Maharashtra

Nanded

CC/14/170

M/s Kannawar Sadi Center Nanded through its partner - Complainant(s)

Versus

National Insurance co.Ltd. & etc1 - Opp.Party(s)

Adv.P.K.Patani

15 Apr 2015

ORDER

District consumer Disputes Redressal Forum
Nanded
Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
 
Complaint Case No. CC/14/170
 
1. M/s Kannawar Sadi Center Nanded through its partner
Shivaji Nagar,
Nanded
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. National Insurance co.Ltd. & etc1
Nagina Ghat Road,
Nanded
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. S.B.Kulkarni PRESIDENT
 HON'ABLE MR. R.H.Bilolikar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

                 निकालपत्र                                   

(घोषीत द्वारा- सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्‍यक्ष)

 

1.     अर्जदार यांनी  गैरअर्जदार यांचेविरुध्‍द सेवेत त्रुटीच्‍या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.

      अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्‍यात खालील प्रमाणेः-

2.    अर्जदार ही एक भागीदारी संस्‍था असून प्रस्‍तुतची तक्रार ही भागीदारी संस्‍थेच्‍या एका भागीदाराकडून दाखल करण्‍यात आली आहे.  अर्जदार हे 3,4,5,6 पहिला मजला, गुरुनानक मार्केट, नांदेड येथे मे.कन्‍नावार साडी सेंटर या नावाने गेली 30 ते 35 वर्षापासून कापडाचा व्‍यापार करतात.  अर्जदाराने आपल्‍या दुकानाचा विमा गैरअर्जदार क्र. 1 कडे उतरविला होता. सदर विम्‍याचा कालावधी दिनांक 10.12.2011 ते 09.12.2012 च्‍या मध्‍यरात्रीपर्यंत होता. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 कडून रक्‍कम रु.80 लाखाचा विमा उतरविला असल्‍याने त्‍यापोटी रक्‍कम रु.16,369/- चा भरणा विमा कंपनीकडे केला होता.  सदर विमा हा भुकंप व जळीत करीता लागु होता.  गैरअर्जदार क्र. 2 ही वित्‍तीय संस्‍था असून अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडून कॅश क्रेडीट कर्ज रक्‍कम रु.20 लाख घेतले आहे.  कर्जाच्‍या बदल्‍यात अर्जदाराचे दुकानातील माल गैरअर्जदार क्र. 2 बँकेला तारण करण्‍यात आला आहे. 

            दिनांक 24.08.2012 ते दिनांक 25.08.2012 च्‍या मध्‍यरात्री 12.30 वाजता अचानक अर्जदाराच्‍या दुकानाला आग लागल्‍याचे कळाले.  सदरील बातमी कळताच अर्जदाराने घटनास्‍थळ गाठले, तोपर्यंत अग्‍नीशामक दल व पोलीस घटनास्‍थळी पोहोचले होते.  अर्जदाराचे पहिल्‍या मजल्‍यावर साडी विभागात आग लागल्‍याचे लक्षात आले.  अर्जदाराने अग्‍नीशामकदल व पोलीस दल यांचे सहकार्याने आग आटोक्‍यात आणली. दिनांक 25.08.2012 रोजी अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 विमा कंपनीस घटनेबाबत माहिती दिली.  गैरअर्जदार क्र. 1 यांनी श्री रॉबर्ट रॉड्रीक्‍स यांची सर्व्‍हेअर म्‍हणून नियुक्‍ती केली.  दिनांक 26.08.2012 रोजी सर्व्‍हेअर यांनी घटनास्‍थळी येऊन सर्व्‍हेक्षण केले व अर्जदारास सुचना दिल्‍या.  सर्व्‍हेअरने वेळोवेळी घटनास्‍थळाचे सर्व्‍हेक्षण करुन माहिती गोळा करण्‍याचे कार्य करीत होते त्‍यास अर्जदाराने सहकार्य केलेले आहे.  अर्जदाराचे सदरील जळीत प्रकरणात अतोनात नुकसान झाल्‍यामुळे अर्जदारास प्रचंउ आर्थिक ताण सहन करावा लागला असल्‍याने अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांना अर्जदाराचा विमा दावा लवकर निकाली काढणेबाबत विनंती केली. सर्व्‍हेअरने त्‍यांचे अहवालात अर्जदाराचे दुकानात लागलेल्‍या आगीमुळे रक्‍कम रु.44,97,055/- एवढे नुकसान झाल्‍याचे निष्‍कर्षावर आले.  सर्व्‍हेअर श्री रॉबर्ट रॉड्रीक्‍सर्व्‍हेअर यांनी 5 टक्‍के पॉलिसी एक्‍सेस रु.2,24,855/- वजा करुन रक्‍कम रु.42,72,200/- नुकसान भरपाई देणेबाबत अभिप्राय दिनांक 15.02.2013 रोजी दिला. अनेकवेळा पाठपुरावा करुन गैरअर्जदार क्र. 1 यांनी सर्व्‍हेअरचा अहवाल प्राप्‍त झाल्‍यानंतर अर्जदाराच्‍या विनंतीकडे दुर्लक्ष केले व पुर्ण एक वर्षानंतर दिनांक 27.02.2014 रोजी अर्जदारास विवादीत रक्‍कम दिली. अर्जदाराने अजून एक भागीदार संस्‍था नामे कन्‍नावार क्‍लॉथ सेंटरच्‍या मालाचा विमा न्‍यु इंडिया एश्‍योरन्‍स कंपनीमार्फत काढला होता.  या आगीच्‍या वेळेस क्‍लॉथ सेंटरचा काही माल जळालेला असल्‍याने त्‍याचे सर्व्‍हेक्षणसाठी न्‍यु इंडिया एश्‍योरन्‍स कंपनीने श्री रॉबर्ट रॉड्रीक्‍स यांची सर्व्‍हेअर म्‍हणून नियुक्‍ती केली.  वरील दोन्‍ही प्रकरणात सर्व्‍हेअर यांनी आपला सर्व्‍हे संपवून एकाच दिवशी म्‍हणजे दिनांक 15.02.2013 रोजी आपला अहवाल दोन्‍ही कंपनीकडे सादर केला.  त्‍यापैकी न्‍यु इंडिया एश्‍योरन्‍स कंपनीने सदरील सर्व्‍हेअरच्‍या अहवालानुसार दिनांक 28.02.2013 रोजी अर्जदाराच्‍या खात्‍यात रक्‍कम रु.2,47,400/- विनाविलंब जमा केले.  परंतु गैरअर्जदार क्र. 1 यांनी एक वर्षापर्यंत अर्जदाराची रक्‍कम जमा केली नाही. गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास बोलावून सांगितले की, अर्जदाराचा क्‍लेम रक्‍कम रु.42,72,200/- मध्‍ये गैरअर्जदार क्र. 1 यांनी निकाली काढीत असून त्‍यास अर्जदाराची संमती मागीतली.  अर्जदाराने विमा कंपनी रक्‍कम रु.59,41,458/- नुकसान झाल्‍याचे सांगून नुकसान भरपाई वाढवून देण्‍याची विनंती केली.  परंतु सर्व्‍हेअरने दिलेला अभिप्राय हा अंतिम असून तो मान्‍य करणेस अर्जदारास सांगितले. गैरअर्जदार क्र. 1 च्‍या लहरी स्‍वभावामुळे अर्जदाराने त्‍याची होत असलेली  आर्थिक कुचंबणामुळे सर्व्‍हेअरने दिलेला अहवालात नमूद रक्‍कम रु.42,72,200/- चा मावेजा मान्‍य असल्‍याचे गैरअर्जदार क्र. 1 यांना कळविले.  गैरअर्जदार क्र. 1 यांनी दिनांक 27.02.2014 रोजी अर्जदारास रक्‍कम रु.40,25,763/- आरटीजीएस व्‍दारे त्‍याचे बँकेच्‍या खात्‍यात जमा केले.   सदर रक्‍कम जमा झाल्‍याची माहिती मिळताच अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे कमी रक्‍कम जमा झाल्‍याबाबत विचारणा केली.  गैरअर्जदार यांनी कुठलेही सबळ कारण न देता अर्जदारास उडवाउडवीची उत्‍तरे दिली. सर्व्‍हेअरने अहवाल सादर करतांना नुकसानाचे असेसमंट करुन रक्‍कम रु.44,97,055/- असा मावेजा देण्‍यात यावा असे प्रतिपादन केले आहे व नंतर त्‍या रक्‍कमेतून पॉलिसी एक्‍सेस वजा करुन अहवाल सादर केला आहे व पॉलिसी एक्‍सेस वजा करुनच रक्‍कम रु.42,72,200/- चा मावेजा होत आहे असे विमा कंपनीला कळविले.  तरीही कुठल्‍याही सबळ कारणाशिवाय गैरअर्जदार यांनी मुल्‍यांकित मावेजा न देता कमी रक्‍कम दिली आहे.  सर्व्‍हेअरचा अहवाल प्राप्‍त झाल्‍यानंतरही तब्‍बल 13 महिन्‍यानंतर अर्जदारास अहवालात नमूद रक्‍कमेपेक्षा कमी रक्‍कम देऊन अव्‍यवहारीक पणाचे दर्शन घडवून आणले आहे.  गैरअर्जदार यांनी अर्जदारास पॉलिसी काढतेवेळेस सर्टीफीकेट-कम-पॉलिसी शेडयूल्‍ड दिले होते परंतु पॉलिसीबद्दल अन्‍य नियम व अटी आजपर्यंत अर्जदारास पुरविलेल्‍या नाहीत. गैरअर्जदार क्र. 1 यांनी  सर्व्‍हेअरच्‍या अहवालापेक्षा कमी रक्‍कम अर्जदारास दिलेली आहे, उवरीत रक्‍कमेची मागणी केल्‍यानंतर विमा कंपनीने अर्जदारास रक्‍कम देण्‍याचे अमान्‍य केल्‍यामुळे अर्जदाराने सदरील तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्‍ये अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 विमा कंपनीस अर्जदारास मंजूर मावेजातील फरकाची रु.2,46,737/- तसेच एकूण रक्‍कम रु.42,72,200/-वर दिनांक 01.03.2013 पासून आजपावेतो द.सा.द.शे. 24 टक्‍के व्‍याजासह येणे असलेली रक्‍कम रु.14,52,548/- व त्‍यावर अर्ज दाखल केल्‍यापासून रक्‍कम वसूल होईपर्यंत द.सा.द.शे. 24 टक्‍के व्‍याज तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्‍कम रु. 2 लाख व  व दावा खर्च रु. 1 लाख  इत्‍यादी रक्‍कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्‍दारे केलेली आहे.

3.          गैरअर्जदार क्र. 1 यांना नोटीस तामील झाल्‍यानंतर तक्रारीत हजर झाले व त्‍यांनी लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेला आहे.  गैरअर्जदार 2 हे त्‍यांचे वकीलामार्फत तक्रारीत हजर झाले परंतु त्‍यांना अनेक संधी देऊनही त्‍यांनी आपला लेखी जबाब दाखल केलेला नाही.

            गैरअर्जदार क्र. 1 यांचा लेखी जबाब थोडक्‍यात पुढील प्रमाणेः-

4.          अर्जदाराचा तक्रार अर्ज कायद्याने टिकू शकत नाही कारण अर्जदारास अर्ज दाखल करणेस कोणतेही कारण शिल्‍लक नाही.  गैरअर्जदार क्र. 2 हे या प्रकरणात नॉमिनल पार्टी आहे हे म्‍हणणे चुकीचे आहे.  अर्जदाराने सदर बँकेकडून किती टक्‍क्‍याने कर्ज रक्‍कम घेतली याबद्दल गैरअर्जदार क्र. 1 यांना माहिती नाही.   अर्जदाराने सदर क्‍लेमसाठी लागणारी व आवश्‍यक असलेली सर्व संबंधीत कागदपत्रे गैरअर्जदार क्र. 1 यांनी सुचना देऊनही वेळेवर दाखल केलेली नाही. 

            सर्व्‍हेअर श्री रॉबर्ट रॉड्रीक्‍स यांनी प्रस्‍तुतचे क्‍लेमचा सर्व्‍हे करीत असतांना अर्जदाराच्‍या दुकानातील मालाचा घटनेच्‍या वेळी म्‍हणजेच दिनांक 24.08.2012 ते दिनांक 25.08.2012 रोजी खरेदी करुन विक्री व क्‍लोजिंग स्‍टॉक काढते वेळेस मागील 3 वर्षाचे (2009-2010,2010-2011 व 2011-2012) खरेदीचे सरासरी न घेता फक्‍त वर्ष 2011-12 चे खरेदीचे सरासरी घेतले होते. त्‍या खरेदीचे रु.43,34,329 वर टक्‍केवारी 1.183 ने गुणकार करुन (43,34,329 X1.183/100 = ) रुपये 51,27,511/- इतकी विक्री दाखवले आणि क्‍लोजिंग स्‍टॉक( 1,10,68,969 – 51,27,511) रुपये 59,41,458/- इतके दाखवले जे की, चुकीचे आहे.  त्‍यामुळे जेव्‍हा पुर्ण क्‍लेम फाईल रिजनल ऑफीस पुणे येथे अप्रुव्‍हलसाठी गेली त्‍यावेळेस तेथील आर.ओ.क्‍लेम कमिटीने तीन वर्षाचे खरेदीचे सरासरी

            वर्ष                                  टक्‍केवारी

      2009-2010              -                 1.159

      2010-2011               -                 1.397

      2011-2012               -                 1.183

                  

                    एकूण टक्‍केवारी         3.739/3= 1.246

                

म्‍हणजेच मागील 3 वर्षाचे खरेदीचे सरासरी टक्‍केवारी 1.246 होते व घटनेच्‍या वेळी अर्जदाराची खरेदी रु.43,34,329/- होती. परंतु रक्‍कमेवर सरासरी 1,246 लावून गुणाकार केल्‍यास विक्रीची किंमत रक्‍कम रु.54,00,574/-  अशी होते आणि सदर एकूण रक्‍कम रु.1,10,68,969/- मधून वजा केल्‍यास रु.56,68,395/- इतकी होती जी  रक्‍कम घटनेच्‍या वेळी क्‍लोजिंग स्‍टॉक होती.  सर्व्‍हेअरने आपल्‍या अहवालात रक्‍कम रु.59,41,458/- दाखविली होती ती रक्‍कम बरोबर नसल्‍यामुळे पुणे रिजनल क्‍लेम  कमिटीने आपल्‍या अहवालामध्‍ये  सदर रक्‍कम रु.56,68,395/- दाखविली जे की, बरोबर व कायदेशीर आहे आणि नियमास अनुसरुन आहे. त्‍यानुसारच रक्‍कम रु.56,68,395/- मधून ( Less out of fashion & dead stock valued at 5%)   रु.2,83,419 वजा केल्‍यास शिल्‍लक रक्‍कम रु.53,84,976  त्‍यामधून रु.9,31,489 ( Less saved stock)  वजा केल्‍यास रु.44,53,487/- रक्‍कम  Gross loss of stock राहते.  त्‍यामधून Salvage ची रक्‍कम रु.4,99,087  वजा केल्‍यास रक्‍कम रु.39,54,400 राहते, जे की, Net Loss on stock आहे आणि  Assessed loss  on fff  इतकी रक्‍कम रु.2,83,246/- व दोघांची एकत्रित रक्‍कम होते तो रु.42,37,646/- ज्‍यामधून 5% Excess पॉलिसीप्रमाणे रु.2,11,882/- वजा केल्‍यास शिल्‍लक Net Loss payable  रु.40,25,763/-  इतकीच राहते.  परंतु सर्व्‍हेअरने सदरील रक्‍कम रु.42,72,200/- असेसमेंट केले होते  जे की, वरीलप्रमाणे चुकीचे आहे.  सर्व्‍हेअरच्‍या चुकीमुळे घटनेच्‍या वेळी विक्री आणि क्‍लोजिंग स्‍टॉकचे आकडेमध्‍ये तफावत असल्‍याने शेवटी नेट लॉस  पेयेबल मध्‍ये सुध्‍दा फरक आलेला आहे.  म्‍हणून रिजनल ऑफीस क्‍लेम कमिटी यांनी सदरील चुक दुरुस्‍त करुन क्‍लेम रु.40,23,326/- अर्जदारास पुर्ण सुचना देऊन त्‍यांचेकडून क्‍लेम व्‍हाऊचर भरुन व कँसल चेक स्विकारुन अर्जदाराचे एक्‍सीस बँक नांदेडच्‍या खात्‍यामध्‍ये दिनांक 25.02.2014 रोजी भरणा केलेला आहे.  जे की, अर्जदारास प्राप्‍त झालेले आहे म्‍हणून गैरअर्जदार क्र. 1  यांनी क्‍लेम सेटलमेंटमध्‍ये विलंब केलेला नाही.   अर्जदाराने जळीत प्रकरणामुळे आणि सदर अपघात विद्युत असल्‍यामुळे इलेक्‍ट्रीक इन्‍सपेक्‍टर यांचा अहवाल गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे किंवा सर्व्‍हेअरकडे दाखल करणे भाग होते.  परंतु तसे न केल्‍यामुळे सदर क्‍लेम निकाली काढण्‍यासाठी जवळपास एक वर्षाचा विलंब झालेला आहे.  त्‍यासाठी अर्जदार हे स्‍वतः जिम्‍मेदार आहेत.  प्रस्‍तुत प्रकरण दाखल करणेस अर्जदारास अधिकार नाही.  अर्जदाराने खोटा दावा दाखल करुन सत्‍य परिस्थिती लपवून मंचाची दिशाभूल करुन गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडून केवळ पैसे उकळण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे.  त्‍याकरीता अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्‍यात यावी अशी विनती गैरअर्जदार क्र. 1 यांनी आपल्‍या लेखी जबाबाव्‍दारे केलेली आहे.

5.          अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्‍याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत.  दोन्‍ही बाजूंचा युक्‍तीवाद ऐकला.  दोन्‍ही बाजूंनी दाखल  केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्‍टी स्‍पष्‍ट होतात. 

6.          अर्जदार यांनी  गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडून Standard Fire and Special peril ही दिनांक 10.12.2011 ते 09.12.2012 या कालावधीसाठी घेतलेली होती हे दाखल पॉलिसीवरुन सिध्‍द होते.  त्‍यामुळे अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत.  अर्जदाराच्‍या दुकानाला दिनांक 25.08.2012 च्‍या मध्‍यरात्री  आग लागली व त्‍यामध्‍ये अर्जदाराचे दुकानाचे नुकसान झाले ही बाब अर्जदार यांनी दाखल केलेल्‍या F.I.R. महानगरपालिकेच्‍या अग्‍नीशामक दल विभागाने दिलेल्‍या प्रमाणपत्रावरुन दिसून येते. अर्जदाराच्‍या दुकानाचे आग लागून नुकसान झाल्‍याची बाब अर्जदार यांनी विमा कंपनीला कळविल्‍यानंतर विमा कंपनीने सर्व्‍हेअरची नियुक्‍ती केलेली आहे व सर्व्‍हेअरने सर्व्‍हेक्षण करुन अहवाल गैरअर्जदार यांचेकडे दिनांक 15.02.2013 रोजी दिलेला आहे.  सर्व्‍हेअरने अहवालामध्‍येे रक्‍कम रु.42,72,200/- देण्‍याचा अभिप्राय दिलेला होता.  परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदारास सुमारे एक वर्ष म्‍हणजेच दिनांक 08.02.2014 रोजी पर्यंत नुकसान भरपाईची रक्‍कम दिलेली नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिनांक 08.02.2014 रोजी सर्व्‍हेअरचा अहवालानुसार रक्‍कम रु.42,72,200/- एवढी रक्‍कम न देता रक्‍कम रु.40,25,763/- एवढीच रक्‍कम  दिलेली आहे.  तसेच गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा विमा दावा निकाली काढण्‍यासाठी सुमारे एक ते दीड वर्षाचा कालावधी लावलेला आहे. प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये न्‍यायनिर्णय देण्‍यासाठी पुढील मुद्दे उपस्थित होतातः-

            मु द्दा                                     उ त्‍त र

1)    गैरअर्जदार क्र. 1 यांनी सर्व्‍हेअरच्‍या अहवालाप्रमाणे

      अर्जदारास रक्‍कम न देऊन सेवेत त्रुटी दिलेली आहे का ?     होय.

2)    अर्जदार नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहे का ?            होय.

3)    आदेश काय ?                                     अंतीम आदेशाप्रमाणे.

 

का  र णेः-

मुद्दा क्रमांक 1

7.          अर्जदार यांनी तक्रारीसोबत सर्व्‍हेअरचा अहवाल दाखल केलेला आहे.  सदरील अहवालाचे अवलोकन केले असता सर्व्‍हेअरने अर्जदाराचे नुकसान रक्‍कम रु.42,72,200/- झालेले असल्‍याचा अहवाल दिलेला आहे.  परंतु गैरअर्जदार विमा कंपनी यांनी अर्जदारास रक्‍कम रु.40,25,763/- एवढीच रक्‍कम  दिलेली आहे.   याबाबत गैरअर्जदार विमा कंपनी यांनी दिलेले कारण पुढील प्रमाणे आहेः-

            सर्व्‍हेअर यांनी सर्व्‍हे करीत असतांना अर्जदाराच्‍या दुकानातील मालाचा घटनेच्‍या वेळी म्‍हणजेच दिनांक 24.08.2012 ते दिनांक 25.08.2012 रोजी खरेदी करुन विक्री व क्‍लोजिंग स्‍टॉक काढते वेळेस मागील 3 वर्षाचे (2009-2010,2010-2011 व 2011-2012) खरेदीचे सरासरी न घेता फक्‍त वर्ष 2011-12 चे खरेदीचे सरासरी घेतले होते. त्‍या खरेदीचे रु.43,34,329 वर टक्‍केवारी 1.183 ने गुणकार करुन (43,34,329 X1.183/100 = ) रुपये 51,27,511/- इतकी विक्री दाखवले व क्‍लोजिंग स्‍टॉक रक्‍कम रु.59,41,458/- दाखवले जे चुकीचे आहे.  त्‍यामुळे जेव्‍हा पुर्ण क्‍लेम फाईल रिजनल ऑफीस पुणे येथे अप्रुव्‍हलसाठी गेली त्‍यावेळेस तेथील आर.ओ.क्‍लेम कमिटीने तीन वर्षाचे खरेदीचे सरासरी व टक्‍केवारीनुसार क्‍लोजिंग स्‍टॉकची रक्‍कम हिशोब करुन काढली असता नुकसान भरपाईची रक्‍कम रु.40,23,326/- निघते. सर्व्‍हेअरचा अहवालाचे अवलोकन केले असता सर्व्‍हेअरच्‍या अहवालमधील पान क्र. 8 वर सर्व्‍हेअरने सन 2006-2007 पासून सन 2011-2012 पर्यंत Audited Financial statement verify केलेले असल्‍याचे दिसते.  तसेच एप्रील,2012 ते जुलै 2012 या प्रत्‍येक महिन्‍याचे अर्जदाराने बंकेला दिलेले स्‍टॉक स्‍टेटमेंट व Financial statement duly certified by C.A.  या सर्व बाबींची शहानिशा करुन सर्व्‍हेअरने दिनांक 24.08.2012 रोजीचा क्‍लोजिंग स्‍टॉक रक्‍कम रु.75,09,663/- काढलेला असून सदरील आकडा जास्‍तीचा (higher side) असल्‍याने सर्व्‍हेअर Carefully examined & analyzed all the figures in the financial statement with the help of ratio analysis  करुन अर्जदाराच्‍या नुकसान भरपाईची रक्‍कम रक्‍कम रु.42,72,200/- निश्चित केलेली आहे.  सदरील रक्‍कम निश्चित केल्‍यानंतर गैरअर्जदार यांच्‍या रिजनल क्‍लेम  कमिटीने रक्‍कम कमी केलेली आहे. रिजनल क्‍लेम  कमिटीमध्‍ये तीन सदस्‍य  1)Admin Officer,2)Manager,3) Regional Manager आहेत. 

            विमा कायदा,1938 च्‍या कलम 64UM नुसार सर्व्‍हेअरची नियुक्‍ती केली जाते. विमा कायदा,1938 च्‍या कलम 64UM चे अवलोकन केले असता सर्व्‍हेअरची नियुक्‍ती करण्‍यासाठीचे निकष त्‍यामध्‍ये दिलेले आहेत.  त्‍यावरुन सर्व्‍हेअर हा नुकसान भरपाईची रक्‍कमेबाबत निष्‍कर्ष काढण्‍यासाठी तज्ञ व्‍यक्‍ती आहे.  सर्व्‍हेअर हा तज्ञ व्‍यक्‍ती असल्‍याने तज्ञ व्‍यक्‍तीने दिलेला अहवाल चुकीचा आहे हे फक्‍त त्‍या क्षेत्रातील अन्‍य तज्ञ व्‍यक्‍ती किंवा त्‍यापेक्षा Higher qualified  असलेली तज्ञ व्‍यक्‍ती यांनीच सांगणे संयुक्‍तीक आहे.  परंतु प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये रिजनल क्‍लेम  कमिटीमध्‍ये असलेल्‍या व्‍यक्‍ती हया विमा कायदा,1938 च्‍या कलम 64UM नुसार सर्व्‍हेअरच्‍या निकषामध्‍ये बसतात याबद्दलचा उल्‍लेख गैरअर्जदार यांनी केलेला नाही.  त्‍यामुळे तज्ञ व्‍यक्‍तीचा अहवाल अन्‍य व्‍यक्‍तीने अमान्‍य करणे बेकायदेशीर आहे.  त्‍यामुळे सर्व्‍हेअरने आपल्‍या अहवालामध्‍ये अर्जदाराचे झालेल्‍या नुकसान भरपाईची दर्शविलेली रक्‍कम योग्‍य आहे.  गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास रक्‍कम रु.2,46,737/- कमी देऊन सेवेत त्रुटी दिलेली आहे.  तसेच विमा कंपनीच्‍या नांदेड डिव्‍हीजनच्‍या डिव्‍हीजनल मॅनेजरने रिजनल  ऑफीसच्‍या दिनांक 18.11.2013 रोजी दिलेल्‍या पत्राचे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये डिव्‍हीजनल मॅनेजर We recommended the full & final settlement  of claim for Rs.42,72,200/-  असे नमूद केलेले आहे.  त्‍यामुळे मुद्दा क्रमांक 1 चे उत्‍तर मंच होकारार्थी देत आहे.

मुद्दा क्रमांक 2

8.          गैरअर्जदार विमा कंपनी याचेकडे सर्व्‍हेअरने दिनांक 15.02.2013 रोजी अहवाल सादर केलेला आहे.  परंतु विमा कंपनीने अर्जदारास रक्‍कम सुमारे एक वर्षानंतर विलंबाने दिलेली आहे.  सदर विलंबाचे कारण गैरअर्जदार यांनी असे सांगितले आहे की, अर्जदाराने विद्युत निरीक्षकाचा अहवाल उशीराने दिल्‍याने रक्‍कम देण्‍यास विलंब झालेला आहे. विमा कंपनीने अर्जदारास घटना घडल्‍यानंतर 9 महिन्‍यांनी विद्युत निरीक्षकाचा अहवाल मागीतला आहे ही बाब दिनांक 17.06.2013 रोजीच्‍या ई-मेलवरुन दिसून येते. जी कागदपत्रे विमा कंपनीने घटना घडली त्‍यावेळी लगेचच अर्जदारास मागावयास पाहिजे होती ती कागदपत्रे विमा कंपनीने उशीराने मागवलेली आहेत. त्‍यासाठी अर्जदारास जबाबदार धरणे चुकीचे अर्जदार आहे.  I.R.D.A च्‍या नियमावलीनुसार सर्व्‍हेअरने अहवाल दिल्‍यानंतर विमा कंपनीने विमा दावा 30 दिवसाच्‍याआत निकाली काढणे बंधनकारक आहे.  परंतु प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये विमा कंपनीने अर्जदाराचा विमा दावा सुमारे 1 वर्षानंतर निकाली काढलेला आहे. त्‍यामुळे अर्जदारास निश्चितच नुकसान सहन करावे लागले आहे. त्‍यामुळे मंच मुद्दा क्रमांक 2 चे उत्‍तर होकारार्थी देत आहे. 

            मुद्दा क्रमांक 1 व मुद्दा क्रमांक 2 चे उत्‍तर होकारार्थी देऊन मंच पुढील प्रमाणे आदेश देत आहे.

                       आ दे श

 

1.     अर्जदार यांची  तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.    गैरअर्जदार क्र. 1, विमा कंपनी यांनी अर्जदारास रु.2,46,737/- सर्व्‍हेअर यांनी अहवाल दिल्‍याचा दिनांक 15.02.2013 पासून द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याजासह आदेश कळाल्‍यापासून तीस दिवसाच्‍या आत द्यावेत.

3.    गैरअर्जदार क्र.  1 यांनी अर्जदाराचा विमा दावा विलंबाने निकाली काढल्‍यामुळे नुकसान भरपाई रक्‍कम रु.15,000/- द्यावी.

4.    गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.2500/- आदेश कळाल्‍यापासून तीस दिवसाचे आत द्यावेत.

 

5.    दोन्‍ही पक्षकारास निकालाच्‍या प्रती मोफत पुरविण्‍यात याव्‍यात. 

6.    वरील आदेशाच्‍या  पुर्ततेचा अहवाल दोन्‍ही पक्षकारांनी निकालाच्‍या तारखेपासून  45 दिवसांच्‍या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर   आदेशाच्‍या पुर्ततेसाठी ठेवण्‍यात यावे. 

 
 
[HON'BLE MRS. S.B.Kulkarni]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. R.H.Bilolikar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.