यापार पध्‍दती असल्‍याचे म्‍हटले आहे. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने मंचासमोर तक्रार दाखल करुन विमा दाव्‍याची रक्‍कम रु.7,50,000/- ही 12 टक्‍के व्‍याजासह मिळावी, शारिरीक व मानसिक त्रासाबाबत भरपाई रु.50,000/- आणि तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्‍या केलेल्‍या आहेत.
2.    सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदाराला पाठविण्‍यात आली असता गैरअर्जदाराने तक्रारीला लेखी उत्‍तर दाखल करुन  तक्रारकर्त्‍याने तक्रारीत घेतलेले आक्षेप नाकारले असून तक्रारकर्त्‍याला पॉलिसीसोबत अटी व शर्ती पुरविण्‍यात आल्‍याचे म्‍हटले आहे. तसेच त्‍या मिळाल्‍या नसल्‍याची तक्रार कधीही तक्रारकर्त्‍याने केली नाही. सदर विवादित वाहनाच्‍या चोरीमध्‍ये वाहन चालकाचा समावेश असल्‍याने व तक्रारकर्त्‍याने वाहन चोरी गेल्‍याबद्दल माहिती गैरअर्जदारांना उशिराने दिल्‍यामुळे वाहनाचा विमा दावा हा अटी व शर्तीनुसार नाकारल्‍याचे म्‍हटले आहे. तसेच गैरअर्जदाराने सदर प्रकरणी कोणतीच त्रुटी केली नसल्‍याने सदर तक्रार खारीज करण्‍याची मागणी केलेली आहे.
3.    सदर तक्रार मंचासमक्ष युक्‍तीवादाकरीता दि.10.02.2011 रोजी आल्‍यानंतर मंचाने तक्रारकर्त्‍याचा युक्‍तीवाद ऐकला. तसेच सदर प्रकरणी तक्रारकर्त्‍याची तक्रार, गैरअर्जदाराचे लेखी उत्‍तर, दस्‍तऐवज, तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले दस्‍तऐवज व निवाडे यांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
-निष्‍कर्ष-
4.    तक्रारकर्त्‍याचे वाहन एल पी टी 1612 ज्‍याचा नोंदणी क्र.एम एच 04/सी यु 6414 आहे, तो गैरअर्जदाराकडे विमाकृत होता ही बाब दाखल दस्‍तऐवज क्र. 2 वरुन स्‍पष्‍ट होत असल्‍याने तक्रारकर्ता हा गैरअर्जदाराचा ग्राहक असल्‍याचे मंचाचे मत आहे.
5.    तक्रारकर्त्‍याचे वाहन चोरीला गेले होते, ही बाब तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले दस्‍तऐवज क्र.4 वरुन (एफ.आय.आर.) स्‍पष्‍ट होते. तसेच वाहन चोरीला गेल्‍याबाबतची तक्रार पोलिसांना दिल्‍याची बाबसुध्‍दा सदर दस्‍तऐवजावरुन स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍याचे वाहन हे चालकाने त्‍याच्‍यासोबत विश्‍वासघात केला व सदर वाहन विकले ही बाब तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या नि.क्र.12 सोबत असलेल्‍या दस्‍तऐवजावरुन स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे वाहन हे तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले पृष्‍ठ क्र. 69 अंतिम अहवाल नमुन्‍याचे अवलोकन केले असता वाहन चोरीला गेले होते व त्‍याबाबतची सुचना तक्रारकर्त्‍याने मौदा पोलीस स्‍टेशनला दिल्‍याचे सदर दस्‍तऐवजावरुन स्‍पष्‍ट होते. तसेच सदर वाहन चालकाने संगनमत करुन विकले ही बाबसुध्‍दा सदर दस्‍तऐवजावरुन स्‍पष्‍ट होते.
 
6.    गैरअर्जदाराने, तक्रारकर्त्‍याचे वाहन हे त्‍याच्‍या चालकाने चोरले, तसेच तक्रारकर्त्‍याने वाहन चोरीची सुचना उशिरा दिली असे पुढे कारण देऊन विमा दावा नाकारला आहे. सदर बाब तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत दाखल केलेले दस्‍तऐवज क्र. 10 वरुन स्‍पष्‍ट होते व पोलिसांच्‍या सुचनेनुसार तक्रारकर्त्‍याचे वाहनाचा शोध घेतला आहे व त्‍यानंतर वाहन सापडून आले नाही, म्‍हणून पोलिसांनी सदर गुन्‍ह्याची नोंद घेतली. तसेच गैरअर्जदारांना त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने सुचना दिलेली आहे ही बाब स्‍पष्‍ट होते, त्‍यामुळे व वाहन चालकाने वाहन चोरले अशा परिस्थितीमध्‍ये विमा दावा नाकारता येतो अशा कथनासंबंधीचे कोणतेही दस्‍तऐवज गैरअर्जदाराने दाखल केलेले नाही. तसेच अटी व शर्ती तक्रारकर्त्‍यांना पुरविल्‍या होत्‍या यासंबंधीचे कोणतेही दस्‍तऐवज व पुरावा दाखल केलेला नाही. सदर प्रकरणामध्‍ये तक्रारकर्त्‍याने मंचासमक्ष मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाचा IV (2008) CPJ (SC), National Insurance Company Ltd. Vs. Nitin Khandelwal  दाखल केलेला आहे, या निवाडयाचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता हा विमाकृत रकमेच्‍या 75 टक्‍के रक्‍कम म्‍हणजे नॉन स्‍टँडर्ड बेसिसवर विमा दावा मिळण्‍यास पात्र ठरतो असे या न्‍याय निवाडयानुसार स्‍पष्‍ट केले आहे. तक्रारकर्त्‍याचे वाहनाचे विमाकृत मुल्‍य हे रु.7,50,000/- आहे, जर तक्रारकर्ता हा सदर विमाकृत मुल्‍यापैकी नॉन स्‍टँडर्ड बेसिसवर रु.5,62,500/- मिळण्‍यास पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. सदर रक्‍कम गैरअर्जदाराने आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसाचे आत तक्रारकर्त्‍याला द्यावे अन्‍यथा सदर रकमेवर तक्रारकर्ता आदेश पारित दिनांकापासून तर रक्‍कम अदा होईपर्यंतच्‍या कालावधीकरीता द.सा.द.शे.10 टक्‍के व्‍याज मिळण्‍यास पात्र राहील.
7.    गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारीत असतांना चुकीच्‍या पध्‍दतीने नाकारला व सेवेत त्रुटी दिलेली असल्‍याने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासाकरीता तक्रारकर्ता हा रु.10,000/- मिळण्‍यास पात्र ठरतात व तक्रारीचा खर्चाबाबत रु.2,000/- मिळण्‍यास पात्र ठरतो. सदर निष्‍कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    गैरअर्जदाराला आदेश देण्‍यात येतो की, त्‍याने तक्रारकर्त्‍याच्‍या विमा दाव्‍यापोटी  नॉन स्‍टँडर्ड बेसिसवर रु.5,62,500/- आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30     दिवसाचे आत द्यावे अन्‍यथा सदर रकमेवर तक्रारकर्त्‍याला आदेश पारित दिनांकापासून तर रक्‍कम अदा होईपर्यंतच्‍या कालावधीकरीता द.सा.द.शे.10 टक्‍के       व्‍याज देय राहील.
3)    तक्रारकर्त्‍याला गैरअर्जदाराने शारिरीक व मानसिक त्रासाकरीता भरपाई म्‍हणून    रु.10,000/- द्यावे.
4)    तक्रारकर्त्‍याला गैरअर्जदाराने तक्रारीचा खर्चाबाबत रु.2,000/- द्यावे.
5)    गैरअर्जदाराने सदर आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसाचे      आत करावे.
 

[HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT