Maharashtra

Nagpur

CC/11/179

Shersingh Bachansingh Saini - Complainant(s)

Versus

National Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Adv.

17 Mar 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/179
 
1. Shersingh Bachansingh Saini
Plot no. 237, Nari Road, Teka Naka, Kamptee Road,
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. National Insurance Co.Ltd.
3, Midlestone Street
Kolkata
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 HONABLE MR. N.V.Bansod MEMBER
 
PRESENT:
श्री. कौशिक मंडल.
......for the Complainant
 
श्री. सी.बी. पांडे.
......for the Opp. Party
ORDER

 

(मंचाचा निर्णय: श्री. नरेश बनसोड - सदस्‍य यांचे आदेशांन्‍वये)
                           -// आ दे श //-
                  (पारित दिनांक : 17/03/2012)
 
1.          प्रस्‍तुत तक्रार तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत मंचात दि.06.04.2011 रोजी विरुध्‍द पक्षा विरुध्‍द दाखल करुन मागणी केली आहे की, त्‍याच्‍या वाहनाचे अपघातामुळे झालेल्‍या नुकसानाचे व दुरुस्‍तीचे रु.3,70,945/- देण्‍याचे निर्देश देण्‍याचे तसेच विरुध्‍द पक्षाचे चुकीमुळे वित्‍त सहाय्य करण्‍या-याने लावलेले व्‍याज व प्रासंगिक शुल्‍क तसेच खर्चाबाबत रु.25,000/- भरपाईबाबत रु.50,000/- व इतर व्‍याजाची मागणी केली.
 
                  प्रस्‍तुत तक्रारीचे थोडक्‍यात स्‍वरुप खालिल प्रमाणे :-
 
2.          तक्रारकर्त्‍याने त्‍याचा ट्रक क्र.एलपीटी/2516, नोंदणी क्र.सीजी-04/एफ-बी-2427, मॉडेल क्र. 2008 चा दि.04.02.2008 ते 03.02.2009 या कालावधीकरीता पॉलिसी क्र.280400/31/07/6300002100 अन्‍वये रु.13,00,000/-‘ करीता विमाकृत केले होते. विरुध्‍द पक्ष क्र.2 ने पॉलिसी बाबत प्रिमीयमची रक्‍कम मिळताच एका पृष्‍ठाची पॉलिसी प्रमाणपत्र शर्ती, अटींसह तकारकर्त्‍यास दिले नाही, त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष आता त्‍या गोष्‍टीचा आधार घेऊ शकत नाही.
 
3.          सदर ट्रकची पॉलिसी सुरु असतांना दि.14.11.2008 रोजी रात्री 11.43 चे सुमारास कामठी पोलिस स्‍टेशनच्‍या हद्दीत अपघात झाला, त्‍यावेळी ट्रक मालक स्‍वतः वाहन चालवित होते. सदर अपघात हा नागपूर-कामठी रोड, कामठी शिवार, इंडियन पेट्रोलपंप रोड येथे झाला त्‍यावेळी ट्रकमधे Ingots (धातुची लगड) भरली होती. तक्रारकर्ता नागपूर ते रायपूर रस्‍त्‍यावर वाहन चालवित असतांना समोरुन येणा-या त्रयस्‍त ट्रकने तक्रारकर्त्‍याचे ट्रककडे वळविला म्‍हणून तक्रारकर्त्‍याने अचानक ब्रेक दाबले, त्‍यावेळी मागच्‍या बाजूने येणा-या ट्रकने कंडक्‍टरच्‍या बाजूला धडक देऊन वाहन क्षतिग्रस्‍त होऊन वाहनाचे प्रचंड नुकसान झाले. तक्रारकर्त्‍याने अपघाताची सुचना लगेच विरुध्‍द पक्ष क्र.2 व पोलिस कॅम्‍प कामठी शिवार यांना दिली, पोलिस विभागाने दि.15.11.2008 रोजी स्‍थळ तपासणी केली. विरुध्‍द पक्ष क्र.2 ने स्‍पॉट सर्व्‍हेअर नियुक्‍त केला त्‍या सर्वेअरला काही विपरीत आढळून आले नाही, जेव्‍हा की सर्वेअरने क्षतिग्रस्‍त वाहनाची सर्व बाजूने छायाचित्रे काढली, ट्रकची सर्व कागदपत्रे, वाहन चालक परवाना तपासला व दस्‍तावेजांच्‍या प्रति घेतल्‍या व विरुध्‍द पक्ष क्र.2 यांना अहवाल सादर केला. सदर अपघातग्रस्‍त वाहन मे. आर.एस.बॉडी वर्कस् नारी रिंगरोड कपिलनगर नागपूर येथे दुरुस्‍ती करता आणले व दुरुस्‍तीची अंदाजपत्रक घेतले व लेखी सुचनापत्र, दावा अर्ज, वाहनाचे दस्‍तावेज विरुध्‍द पक्ष क्र.2 ला तपासणीकरीता दिले.
4.          विरुध्‍द पक्ष क्र.2 ने श्री सुभाष चोपडे यांची नुकसानीचे अंतिम मुल्‍यांकन करण्‍यांस नियुक्‍त केले परंतु त्‍यांची वागणूक पूर्णतः असंयुक्तिक स्‍वरुपाची होती. त्‍याबाबत तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.2 चे वरीक्ष्‍ठ अधिका-यांना कळविले व त्‍याबाबत सक्‍करदरा पोलिस स्‍टेशन येथे तक्रारसुध्‍दा दाखल केली. तक्रारकर्त्‍यानुसार वाहन दुरुस्‍तीकरीता रु.3,70,945/- चा खर्च आला व त्‍याची देयके विरुध्‍द पक्ष क्र.2 ला सुपूर्द केली. तरीसुध्‍दा विरुध्‍द पक्ष क्र.2 चे सिनीअर डिव्‍हीजनल मॅनेजर यांनी दि.29.09.2010 रोजी म्‍हणजे दोन वर्षांनंतर पत्र पाठवुन विचारणा करुन प्रर्तता करण्‍यांस सांगितले त्‍याचे तक्रारकर्त्‍याने उत्‍तर दिले. तक्रारकर्त्‍याने दावा निकाली काढण्‍यांस विलंब होत असल्‍याने दुसरा सर्वेअर नियुक्‍त करण्‍याची मागणी केली, परंतु ती विरुध्‍द पक्षाने मान्‍य केली नाही व कुठलेही उचित कारण न देता तक्रारकर्त्‍याचा योग्‍य व रास्‍त दावा मंजूर केला नाही. तक्रारकर्त्‍यानुसार सर्वेअर रिपोर्ट प्राप्‍त झाल्‍यानंतर एक महिन्‍यात किंवा तिन महिने वादाचे कारण उद्भवल्‍यापासुन दावा निकाली काढणे बंधनकारक होते परंतु विरुध्‍द पक्षाने सदर दावा निकाली न काढल्‍यामुळे मंचासमोर तक्रार दाखल करणे भाग पडले.
 
5.          तक्रारकर्त्‍याने आपल्‍या म्‍हणण्‍याचे पृष्‍ठयर्थ 14 दस्‍तावेज दाखल केले त्‍यामधे विरुध्‍द पक्षाला दिलेले सुचनापत्र, विमादावा, स्‍थळ पंचनामा, विमा पॉलिसी, व वाहनासंबंधीचे दस्‍तावेज दाखल केले. ते अनुक्रमे पृ.क्र.8 ते 43 वर आहेत.
6.          मंचाने विरुध्‍द पक्षास नोटीस बजावला असता ते मंचाज हजर झाले असुन त्‍यांचे म्‍हणणे खालिल प्रमाणे...
            विरुध्‍द पक्षाने म्‍हटले की, तक्रारकर्त्‍याने बेकायदेशिर लाभ मिळवीण्‍याकरीता सदर तक्रार दाखल केलेली असुन केलेले कथन मंचाची दिशाभूल करणारी असल्‍यामुळे तक्रार खारिज करण्‍याची मागणी केली आहे. विरुध्‍द पक्षाने पुन्‍हा आक्षेप घेतला की, सदर प्रकरणातील व्‍यवहार विमापत्र व्‍यावसायीक वापराचे कारणासाठी घेतलेले आहे. तक्रारकर्ता ट्रान्‍सपोर्टचा व्‍यवसाय करतो व व्‍यावसायीक वापर असल्‍यामुळे तो ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत ‘ग्राहक’ ठरत नाही, म्‍हणून तक्रार खारिज करण्‍याची मागणी केली आहे.
7.          विरुध्‍द पक्षाने म्‍हटले आहे की, प्रस्‍तुत प्रकरणाचा अपघात दावा दि.29.03.2011 रोजी नामंजूर करण्‍यांत आलेला आहे. कारण दाव्‍याची सत्‍यता,छाननी व पडताळणी केल्‍यानंतर तो संशयास्‍पद असल्‍याचे आढळले व बनावटी दस्‍तावेजांचे आधारावर बेकारदेशिररित्‍या लाभ मिळविण्‍याचा प्रयत्‍न केल्‍यामुळे विमादावा मिळण्‍यांस अपात्र आहे. सदर तक्रार जबर खर्चासह खारिज करण्‍याची मागणी केलेली आहे. विरुध्‍द पक्षाने सदर वाहन व विमा पॉलिसीबाबत म्‍हणणे मान्‍य केले आहे, तसेच त्‍यांनी पुन्‍हा कथन केले की, सदर वाहन हे टाटा मोटर्स, भोपाळ याचा तारणबोजा’, नोंदवुन विमापत्रातील शर्ती, अटी व मर्यादेच्‍या अधीन राहून विरुध्‍द पक्ष क्र.2 कडून घेतलेले आहे. विरुध्‍द पक्षाने एका पानाचे विना अटी शर्ती विमापत्र पाठविल्‍याचे नाकारले व म्‍हटले की, तक्रारकर्त्‍याने आजतागायत कधीही मागणी केलेली नाही व अटी शर्ती मिळाल्‍याबाबतच्‍या सुचनाही केलेली नाही त्‍यामुळे हे कथन खोटे आहे. विरुध्‍द पक्षाने म्‍हटले की, जर अटी शर्ती अंतर्गत दावा देय असेल तर दाव्‍याची रक्‍कम बोजा नोंदविलेल्‍या वित्‍त संस्‍थेला देण्‍यांत येते, म्‍हणून टाटा मोटर्स, भोपाळ या वित्‍तसंबंध गुंतलेले असल्‍यामुळे त्‍यांना आवश्‍यक पक्ष म्‍हणून संलग्‍नीत न केल्‍याने तक्रार खर्चासह खारिज करण्‍याची मागणी केली आहे.
 
8.          तक्रारीच्‍या परिच्‍छेद क्र. 2 ते 9 चे उत्‍तरात तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे नाकारले, तसेच इतर म्‍हणणे सुध्‍दा नाकारले. विरुध्‍द पक्षाने म्‍हटले की, स्‍वतंत्र परवानाधारक सर्वेअरने तथाकथीत सांगितलेल्‍या नुकसानीचे मुल्‍यांकन रु.1,23,450/- व साल्‍वेज व्‍हॅल्‍यू रु.5,000/- इतके केलेले आहे. तसेच विरुध्‍द पक्ष क्र.2 हे सदर मुल्‍यांकनावर अवलंबुन आहे, जर तक्रारकर्त्‍याने दस्‍तावेजांची पूर्तता केल्‍यास व अपघाताने क्षतिग्रस्‍त झाल्‍याचे सिध्‍द केल्‍यास रक्‍कम विनाविलंब देण्‍यास देय आहे, असे म्‍हटले. विरुध्‍द पक्षाने त्‍याचे उत्‍तरात दावा पडताळणी केल्‍यानंतर या बाबी निदर्शनास आल्‍या त्‍या खालिल प्रमाणे नमुद केल्‍या आहेत...
1.         The Lorry Receipt/ Consignment Note bearing No.1045 produced by the complainant stated to be issued by “Maharashtra Roadways”, is not in existence at the given address. The signature about the receipt of the goods on 13.11.2008 at the place of destination can be visible seen on the D.M. No.1045. Therefore , the said document produced in support of claim appears to be not genuine.
 
2.                  The loading of the Truck on 13.11.2008 with mild steel of M/s Vijay Steel from Raipur to be transported at Mumbai is not proved. The spot panchanama produced by the complainant also did not disclose about the existence of goods in the vehicle and no evidence by way of loading challan, transporter’s Memo, weighing receipt is produced to support the claim and the claim appears to be not genuine.
3.                  The vehicle was fitted with only 4-5 U bolts instead of 14 U bolts and without fixing the 14 U bolts it is unbelievable that the vehicle was loaded the mild steel of 15.120 Tons and could travel distance of about 250 ks from Raipur to Kampte and hence, the claim appears to be not genuine.
4.                  The final Survey Report states that old parts were fitted with truck an certain parts do not tally with the fitted parts such as show/cowl Assembly, Steering etc. are not in accordance with the operator’s service books of the said vehicle and hence, the claim appears to be not genuine;
5.                  The investigator carried out by the investigator Mr. Bajpai opined that the accident to the vehicle as stated appears to be an concocted story and chaim appears to be based upon factitious documents;
6.                  The permit produced is not issued by the RTO, Raipur an appears to be not genuine;
 
 
9.          तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास म्‍हटले की सदर दावा हा बनावटी आहे व केवळ दावा करण्‍यासाठी वाहन अपघातग्रस्‍त झाले असे दर्शविण्‍यांत आले म्‍हणून तपासणी व पडताळणी केल्‍यानंतर तो नामंजूर करण्‍यांत आला. तसेच दावा निकाली काढण्‍यासाठी झालेल्‍या विलंबासाठी तक्रारकर्त्‍याने आवश्‍यक सहकार्य न केल्‍याने विलंब झाला असल्‍याने तक्रारकर्ता स्‍वतः जबाबदार आहे. विरुध्‍द पक्षाने सर्वेअर श्री. चोपडे बाबत तक्रारकर्त्‍याने केलेले कथन नाकारले. विरुध्‍द पक्षाने आपल्‍या म्‍हणण्‍याचे पृष्‍ठयर्थ एकूण 12 दस्‍तावेज दाखल केले त्‍यामधे दि.29.03.2011 चे विमा नाकारल्‍याचे पत्र, थॉमस यांचा सर्वे रिपोर्ट, श्री. चोपडे याचा रिपोर्ट, लांबा यांचा पुर्ननिरीक्षण अहवाल, वाजपेयी यांचा चौकशी अहवाल, तसेच मोहम्‍मद इब्राहीम यांचा अहवाल, आरटीओ रायपूर यांचे पत्र इत्‍यादी पृ क्र.66 ते 109 वर दाखल केले आहे.
10.         तक्रारकर्त्‍याने आपल्‍या प्रतिउत्‍तरात विरुध्‍द पक्षाचे म्‍हणणे कसे असंयुक्तिक स्‍वरुपाचे आहे हे स्‍पष्‍ट करण्‍याकरीता तक्रारीत नमुद केल्‍याप्रमाणेच कथन केले आहे. तक्रारकर्त्‍याने म्‍हटले की, विरुध्‍द पक्षाचे 29.09.2010 चे पत्रास 19.10.2010 रोजी उत्‍तर दिले आहे व त्‍यांची तक्रार मंजूर होण्‍या योग्‍य असुन विरुध्‍द पक्षाने विनाकारण विमादावा गैरकायदेशिररित्‍या नाकारलेला आहे.
 
11.         मंचाने दोन्‍ही पक्षांचे वकीलांचा युक्तिवाद ऐकला व तक्रारीसोबत असलेल्‍या सर्व दस्‍तावेजांचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्‍कर्षाप्रत पोहचले.
 
                        -// नि ष्‍क र्ष //-
 
 
12.         तक्रारकर्त्‍याचे वाहनाचा अपघात हा दि.14.11.2008 रोजी झाल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने दि.29.03.2011 ला विमा दावा नाकारल्‍यामुळे वादाचे कारण सतत सुरु आहे, असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
 
13.         विरुध्‍द पक्षाने म्‍हटले की, तक्रारकर्त्‍याने घेतलेले उपरोक्‍त विमापत्र व्‍यावसायीक व्‍यवहाराकरीता घेतले असुन तक्रारकर्ता अनेक प्रकारच्‍या व्‍यवसायात गुंतलेला आहे व त्‍यात वाहतुक व्‍यवसाय अंर्तभुत असल्‍यामुळे व दावा बनावटी स्‍वरुपाचा असल्‍यामुळे तक्रारकर्ता ग्राहक या संज्ञेत येत नसल्‍यामुळे, सदर तक्रार खारिज करण्‍याची मागणी केली. राष्‍ट्रीय आयोगाने, ‘हरसोलीया मोटर्स - विरुध्‍द - नॅशनल इन्‍शोरन्‍स कंपनी लि.’ 2005 सीपीजे-27 (भाग-1) (एनसी) या निकालपत्रानुसार विमापत्र व्‍यावसायीक कारणासाठी जरी घेतले असले तरी त्‍यातुन नफा उत्‍पन्‍न होत नाही व विमापत्र हे झालेले नुकसान  indemnify करण्‍याकरता आहे, त्‍यामुळे तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षांचा ग्राहक ठरतो व त्‍याबाबतचे विरुध्‍द पक्षाचे म्‍हणणे मंचाने तथ्‍यहीन असल्‍यामुळे नाकारले.
 
14.         सदर तक्रारीत तक्रारकर्त्‍याने अपघातानंतर एफ.आय.आर. दाखल न करताच स्‍थळ पंचनामा झालेला असुन त्‍याची प्रत तक्रारीसोबत जोडलेली आहे. स्‍थळ पंचनाम्‍यावरुन व तक्रारीतील कथनावरुन ब-याच संदीग्‍ध बाबी तसेच विरुध्‍द पक्षाने सर्वेअरचे रिपोर्ट, फायनल सर्वे रिपोर्ट, इन्‍व्‍हेस्‍टीगटर्स रिपोर्ट इत्‍यादी बाबी दाखल करुन संपूर्ण अपघात हा विरुध्‍द पक्षाकडून खोटयानाटया कारणाकरीता रक्‍कम उकळण्‍याकरीता स्‍वतःहून घडवुन आणलेला आहे, त्‍यामुळे योग्‍य निष्‍कर्षाप्रत पोहचण्‍याकरीता महाराष्‍ट्र राज्‍य आयोगाचे खालिल निकालपत्रानुसार सदर प्रकरणात Probe/ Investigation  करणे गरजेचे आहे, असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
 
1.                  2003 (Vol- 3) CPR- 246, Vijay Madhav Kher –v/s- Dileep Sitaram Raul”,
 
            If the disputes brought before consumer forum is amenable to its jurisdiction,
            then it is obligatory upon fora to probe the same by themselves and resolve it.
 
  1. 2008 CTJ- 996, (CP) ICICI Prudential Life Insurance Co. Ltd –v/s- Smt Latika Shivshankar Salunke”,
 
Duty of the consumer forum to investigate into the question whether the charge made by the Insurance Co. for repudiating the claim well founded infact – investigation indeed made.
 
15 - अ.          तक्रारकर्त्‍याने तक्रारीच्‍या परिच्‍छेद क्र.2 मधे नमुद केले की, उपरोक्‍त अपघातग्रस्‍त वाहन 14.11.2008 रोजी 11.43 चे सुमारास कामठी पोलिस स्‍टेशनच्‍या हद्दीत अपघात झाला त्‍यावेळी ट्रक मालक स्‍वतः वाहन चालवित होता. अपघात हा नागपूर-कामठी रोड, कामठी शिवार, इंडियन पेट्रोलपंप रोड येथे झाला त्‍यावेळी ट्रकमधे ingots भरुन होते. तक्रारकर्ता रायपूत ते नागपूर रस्‍त्‍यावर वाहन चालवीत असतांना समोरुन येणा-या त्रयस्‍त ट्रक तक्रारकर्त्‍याचे वाहनाकडे वळला म्‍हणून त्‍याने अचानक ब्रेक दाबले. मागच्‍या बाजूने येणा-या ट्रकने तक्रारकर्त्‍याचे ट्रकला कंडक्‍टरचे बाजूला धडक बसवुन क्षतिग्रस्‍त होऊन वाहनाचे प्रचंड नुकसान झाले.
 
      ब.    तक्रारकर्त्‍याने आपल्‍या म्‍हणण्‍याचे पृष्‍ठयर्थ व अपघाताचे समर्थनार्थ घटनास्‍थळ पंचनामा अनुक्रमे पृ क्र. 11 व 12 दाखल केला आहे व त्‍यातील तपशिल खालिल प्रमाणे आहे...
            ‘सदरचे घटनास्‍थळ हे अर्जदाराने दाखवले घटनास्‍थळ हे नागपूर कामठी रोडवरील कामठी शिवारातील इंडियन पंप जवळील रोडवर आहे. सदर रोड हे 30 फूट रुंदीचे व डांबरी असुन दोन्‍ही बाजूस 5-5 फूटाचे कच्‍चे रोड आहे. याच ठिकाणी अपघातग्रस्‍त ट्रक दिसत असुन कंडक्‍टर साईडने पडलेला आहे, त्‍यावर सीजी 04/एफबी-2427 ची नंबरप्‍लेट लागली असुन ट्रकची बारकाईने पाहणी केली असता ट्रकचे डॅशबोर्ड, रेडिएटर, कॅबिन बॉडीचे नुकसान झाल्‍याचे दिसते. दि.14.11.2008 रोजी सदर ट्रक हा रायपूर वरुन नागपूरकडे येत असतांना कामठीचे समोर जात असता 23/43 वाजताचे दरम्‍यान समोरील ट्रकने ब्रेक लावल्‍याने वाहनाची ठोस झाली व तोल बीघडून ट्रक पलटी झाला कोणीही जखमी झाले नाही, असे पंचासमोर अर्जदार सांगत आहे.
 
            वरील परिच्‍छेद क्र.’अ’ मधील कथन व परिच्‍छेद क्र.’ब’  मधील ठळक शब्‍दांमधील कथन हे पूर्णतः विरोधाभासी असुन तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे पूर्णतः अविश्‍वसनीय वाटते.
 
16.         तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या घटनास्‍थळ पंचनाम्‍याचे सुक्ष्‍म निरीक्षणकेले असता मंचाचे असे निदर्शनास येते की, सदर घटनास्‍थळ पंचनामा हा सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, श्री. त्रीभुनवनाथ तिवारी, पोलिस मदत केंद्र कापसी, पोलिस स्‍टेशन कामठी यांनी केलेला आहे. तक्रारकर्त्‍याने नमुद केलेला घटनाक्रम हा नागपूर कामठी रोडवरील शिवारात घडलेला आहे जेव्‍हा की, उपरोक्‍त पोलिस अधिकारी हे घटना स्‍थळापासुन दूर असलेल्‍या पोलिस मदत केंद्र कापसी, पोलिस स्‍टेशन कामठी यांनी केलेला आहे. जेव्‍हा की, घटनास्‍थळापासुन कामठी पोलिस स्‍टेशन हे जवळच्‍या अंतरावर असतांना सुध्‍दा पोलिस मदत केंद्र कापसी (नागपूर भंडारा रोड) यांनी प्रथम खबरी अहवालाची नोंद न होताच घटनास्‍थळ पंचनामा का केला व कोणत्‍या कायद्यातील तरतुदी अंतर्गत केला ही बाब पूर्णतः अविश्‍वसनीय वाटते. जेव्‍हा की, तक्रारकर्त्‍याचे पॉलिसीच्‍या अटी शर्तीनुसार अपघात झाल्‍यानंतर त्‍वरीतच जवळच्‍या पोलिस स्‍टेशनला त्‍वरीत एफ.आय.आर./तक्रार करणे आवश्‍यक होते. परंतु तक्रारकर्त्‍याने तसे न करता दुर स्‍थानापन्‍न असलेल्‍या पोलिस अधिका-यामार्फत केलेला पंचनामा पून्‍हा अविश्‍वसनीय वाटतो.
17.         तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या अनुक्रमे पृ.क्र.13 वरील विमापत्राचे अवलोकन केले असता, उपरोक्‍त वाहन हे ‘टाटा मोटर्स लि.’, भोपाळ यांचेकडे गहाण ठेवलेले आहे. तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या मोटार दावा प्रपत्राचे अवलोकन केले असता असे आढळून आले की, उपरोक्‍त वाहन हे ‘बँक अकाऊंट नंबर 624201506327 आयसीआयसीआय बँक लिमीटेड, रामदास पेठ, नागपूर’ यांचे नावाचा स्‍पष्‍ट उल्‍लेख आहे त्‍यामुळे सदर वाहन हे त्‍यांचेकडे सुध्‍दा गहाण/तारण असावे असे दिसते. विरुध्‍द पक्षाने सदर तक्रारीत वित्‍तीय संस्‍था टाटा मोटर्स, भोपाळ यांना वादी केले नाही या एकमेव कारणाकरीता तक्रार खारिज करण्‍याची मागणी केली. वरील नोंदीवरुन हे स्‍पष्‍ट होते की, सदर वाहन हे टाटा मोटर्स, भोपाळ यांचेकडे गहाण असतांना तक्रारकर्त्‍याच्‍या मोटार दावा पत्रावर आयसीआयसीआय बँक, नागपूर यांची सुध्‍दा नोंद असल्‍यामुळे विरुध्‍द पक्षाचे मागणीनुसार वस्‍तुस्थिती स्‍पष्‍ट होण्‍याकरीता व वित्‍तीय संस्‍था यांना अपघातग्रस्‍त विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍याकरीता वादी करणे आवश्‍यक आहे. या विरुध्‍द पक्षांचे म्‍हणण्‍याशी मंच सहमत आहे. या विरुध्‍द पक्षाचे स्‍पष्‍ट आक्षेपानंतर सुध्‍दा तक्रारकर्त्‍याने आपल्‍या प्रतिउत्‍तरात कुठलेही स्‍पष्‍टीकरण दिले नाही, त्‍यामुळे मंचाप्रमाणेच तक्रारकर्त्‍यास विरुध्‍द पक्षाचे म्‍हणणे योग्‍य वाटते, तरीसुध्‍दा तक्रारकर्त्‍याने टाटा मोटर्स, यांना वादी न केल्‍यामुळे नॉन ज्‍यॉईंडर ऑफ नेसेसरी पार्टी, या एकमेव कारणकरीता सदर तक्रार खारिज होण्‍यांस पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
 
18.         तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या दस्‍तावेजावरुन हे स्‍पष्‍ट होते की, दि.14.11.2008 ला रात्री अपघात झाल्‍यानंतर व तक्रारकर्ता नागपूर येथे राहत असतांना दि.17.11.2008 रोजी अपघाताची सुचना दिली त्‍यामधे अपघाताचे कारण नमुद नाही. तसेच त्रयस्‍त वाहनाचे विवरण सुध्‍दा दिलेले नाही. तसेच तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या विमा दाव्‍यात व स्‍थळ पंचनाम्‍यात तक्रारकर्त्‍याचे वाहनाचा अपघात स्‍थळ पंचनाम्‍यात कोणत्‍या वाहनासोबत अपघात झाला याचा सुध्‍दा उल्‍लेख नाही, त्‍यामुळे संपूर्ण घटनाक्रम हा संशयास्‍पद स्‍वरुपाचा आहे असे मंचाचे मत आहे. तसेच विमादावा प्रपत्रात हे सुध्‍दा नमुद आहे की, सदर वाहनात दोन प्रवासी प्रवास करीत होते व त्‍या वाहनात 15940 किलो लोखंडी सळया भरलेल्‍या असतांना त्‍या बाबीचा घटनास्‍थळ पंचनाम्‍यात सादा उल्‍लेख सुध्‍दा नाही. व अपघातानंतर 10 तासाचे अवधीत घटनास्‍थळ पंचनाम्‍याच्‍या अगोदर उपरोक्‍त लोखंडी सळया कुठे गेल्‍या किंवा तक्रारकर्त्‍याने सदर सळ्या दुस-या वाहनाव्‍दारे त्‍वरीतच घटनारस्‍थळावरुन हालवुन त्‍या मुंबई येथील स्‍थळी पाठविल्‍या काय याबाबतचा उल्‍लेख दिसत नाही. जेव्‍हा की, पृ. क्रृ 40 वरील महाराष्‍ट्र रोडवेजच्‍या कन्‍साइन्‍मेंटचे सुक्ष्‍म अवलोकन केल्‍यावर उपरोक्‍त लोखंडी सळाकी मुंबई येथे स्विकारल्‍याचे दिसते, त्‍यामुळे संपूर्ण घटनाक्रम व तक्रारकर्त्‍याने निवेदन केलेली बाब ही पूर्णतः विरोधाभासी व संशयास्‍पद स्‍वरुपाचे आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. विमादावा प्रपत्रात तक्रारकर्त्‍याने नमुद केले की, त्‍यांच्‍यासोबत वाहनात दोन प्रवासी प्रवास करीत होते, परंतु परिच्‍छेद क्र.9 मधे तक्रारकर्त्‍याने प्रवास्‍यांची नावे व पत्‍ते दिली नाही व त्‍यांचे बाबतची माहिती पोलिस अधिका-याने नोंदविली नाही असे कथन केले. त्‍यातच त्‍या दुर्घटनेची रिपोर्ट पोलिसात दिली होती काय याबाबत तक्रारकर्त्‍याने होकारार्थी उत्‍तर दिले परंतु प्रथम खबरी अहवाल हा मंचासमोर नाही, तसेच घटनास्‍थळ पंचनाम्‍यात त्‍याची नोंद नाही.
 
 
19.         विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास दि.29.09.2010 रोजी अपघाताबाबत श्री.एच.बी.बाजपेयी चौकशी अधिकारी यांचे अहवालानुसार विचारणा केली व दस्‍तजावेज दाखल करण्‍यांस सांगितले त्‍यामधे महाराष्‍ट्र रोडवेज, ऑथोरायजेशन परमीट व महाराष्‍ट्र रोडवेजच्‍या खोटया व खोडसाळ लोड चालानचा उल्‍लेख केला व त्‍याबाबत स्‍पष्‍टीकरण मागितले त्‍यामधे हे सुध्‍दा नमुद आहे की, पॉलिसीच्‍या अटींनुसार अट क्र.3 व 5 चे उल्‍लंघन झालेले आहे असे म्‍हटले कारण परमीट प्रमाणे प्राधिकृत एथोरायजेशन लेटर नाही. त्‍याची तक्रारकर्त्‍याने दि.19.10.2010 रोजी अनुक्रमे पृ.क्र. 44 वरील पत्राव्‍दारे उत्‍तर दिले, त्‍यावरुन विरुध्‍द पक्षाचे पत्रानुसार स्‍पष्‍टीकरण वजा दस्‍तावेज विरुध्‍द पक्षास दाखल केली नाही हे स्‍पष्‍ट होते. जेव्‍हा की, विरुध्‍द पक्षाने अनुक्रमे पृ.क्र. 109 वर दाखल केलेल्‍या आरटीओ, रायपूर यांचे पत्रात उपरोक्‍त वाहनाबाबत व परमीट ऍथोरायजेशनबाबत खालिल प्रमाणे नमुद आहे.
      उपरोक्‍त विषय के संबंधमे लेख है की, वाहन क्र.सीजी 04 / एफबी-2427 का प्राधिकार पत्र सं. 2989/08 जारी दि.24.10.2008 वैधता 29.10.2008 से 28.10.2009 तक कार्यालयीन अभिलेखके अनुसार उपरोक्‍त प्राधिकारपत्र उस कार्यालयने जारी नही किया गया है. त्‍याबाबत तक्रारकर्त्‍याने आपले प्रतिउत्‍तरात विरुध्‍द पक्षाचे म्‍हणणे व सदर दस्‍तावेजातील कथन अयोग्‍य व खोटे आहे हे सिध्‍द करुन शकला नाही, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले अनुक्रमे.पृ. क्र. 16 वरील गुडस् कॅरींग परमीट व त्‍याचे ऍथोरायजेशन पूर्णतः संशयास्‍पद आहे हे स्‍पष्‍ट होते.
            विरुध्‍द पक्षाने श्री. बाजपेयी यांचे चौकशी अहवाला व्‍दारे स्‍पष्‍ट केले की, महाराष्‍ट्र रोडवेज हे अस्तित्‍वातच नसुन ओम महाराष्‍ट्र रोडवेज ही आहे. तसेच संपूर्ण अनुक्रमे पृ.क्र.40 वरील दस्‍तावेज हा पूर्णतः बनवाबनवी करुन व खोटा दस्‍तावेज बनविलेला आहे, हे श्री. बाजपेयी यांच्‍या चौकशी अहवालावरुन स्‍पष्‍ट होते असे मंचाचे मत आहे.
 
20.         वरील बाबींसह विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा दावा नाकारतांना ब-याच त्रुटया तक्रारकर्त्‍याचे निदर्शनास आणल्‍या परंतु तक्रारकर्त्‍याने वस्‍तुनिष्‍ठ दस्‍तावेजाव्‍दारे विरुध्‍द पक्षाचे विमादावा निकाली काढण्‍याकरीता समाधान करु न शकल्‍यामुळे त्‍यांनी दावा नाकारला व तो त्‍यांनी संपूर्ण चौकशी अहवाल, सर्वे रिपोर्ट या बाबी गृहीत धरुन नाकारलेला असल्‍यामुळे तो मंचास संयुक्तिक वाटतो.
21.         तक्रारकर्त्‍याने तक्रारीत म्‍हटले की, विरुध्‍द पक्षाने विमापत्राची एकपानी प्रत त्‍यांना दिली व अटी शर्ती पुरविलेल्‍या नाहीत, त्‍यावर विरुध्‍द पक्ष म्‍हणाले की, त्‍यांनी विमापत्रासोबत अटी शर्ती सुध्‍दा पुरविलेल्‍या होत्‍या. व तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे आहे की, त्‍यांना पुरविलेल्‍या नाही तर तक्रारकर्त्‍याने दि.04.02.2008 नंतर त्‍याची मागणी पत्राव्‍दारे का केली नाही. व दि.14.11.2008 रोजी अपघात झाल्‍यानंतर सुध्‍दा तक्रारकर्त्‍याने विम्‍याच्‍या अटी शर्तींची माहिती व्‍हावी म्‍हणून मागणी केली नाही, त्‍यामुळे आता तक्रारीत त्‍याबाबतचे कथन करणे मंचास पुर्णतः असंयुक्तिक स्‍वरुपाचे असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे नाकारले व खालिल निकालपत्राचा आधार घेऊन ऐनकेन प्रकारे फायदा करुन घेण्‍याचे हेतूने मांडले आहे, असे मंचाचे मत आहे व तक्रारकर्त्‍याची तक्रार खालिल निकालपत्रांचे पाठबळ मिळण्‍यांस पात्र नाहीत.
22.         तक्रारकर्त्‍याने आपल्‍या म्‍हणण्‍याचे पृष्‍ठयर्थ सर्वोच्‍च न्‍यायालयाचे व राष्‍ट्रीय आयोगाचे खालिल निकालपत्रांस आधारभूत मानुन विमा दावा मंजूर करण्‍याबाबत आदेश देण्‍याची मागणी केली आहे.
 
      1.    कमला मगनलाल वग्‍यानी –विरुध्‍द- युनायटेड इंडिया एन्‍शोरन्‍स कं.ली. 2011 (भाग-2) सीपीसी-315,
      2.    राष्‍ट्रीय आयोग, ‘ओरिएन्‍टल एन्‍शोरन्‍स कं. ली. –विरुध्‍द – हरदयालसिंग नेगी’, आरपी नं.2854, 2010 आदेश दि.21.07.2011.
      3. राष्‍ट्रीय आयोग,’ अलगनंदा प्‍लँटेशन लि. –विरुध्‍द- सुशिला गर्ग आणि इतर’, 2010 (भाग-1) सीपीसी – 516.
      4. केरळ राज्‍य आयोग, ‘शोभा –विरुध्‍द – नॅशनल इन्‍शोरंस कं. लि.’, 2008 (भाग-2) सीपीजे -100.
23.         अपघात व अपघाताचा घटनाक्रम, महाराष्‍ट्र रोडवेजचे दस्‍तावेज, परमीट, घटनास्‍थळ पंचनामा, वित्‍त संस्‍थेस प्रतिवादी न करणे, या सर्व बाबतीत वरील विवंचनावरुन हे स्‍पष्‍ट झाले की, तक्रारकर्त्‍याने संपूर्णतः बनवाबनवी करुन अपघात झाल्‍याचे दर्शवून व खोटे दस्‍तावेज मंचासमक्ष दाखल करुन तसेच विरुध्‍द पक्षाकडे दाखल करुन त्‍यांचे कडून खोटया दाव्‍याचे आधारावर पैसे उकळण्‍याचा गैरकायदेशिररित्‍या सबळ प्रयत्‍न केलेला आहे, असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. सदर विमादावा नाकारण्‍यांस विरुध्‍द पक्षास विलंब झाला असे दिसत असले तरी संपूर्ण घटनाक्रम हा अविश्‍वसनीय व संशयास्‍पद असल्‍यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 26 नुसार सदर तक्रार रु.5,000/- चे दंडासह खारिज करणे व विरुध्‍द पक्षास विनाकारण तक्रारीत गोवल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षास रु.5,000/- खर्चापोटी देणे संयुक्तिक होईल असे मंचाचे मत आहे. करीता खालिल प्रमाणे आदेश पारित करण्‍यांत येतो.
 
 
 
 
              -// अं ति म आ दे श //-
 
 
1.    तक्रारकर्त्‍याची तक्रार खारिज करण्‍यांत येते.
2.    तक्रारकर्त्‍यास आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यानी खोटी व खोडसाळ स्‍वरुपाची       तक्रार मंचासमोर दाखल केल्‍यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 26 नुसार     रु.5,000/- दंडासह खारिज करण्‍यांत येते, सदर रक्‍कम त्‍यांनी मंचाचे ‘लिगल       एड’, खात्‍यात जमा करावी.
3.    तक्रारकर्त्‍यास आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यानी विरुध्‍द पक्षास विनाकारण तक्रारीत गोवल्‍यामुळे रु.5,000/- खर्चापोटी अदा करावे.
4.    वरील आदेशाची अंमलबजावणी तक्रारकर्त्‍याने आदेशाची प्रत मिळाल्‍याचे       दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER
 
[HONABLE MR. N.V.Bansod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.