( आदेश पारित द्वारा : श्रीमती जयश्री येंडे, मा.सदस्या )
आदेश
( पारित दिनांक : 17 ऑगस्ट, 2011 )
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक सरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे.
प्रस्तुत प्रकरणात तक्रारदाराचे म्हणण्यानुसार, तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं.3 यांनी उत्पादीत केलेली सिव्हिक्स चारचाकी वाहन गैरअर्जदार यांचे कडुन खरेदी करण्यासाठी गैरअर्जदार यांना दिनांक 5.6.2006 रोजी रुपये 3,00,000/- दिनांक 7.7.2006 रोजी 3,60,000/- तसेच दिनांक 2.11.2006 रोजी धनादेशाद्वारे रुपये 17,000/- असे एकुण 6,77,000/- रुपये गैरअर्जदार क्रं. 1 यांना अदा केले. परंतु गैरअर्जदार क्रं.1 यांनी सिव्हिक्स चारचाकी वाहन न देता झेडएक्स हे चारचाकी वाहन डिसेंबर-2008 रोजी दिले व सदरचे वाहन जुने, खराब अवस्थेतील होते व आहे. गैरअर्जदार यांनी झेडएक्स चारचाकी वाहन देतेवेळी सिव्हिक्स चारचाकी वाहन आल्यावर हे वाहन बदलवुन देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. परंतु आश्वासनाप्रमाणे गैरअर्जदार यांनी तक्रारदारास सिव्हिक्स चारचाकी वाहन वेळोवेळी मागणी करुनही दिले नाही किंवा त्यापोटी घेतलेली रक्कम रुपये 6,77,000/-ही परत केली नाही.ही सेवेतील त्रुटी ठरते म्हणुन तक्रारदाराने ही तक्रार दाखल करुन रुपये 6,77,000/- परत करावे किंवा नविन सिव्हीएक्स चारचाकी वाहन द्यावे. नुकसान भरपाईपोटी रुपये 50,000/- 15टक्के व्याजासह मिळावे अशी मागणी केली.
तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून, दस्तऐवजयादीनुसार एकुण 9 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात रोख रक्कमेची पावती धनादेश, बॅकेचा उतारा, नोटीस पोस्टाची पावती, नोटीस परत आलयाचा लिफाफा, इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
यात गैरअर्जदार क्रं.1 ते 3 यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त होऊन गैरअर्जदार क्रं 3 हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला. गैरअर्जदार क्रं.1 व 2 यांना पेपर पब्लीकेशन द्वारे नोटीस देण्यात आली परंतु ते हजर झाले नाही म्हणुन प्रकरण त्यांचे विरुध्द एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 25/3/2011 रोजी पारीत करण्यात आला.
गैरअर्जदार क्रं 3 यांचे कथनानुसार सदर तक्रार ही कालमर्यादेत नाही. सदर प्रकरणाला व्यावसाईक तत्वाची बाधा येते. गैरअर्जदार यांचे कथनानुसार जर तक्रारदाराने चारचाकी वाहन खरेदीची संपुर्ण रक्कम रुपये 6,77,000/- रुपये गैरअर्जदार यांना अदा केलेले होते तर डिसेंबर 2008 पर्यत म्हणजे 2 वर्षे पर्यत सदर वाहनाचा ताबा मिळाला नाही तर तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं.1 व 2 विरुध्द कुठलीही तक्रार केलेली नाही ही बाब आश्चर्यचकीत करणारी आहे. वास्तविक सदर तक्रारीस कारण दिनांक 2.11.2006 रोजी निर्माण झाले होते. तक्रारदाराने सदर तक्रार 2 वर्षाचे आत दाखल करावयाची हवी होती. तक्रारदाराने वाहन विकत घेतल्याचे कुठलेही कागदपत्रे दाखल केले नाही. वास्तविक तक्रारदारास 2006 मध्ये होंडा सीवीक चारचाकी वाहन विकत घ्यावयाचे होते. परतु त्या वाहनाची किंमत 6,77,000/’ कधीच नव्हती. नोव्हेंबर 2000 मध्ये होंडा सीवीक कार, मॉडेल नं.1.8,एस.ए.टी. हिची किंमत 10,83,300/- होती तसेच मॉडेल नं. 1.8 एस.ए.टी हिची किंमत रुपये 11,53,500/- एवढी होती. तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं.2 यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा आणि रिस्ट्रीक्टीव ट्रेड प्रॅक्टीसचा अवलंब केला हे सिध्द केलेले नाही. वास्तविक गैरअर्जदार क्रं.2 ची डिलरशीप दिनांक 18/8/2008 पासुन संपुष्टात आणलेली होती. सदर कार डिसेंबर 2008 मध्ये घेतलेली होती. त्यामुळे तक्रारदार गैरअर्जदार क्रं.2 यांना जबाबदार धरु शकत नाही. त्यासाठी कागदोपत्री पुरावा आवश्यक आहे. सदर वाद हा दिवाणी स्वरुपाचा असल्याने या मंचाला अधिकारक्षेत्र नाही. गैरअर्जदार आणि तक्रारदार यांचेत कुठलाही करार झालेला नसुन तक्रारदार यांने त्यांचेकडे कुठलीही तक्रार दाखल केलेली नाही अथवा सदर वाहनाचे पैसेही गैरअर्जदार क्रं.3 यांना दिलेले नाही. गैरअर्जदार क्रं.3 यांच्या सेवेत कुठलीही कमतरता नसल्यामुळे गैरअर्जदाराबद्दलची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार क्रं. 3 यांनी केलेली आहे.
तक्रारदारातर्फे वकील श्री एम.पी.जैन व गैरअर्जदार क्रं.1 व 2 एकतर्फी, गैरअर्जदार क्रं. 3 तर्फे वकील श्री. मुकेश शिंदे यांचा युक्तीवाद ऐकला.
#0#- कारणमिमांसा -#0#
तक्रारदारानेआपल्या तक्रारीत असा आक्षेप घेतला आहे की, गैरअर्जदारांनी होंडा सिव्हीएक्स वाहनापोटी मोबदला घेऊनही होंडा सिव्हीएक्स हे वाहन दिले नाही तसेच होंडा सिव्हीएक्स हे चारचाकी वाहन न देता झेडएक्स हे चारचाकी वाहन दिले व सदर वाहन देतांना होंडा सिव्हीएक्स हे वाहन आल्यानंतर सदरचे वाहन बदलवुन देण्यात येईल असे आश्वासन देऊनही अद्यापी गैरअर्जदार यांनी होडा सिव्हीएक्स हे चारचाकी वाहन बदलवुन दिले नाही. तसेच तक्रारदारास नविन होंडा सिव्हीएक्स चारचाकी वाहन घ्यायचे होते या म्हणण्यापुष्ठर्य्थ कुठलाही सुस्पष्ट पुरावा सादर केला नाही. होंडा सिव्हीएक्स वाहनाचे मोबदल्यापोटी 2006 मध्ये तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांना संपुर्ण रक्कम दिली होती तर त्याबाबत कुठलीही तक्रार न करता सन 2008 मध्ये म्हणजे जवळपास तब्बल 1 वर्षे 3 महिन्यानंतर होंडा सिव्हीएक्स हे वाहन का स्विकारले याचा खुलासा केलेला नाही. जेव्हाकी कुठलेही वाहन घ्यावे हे सर्वेस्वी निर्णय ग्राहकाचा असतो. एवढेच नव्हे तर होंडा झेडएक्स या वाहनाऐवजी होंडा सिव्हीएक्स हे चारचाकी वाहन बदलवुन देण्यात येईल असे आश्वासन गैरअर्जदार यांनी दिले होते याबाबतही कुठलाहीपुरावा तक्रारदाराने दिलेला नाही.
तक्रारदाराचा दुसरा आक्षेप असा आहे की, गैरअर्जदाराने हे चारचाकी वाहन नविन न देता जुने खराब व उत्पादनातील दोष असलेले दिले. तक्रारदाराने सदर वाहन जुने व उत्पादकीय दोष असल्याबाबतचा देखील कुठलाही पुरावा वा दस्तऐवज या मंचासमक्ष दाखल केले नाही. वरील सर्व बाबी लक्षात घेता. तक्रारदाराची सदर तक्रार पुराव्या अभावी मान्य करता येणार नाही.
-// अं ति म आ दे श //-
1. वरील निरीक्षणासह तक्रारदाराची तक्रार निकाली काढण्यात येते.
1.
2. आपआपला खर्च सोसावा.
2.