Maharashtra

Satara

CC/13/154

GHANSHAM AKNATH SHIGTE - Complainant(s)

Versus

NATIONAL INSURANCE CO.LTD - Opp.Party(s)

04 Aug 2015

ORDER

Consumer Disputes Redressal
Forum, Satara
 
Complaint Case No. CC/13/154
 
1. GHANSHAM AKNATH SHIGTE
KRISHNANAGAR SATARA
...........Complainant(s)
Versus
1. NATIONAL INSURANCE CO.LTD
POI NAKA SATARA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SAVITA BHOSALE PRESIDENT
 HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR MEMBER
 HON'BLE MRS. Mrs.Surekha Hazare MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

 

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

 

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

           मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

                                          मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

       

                तक्रार अर्ज क्र. 154/2013

                      तक्रार दाखल दि.03-09-2013.

                            तक्रार निकाली दि.04-08-2015. 

श्री. घनःश्‍याम एकनाथ शिंगटे,

रा.105/3, प्‍लॉट नं.10, सरबल,

एम.एस.ई.बी. ऑफीस जवळ,

कृष्‍णानगर, सातारा, ता.जि.सातारा.                  ....  तक्रारदार

  

         विरुध्‍द

 

1. नॅशनल इन्‍श्‍यूरन्‍स कं.लि.,,

   शाखा सातारा, तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक, ,  

   पत्‍ता- गणेशचंद्र चेंबर्स, 172-क,

   शाखा सातारा (941),

   रविवार पेठ,पोवई नाका, सातारा

2. डेडिकेटेड हेल्‍थ सर्व्हिसेस टी.पी.ए

   (इं) प्रा.लि. शाखा पुणे तर्फे

   शाखा व्‍यवस्‍थापक,

   पत्‍ता- ऑफीस नंबर 01/201, दुसरा मजला,

   जे.के. चेंबर्स,शुक्रवार पेठ,

   बाजीराव रोड, पुणे 411 002.                   ....  जाबदार

 

                               तक्रारदारातर्फे अँड.व्‍ही.आय.शेट्टी

                               जाबदार क्र.1 व 2 तर्फेअँड.एस.बी.गोवेकर.

 

 न्‍यायनिर्णय

 

(सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्‍यक्षा यानी पारित केला)

                                                                                     

1.  तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे.  तक्रारअर्जातील थोडक्‍यात मजकूर पुढीलप्रमाणे-

     तक्रारदार हे कृष्‍णानगर, सातारा येथील कायमस्‍वरुपी रहिवाशी आहेत.  तक्रारदार यांनी त्‍यांचे स्‍वतःसाठी व पत्‍नीसाठी जाबदार क्र. 1 यांचेकडून हॉस्पिटलायझेशन बेनिफिट पॉलीसी नामक मेडीक्‍लेम पॉलीसी क्र.270104/48/12/8500000645  घेतली होती.  या पॉलीसीचा कालावधी दि.15/6/2012 ते दि.14/6/2013 असा होता.  जाबदार क्र. 1 ने दिले पॉलीसी प्रमाण पत्रासोबत तक्रारदार यांना कॅशलेस प्रकारची मोफत सेवा व सुविधा तत्‍परतेने देता यावी म्‍हणून जाबदार क्र. 1 यांचेवतीने जाबदार क्र. 2 यांची नियुक्‍ती केलेचे कळविले आहे.  जाबदार क्र. 1 व 2 हे एकत्रित व संयुक्तिकरित्‍या मेडिक्‍लेम पॉलीसीचे विमा संरक्षण व तदनुषंगिक संवा पुरविणेचा व्‍यवसाय करतात.  प्रस्‍तुत कामी जाबदार यांनी तक्रारदार यांचा मेडिक्‍लेम नाकारलेला आहे. तो पुढीलप्रमाणे तक्रारदाराला सप्‍टेंबर,2012 मध्‍ये अचानक चालताना अंधारी येवू लागली म्‍हणून तक्रारदार यांना डॉ. साबळे यांचेकडे उपचारासाठी नेलेवर ते उपचारानंतर व्‍यवस्‍थीत झाले.  पुन्‍हा दि. 4/12/2012 रोजी तक्रारदाराला श्‍वास घेताना त्रास जाणवू लागला म्‍हणून त्‍यांना पुन्‍हा डॉ. साबळे यांचेकडे उपचारासाठी दाखल केलेवर डॉक्‍टरांनी 2 डी.इको कार्ड्रीओग्राफी आणि कलर डॉपलर नामक तपासणी करुन घेतली व त्‍याचा रिपोर्ट दिला.  त्‍या अनुसरुन डॉक्‍टरांनी तक्रारदाराला एंजिओग्रार्फी करुन घेणेस सांगितले.  प्रस्‍तुत एंजिओग्राफी सातारा येथील प्रतिभा हॉस्पिटल अँन्‍ड हार्टकेअर सेंटर येथे दि.11/12/2012 रोजी करणेत आली.  पुढे डॉ. साबळे यांचे सल्‍ला व मार्गदर्शनाप्रमाणे तक्रारदार यांचेवर पुणे येथील पुणे हॉस्पिटल अँन्‍ड रिसर्च सेंटर येथे बायपास सर्जरी करणेसाठी तक्रारदारांना दि. 17/12/2012 रोजी दाखल करणेत आले.  तक्रारदारांवर प्रस्‍तुत हॉस्पिटलमध्‍ये बायपास शस्‍त्रक्रिया करणेत आली व दि.26/12/2012 रोजी डिस्‍चार्ज देणेत आला.  सदरील शस्‍त्रक्रियेकरीता तक्रारदारांना पुणे हॉस्पिटल अँन्‍ड रिसर्च सेंटर यांचे बिलाप्रमाणे रक्‍कम रु.2,18,767/- (रुपये दोन लाख अठरा हजार सातशे सदुसष्‍ट मात्र) इतका खर्च करावा लागला आहे.   त्‍याखेरीज औषधांसाठी एकूण रक्‍कम रु.31,442/- करावा लागला.  कलर ड्रॉपलरसाठी रक्‍कम रु.2,000/-, एंजीओग्राफीसाठी रक्‍कम रु.11,000/- तसेच रहाणे-खाणे, येणेजाणेसाठी रक्‍कम रु.15,000/- खर्च झाला. असा एकूण खर्च रक्‍कम रु.2,78,709/- या खर्चाच्‍या भरपाईसाठी तक्रारदाराने जाबदार क्र. 1 कडे विमा क्‍लेम सादर केला. परंतु जाबदार यांनी दि. 8/2/2013 रोजी तक्रारदाराला दोन-तीन वर्षांपासून हायपर टेन्‍शनचा त्रास होता व यापूर्वी व्‍याधीची माहीती पॉलीसी घेताना तक्रारदार यांनी लपवून ठेवली म्‍हणून तक्रारदाराचा विमा क्‍लेम नाकारीत असलेचे कळविले.  त्‍यामुळे जाबदाराने तक्रारदारास सदोष सेवा दिली आहे.  सबब सदरची विमा क्‍लेम रक्‍कम जाबदाराकडून मिळणेसाठी प्रस्‍तुत तक्रार अर्ज मे मंचात तक्रारदार यांनी दाखल केला आहे.

2.   प्रस्‍तुत कामी तक्रारदाराने जाबदार यांचेकडून सेवेतील कमतरता दूर होवून मिळावी, तक्रारदारास झाले एकूण खर्चाची रक्‍कम रु.2,83,209/- (रुपये दोन लाख त्रयाऐंशी हजार दोनशे नऊ फक्‍त) वसूल होवून मिळावेत, सदरील रक्‍कम तक्रारदाराचे पदरी पडेपर्यंत अर्ज दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 10 टक्‍के व्‍याज जाबदाराने तक्रारदाराला द्यावे, मानसिक त्रासापोटी तक्रारदाराला जाबदाराकडून रक्‍कम रु.25,000/- व अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.20,000/- मिळावेत अशी विनंती केली आहे.

3.  प्रस्‍तुत कामी तक्रारदार यांनी नि. 2 कडे प्रतिज्ञापत्र, नि. 6 चे कागदयादीसोबत नि.6/1 ते नि.6/19 कडे अनुक्रमे विमा पॉलीसीची प्रत, कलर ड्रॉपलरची रिपोर्टची प्रत, पूजा हॉस्पिटल अँन्‍ड रिसर्च सेंटर यांचे डिस्‍चार्ज कार्ड, जाबदाराने तक्रारदाराकडून भरुन घेतलेला फॉर्म ‘A’ ची प्रत, पुना हॉस्पिटलचे बीलाची प्रत, पुना हॉस्पिटल कडील औषधांची बीले, खर्चाची पावती, जाबदाराने विमा क्‍लेम नाकारलेचे पत्र, तक्रारदाराने जाबदार नं. 1 यांना दिलेले पत्र, प्रतिभा हॉस्पिटलच्‍या खर्चाची पावती नि. 17 कडे तक्रार अर्जासोबतचे प्रतिज्ञापत्र हाच तक्रारदाराचा पुरावा समजणेत यावा म्‍हणून पुरसीस, नि. 19 कडे कागदयादीसोबत तक्रारदाराचे आईच्‍या आधारकार्डची प्रत, नि. 24 कडे लेखी युक्‍तीवाद, नि. 25 ला पुरावा संपलेची पुरसीस वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.

4.   जाबदाराने प्रस्‍तुत कामी नि. 15 कडे कैफीयत, नि.16 कडे म्‍हणण्‍याचे अँफीडेव्‍हीट, नि.22 चे कागदयादीसोबत नि.22/1 ते 22/6 कडे अनुक्रमे जाबदाराने तक्रारदाराला दि. 8/2/13 रोजी क्‍लेम नाकारलेचे दिलेले पत्र, पॉलीसीची प्रत, तक्रारदाराने जाबदाराला दिलेले पत्र, जाबदाराने दि. 19/3/2013 रोजी क्‍लेम नाकारलेचे तक्रारदार यांना दिलेले पत्र, जाबदाराने दि. 19/3/2013 रोजी क्‍लेम नाकारलेचे तक्रारदार यांना दिलेले पत्र, मुळ क्‍लेम फॉर्म, मुळ मेडिकल पेपर्स, नि. 26 व 27 कडे कैफीयतीसोबत दिलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे हाच जाबदारांचा पुरावा व लेखी युक्‍तीवाद समजणेत यावा म्‍हणून जाबदाराने दिलेली पुरसीस तसेच नि. 26 कडे नि. 30 चे कागदयादी सोबत जाबदारने तक्रारदाराजा दिलेले पत्र, पॉलीसीची प्रत, टर्मस् अँन्‍ड कंडिशन सह, तक्रारदाराने जाबदारला दिलेले पत्र, दि. 19/3/2013 रोजी जाबदाराने तक्रारदाराला दिलेले पत्र,(क्‍लेम नाकारलेचे), मुळ क्‍लेमफॉर्म व  अँनेक्‍श्‍चर ‘A’ मेडीकल पेपर्स मुळ प्रत वगैरे कागदपत्रे मे मंचात दाखल केली आहे.  प्रस्‍तुत कामी जाबदार यांनी खालीलप्रमाणे आक्षेप नोंदवलेले आहेत. 

     i)  तक्रारदाराचा अर्ज व त्‍यातील मजकूर मान्‍य व कबूल नाही.  परंतु तक्रारदाराने जाबदारांकडून अर्जात नमूद मेडिक्‍लेम पॉलीसी घेतलेचे मान्‍य व कबूल आहे.

     ii)  तक्रारदाराला विमापॉलीसी उतरविताना प्रपोजल फॉर्ममध्‍ये तब्‍येतीविषयी खरी माहिती भरणेस सांगितले होते त्‍यावेळी तक्रारदाराने त्‍यांना असले आजाराबाबत कोणताही आजार नाही अशी माहीती भरली होती.  परंतु तक्रारदाराला हायपरटेन्‍शनचा आजार नाही अशी माहिती भरली होती.  परंतु तक्रारदाराला हायपरटेन्‍शनचा आजार पॉलीसी उतरवण्‍यापूर्वी दोन तीन वर्षापासून होता.  परंतु तक्रारदाराने सदरची बाब लपवून ठेवली व जाबदार विमा कंपनीची फसवणूक करुन सदची पॉलीसी घेतली असलेने तक्रारदाराचा विमा क्‍लेम जाबदाराने फेटाळला आहे. यामध्‍ये तक्रारदाराला कोणतीही सेवात्रुटी जाबदाराने दिलेली नाही. तक्रारदाराने विमा पॉलीसीतील अटी व शर्थींचा भंग केलेला असलेने व त्‍यामुळे त्‍यांचा विमा क्‍लेम जाबदाराने नाकारला आहे. यात कोणतीही सेवात्रुटी केली नाही. त्‍यामुळे तक्रारदार यांचा सदर तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा असे म्‍हणणे जाबदाराने याकामी दाखल केले आहे.   

5.    वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रे व म्‍हणणे यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन प्रस्‍तुत तक्रारअर्जाचे निराकरणार्थ मे मंचाने पुढील मुदद्यांचा विचार केला.

अ.क्र.                  मुद्दा                      उत्‍तर

1.  तक्रारदार हे जाबदारांचे  ग्राहक आहेत काय?

    व जाबदार हे तक्रारदाराचे सेवापुरवठादार आहेत काय?           होय.                                        

2.  जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा

    पुरवली आहे काय?                                       होय.

3.  तक्रारदार विमाक्‍लेमची रक्‍कम

    मिळणेस पात्र आहेत काय ?                                होय.

4.   अंतिम आदेश काय?                                 खाली नमूद

                                                      आदेशाप्रमाणे.

विवेचन-

6.    वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदाराने जाबदार यांचेकडून हॉस्पिटलायझेशन बेनिफीट नामक मेडिक्‍लेम पॉलीसी क्र.270104/48/12/8500000645 ही दि.15/6/2012 ते दि.14/6/2013 या कालावधीसाठी घेतली आहे.  जाबदाराने तक्रारदाराला कॅशलेस प्रकारची सेवा व सुविधा देण्‍याचे मान्‍य केलेले होते.  सदरची बाब जाबदाराने मान्‍य व कबूल केली आहे.  तसेच प्रस्‍तुतची विमा पॉलीसी याकामी दाखल आहे.  त्‍यावरुन तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक असून जाबदार हे तक्रारदाराचे सेवापुरवठादार आहेत हे निर्वादितपणे सिध्‍द होते.  तसेच प्रस्‍तुत तक्रारदार यांना सप्‍टेंबर 2012 मध्‍ये अचानक चालताना तोल जावून अंधारी येवू लागलेने सातारा येथील प्रतिभा हॉस्पिटलमध्‍ये डॉ.साबळे यांचेकडे उपचारार्थ दाखल केले.  डॉ.साबळे यांनी तपासणी करुन तक्रारदारांवर हायपर टेन्‍शनचा उपचार चालू केले.  नंतर तक्रारदाराला दि.4/12/12 रोजी श्‍वास घेताना त्रास जाणवू लागला व घाम येवू लागला.  डॉ. साबळे यांनी तक्रारदाराची तातडीने 2D Eco, Cardiography & colour Dopler नामक तपासणी करुन घेतली.  या तपासण्‍यावरुन डॉक्‍टरने तक्रारदाराला एंन्‍जीओग्राफी करुन घेणेस सांगीतले.  पुढे ता. 11/12/2012 रोजी तक्रारदाराची एंन्‍जीओग्राफी झाली व डॉ. साबळे यांचे सल्‍ल्‍यानुसार पुणे हॉस्पिटल अँन्‍ड रिसर्च सेंटर येथे बायपास सर्जरी करणेत आली. तेथे तक्रारदाराला दि.17/12/2012 ते दि.26/12/2012 पर्यंत दाखल केले होते.  दि. 26/12/2012 रोजी तक्रारदाराला डिस्‍चार्ज मिळाला.  या शस्‍त्रक्रियेसाठी रक्‍कम रु.2,18,767/- (रुपये दोन लाख अठरा हजार सातशे सदुसष्‍ट मात्र) इतका खर्च आला.  त्‍याखेरीज मुळ तक्रार अर्ज कलम 4 मध्‍ये नमूद केलेप्रमाणे रक्‍कम रु.2,78,209/- (रुपये दोन लाख अठ्ठयाहत्‍तर हजार दोनशे नऊ मात्र) इतका औषधोपचार, इतर सर्व प्रकारच्‍या तपासण्‍या, एंजिओग्राफी, इको, कलर डॉपलर, राहणे-खाणे, जाणे-येणे याकरीता खर्च झाला आहे.  प्रस्‍तुत बाबतीत खर्चाच्‍या पावत्‍या तक्रारदारने मे मंचात दाखल  केल्‍या आहेत.  त्‍या नि.6  चे कागदयादीसोबत नि. 6/7 ते नि. 6/16 कडे दाखल केल्‍या आहेत.  तक्रारदार यांनी प्रस्‍तुत कामी सर्व औषधोपचाराचा व ऑपरेशनचा खर्च मिळणेसाठी जाबदार विमा कंपनीकडे विमा क्‍लेम सादर केला असता जाबदाराने तक्रारदारास विमा प्रस्‍ताव देणेपूर्वी 2-3 वर्षांपासून हायपर टेन्‍शनची व्‍याधी जडली होती व सदरचा खुलासा विमाप्रस्‍ताव देतेवेळी तक्रारदाराने केलेला नाही. ही माहिती तक्रारदाराने लपवून ठेवली असे चूकीचे कारण देऊन दि.8/2/2013 रोजीचे पत्राने तक्रारदाराचा विमाक्‍लेम नाकारला आहे.  प्रस्‍तुतची दोन्‍ही पत्रे तक्रारदाराने याकामी दाखाल केली आहेत.  जाबदाराने तक्रारदाराचे कोणतेही वैद्यकीय रेकॉर्ड न पाहता घाईगडबडीने विमाक्‍लेम नाकारला आहे.  तक्रारदाराचे पूना हॉस्पिटल अँन्‍ड रिसर्च सेंटर यांचेकडील ता.26/12/2012 चे डिस्‍चार्ज पेपरवर तक्रारदाराचे बाबतीत ‘Post History-hypertension since 2 to 3 months’ अशी सुस्‍पष्‍ट नोंद करुन ती प्रमाणित केली आहे.  प्रस्‍तुत डिस्‍चार्ज समरी तक्रारदाराने नि. 6/4 कडे दाखल केले आहे.  तसेच जाबदाराने पुना हॉस्पिटल अँन्‍ड रिसर्च सेंटर यांचेकडील डॉ. बाफना यांचेकडून फॉर्म-ए भरुन घेतला आहे. व त्‍याचा आधार घेऊन विमाक्‍लेम नाकारला आहे.  प्रस्‍तुत फॉर्म ‘ए’ ची मुळ प्रत जाबदाराने नि. 22/6 कडे दाखल आहे.  प्रस्‍तुत फॉर्म ‘ए’ चे अवलोकन करता त्‍यामध्‍ये कलम 7 चे उत्‍तर “Yes  : 2yrmtns from IHD व 2 व 3 mth. From HTM असे नमूद आहे.  तसेच कलम नं. 9 चे उत्‍तर – म्‍हणजेच Duration of Present disease suffered i.e. since how long he/she may be suffering from present disease before approaching you चे उत्‍तर 7 days to II months असे दिले आहे.  प्रस्‍तुत फॉर्म  ‘A’  मध्‍ये  कलम 6  व  7  मध्‍ये 2 to 3 yrs लिहून पुन्‍हा Mths  असा शब्‍द त्‍याला जोडूनच नंतर लिहीलेला दिसत आहे. परंतु या खाडाखोडीबाबत किंवा प्रस्‍तुत डॉ. बाफना यांचे नं. 6 व 7 चे नेमके व योग्‍य उत्‍तर काय होते किंवा  त्‍यात खाडाखोड कोणी केली का ? केली हे स्‍पष्‍ट होत नाही आणि प्रस्‍तुत बाब स्‍पष्‍ट होणेसाठी जाबदाराने डॉ. बाफना यांनी दिले डिस्‍चार्ज पेपरमध्‍ये नि. 6/4 कडील दाखल केले डिस्‍चार्ज समरी मध्‍ये Post History:- Hypertension since 2-3 months असे स्‍पष्‍ट नमूद केले आहे.  प्रस्‍तुत डिस्‍चार्ज पेपर हा दि.26/12/12 रोजीचा आहे.  त्‍यानंतर ब-याच कालावधीनंतर जाबदार यांनी डॉ. बाफना यांचेकडून फॉर्म-ए भरुन घेतला आहे.  दरम्‍यानच्‍या काळाचा विचार करता, डॉ. बाफना यांचेकडून फॉर्म ए भरुन घेतला आहे.  दरम्‍यानच्‍या काळाचा विचार करता, डॉ. बाफना यांचेकडून फॉर्म–ए मध्‍ये माहिती नोंदविताना 2-3 महिने ऐवजी 2,3 वर्षे असे चकून झाले असण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.  परंतू यातील खरी माहिती कोणती हे 2-3 वर्षे की 2-3 महिने हे शाबीत करणेसाठी प्रस्‍तुत डॉक्‍टरांचे शपथपत्र दाखल नाही.  प्रस्‍तुत बाबतीत आम्‍ही पुढील  मा. राष्‍ट्रीय आयोगाच्‍या न्‍यायनिवाडयाचा आधार घेतला. Insurance-Mediclaim-whether complainant gave any incorrect

Information ? – held No.

2002 (1) CPJ Pg.23, NC

Mediclaim- Pre-existing disease-unless a person hospitalized/undergoes operation in near proximity of obtaining policy, he is not supposed to disclose normal wear and tear of human life malaise of hypertension, diabetes etc. are controllable on day to day basis by standard medication & cannot e used as concealment of Pre-existing disease.

2008 (4) CPJ Page 511 Delhi

Similar case law on same point.

2006 (3) CPJ Page 62 Delhi

IV (2008)CPJ 511  Delhi State

Oriental Insurance Co. V/s. Mahinder singh.

Head Note -  Consumer Protection Act,1986 Sec.15-Insurance-Medi-claim-Policy-Reimbursment claim repudiated-contention , factum of Pre-existing disease not disclosed- complaint allowed by forum. Hence appeal-Unless a person hospitalized/undergoes operation in near Proximity of obtaining, policy he is not supposed to disclose normal Wear & tear of human life-Insured leading healthy ward normal life, not supposed to disclose factum of treatment/ operation for particular disease 10-12 year before Deceased living ordinary life subjected to basic medical tests by penal doctors- onus on insurer to prove concealment of Pre-existing disease at time of obtaining  Policy-Appeal devoid of merit-dismissed.’                            

     वरील न्‍यायनिवाडयांचा तसेच तक्रारदार व जाबदाराने दाखल केले कागदपत्रे यांचा विचार करता जाबदाराने तक्रारदाराला विमा पॉलीसी घेणेपूर्वी 2-3 वर्षांपासून हायपरटेन्‍शनचा त्रास होता ही बाब जाबदाराने सिध्‍द केलेली नाही.  सबब तक्रारदाराचा प्रस्‍तुत विमाक्‍लेम नाकारुन जाबदाराने तक्रारदाराला सदोष सेवा दिलेचे सिध्‍द होते.  तसेच वरील सर्व पुराव्‍याची कागदपत्रे पहाता, प्रस्‍तुत तक्रारदार यांना विमा पॉलीसी घेणेपूर्वी फक्‍त 2 ते 3 महिनेपासूनच हायपरटेन्‍शनचा त्रास होता हे दिसून येते.  परंतु जाबदाराने तक्रारदारास सदर हायपरटेन्‍शनचा त्रास विमा प्रस्‍ताव घेणेपूर्वी 2 ते 3 वर्षांपासून होता व ही गोष्‍ट तक्रारदाराने विमा प्रपोजल फॉर्म भरताना लपवून ठेवली या कारणास्‍तव नाकारला आहे ही सेवेतील त्रुटीच आहे.  सबब जाबदाराने तक्रारदार यांना प्रस्‍तुत विमा क्‍लेमची रक्‍कम अदा करणे न्‍यायोचीत आहे व तक्रारदार हे प्रस्‍तुत रक्‍कम मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.

9.    सबब आम्‍ही खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करत आहोत.    

                           -ः आदेश ः-

1.   तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

2.  जाबदार विमा कंपनीने तक्रारदार यांना विमाक्‍लेमची रक्‍कम रु.2,83,209/- (रुपये

    दोन लाख त्र्याऐंशी हजार दोनशे नऊ मात्र) अदा करावेत.

3. प्रस्‍तुत विमा रकमेवर अर्ज दाखल तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत

   द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याज जाबदाराने तक्रारदाराला अदा करावेत.

4. जाबदार यांनी  तक्रारदार यांना झाले मानसिक त्रासासाठी रक्‍कम

   रु.15,000/-(रुपये पंधरा हजार मात्र) तर अर्जाचा खर्च म्‍हणून रक्‍कम

   रु.5,000/- (रुपये पाच हजार मात्र) अदा करावेत.

5.  वरील सर्व आदेशाचे पालन जाबदार यांनी आदेश पारीत तारखेपासून 45

    दिवसांचे आत करावे.  

6.  विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केलेस तक्रारदाराला ग्राहक संरक्षण

    कायद्यातील कलम 25 किंवा 27 नुसार वसुलीची प्रक्रिया करणेची  मुभा

    राहील.

7.  पस्‍तुत आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य द्याव्‍यात.

8.  सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला.

ठिकाण- सातारा.

दि.04-08-2015.

            (सौ.सुरेखा हजारे)   (श्री.श्रीकांत कुंभार)    (सौ.सविता भोसले)

           सदस्‍या          सदस्‍य             अध्‍यक्षा

             जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

 
 
[HON'BLE MRS. SAVITA BHOSALE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Mrs.Surekha Hazare]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.