Maharashtra

Nagpur

CC/11/12

M/s. Bhagwati Pulses, Through Shri V.K. Agrawal - Complainant(s)

Versus

National Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Adv. Kaushik Mandal

22 Mar 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/12
 
1. M/s. Bhagwati Pulses, Through Shri V.K. Agrawal
Plot No. 45, E.I.A., Chikhali Layout, Kalamana Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. National Insurance Co.Ltd.
The Chairman Cum Managing Director, 3, Midelton Street,
Kolkatta
2. National Insurance Co.Ltd.
10, Wardhman Nagar, Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MR. N.V.Bansod MEMBER
 
PRESENT:Adv. Kaushik Mandal, Advocate for the Complainant 1
 
श्री. सी.बी. पांडे.
......for the Opp. Party
ORDER

 

(मंचाचा निर्णय: श्री. नरेश बनसोड - सदस्‍य यांचे आदेशांन्‍वये)
                           -// आ दे श //-
                  (पारित दिनांक : 22/03/2012)
 
 
1.          प्रस्‍तुत तक्रार तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत मंचात दि.13.01.2011 रोजी विरुध्‍द पक्षा विरुध्‍द दाखल करुन मागणी केली आहे की, विरुध्‍द पक्षाचे सेवेत त्रुटी आहे व विमाकृत चोरी गेलेल्‍या मालाची रक्‍कम रु.1,35,920/- दि.29.11.2008 पासुन 12 टक्‍के व्‍याजासह तसेच सेवेतील त्रुटी व अनुचित व्‍यापार पध्‍दतीमुळे त्‍यास झालेल्‍या शारीरिक मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.25,000/- व इतर मागण्‍या केल्‍या आहेत.
 
                  प्रस्‍तुत तक्रारीचे थोडक्‍यात स्‍वरुप खालिल प्रमाणे :-
 
2.          तक्रारकर्त्‍याने माल सुरक्षीत राहावा म्‍हणून मरीन पॉलिसी म्‍हणून पॉलिसी क्र.281108/21/08/4400000015 ही अटी शर्ती विना एक पानाची पॉलिसी रु.5,00,00,000/- करता दि.30.05.2008 ते 29.05.2009 या कालावधी करीता होती. पॉलिसीच्‍या कालावधीत दि.29.11.2008 रोजी रु.1,35,920/- मुल्‍य असलेली 246 पोती तुरीचे एक कन्‍साईमेन्‍ट गोयल ट्रेडर्स, लखनौ याना हस्‍तांतरीत करण्‍याकरता मे. जय भगवती रोड लाईन्‍स् कळमना मार्केट, नागपूर यांनी ट्रक क्र.युपी-70/एटी-2761 नोंदविण्‍यांत आली त्‍याकरता वाहतुक शुल्‍कापोटी रु.8,000/- मे.जय भगवती रोड लाईन्‍स यांना अग्रिम दिले. दि.15.12.2008 रोजी मे. गोयल ट्रेडर्स यांचेकडे विचारणी केली असता उपरोक्‍त कन्‍साइमेंन्‍ट त्‍यांना प्राप्‍त झाले नव्‍हते, म्‍हणून मे. जय भगवती रोड लाईन्‍सचे मालक श्री. दिपक जैस्‍वाल यांचेकडे चौकशी केली असता कन्‍साइमेंन्‍ट तपासण्‍याकरीता वेळ मागितला व दि.21.12.2008 रोजी श्री. दिपक जैस्‍वाल यांनी तक्रारकर्त्‍यास कळविले की, त्‍यांना न कळविता ट्रकच्‍या ड्रायव्‍हरने संपूर्ण कन्‍साइनमेंन्‍ट वैयक्तिक फायद्याकरीता दुस-या व्‍यक्तिस विकले. तक्रारकर्त्‍याने कळमना पोलिस स्‍टेशन येथे दि.21.12.2008 रोजी एफ.आय.आर क्र.333/21.12.2008 अन्‍वये गुन्‍हा नोंदवुन तपास करण्‍यांत आला तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.2 यांना सुध्‍दा सुचना दिली व मार्गदर्शनाची मागणी केली. त्‍यासोबत एफआयआर कॉपी, बिल, स्‍टॉक डिस्‍पॅच्‍ड, गेटपास कॉपी, नोंदणीकृत कन्‍साईनमेंट प्राप्‍त न झाल्‍याचे पत्र, पॉलिसीची प्रतीसह रितसर भरलेला दावा विरुध्‍द पक्ष याना पाठविला.
 
3.          विरुध्‍द पक्ष क्र.2 यांनी दाव्‍याबाबत कोणतीच सुचना दिली नाही व दावा सुध्‍दा निकाली काढला नाही किंवा खारिजही केला नाही. तक्रारकर्त्‍यास पोलिस फायनल रिपोर्ट प्राप्‍त झाल्‍यावर त्‍याची प्रत विरुध्‍द पक्ष क्र.2 ला पुरविली दि.12.04.2010 रोजी मे जय भगवती रोड लाईन्‍सचे मालक दिपक जैस्‍वाल यांना नोटीस पाठवून मालाची रक्‍कम वाहतुक शुल्‍कापोटी अग्रिम, रकमेच्‍या नुकसान भरपाईची मागणी केली. तक्रारकर्त्‍याने दावा मंजूरीकरीता सर्व तांत्रीक बाबींची पुर्तता केली तरी सुध्‍दा विरुध्‍द पक्षाने त्‍याचा दावा थोपवुन ठेवलेला आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.2 च्‍या कार्यालयास वारंवार भेटी देऊन मौखिकरित्‍या तसेच दुरध्‍वनीव्‍दारे विनंती केली. तरीसुध्‍दा त्‍यांनी दाद दिली नाही, ही विरुध्‍द पक्षांचे ग्राहक सेवेतील त्रुटी असुन अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला आहे असे म्‍हटले आहे. तक्रारकर्त्‍यानुसार आयआरडीए च्‍या नियमावलीनुसार सर्व्‍हे रिपोर्ट प्राप्‍त झाल्‍यानंतर एक महिन्‍याचे आत दावा निकाली काढण्‍याचे बंधन आहे, अन्‍यथा व्‍याजाची आकारणी निर्धारित केलेली आहे. त्‍याचप्रमाणे आयआरडीएच्‍या नियमावलीनुसार खालिल म्‍हणणे मांडले...
            The basic  principle of insurance is to reinstate the position of their customer to pre-accidental condition by indemnifying them immediately on the happening of any insured peril, which gives rise to any insurance claim.
 
4.          तक्रारकर्त्‍याने म्‍हटले की कन्‍साइनमेंट चोरीस गेल्‍यामुळे त्‍यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. तक्रारकर्त्‍याने आपल्‍या म्‍हणण्‍याचे पृष्‍ठयर्थ एकूण 11 दस्‍तावेज पृ.क्र.9 ते 36 वर दाखल केले त्‍यामधे भगवती पल्‍सेसचे इन्‍हॉईस, जय भगवती रोड लाईन्‍सची पावती, विनायक एजंसीची दोन बिले, मे.गोयल ट्रडर्सचे माल न मिळाल्‍याबाबतचे पत्र, डिस्‍पॅच्‍ड स्‍टॉक रजिस्‍टरची प्रत, कळमना पोलिस स्‍टेशनला दाखल केलेली तक्रार, माल चोरीस गेल्याबाबतचे विरुध्‍द पक्ष क्र.2 ला पाठविलेले पत्र, पोलिस फायनल रिपोर्टसह स्‍पॉट पंचनामा रिपोर्ट व स्‍टेटमेंन्‍ट, कॅरियर ऍक्‍टच्‍या कलम 10 अंतर्गत वाहतुकदारास नोटीस व त्‍याची पोच पावती इत्‍यादी दस्‍तावेज दाखल केलेली आहेत.
5.          मंचाने विरुध्‍द पक्षास नोटीस बजावला असता ते मंचाज हजर झाले असुन त्‍यांचे म्‍हणणे खालिल प्रमाणे...
            तक्रारकर्त्‍याने दाखल केलेली त‍क्रार बेकायदेशिररित्‍या लाभ मिळविण्‍याकरीता खोटे आरोप करुन दाखल केल्‍यामुळे ती खारिज करण्‍यांची मागणी केली. उपरोक्‍त ‘मरीन ओपन डिक्‍लेरेशन विमापत्र’, व्‍याससायीक व्‍यवहारासाठी घेतलेले असुन तक्रारकर्ता अनेक व्‍यवसायात गुंतलेला आहे त्‍यामधे वाहतुक व्‍यवसाय अंर्तभुत आहे व दावा व्‍यावसायीक, बनावटी असल्‍यामुळे ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत ग्राहक या संज्ञेत येत नसल्‍यामुळे ती खारिज करण्‍याची मागणी केली आहे. तक्रारकर्त्‍याने दाव्‍यापृष्‍ठयर्थ समाधारकारक पुरावे न दिल्‍यामुळे व त्‍यांना वारंवार सुचना देऊनही सादर न केल्‍यामुळे दावा संशयास्‍पद असुन बेकायदेशिररित्‍या लाभ मिळविण्‍याकरीता केलेला आहे. सदर तक्रार विमापत्राप्रमाणे व ग्राहक संरक्षणकायद्याचे तरतुदीनुसार विहीत कालावधीत नाही व विरुध्‍द पक्ष क्र.1 यांना विनाकारण तक्रारीत गुंतविले त्‍यामुळे वरील आक्षेपा संदर्भात प्रारंभिक मुद्दे निकाली काढावे अशी मागणी केली आहे.
 
6.          विरुध्‍द पक्षाने उपरोक्‍त पॉलिसीचा अवधी मान्‍य केला, तसेच त्‍यांनी म्‍हटले की, कोणतेही कन्‍साईनमेंट पाठविण्‍याआधी लीखीत स्‍वरुपात डिक्‍लेअरेशन करणे अनिवार्य आहे. तक्रारकर्त्‍याला विमा पत्रासोबत अटी शर्ती प्राप्‍त झाल्‍या नाहीत, हे म्‍हणणे नाकारले व म्‍हटले की, त्‍याबाबत आज तागायत कधीही तक्रार केली नाही व लेखी पत्रव्‍यवहार सुध्‍दा केलेला नाही व विमापत्रान्‍वये दाव्‍याप्रतिपुर्ती संदर्भात आवश्‍यक दस्‍तावेज व परिपूर्ण माहिती पुरविल्‍यास अटी शर्तीचे अधीन प्रतिपूर्तीचा लाभ मिळू शकतो. विरुध्‍द पक्षाने तक्रारीचा परिच्‍छेद क्र.2 पूर्णपणे नाकारला, तसेच परिच्‍छेद क्र.3 मधील म्‍हणणे नाकारले त्‍यात खालिल प्रमाणे नमुद केले.
      ‘हे म्‍हणणे संपूर्णपणे खोटे आहे की, तथाकथीत घटनेची सुचना पिंपळगाव, चंद्रपूर पोलिस स्‍टेशनला देण्‍यांत आली. हे म्‍हणणे खोटे आहे की, सदर प्रकरणाचा तपास कळमेश्‍वर पोलिस स्‍टेशनमधील अधिका-यांनी दि.21.12.2008 रोजी गुन्‍हा नोंदवुन सुरु केला’.
 
7.          तक्रारकर्त्‍याने सदर घटनेची सुचना व नुकसान भरपाईचा दावा संपूर्ण कागदपत्रासह विहीत नमुन्‍यात सादर केला हे नाकारले. विरुध्‍द पक्षाने म्‍हटले की, तक्रारकर्त्‍याला वारंवार दुरध्‍वनीव्‍दारे सुचित करुन आवश्‍यक 15 दस्‍तावेजांची मागणी केल्‍याची यादी उत्‍तरात पृ.क्र. 49 वर दाखल केली.विरुध्‍द पक्षाने दावा थोपवुन ठेवला हे नाकारुन म्‍हटले की, दावा निकाली काढण्‍यासाठी झालेल्‍या विलंबाकरीता तक्रारकर्ते जबाबदार आहेत व त्‍यांचे सेवेत त्रुटी व निष्‍काळजीपणा नाही व इतर तक्रारर्त्‍याची मागणी नाकारली.
 
8.          विरुध्‍द पक्षाने आपल्‍या विशेष बयानात उत्‍तरात नमुद केल्‍याप्रमाणेच म्‍हणणे मांडले व म्‍हटले की, तथाकथीत चोरीची घटना कुठे झाली, चोरीचे वाहन कोठे सापडले, चोरीची तक्रार लोकल पोलिसांना दील्‍याची कागदपत्र व त्‍यांनी केलेल्‍या कारवाईची कागदपत्र सादर न केल्‍यामुळे दावा संशयास्‍पद निष्‍पन्‍न होते, असे म्‍हणुन तक्रार खारिज करण्‍याची मागणी केली आहे.
 
9.          विरुध्‍द पक्षाचे शपथपत्रावरील उत्‍तरास तक्रारकर्त्‍याने प्रतिउत्‍तर दाखल करुन विरुध्‍द पक्षाचे म्‍हणणे कसे अयोग्‍य व चुकीचे आहे याचे कथन केले. तक्रारकर्त्‍याने म्‍हटले की, विरुध्‍द पक्षाने आजपर्यंत कधीही दस्‍तावेजांची मागणी केली नाही. व विरुध्‍द पक्ष त्‍यांचे म्‍हणणे दस्‍तावेजासह सिध्‍द करण्‍यांस अपयशी ठरले आहेत. उलटपक्षी तक्रारकर्त्‍याने दि.24.12.2008 चे पत्राव्‍दारे दस्‍तावेज दाखल करुन मदत व मार्गदर्शन मागितले. तक्रारकर्त्‍याने म्‍हटले की, विरुध्‍द पक्ष 20 महिने प्रकरण निद्रिस्‍त अवस्‍थेत ठेऊन काहीही हालचाल केली नाही, त्‍यामुळे दावा निकाली काढण्‍यांस विलंब हा विरुध्‍द पक्षामुळे झालेला असुन त्‍यास ते जबाबदार आहेत व त्‍यांची अकार्यक्षमता स्‍पष्‍ट होते. विरुध्‍द पक्षाचे सेवेत गंभीर स्‍वरुपाची त्रुटी असुन त्‍यांचे कथन हे मंचाची दिशाभूल करण्‍याकरीता केलेले आहे असे म्‍हटले आहे. विरुध्‍द पक्षाने दि.24.08.2011 रोजी उत्‍तर दाखल केल्‍यानंतर दि.26.09.2011 ला व 17.02.2012 ला विमा पत्राची प्रमाणीत प्रत दाखल केली. 
 
10.         मंचाने दोन्‍ही पक्षांचे वकीलांचा युक्तिवाद ऐकला व तक्रारीसोबत असलेल्‍या सर्व कागदपत्रांचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता आम्‍ही खालिल प्रमाणे निष्‍कर्षाप्रत पोहचलो.
 
                        -// नि ष्‍क र्ष //-
 
 
11.         विरुध्‍द पक्षाने म्‍हटले की, तक्रारकर्त्‍याने घेतलेले उपरोक्‍त विमापत्र व्‍यावसायीक व्‍यवहाराकरीता घेतले असुन तक्रारकर्ता अनेक प्रकारच्‍या व्‍यवसायात गुंतलेला आहे व त्‍यात वाहतुक व्‍यवसाय अंर्तभुत असल्‍यामुळे व दावा बनावटी स्‍वरुपाचा असल्‍यामुळे तक्रारकर्ता ग्राहक या संज्ञेत येत नसल्‍यामुळे, सदर तक्रार खारिज करण्‍याची मागणी केली. तक्रारकर्त्‍याचा दावा बनावटी स्‍वरुपाचा असल्‍याचे दस्‍तावेजासह सिध्‍द करण्‍यांस विरुध्‍द पक्ष पूर्णपणे अपयशी ठरले आहे असे मंचाचे मत आहे. राष्‍ट्रीय आयोगानी, हरसोलीया मोटर्स विरुध्‍द नॅशनल इन्‍शोरन्‍स कंपनी लि. 2005 सीपीजे-27 (भाग-1) (एनसी)’, या निकालपत्रानुसार विमापत्र व्‍यावसायीक कारणासाठी जरी घेतले असले तरी त्‍यातुन नफा उत्‍पन्‍न होत नाही व विमापत्र हे झालेल्‍या नुकसानीकरीता indemnify करण्‍याकरता आहे, त्‍यामुळे तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षांचा ग्राहक ठरतो व त्‍याबाबतचे विरुध्‍द पक्षाचे म्‍हणणे मंचाने तथ्‍यहीन असल्‍यामुळे नाकारले. विरुध्‍द पक्षाने पृष्‍ठ क्र.48 वरील परिच्‍छेद क्र.ड मधे म्‍हटले की, विमापत्राप्रमाणे व ग्राहक सेवेतील तरतुदींप्रमाणे तक्रार विहीत कालावधीत नाही हे विरुध्‍द पक्षांचे म्‍हणणे स्‍पष्‍ट कारणमिमांसे अभावी व दस्‍तावेजा अभावी तथ्‍यहीन ठरते. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा दावा निकाली न काढल्‍यामुळे किंवा रद्द न केल्‍यामुळे वादाचे कारण दावा दाखल केल्‍यापासुन सतत सुरु आहे, असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे व त्‍यास खालिल राष्‍ट्रीय आयोगाचे निकालपत्रास आधारभुत मानुन विरुध्‍द पक्षांचे म्‍हणणे नाकारले.
      ‘मे. मुरारी उलन मिल्‍स लि. विरुध्‍द डिव्‍हीजनल मॅनेजर, युनायटेड इंडिया इन्‍शोरन्‍स कंपनी लि., 2005 (भाग-1) सीपीआर-122’. तक्रारकर्त्‍याने म्‍हटले की, त्‍यांना एक पानाची पॉलिसी प्रत पुरविण्‍यांत आली व अटी, शर्ती पुरविण्‍यांत आल्‍या नाही. तक्रारकर्त्‍यास पॉलिसीसह अटी व शर्ती पुरविण्‍यांत आल्‍या होत्‍या हे दस्‍तावेजासह सिध्‍द करण्‍यास विरुध्‍द पक्ष अपयशी ठरले आहेत.
 
12.         तक्रारकर्त्‍याने तक्रारीच्‍या परिच्‍छेद क्र.1 मधे नमुद केले की, उपरोक्‍त एक पानाचे विमा पॉलिसी पत्र विना अटी व शर्ती तक्रारकर्त्‍यास निर्गमीत केले, त्‍यामुळे त्‍या अटी व शर्ती विमा दावा निकाली काढले वेळी लागू पडत नाही व विरुध्‍द पक्षाने त्‍याचा आधार घेतल्‍यास ते खारिज करावे. हे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणने विरुध्‍द पक्षाने नाकारले व म्‍हटले की, तक्रारकर्त्‍याने अटी शर्ती प्राप्‍त न झाल्‍याबाबत लेखी सुचना केलेली नाही. विरुध्‍द पक्षाने अनुक्रमे पृ. क्र.60 व 68 वर विमापत्र अटी शर्तीसह निर्गमीत केल्‍याचे दाखविण्‍याकरीता दि.26.09.2011 व 17.02.2012 रोजी दाखल केले. तसेच पृ. क्र.60 चे अवलोकन केले असता हे स्‍पष्‍ट होते की, सदर विमापत्राची दुय्यम प्रत ही दि.03.05.2011 लाच विरुध्‍द पक्षाचे ताब्‍यात होती. तरी सुध्‍दा विरुध्‍द पक्षाने सदर विमा व अटी शर्तींची प्रत उत्‍तरा सोबत दि.20.07.2011 ला का दाखल केली नाही, यावरुन विरुध्‍द पक्षाचे संपूर्ण कार्यपध्‍दती ही संशयास्‍पद असल्‍याचे मंचाचे मत आहे व विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास अटी शर्ती विना विमा पत्र निर्गमीत केले या तक्रारकर्त्‍याच्‍या म्‍हणण्‍यास पुष्‍टी मिळते.
13.         विरुध्‍द पक्षाने आपल्‍या उत्‍तराचे परिच्‍छेद क्र.5 मधे नमुद केले की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला वारंवार दुरध्‍वनीव्‍दारे सुचीत करुन आवश्‍यक 15 दस्‍तावेजांची मागणी केल्‍याचे म्‍हटले आहे, जे की दाव्‍याची छाननी व पडताळणीकरीता आवश्‍यक होते परंतु तक्रारकर्त्‍याने ते दस्‍तावेज सादर केलेले नाही, हे विरुध्‍द पक्षाचे म्‍हणणे वस्‍तुनिष्‍ठ पुराव्‍या अभावी अविश्‍वसनीय वाटते. जेव्‍हा की, तक्रारकर्त्‍याने अनुक्रमे पृ.क्र.15 वरील पत्रानुसार दि.20.12.2008 रोजी उपरोक्‍त कन्‍साईमेंन्‍ट गहाळ झाल्‍याचे निश्चित झाल्‍यानंतर पोलिस स्‍टेशन, कळमना, नागपूर यथे तक्रार केली व अनुक्रमे पृ.क्र. 17 नुसार दि.24.12.2008 रोजी विरुध्‍द पक्ष क्र.2 यांना पोलिस रिपोर्ट, बिल, गेटपावस, गोयल ट्रेडर्सचे पत्र, माह. बंद विमा स्‍टेटमेंन्‍ससह सुचना वजा दस्‍तावेज दाखल केले. तरी सुध्‍दा विरुध्‍द पक्षाने त्‍याची दखल घेतली नाही, त्‍याबाबत झालेल्‍या नुकसानीच्‍या निर्धारणाकरीता सर्व्‍हेअर व इन्‍हेस्‍टीगेटरची नियुक्ति सुध्‍दा केलेली नाही, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाने दुरध्‍वनीवरुन केलेल्‍या मागणी नुसार 15 दस्‍तावेज पुरविले नाही, हे म्‍हणणे पूर्णतः अविश्‍वसनीय असुन निव्‍वळ मंचाची दिशाभुल करण्‍याकरता कथनकेलेले आहे, या तक्रारकर्त्‍याचे म्‍हणण्‍यास पुष्‍टी मिळते व मंच त्‍याबाबत सहमत आहे.
14.         तक्रारकर्त्‍याने तक्रारीच्‍या परिच्‍छेद क्र.3 मधे नमुद आहे की, त्‍यांनी कळमना पोलिस स्‍टेशनला 21.12.2008 रोजी एफआयआर नोंदविला व पोलिसांनी तपासास सुरवात केली. त्‍याचे उत्‍तरात विरुध्‍द पक्षाने नमुद केले की, हे म्‍हणणे संपूर्णपणे खोटे आहे की, तथाकथीत घटनेची सुचना पिंपळगाव, चंद्रपूर पोलिस स्‍टेश्‍नला देण्‍यांत आली. हे म्‍हणणे खोटे आहे की, सदर प्रकरणाचा तपास कळमेश्‍वर पोलिस स्‍टेशनमधील अधिका-यांनी दि.21.12.2008 रोजी गुन्‍हा नोंदवुन सुरु केला’. यावरुन हे स्‍पष्‍ट होते की, विरुध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍याचे म्‍हणण्‍याप्रमाणे खरोखरच 20 महिनेपर्यंत निद्रावस्‍थेत होते व त्‍यांना या गोष्‍टीचे सुध्‍दा भान राहीले नाही की, तक्रारकर्त्‍याने एफ.आय.आर. हा कळमना पोलिस स्‍टेशन, नागपूर येथे दाखल केला असतांना सुध्‍दा शपथपत्रावर पिंपळगाव, चंद्रपूर पोलिस स्‍टेशन, तसेच कळमेश्‍वर पोलिस स्‍टेशनचा उल्‍लेख करतात हे फार दुर्भाग्‍यपूर्ण आहे व यावरुन विरुध्‍द पक्षाची संपूर्ण कार्यपध्‍दती निष्‍काळजीपणाची, गैरकायदेशीर स्‍वरुपाची आहे व विरुध्‍द पक्षाने कसा अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे हे सिध्‍दा होते.
 
15.         वरील विवेचनावरुन हे स्‍पष्‍ट झाले की, विरुध्‍द पक्षाने त्‍यांचा दावा निकाली काढण्‍यासाठी कुठलाही प्रयत्‍न केलेला नसुन निव्‍वळ थोपवुन ठेवलेला होता, असे दिसते. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत दाखल दस्‍तावेजांवरुन त्‍याने दि.29.11.2008 रोजी रु.1,35,920/- ची 246 पोती तुरीचे कन्‍साइनमेंट मे. गोयल ट्रेडर्स, लखनौ यांना मे. जय भगवती रोड लाईन्‍स् नागपूर मार्फत पाठविण्‍यांत आलेले होते व ते कन्‍साइमेंट ट्रकच्‍या ड्रायव्‍हरने वैयक्तिक लाभाकरीता परस्‍पर दुस-या व्‍यक्तिला विकले व त्‍याबाबत तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.2 कडे दावा दस्‍तवेजासह दाखल केला. त्‍यामुळे दाव्‍याची रक्‍कम रु.1,35,920/- दि.29.11.2008 पासुन तक्रारकर्त्‍याचे हाती पडेपर्यंत 9 टक्‍के व्‍याजाने विरुध्‍द पक्षाने देणे संयुक्तिक होईल असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. दावा रकमेवर मंचाने व्‍याजाची आकारणी केल्‍यामुळे शारीरिक व मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाईची आवश्‍यकता नाही. करीता खालिल प्रमाणे आदेश देण्‍यांत येतो.
 
           
 
             -// अं ति म आ दे श //-
 
 
1.    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यांत येते.
2.    विरुध्‍द पक्षाला आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास विमा दाव्‍याची     रक्‍कम रु.1,35,920/- दि.29.11.2008 पासुन तक्रारकर्त्‍याचे हाती पडेपर्यंत       द.सा.द.शे. 9% व्‍याजासह द्यावी.
3.    विरुध्‍द पक्षाला आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला तक्रारीच्‍या       खर्चापोटी `.3,000/-       द्यावे.
4.    वरील आदेशाची अंमलबजावणी विरुध्‍द पक्षाने आदेशाची प्रत मिळाल्‍याचे      दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MR. N.V.Bansod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.