Maharashtra

Thane

CC/07/572

Mr.Ramani J.Ranchhodas - Complainant(s)

Versus

National Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Mr.V.T.Hundlani

27 Oct 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/07/572
 
1. Mr.Ramani J.Ranchhodas
Jai Jalaram Tea House Kishore Nagar CHS Ltd.Near Anad bhavan Soct.Kopricolony,Thane(E)
Thane
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. National Insurance Co.Ltd.
3,Middletone Street,P.B.NO.9229,Kokata
kolkata
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER
 

               न्‍यायनिर्णय   

               (द्वारा सौ. माधुरी एस. विश्‍वरुपे- मा. सदस्‍या)

 

 

  1. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून व्‍यक्‍तीगत विमा पॉलिसी रक्‍कम रु. 1,00,000/- ची घेतली होती. विमा पॉलिसीमध्‍ये कालावधी दि. 06/02/2007 ते दि. 05/02/2006 असा टाकण्‍यात आला.
  2.   तक्रारदारांना दि. 08/02/2009 रोजी हायवेवर दुचाकी वाहन घेऊन जात असतांना वाहन घसरल्‍यामुळे पडून झालेल्‍या अपघातात पाठीला इजा झाल्यामुळे तक्रारदारांना हॉस्पिटलमध्‍ये दाखल केले.
  3. तक्रारदारांना सदर अपघातात झालेल्‍या (back injury) पाठीच्‍या कण्‍याच्‍या उपचाराकरीता दि. 10/02/2007 ते दि. 02/03/2007 या कालावधीत कौसल्‍या मेडिकल फाऊंडेशन ट्रस्‍ट हॉस्पिटल पाचपाखडी, ठाणे येथे अॅडमिट केले होते. सदर कालावधीत उपचाराकरीता व औषधोपचाराकरीता रक्‍कम रु. 1,50,000/- एवढा खर्च झाला. तक्रारदारांची विमा पॉलिसी रु. 1,00,000/- रकमेची असल्‍यामुळे तेवढयाच रकमेची मागणी सामनेवाले यांचेकडे केली.

 

  1.   तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे वैदयकीय उपचाराच्‍या खर्चाच्‍या रकमेची मागणीसाठी विमा प्रस्‍ताव सामनेवाले यांचेकडे आवश्‍यक कागदपत्रांसहीत दाखल केला. सामनेवाले यांनी दि. 20/07/2007 रोजीच्‍या पत्राद्वारे प्रस्‍तावातील वैदयकीय उपचार अपघातातील नसून तक्रारदारांना असलेल्‍या जुन्‍या व तीव्र आजाराच्‍या उपचाराची असल्‍याचे कारणास्‍तव नामंजूर केला.

 

  1. सामनेवाले यांचे म्‍हणण्‍यानुसार तक्रारदारांनी दि. 08/02/2007 रोजी झालेल्‍या अपघाताबाबतचा कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केला नाही. तसेच अपघातामध्‍ये झालेल्‍या इजा (injury) संदर्भात वैदयकीय उपचाराबाबचा पुरावा म्‍हणजेच टेस्‍ट रिपोर्ट ट्रीटमेंट पेपर्स, डिसचार्ज कार्ड वगैरे दाखल नाही.

 

  1. सामनेवाले यांचेकडे दि. 08/03/2007 रोजीच्‍या पत्रान्‍वये जवाहर रामानी यांनी प्रस्‍ताव सेटलमेंटबाबत कळवले आहे. जवाहर रामानी यांनी सामनेवाले यांचेकडून सदर विमा पॉलिसी घेतली नाही. तक्रारदारांनी दि. 07/09/2007 रोजी सामनेवाले यांना वकीलातर्फे कायदेशीर नोटीस पाठविली आहे.     तक्रारदारांच्‍या डॉक्‍टरांनी दि. 10/02/2007 रोजी तपासणी करुन दिलेले वैदयकीय प्रमाणपत्र सामनेवाले यांनी त्‍यांचे वेगवेगळया दोन तज्ञ डॉक्‍टरांचे मत देण्‍यासाठी पाठवले असता तक्रारदारांना झालेली इजा अपघातसंदर्भातील नसून त्‍यांचे वयोमानाप्रमाणे झालेल्‍या जुन्‍या व तीव्र आजाराचे स्‍वरुपाप्रमाणे आहे. सामनेवाले यांचे म्‍हणण्‍यानुसार पॉलिसी सर्टिफिकेट नं. 162 व पॉलिसी नंबर एकमेकांशी जुळत नाहीत. सामनेवाले हे (backward) मागच्‍या डेटपासूनची (06/02/2007 to 05/12/2008) अशा प्रकारची पॉलिसी देत नाहीत.

 

  1. तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, सामनेवाले यांची लेखी कैफीयत व लेखी युक्‍तीवाद यांचे वाचन केले.  तक्रारदारांनी लेखी युक्‍तीवाद हाच तोंडी युक्‍तीवाद समजण्‍यात यावा अशी पुरशीस दाखल केली आहे.  सामनेवाले तोंडी युक्‍तीवादासाठी गैरहजर असल्‍यामुळे तक्रारीत दाखल पुराव्‍यावरुन प्रकरण गुणवत्‍तेवर निकाली करण्‍याचा निर्णय मंचाने घेतला.  यावरुन खालीलप्रमाणे निष्‍कर्ष मंचाने काढला आहेः

 

    अ.     तक्रारदारांनी पुरावा शपथपत्रात नमुद केल्‍याप्रमाणे तक्रारदारांचे नांव जवाहर    वडीलांचे नांव रणछोडदास व आडनाव रामानी आहे.  काही वेळा आडनावापासुन   तक्रारदारांचे नांव नमुद आहे.  तर कधी प्रथम नाव  जवाहर पासुन नमुद आहे. त्‍यामुळे जवाहर व रामाणी या दोन व्‍यक्‍ती नाहीत तक्रारदारांचे पुर्ण नाव जवाहर रणछोडदास रामाणी आहे. 

  ब.  सामनेवाले यांनी डॉ.महेश बलदेवा यांचा अहवाल मंचात दाखल केला आहे.  सदर अहवालामध्‍ये नमुद केलेला पॉलीसी नंबर-260300 असुन तक्रारदारांनी सदर पॉलीसी नंबर तक्रारीत नमुद केला आहे.  तसेच पॉलीसी प्रमाणे प्रमाणपत्रावर पॉलीसी कालावधी चुकीचा नमुद केला असला तरी सामनेवाले यांनी या कारणास्‍तव तक्रारदारांचा विमादावा नाकारला नाही.  सबब सामनेवाले यांना विमा पॉलीसी मान्‍य असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  तसेच डॉ.बलदेवा यांच्‍या तज्ञ अहवालामध्‍ये पॉलीसी कालावधी ता.06.02.2007 ते ता.05.02.2008 असा दिला आहे.  श्री.बलदेवा यांनी तज्ञ अहवाल तक्रारदारांच्‍या पॉलीसीचे व वैदयकीय कागदपत्रांचे अवलोकन केल्‍यानंतर दिला असल्‍याचे अहवालामध्‍ये नमुद केले आहे.  सबब तक्रारदारांची पॉलीसी वैध असुन पॉलीसी कालावधीत तक्रारीतील घटना झालेली आहे. 

  क.  तक्रारदारांनी वैदयकीय बीले उपचाराबाबतची दाखल केली आहेत.  डॉ.महेश बलदेवा वैदयकीय अहवालामध्‍ये खालील प्रमाणे नमुद केलेले आहे. 

 

“Nature of injury from the reports annexed appears to be due to old age and long standing and treatment taken at kaushalya medical foundation trust hospital, Thane is for old long standing disease of spine and vertebral column.”

 

             सदर अहवालानुसार तक्रारदारांचे आजारपण हे दिर्घकालावधीपासुन वयोमानाप्रमाणे पाठीच्‍या कण्‍याची झीज झाल्‍यामुळे निर्माण झाले आहे.  सदर आजारपणाचे स्‍वरुप अपघातामध्‍ये झालेल्‍या इजे (Injury) संदर्भातील असल्‍याबाबतचा कोणताही पुरावा मंचासमोर दाखल नाही. 

   ड.   सामनेवाले यांनी डॉ.मनिष सचदेव यांचा ता.08.06.2007 रोजीचा तज्ञ मताचा (Expert Opinion) अहवाल मंचात दाखल केला आहे.  सदर अहवालामध्‍ये नमुद केले आहे की, “His illness was not directly related  to  accident  or as a consequences of that accident.”

  

  1. सामनेवाले यांनी दाखल केलेल्‍या दोन्‍ही डॉक्‍टरांचे तज्ञमतानुसार तक्रारदारांनी विमा प्रस्‍तावासोबत दाखल केलेल्‍या वैदयकीय कागदपत्रांवरुन तक्रारदारांचा आजार अपघाता संदर्भातील इंजाबाबत (Injury)  असल्‍याचे सिध्‍द होत नाही.  तक्रारदारांच्‍या एमआरआय अहवालनुसार “Lumbar spondylosis with degenerative disedisease seen at multiple levels fam L1-L2 to L5- S1” नमुद केल्‍याचे तज्ञांचे अहवालावरुन स्‍पष्‍ट होते.
  2. तक्रारीतील दाखल पुराव्‍यावरुन तक्रारदारांना ता.08.02.2009 रोजी अपघात झाल्‍याबाबतचा कोणताही पुरावा दाखल नाही.  
  1.   तक्रारदारांनी सामनेवाले यांना विमा प्रस्‍तावासोबत दाखल केलेल्‍या वैदयकीय बीलानुसार तक्रारदारांना दिलेले उपचार अथवा त्रास अपघाती इजेमुळे झाल्‍याबाबतचा उल्‍लेख उपचारक डॉक्‍टरांनी केल्‍याचे दिसुन येत नाही.  अशा परिस्थितीत तक्रारदारांच्‍या वैदयकीय उपचाराबाबत खर्चाचा विमादावा प्रतिपुर्तीसाठी देय नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते असे मंचाचे मत आहे. 

8.    उपरोक्‍त चर्चेनुरुप व निष्‍कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश करण्‍यात येतो.

9.    या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही .

                    आदेश

1. तक्रार क्रमांक-572/2007 ही नामंजुर करण्‍यात येते.

2. खर्चाबाबत आदेश नाहीत.

3. आदेशाच्‍या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्‍य व विनाविलंब पोस्‍टाने पाठविण्‍यात याव्‍यात.

4. तक्रारीचे अतिरिक्‍त संच असल्‍यास तक्रारदार यांना परत करण्‍यात यावे.

 
 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.