Maharashtra

Nagpur

CC/11/7

Shri Anand Omprakash Taori - Complainant(s)

Versus

National Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Adv. M.P. Jain

17 Jan 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/7
 
1. Shri Anand Omprakash Taori
4/4, Priadarshini Colony, Near RTO Office, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. National Insurance Co.Ltd.
Plam Commercial Complex, 5th floor, Ajani Chowk,Wardha Raod,
Nagpur
Maharahstra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HON'ABLE MR. N.V.Bansod MEMBER
 
PRESENT:Adv. M.P. Jain, Advocate for the Complainant 1
 ADV.C.B.PANDE, Advocate for the Opp. Party 1
ORDER

 

(मंचाचा निर्णय: श्री. नरेश बनसोड - सदस्‍य यांचे आदेशांन्‍वये)
                          -// आ दे श //-
                 (पारित दिनांक : 17/01/2012)
 
1.          प्रस्‍तुत तक्रार तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्‍द मंचात दि.24.12.2011 रोजी दाखल केली असुन प्रस्‍तुत तक्रारीचे थोडक्‍यात स्‍वरुप खालिल प्रमाणे :-
 
2.          तक्रारकर्त्‍यानुसार त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून पॉलिसी क्र.281100/42/08/81/90000098 ही रु.3,00,000/- करीता घेतली होती. तक्रारकर्त्‍याचा दि.11.06.2009 रोजी अपघात झाला त्‍यामुळे तो दि.10.08.2009 पर्यंत नियमीत रोजचे व्‍यवहार करण्‍यांस असमर्थ झाला. त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे पॉलिसीच्‍या अट क्र. 12 मधील क्‍लॉज (एफ) नुसार 60 दिवसांपर्यंत तात्‍पूरत्‍या आजारासाठी म्‍हणजे 8.5 आठवडे x 3000 प्रमाणे रु.25,714/- आणि औषधांचा खर्च रु.5,910/- असे एकूण रु.31,624/- चा विमा दावा क्र.281100/42/09/81/900000006 असा दाखल केला. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचे म्‍हणण्‍यानुसार रक्‍कम न देता रु.12,360/- चा दावा मंजूर केला, परंतु तक्रारर्त्‍यास मान्‍य नसल्‍यामुळे त्‍याने वाऊचरवर आक्षेप नोंदवुन(अंडर प्रोटेस्‍ट) सही केली. तरी सुध्‍दा विरुध्‍द पक्षाने रकमेचे दावा वाऊचर तक्रारकर्त्‍यास पाठविले ही त्‍यांचे सेवेतील त्रुटी आहे. तसेच तक्रारकर्त्‍याने व‍कीलामार्फत नोटीस पाठविली व नुकसान भरपाईची मागणी केली, परंतु विरुध्‍द पक्षाने रक्‍कम न देता वकीला मार्फत चुकीचे उत्‍तर दिले, ही त्‍यांचे ग्राहक सेवेतील त्रुटी आहे. जेव्‍हा की, पॉलिसीमधे लिहील्‍याप्रमाणे तक्रारकर्ता 60 दिवसांत झालेल्‍या नुकसान तसेच औषधींचा खर्च मिळण्‍यांस पात्र आहे.
 
            तक्रारकर्त्‍याने आपल्‍या म्‍हणण्‍याचे पृष्‍ठयर्थ एकूण 5 दस्‍तावेज अनुक्रमे 6 ते 19 वर दाखल केलेले आहेत.
3.          सदर प्रकरणी मंचामार्फत विरुध्‍द पक्षावर नोटीस बजावण्‍यांत आली असता, त्‍यांना नोटीस मिळाल्‍यानंतर ते मंचात हजर झाले असुन त्‍यांनी आपला लेखी जबाब खालिल प्रमाणे दाखल केलेला आहे.
4.          विरुध्‍द पक्षाचा पॉलिसीच्‍या अवधीबाबत काहीही वाद नाही, तसेच पॉलिसीच्‍या अटी व शर्ती तक्रारकर्त्‍यास समजावुन सांगितल्‍या असुन विमापत्र निर्गमीत करण्‍यांत आले होते, त्‍यामुळे यातील अटी व शर्ती बंधनकारक आहे. तक्रारकर्त्‍याने आवश्‍यक दस्‍तावेज व परिपूर्ण माहिती पुरविल्‍यास विमा पत्राच्‍या अटी व शर्तींच्‍या अधीन राहून प्रतिपूर्तीसाठी पात्र ठरेल. विरुध्‍द पक्षांनी म्‍हटले आहे की, तक्रारकर्ता दि.11.06.2009 रोजी झालेल्‍या उपचारामुळे तो दि.19.08.2009 पर्यंत नियमीत व्‍यवहार करण्‍यांस असमर्थ राहीला हे नाकारले. तसेच तक्रारकर्ता 60 दिवसांकरता आजारी होता व काहीही काम करु शकत नव्‍हता त्‍यामुळे व साडेआठ (8 ½ ) आठवडे आजारी असल्‍यामुळे प्रति आठवडा रु.3,000/- मिळण्‍यांस पात्र होता, हे सुध्‍दा नाकारले विरुध्‍द पक्षांनी म्‍हटले आहे की, डॉक्‍टरांच्‍या प्रमाणपत्राप्रमाणे तो केवळ 3 आठवडे काम करण्‍यांस असमर्थ होता व त्‍यांनी हॉस्‍पीटल व औषधोपचाराचा खर्च म्‍हणून रु.3,360/- चे देयक दाखल केले होते व 3 आठवडे x रु.3,000/- असे एकंदर रु.12,360/- तक्रारकर्ता मिळण्‍यांस पात्र होता व ती रक्‍कम दि.08.01.2010 रोजी धनादेशाव्‍दारे तक्रारकर्त्‍यास दिलेली आहे, त्‍यामुळे त्‍यांचे सेवेत कुठलीही त्रुटी नसल्‍याचे नमुद केले असुन डॉक्‍टरांच्‍या प्रमाणपत्राप्रमाणे तो केवळ 3 आठवडे हॉस्‍पीटलमधे भरती होता. म्‍हणून विरुध्‍द पक्षाने रु.12,360/- चा धनादेश तक्रारकर्त्‍यास पाठविला असुन तक्रारकर्ता अनुचित लाभ घेण्‍याचे उद्देशाने अनावश्‍यक लांछन करीत आहे. विरुध्‍द पक्षाने आपल्‍या विशेष बयाणात तक्रारीच्‍या उत्‍तरात केल्‍याप्रमाणेच कथन केले असुन सदर तक्रार खारिज करण्‍याची मंचास विनंती केलेली आहे. 
 
5.          प्रस्‍तुत तक्रार ही मंचासमक्ष तक्रारकर्त्‍याचे मौखिक युक्तिवादाकरीता दि.20.12.2011 रोजी आली असता तक्रारकर्ता गैरहजर, मंचाने गैरअर्जदारांचा युक्तिवाद यापूर्वीच ऐकला. तसेच मंचासमक्ष दस्‍तावेजांचे व दोन्‍ही पक्षांचे कथन यांचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्‍कर्षांप्रत पोहचले.
-// नि ष्‍क र्ष //-
 
6.          दोन्‍ही पक्षांत विमा पॉलिसीबाबत वाद नाही, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून विमा पॉलिसी काढल्‍यामुळे तो त्‍यांचा ‘ग्राहक’ ठरतो असे मंचाचे मत आहे. तसेच सदर पॉलिसी ही व्‍यक्तिगत अपघात पॉलिसी असुन दस्‍तावेज क्र.1 वरील अटी व शर्तीतील नोट-(एफ) मधे खालिल प्रमाणे नमुद केले आहे...
            If such injury shall be the sole and direct cause of temporary total disablement, then so long as the Insured shall be totally disable from engaging in any employment or occupation of any description whatsoever, a sum at the rate of one percent (1%) of the Capital Sum Insured stated in the Schedule hereto per week but in any case not exceeding Rs.5,000/- per week in all under all policies.
 
            Provided that the compensation payable under the sub-clause (f) shall not be payable for more than 104 weeks in respect of any one injury calculated from the date of commencement of the disablement and in no case shall exceed the Capital Sum Insured.
 
7.          तक्रार‍कर्त्‍याने अनुक्रमे पृष्‍ठ क्र.11 वर दाखल केलेल्‍या डॉ. जितेंद्र टावरी यांचे प्रमाणपत्रावरुन हे स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्ता हा दि.12.06.2009 नंतर दि.10.08.2009 ला दैनंदीन कामकाज करण्‍यांस सक्षम झाला होता. विरुध्‍द पक्षाने म्‍हटले आहे की, तक्रारकर्ता हा 3 आठवडेच हॉस्‍पीटलमधे भरती होता. तसेच पृष्‍ठ क्र. 39 वरील रकाना क्र.7 चे सुक्ष्‍म अवलोकन केले असता (7-अ) नुसार तक्रारकर्ता हा अपघात झाल्‍यापासुन 3 आठवडेच अंथरुनावर होता, 7(1) नुसार दि.08.08.2009 ला काही नॉर्मल इंज्‍युरी तसेच 7(2) नुसार दि.10.08.2009 ला कामकाज करण्‍यांस रुजू होऊ शकत होता. त्‍यामुळे मंचाचा असा निष्‍कर्ष आहे की, तक्रारकर्त्‍याचा दि.11.06.2009 रोजी अपघात झाल्‍यानंतर दि.10.08.2009 ला दैनंदिन कामकाज करण्‍यांस रुजू होऊ शकत होता, त्‍यामुळे पॉलिसीच्‍या अट क्र.12 (1) नुसार तक्रारकर्ता त्‍याचे मागणी नुसार 8.5 आठवडे x 3,000/- = 25,714/- व औषधीचा खर्च रु.5,910/- असे एकंदर रु.31,624/- मिळण्‍यांस दि.10.08.2009 रोजी पात्र होता असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. विरुध्‍द पक्षाने अनुक्रमे पृष्‍ठ क्र.39 वरील वैज्ञकीय प्रमाणत्रावरील 7(अ) मधे नोंद असलेले 3 आठवडे या एकमेव गोष्‍टीचा विचार केला व 7(क) मधील मुद्दा क्र.1 व 2 कडे पूर्णतः दूर्लक्ष केले, त्‍यामुळे त्‍यांनी काढलेला निष्‍कर्ष हा चुकीचा आहे. तसेच विरुध्‍द पक्षाने आपल्‍या उत्‍तराचे परिच्‍छेद क्र.2 मधे नमुद केले आहे की, त्‍यांचा इन्‍व्‍हेस्‍टीगेटर श्री. अरविंद तिवारी यांनी सदर बाब तपासली होती व त्‍याचा चौकशी अहवाल व चौकशी अधिका-याचे शपथपत्र मंचा समक्ष नसल्‍यामुळे विरुध्‍द पक्षाचे म्‍हणणे तथ्‍यहीन ठरत असुन इतर म्‍हणणे मंचाने नाकारलेले आहे.
 
8.          मंचासमक्ष हे स्‍पष्‍ट झाले नाही की, तक्रारकर्त्‍यास विरुध्‍द पक्षाने पाठविलेला रु.12,360/- चा धनादेश त्‍याने वटविला आहे किंवा नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचा न्‍यायोचित दावा निकाली न काढणे ही विरुध्‍द पक्षाची ग्राहक सेवेतील त्रुटी असल्‍याचे मंचाचे मत स्‍पष्‍ट मत आहे.
9.          वरील विवेचनावरुन हे स्‍पष्‍ट झाले आहे की, तक्रारकर्ता हा दि.10.08.2009 ला पॉलिसीच्‍या अटी व शर्तींअंतर्गत रु.25,714/- व औषधोपचाराचा खर्च रु.5,910/- मिळण्‍यांस पात्र होता. तरी सुध्‍दा विरुध्‍द पक्षाने रु.12,360/- चुकीच्‍या निष्‍कर्षावरुन तक्रारकर्त्‍यास धनादेश पाठविला, तसेच तक्रारकर्त्‍याने वाऊचर आक्षेप नोंदवुन(अंडर प्रोटेस्‍ट) परत पाठविले त्‍यामुळे आय.आर.डी.ए. च्‍या नियमावलीनुसार जर विमा कंपनी विमा दावा मंजूर करण्‍यास इच्‍छा प्रदर्शीत करतात. परंतु काही कारणास्‍तव विमा दावा न दिल्‍यास त्‍या रकमेवर विरुध्‍द पक्ष व्‍याज देण्‍यांस बाध्‍य आहे, असे असल्‍यामुळे रु.31,624/- वर दि.1108.2009 पासुन विरुध्‍द पक्ष द.सा.द.शे. 9% दराने व्‍याज देण्‍यांस बाध्‍य आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तसेच विरुध्‍द पक्षाची गैरकायदेशिरकृतिमुळे निश्चितच तक्रारकर्त्‍यास शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागला, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास शारीरिक व मानसिक त्रासासाठी तसेच तक्रारीच्‍या खर्च म्‍हणून एकंदर रु.3,000/- देणे संयुक्तिक होईल असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
10.         मंचाने मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाचे खालिल निकालपत्रातील रेशो नमुद करणे संयुक्तिक वाटते व त्‍यानुसार गैरअर्जदारांनी कामकाज करावे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
S.C.2009 CTJ-1187 SC(CP) Oriental Insurance Co. –v/s- Ozma Sheeping Co. Ltd. – “Insurance Company should not adopt an attitude of avoiding payment of the Genuine & Bonafide Claims of the Insured on one pretext or the other. This attitudes puts on serious question mark on their credibility and trust worthiness. By adopting an honest approach, they can save enormous litigation cost and interest liabilities”.
 
            वरील सर्व बाबींचा विचार करता आम्‍ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहोत. 
-// अं ति म आ दे श //-
 
 
1.    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यांत येते.
2.    गैरअर्जदाराला आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला विमा दाव्‍याची      रक्‍कम रु.31,624/- दि.11.08.2009 रोजी पासुन रक्‍कम अदा होईपर्यंत       द.सा.द.शे.9% व्‍याजासह अदा करावी.
3.    गैरअर्जदाराला आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला शारीरिक व मानसिक      त्रासासाठी तसेच तक्रारीच्‍या खर्च म्‍हणून एकंदर रु.3,000/- अदा करावे.
4.    वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदाराने आदेशाची साक्षांकीत प्रत मिळाल्‍याचे      दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
 
 
[HON'ABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. N.V.Bansod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.