Maharashtra

Nagpur

CC/11/210

Shri Nandlal G. Agrawal - Complainant(s)

Versus

National Insurance Co.Ltd. Through Div. Manager - Opp.Party(s)

Adv.RAJNIKANT THANVI

10 Jan 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/210
 
1. Shri Nandlal G. Agrawal
Sitabuldi
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. National Insurance Co.Ltd. Through Div. Manager
Laxminagar
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

( आदेश पारित द्वारा : श्री. विजयसिंह ना. राणे, अध्‍यक्ष )     
                आ दे श
                        ( पारित दिनांक : 10 जानेवारी 2012 )
 
यातील तक्रारदार श्री नंदलाल अग्रवाल यांची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, त्‍यांचेकडे दोन बजाज कंपनीची वाहने होती. सदर दोन्‍ही वाहने त्‍यांचे ठिकाणावरुन दिनांक 23/4/2006 आणि 24/12/2006 रोजी चोरीस गेली. सदर वाहनाचे क्रमांक अनुक्रम एमएच-31 यु -11 व एम एच-31 पी 2411 असे होते. त्‍याबाबत त्‍यांनी पोलीसांत तक्रार केली. तक्रारदाराने विमा कंपनीकडे वाहनांचा विमा काढलेला होता. तक्रारदाराने विमा कंपनीकडे विमा रक्‍कम अनुक्रम रुपये 10,500/- व 9,500/- एवढी किंमत दर्शवुन काढण्‍यात आली होती. त्‍यांचे कवर नोट नंबर एचएच-31/यु-11.272200/31/05/6200005060 व 272200/31/06/ 6200019 35 अशा आहेत व त्‍यांचा कालावधी दिनांक 10.10.2005 ते 09.10.2006 व 28.06.2006 ते 27.6.2007 पर्यत होता. मात्र विमा कंपनीने तक्रारदारास केवळ रुपये 5,000/- व 2,450/- एवढी रक्‍कम विमा दाव्‍यापोटी निघाल्‍याबद्दल देऊ केली व ती कमी असल्‍यामुळे तक्रारदाराने नाकारली व शेवटी ही तक्रार दाखल केली व ती द्वारे विमा दाव्‍यापोटी रुपये 10,500 व 9,500/- एवढी रक्‍कम मिळावी मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 25,000/- व कोर्ट खर्चाबाबत रुपये 10,000/- मिळावे अशी मागणी केली.
 
सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्‍यात आली. नोटीस प्राप्‍त होऊन गैरअर्जदार हजर झाले व त्‍यांनी आपला लेखी जवाब दाखल केला. 
 
गैरअर्जदाराने आपले उत्‍तरात तक्रारदाराची सर्व विपरित विधाने अमान्‍य केली व पुढे असे नमुद केले की, त्‍यांनी तक्रारदारास त्‍यांचे मुल्‍यांकन रिपोर्टचा विचार करुन योग्‍य किंमत देऊ केली , तक्रारदाराने ती नाकारली नाही. त्‍यामुळे गैरअर्जदाराचे सेवेत कोणतीही त्रुटी नाही आणि म्‍हणुन तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे. तसेच गैरअर्जदाराने तक्रार मुदतीत नाही असा आक्षेप घेतला.
 
#####-    का र ण मि मां सा    -#####
यातील गैरअर्जदाराचा मुदती संबंधीचा आक्षेप यासाठी विचारात घेण्‍याजोगा नाही कारण गैरअर्जदाराने दिनांक 18/8/2010 रोजी त्‍यांचेतर्फे प्रकरण बंद केल्‍याचे पत्र तक्रारदारास पाठविलेले आहे.
यातील वाहनांची पुर्ण किंमत तक्रारदारास मिळालेली नाही. वाहन जुने होते म्‍हणुन वाहनाची किंमत कमी असल्‍यामुळे याबाबत तक्रारदाराने सांगीतलेली किंमत, या रक्‍कमेवर आयडीव्‍ही ( Insured declared value ) याप्रमाणे दर्शविली होती. त्‍यावर त्‍यावर गैरअर्जदाराने विम्‍याचे प्रिमीयम घेतले. आता गैरअर्जदाराचे वाहनाची तेवढी किंमत नव्‍हती हे म्‍हणणे पुर्णतः चुकीचे, अनुचित व्‍यापारी प्रथेचे द्योतक व गैरकायदेशिर आहे  ही त्‍यांचे सेवेतील त्रुटी आहे. सबब आदेश
         -// अं ति म आ दे श //-
1.     तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2.    गैरअर्जदाराने तक्रारदारास रुपये 20,000/-(रुपये 10,500/- अधिक 9,500/-) दोन वाहनांची विमा रक्‍कम मिळुन त्‍यावर दिनांक 18/8/2010  पासुन 9 टक्‍के व्‍याजासह मिळुन येणारी रक्कम द्यावी.
3.    गैरअर्जदाराने तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्‍हणुन रुपये 2,000/-(केवळ दोन हजार रुपये) आणि तक्रारीचा खर्च म्‍हणुन रुपये 2,000/- (केवळ दोन हजार रुपये) असे एकुण 4,000/-रुपये द्यावे.
      वरील आदेशाचे पालन गैरअर्जदार यांनी आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासुन 30 दिवसांचे आत करावे न पेक्षा 9 टक्‍क्‍याऐवजी 12टक्‍के व्‍याज देय ठरतील.
     
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.