Maharashtra

Nagpur

CC/12/227

Smt. Shailkumari Jaiprakash Mishra - Complainant(s)

Versus

National Insurance Co.ltd., Through Manager - Opp.Party(s)

Adv. P.K.Mishra

28 Feb 2013

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/12/227
 
1. Smt. Shailkumari Jaiprakash Mishra
Plot No. 20, Surya Nagar, Kalamana Road,
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. National Insurance Co.ltd., Through Manager
office- 3, Midleton Street,
Kolkata
West Bangal
2. Divisional Manager, National Insurance Co.Ltd.
Div. Office- 13, Gijare Bhawan, Laxminagar,
Nagpur
Maharashtra
3. Manager and Incharge Claim Hub, National Insurance Co.Ltd.
Motor O.D.Claim Hub, Firdos Chambers, Ramdaspeth, Wardha Road,
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. AMOGH KALOTI PRESIDENT
 HON'ABLE MR. SATISH DESHMUKH MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

श्री. अमोघ कलोती, अध्‍यक्ष यांचे कथनांन्‍वये.
 
 
 
- आदेश -
 (पारित दिनांक – 28/02/2013)
 
1.           तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन विरुध्‍द पक्षकारांकडून विमा पॉलिसीची रक्‍कम व नुकसान भरपाई मिळणेची मागणी केली आहे.
 
2.          तक्रारकर्तीचे कथन थोडक्‍यात येणेप्रमाणे -
तक्रारकर्ती टाटा ट्रक क्रमांक एम एच – 31 / बी सी 4783 ची मालक असून, माल वाहतुकीचा व्‍यवसाय तिच्‍या पतीच्‍या ‘प्रयाग गुड्स गॅरेज’, नामक कार्यालयातून करते.
 
तक्रारकर्तीने 15.02.2009 ते दि.14.12.2011 या कालावधीसाठी सदर ट्रकचा रु.6,31,500/- चा पूर्ण नुकसान भरपाई विमा विरुध्‍द पक्षकार क्र. 1 कडे उतरविला होता आणि त्‍याबाबत विमा हप्‍त्‍यांचा भरणा केला होता. विरुध्‍द पक्षकार क्र. 1 ने तक्रारकर्तीला कव्‍हर नोट दिली होती.
 
दि.09.12.2010 पासून सदर अ़क प्रयास गुड्स गॅरेजच्‍या आवारात उभा होता. दि.15.12.2010 रोजी तो चोरीला गेल्‍याचे तक्रारकर्तीच्‍या पतीला आढळून आले. दिवसभर शोध घेऊनही ट्रक न सापडल्‍याने, तिचे पतीने पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्‍हा क्र.258/10 नुसार अज्ञात इसमाविरुध्‍द भारतीय दंड विधानाच्‍या कलम 379 अन्‍वये गुन्‍हा नोंदविला.
 
तक्रारकर्तीने ट्रक चोरीबाबत वि.प.यांना सूचना दि.20.12.2010 रोजी दिली व दि.11.01.2011 रोजी ‘क्‍लेम फॉर्म’ भरुन दिला व तक्रारकर्तीने सदर ट्रकची काळजी घेतली नसल्‍याने पोलिसांनी मा. प्रथम श्रेणी न्‍यायदंडाधिकारी यांचे न्‍यायालयात दाखल केलेल्‍या चौकशी अहवालात नमूद केले असल्‍याचे आणि त्‍यामुळे तक्रारकर्तीने विमा पॉलिसीच्‍या अट क्र. 5 चा भंग केला असल्‍याचे, वि.प.क्र.3 यांनी दि.18.08.2011 रोजीचे पत्रांन्‍वये तक्रारकर्त्‍याला कळविले. दि.07.09.2011 रोजी तक्रारकर्त्‍याने सदर पत्रावर आपले स्‍पष्‍टीकरण सादर केले. तसेच दि.23.09.2011 रोजी स्‍मरणपत्र व दि.13.10.2011 रोजी वि.प.क्र.1 यांना विमा पॉलिसीची रक्‍कम देण्‍याची विनंती केली. दि.21.12.2011 रोजी याबाबत विमा नियमान व विकास प्राधिकरण (आय.आर.डी.ए.) यांना पत्र दिले. यानंतर वि.प.क्र.3 यांनी पोलिस चौकशी अहवालाचे कारण पुढे करुन व अट क्र. 5 चा भंग झाल्‍याचे नमूद करुन दि.06.02.2012 चे पत्रांन्‍वये पूर्ण विमा नुकसान भरपाई देण्‍याचे नाकारले. करिता, प्रस्‍तुत तक्रार दाखल केली.
 
3.          नोटीसची बजावणी होऊनही विरुध्‍द पक्षकार क्र. 1 व 3 यांनी उत्‍तर दाखल केले नाही. त्‍यामुळे त्‍यांचे उत्‍तराविना प्रकरण पुढे चालविण्‍यात आले. विरुध्‍द पक्षकार क्र. 2 यांनी आपले लेखी उत्‍तर सादर करुन विमा नाकारण्‍याच्‍या कृतीचे समर्थन केले आणि तक्रार खारिज करण्‍यात यावी असे नमूद केले.
 
4.          तक्रारकर्तीतर्फे ऍड. श्री. मिश्रा यांचा युक्‍तीवाद दि.21.02.2013 रोजी ऐकला. दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले. विरुध्‍द पक्षकार गैरहजर. असल्‍याने प्रकरण दि.28.02.2013 रोजी त्‍यांचे युक्‍तीवादासाठी नेमण्‍यात आले. परंतू, दि.28.02.2013 रोजी सुध्‍दा वि.प.तर्फे कोणीही हजर न झाल्‍याने प्रकरण आदेशाकरिता बंद करण्‍यात आले.
 
5.          उभय पक्षांचे कथन विचारात घेतले असता, मंचाच्‍या विचारार्थ उद्भवणारे मुद्ये व त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नमूद केले आहेत.
 
मुद्ये                                                   निष्‍कर्ष
1. विरुध्‍द पक्षकारांचे सेवेत कमतरता असल्‍याचे                                होय.
    सिध्‍द होते काय ?
2. आदेश ?                                            अंतिम आदेशानुसार.
 
 
 
-कारणमिमांसा-
6.          तक्रारकर्तीची सदर ट्रकची मालकी, दि.15.02.2009 ते दि.14.12.2011 या कालावधीतील विमा पॉलिसी, दि.15.12.2010 रोजी झालेली ट्रक चोरी, दि.16.12.2010 रोजी पोलिसांना दिलेली फिर्याद आणि 20.12.2010 रोजी विरुध्‍द पक्षकारांना दिलेली सूचना याबाबत वाद नाही. पोलिसांनी मा. प्रथम श्रेणी न्‍यायदंडाधिकारी यांचे न्‍यायालयात सादर केलेल्‍या अर्जामध्‍ये तक्रारकर्तीने सदर ट्रकची काळजी घेतली नसल्‍याचे नमूद केल्‍याचे आणि तक्रारकर्त्‍याने विमा पॉलिसीच्‍या अट क्र. 5 चा भंग केल्‍याचे कथन वि.प.क्र.2 ने केले असले तरी, वि.प.क्र.2 ने सदर पोलिस अहवाल, तसेच विमा पॉलिसीसुध्‍दा मंचाच्‍या अभिलेखावर दाखल केली नाही. मा. प्रथम श्रेणी न्‍यायदंडाधिकारी, क्र. 3 नागपूर यांनी सदर पोलिस अहवालावर दि.06.07.2011 रोजी पारित केलेल्‍या आदेशाची प्रत तक्रारकर्तीने मंचाच्‍या अभिलेखावर दाखल केली आहे. (पृष्‍ठ क्र. 19). सदर आदेशामध्‍ये वि.प.यांनी कथन केल्‍याप्रमाणे कोणतीही बाब नमूद केलेली नाही. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षकारांनी तक्रारकर्तीचा क्‍लेम नाकारण्‍यासाठी दिलेले कारण चुकीचे व असमर्थनीय असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. मा. राष्‍ट्रीय आयोगाचे, युनायटेड इंडिया इंशुरंस कंपनी मर्या. वि. गिरिराज प्रसाद मिना (सी.पी.जे., खंड 4 पृष्‍ठ 759, परिच्‍छेद क्र.8) मध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे ‘क्षुल्‍लक कारणे पुढे करुन ग्राहकांच्‍या मागण्‍या फेटाळता येत नाहीत’, म्‍हणून विरुध्‍द पक्षकारांचे सेवेमध्‍ये कमतरता सिध्‍द झाल्‍याचे मंचाचे मत आहे. चुकीचे, अयोग्‍य व निराधार कारण पुढे करुन तक्रारकर्त्‍याची न्‍याय्य व समर्थनीय मागणी फेटाळणे ही विरुध्‍द पक्षकारांची सेवेतील कमतरता असून, त्‍यामुळे तक्रारकर्तीला शारिरीक व मानसिक त्रास, मनस्‍ताप होणे स्‍वाभाविक आहे.
 
करिता आदेश पुढीलप्रमाणे -
-आदेश-
1)    तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येतो.
2)    विरुध्‍द पक्षकार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारकर्तीस विमा पॉलिसीची रक्‍कम  रु.6,31,500/-, तक्रार दाखल केल्‍यापासून प्रत्‍यक्ष मिळेपर्यंत द.सा.द.शे.9% व्‍याज      दराने द्यावी.
3)    विरुध्‍द पक्षकार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्‍यास शारिरीक व मानसिक त्रास,     मनस्‍ताप याकरीता नुकसान भरपाईपोटी रु.5,000/- द्यावेत.
4)    विरुध्‍द पक्षकार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्‍यास तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.3,000/- द्यावेत.
5)    विरुध्‍द पक्षकार क्र. 1 ते 3 यांनी आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या      तारखेपासून 30 दिवसांचे आत संयुक्‍तपणे किंवा पृथ्‍थकपणे करावी.
 
 
 
 
 
[HON'ABLE MR. AMOGH KALOTI]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. SATISH DESHMUKH]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.