Maharashtra

Bhandara

CC/16/134

Hemant Ramchandra Deshmukh - Complainant(s)

Versus

National Insurance Co.Ltd through Branch Manager - Opp.Party(s)

Adv D.A.Nakhate

24 Aug 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/16/134
( Date of Filing : 28 Nov 2016 )
 
1. Hemant Ramchandra Deshmukh
R/o Rajendra Ward, Shukrawari Bhandara
Bhandara
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. National Insurance Co.Ltd through Branch Manager
Branch Z.P.Chowk ,Behind Gurjer Petrol Pump Bhandara
Bhandara
Maharashtra
2. Milind Udhav Gajbhiye
Bhage Mahari, Parshivani
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MS. SMITA N. CHANDEKAR MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 24 Aug 2018
Final Order / Judgement

                                                                                  :: निकालपत्र ::

        (पारीत व्‍दारा मा.सदस्‍या श्रीमती वृषाली गौ.जागीरदार)

                                                                   (पारीत दिनांक24 ऑगस्‍ट, 2018)   

01.  तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्‍दपक्षा विरुध्‍द विमाकृत वाहनाचे झालेल्‍या नुकसानीची भरपाई मिळावी या संबधाने दाखल केलेली आहे.

02.   तक्रारीचा आशय थोडक्‍यात खालील प्रमाणे-

      तक्रारकर्त्‍याचा खाजगी व्‍यवसाय असून व्‍यवसाय वाढीसाठी त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं-2) श्री मिलींद उध्‍दव गजभिये यांचे कडून दिनांक-04/03/2016 रोजी अशोक लेलॅन्‍ड कंपनीचा टिप्‍पर खरेदी केला व त्‍याचा मोटर वाहन क्रमांक-MH-40/Y-981 असा आहे. सदर खरेदी बाबत तक्रारकर्त्‍याच्‍या नावे नोंद उपप्रादेशिक परिवहन कार्यालय,भंडारा येथे दिनांक-19/03/2016 रोजी घेण्‍यात आली. तक्रारकर्ता हा सदर वाहनाचा उपयोग शेतमाल तसेच गिट्टीच्‍या वाहतुकी करीता करीत होता. सदर वाहनावर चालक म्‍हणून श्री जागेश्‍वर आनंदराव सावलकर याची नियुक्‍ती केली होती व त्‍याचे जवळ अधिकृत वाहन चालविण्‍याचा परवाना होता.

     तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, दिनांक-16/04/2016 रोजी सदर वाहन माल घेऊन भंडारा येथे येत असताना मौजा बडोदा पुलावर अचानक वाहनाला आग लागली व त्‍यात संपूर्ण वाहन जळाले,त्‍यावेळी सदर वाहन श्री जागेश्‍वर सावलकर चालवित होता. सदर अपघाताची फोनव्‍दारे तक्रारकर्त्‍यास माहिती प्राप्‍त होताच त्‍याने सदर घटनेची तक्रार पोलीस स्‍टेशन, मौदा येथे केली.  पोलीसांनी दुसरे दिवशी दिनांक-17/04/2016 रोजी जळालेल्‍या टिप्‍परचा मौका पंचनामा केला.सदर मौका पंचनाम्‍यात ट्रक जळाल्‍याने रुपये-4,00,000/- ते 5,00,000/- चे नुकसान झाल्‍याचे नमुद केले आहे. तक्रारकर्त्‍याने दिनांक-18.04.2016 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनीचे कार्यालयात घटनेची सुचना देऊन रुपये-7,00,000/- नुकसान भरपाईची मागणी केली व दिनांक-20/04/2016 रोजी विमा दावा प्रपत्र सुध्‍दा भरुन दिले. परंतु त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने दिनांक-01/08/2016 रोजीचे पत्रान्‍वये तक्रारकर्त्‍याचा विमा दावा या कारणास्‍तव खारीज केला की, अपघाताचे दिवशी दिनांक-16.04.2016 रोजी वाहनाचा विमा हा विरुध्‍दपक्ष क्रं-2) श्री मिलींद उध्‍दव गजभिये याचे नावाने होता, सदर वाहनाचा विमा हा तक्रारकर्ता याचे नावाने दिनांक-23.05.2016 रोजी हस्‍तांतरीत झाला. तक्रारकर्त्‍याने विमा दाव्‍या संबधी योग्‍य विचार व्‍हावा यासाठी 09.08.2016 रोजी अर्ज केल्‍या नंतर विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने दिनांक-19.08.2016 रोजीचे पत्रान्‍वये अपघाताचे दिवशी वाहनाचा विमा तक्रारकर्त्‍याचे नावे नसल्‍याने विमा दावा देय नसल्‍याचे कळविले.

    तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, सदर वाहनाचा विमा हा दिनांक-05/07/2016 पर्यंत वैध होता. अपघात झाल्‍या नंतर विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे सर्व्‍हेअर श्री आकरे, श्री पाटील व श्री व्‍हालीया यांनी क्षतीग्रस्‍त वाहनाची पाहणी करुन अहवाल विमा कंपनी कडे सादर केला होता. प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालयात वाहनाचे मालकीची नोंद तक्रारकर्त्‍याचे नावे दिनांक-19.03.2016 रोजी झाली होती. म्‍हणून त्‍याने विमाकृत वाहनाची नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी हकदार असून तक्रारकर्त्‍याने तक्रार दाखल करुन पुढील मागण्‍या केल्‍यात-

(1)   विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनीला विमाकृत वाहनाचे नुकसानी संबधाने रुपये-7,00,000/- भरपाई वार्षिक-18% दराने व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

(2)  तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-1,00,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-25,000/- विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

03.   विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे लेखी उत्‍तर दाखल करण्‍यात आले. त्‍यांचे लेखी उत्‍तरा मध्‍ये त्‍यांनी तक्रारकर्त्‍याची रुपये-7,00,000/- नुकसान भरपाई मिळण्‍या बाबतची मागणी नामंजूर केली ही बाब मान्‍य केली. तसेच विमाकृत वाहनाचा अपघात झाल्‍या नंतर सर्व्‍हेअरची नियुक्‍ती करुन अहवाल मागविण्‍यात आल्‍याची बाब मान्‍य केली.  विरुध्‍दपक्ष क्रं-1) ने तक्रारकर्त्‍याचे इतर परिच्‍छेद निहाय कथन अमान्‍य केले आहे. विरुध्‍दपक्षाने त्‍याचे विशेष कथनात असे नमुद केले आहे की, विमाकृत वाहनास अपघात झाल्‍याचे दिवशी वाहनाचा विमा हा तक्रारकर्त्‍याचे नावे नसून तो विरुध्‍दपक्ष क्रं-2) याचे नावाने होता. वाहनास अपघात दिनांक-16.04.2016 रोजी मौदा पोलीस स्‍टेशनचे हद्दीत झाला होता.  वाहनाचा विमा हा दिनांक-05.07.2015 ते दिनांक-05.07.2016 या कालावधी करीता विरुध्‍दपक्ष क्रं-2) मिलींद उध्‍दव गजभिये मूळ मालकाचेनावे होता. विरुध्‍दपक्ष क्रं-2) मिलींद गजभिये यांनी विमा कंपनीला वाहनाचा विमा तक्रारकर्त्‍याचे नावे हस्‍तांतरीत करण्‍या बाबत दिनांक-23.05.2016 रोजी लेखी कळविले होते यावरुन स्‍पष्‍ट होते की, अपघाताचे दिनांक-16.04.2016 रोजी वाहनाचा विमा तक्रारकर्त्‍याचे नावे नव्‍हता व तसे त्‍यांनी लेखी तक्रारकर्त्‍याला दिनांक-01.08.2016  आणि दिनांक-19.08.2016 रोजी कळविलेले आहे.

     विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे पुढे असे नमुद करण्‍यात आले की, Insurance Regulatory Development Authority (I.R.D.A.) Motor Guideline GR-17 प्रमाणे विमा पॉलिसीचे own damage च्‍या बाबतीत पॉलिसी पॅकेज हस्‍तांतरण ज्‍याला वाहन विकण्‍यात आले आहे त्‍याने हस्‍तांतरण करण्‍यासाठी लेखी सुचना विमा कंपनीला हस्‍तांतरणाचे दिनांका पासून 14 दिवसाचे आत केल्‍यास हस्‍तांतरणाचे दिनांका पासून नविन वाहन मालकाचे नावे विमा लागू होईल आणि हस्‍तांतरणाचे दिनांका पासून 14 दिवसा नंतर सुचना मिळाल्‍यास सुचना दिल्‍याचे दिनांका पासून नविन वाहन मालकाचे नावे विमा लागू होईल व नविन विमा पॉलिसीची प्रत (Certificate of Insurance) पुरविण्‍यात येईल अशी तरतुद असल्‍याचे नमुद केले. तक्रारकर्त्‍याने वाहन दिनांक-04/03/2016 रोजी खरेदी केले असून अपघात दिनांक-16/04/2016 रोजी झाला. विरुध्‍दपक्ष क्रं-2) श्री गजभिये यांनी, विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनीला दिनांक-23.05.2016 रोजी पॉलिसी ट्रॉन्‍सफर करण्‍यासाठी कळविले त्‍यामुळे सदर बिमा नियामक आणि विकास प्राधिकरण (I.R.D.A.) यांनी घालून दिलेल्‍या तरतुदीचे तक्रारकर्त्‍याने योग्‍य रितीने पालन न केल्‍याने तक्रारकर्त्‍याला विम्‍या संबधाने कोणतीही  भरपाई लागू होत नसल्‍याने तक्रार खारीज करण्‍याची विनंती विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे करण्‍यात आली.

04.   विरुध्‍दपक्ष क्रं-2) मिलींद उध्‍दव गजभिये (पूर्वीचा वाहन मालक) याला मंचाची रजिस्‍टर पोस्‍टाची नोटीस प्राप्‍त होऊनही तो मंचा समक्ष उपस्थित न झाल्‍याने त्‍याचे विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍यात आली.

05.   तक्रारकर्त्‍याने दस्‍तऐवज यादी पृष्‍ट क्रं-13 नुसार एकूण-12 कागदपत्रे दाखल केली आहेत. पृष्‍ट क्रं-52 वर तक्रारकर्त्‍याने पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले आहे. तसेच पृष्‍ट क्रं-61 वर लेखी युक्‍तीवाद दाखल केला. तसेच तक्रारीचे समर्थनार्थ मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निवाडयाची प्रत दाखल केली.

06.   विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने वर्णन यादी पृष्‍ट क्रं-70 नुसार एकूण-5 कागदपत्रे दाखल केलीत. तसेच पृष्‍ट क्रं-66 वर लेखी युक्‍तीवाद दाखल केला.

07.  तक्रारकर्त्‍याची तक्रार, विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनीचे लेखी उत्‍तर आणि उभय पक्षां तर्फे दाखल दस्‍तऐवजाचे काळजीपूर्वक अवलोकन करण्‍यात आले तसेच उभय पक्षां तर्फे त्‍यांचे वकीलांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकल्‍या नंतर मंचाचा निष्‍कर्ष पुढील प्रमाणे देण्‍यात येतो-

                                                                            ::निष्‍कर्ष::

08.   तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं-2) श्री मिलींद उध्‍दव गजभिये यांचे कडून दिनांक-04/03/2016 रोजी अशोक लेलॅन्‍ड कंपनीचा टिप्‍पर खरेदी केला असून त्‍याचा नोंदणीकृत क्रमांक-MH-40/Y-981 असा आहे. वाहनाचा विमा हा विरुध्‍दपक्ष क्रं-2) श्री गजभिये याचे नावे दिनांक-05.07.2015 ते दिनांक-05.07.2016 या कालावधी करीता होता. तक्रारकर्ता हा सदर वाहनाचा उपयोग गिट्टीच्‍या वाहतुकी करीता करीत होता. सदर वाहनावर अधिकृत वाहन चालक परवानाधारक श्री जागेश्‍वर आनंदराव सावलकर याची नियुक्‍ती केली होती. दिनांक-16.04.2016 रोजी मौदा, जिल्‍हा भंडारा पोलीस स्‍टेशनचे हद्दीत त्‍या वाहनास आग लागून ते मोठया प्रमाणावर क्षतीग्रस्‍त झाले. क्षतीग्रस्‍त वाहनाची पाहणी विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनीचे सर्व्‍हेअर यांनी करुन अहवाल  सुध्‍दा दिला. अपघाताचे दिवशी वाहनाचा विमा हा विरुध्‍दपक्ष क्रं-2) श्री मिलींद गजभिये यांचे नावे होता आणि विरुध्‍दपक्ष क्रं-2) मिलींद उध्‍दव गजभिये याने विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनीला वाहनाचा विमा तक्रारकर्त्‍याचे नावे हस्‍तांतरीत करण्‍या बाबत दिनांक-23.05.2016 रोजी लेखी कळविले होते या सर्व बाबी उभय पक्षांना मान्‍य आहेत.

09.    या प्रकरणा मध्‍ये वादाचा मुद्दा असा आहे की, अपघाताचे दिनांक-16.04.2016 रोजी वाहनाचा विमा तक्रारकर्त्‍याचे नावे नव्‍हता त्‍यामुळे Insurance Regulatory Development Authority Motor Guideline GR-17 मधील तरतुदी प्रमाणे तक्रारकर्त्‍याला विमाकृत वाहनाचे नुकसानी संबधाने विमा राशी देय नसल्‍याचे विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनीचे म्‍हणणे आहे. या उलट तक्रारकर्त्‍याचे असे म्‍हणणे आहे की, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालयात वाहनाचे मालकीची नोंद तक्रारकर्त्‍याचे नावे दिनांक-19.03.2016 रोजी झाली होती आणि अपघाताचे दिवशी वाहन हे अधिकृत वाहन चालक परवानाधारक चालवित होता. तसेच अपघाताचे वेळी वाहनाचा विमा वैध होता त्‍यामुळे तो विमा कंपनी कडून नुसार भरपाई मिळण्‍यास हकदार आहे.

10.  थोडक्‍यात वाहन अपघात दिनांक-16.04.2016 रोजी वाहनाचा विमा तक्रारकर्त्‍याचे नावे नव्‍हता त्‍यामुळे कायदेशीर तरतुदी नुसार त्‍याला विमाकृत वाहनाचे नुकसानी बाबत भरपाई देय आहे किंवा नाही हा मुद्दा  येथे निर्णयार्थ आहे.

11.  या संदर्भात तक्रारकर्त्‍या तर्फे मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने “The New India Assurance Co.Ltd-Versus- Smte. Sheela Rani & Ors” या अपिल प्रकरणात दिनांक-15 सप्‍टेंबर, 1998 रोजी दिलेल्‍या आदेशावर आपली भिस्‍त ठेवली.

     सदर निकालपत्रात  नविन मोटर वाहन कायद्दाच्‍या कलम-157 अनुसार खालील प्रमाणे नमुद आहे-

             It is only in respect of third party risks that Section 157 of the New Act provides that the certificate of insurance together with the policy of insurance described therein “shall be deemed to have been transferred in favour of the person to whom the motor vehicle is transferred”.

      उपरोक्‍त नमुद अटी प्रमाणे तिस-या पक्षाला झालेल्‍या नुकसान भरपाई प्रकरणात विमा जोखीम संबधाने वाहन हस्‍तांतरीत होताना आपोआपच वाहनाचा विमा हा हस्‍तांतरीत होईल असे नमुद आहे मंचाचे समोरील प्रकरणात देखील तिस-या पक्षास झालेल्‍या नुकसान भरपाई संबधी विमा जोखीम मागणी केलेली नसून तक्रारकर्त्‍याने स्‍वतःच्‍या वाहन क्षतीपूर्ती करीता नुकसान भरपाई मागितली आहे, त्‍यामुळे सदर तरतुद हातातील प्रकरणात लागू होत नाही.

        सदर निकालपत्रात पुढे असेही नमुद आहे की-

             “ If the policy of insurance covers other risks as well, e.g., damage caused to the vehicle of the insured himself, that would be a matter falling outside Chapter XI of the New Act and in the realm of contract for which there must be an agreement between the insurer and the transferee, the former undertaking to cover the risk or damage to the vehicle.  In the present case since there was no such agreement and since the insurer had not transferred the policy of insurance in relation there to the transferee, the insurer was not liable to make good the damage to the Vehicle”.

     उपरोक्‍त नमुद अटी प्रमाणे जर वाहनाचे नुकसानी संबधाने विमा जोखीम असल्‍यास नविन कायद्दातील Chapter XI चे बाहेरील बाब आहे आणि विमा हा विमा कंपनी आणि ज्‍याचे नावावर विमा हस्‍तांतरीत झालेला आहे यांचेतील एक करार असून वाहनास झालेल्‍या नुकसानी संबधीची जोखीम विमा कंपनीने घेतलेली आहे. सदर प्रकरणात विमा पॉलिसी हस्‍तांतरीत झालेली नसल्‍याने विमा कंपनीची वाहनास झालेल्‍या नुकसानी संबधाने भरपाई देण्‍याची जबाबदारी येत नाही त्‍यामुळे मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने घेतलेली भूमीका योग्‍य असल्‍याचे मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने मत उपरोक्‍त नमुद अपिलीय प्रकरणात नोंदविलेले आहे.

       तक्रारकर्त्‍याने त्‍याची भिस्‍त ठेवलेला उपरोक्‍त न्‍यायनिवाडा हा त्‍याचे तक्रारीस दुजोरा देत नाही, याउलट विरुध्‍दपक्ष विमा कंपनीच्‍या विमा दावा नाकारणाच्‍या कृतीस पृष्‍टी देत आहे.  हातातील प्रकरणात  अपघाताचे दिवशी तक्रारकर्त्‍याचे नावे विमा पॉलिसी हस्‍तांतरीत झालेली नसल्‍यामुळे, तक्रारकर्ता आणि विरुध्‍दापक्ष विमा कंपनी यांचे मध्‍ये विमा करार अस्तित्‍वात नसल्‍याने तक्रारकर्त्‍याचे वाहनास झालेल्‍या नुकसानी संबधाने भरपाई देण्‍याची जबाबदारी ही विरुध्‍दपक्ष विमा कंपनीवर येत नाही असे मंचाचे मत आहे.  

 

12.   मंचा तर्फे 2018 (1) CPR 42 (NC) – “Gurbinder Singh Cheema-Versus-New India Assurance Company Ltd” या मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाच्‍या निवाडयावर भिस्‍त ठेवण्‍यात येते. सदर प्रकरणात मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने असे नमुद केले आहे की, मोटर वाहन कायद्दाचे कलम-50  आणि 157 वर भिस्‍त ठेवण्‍यात येऊन असे नमुद करण्‍यात आले की, अपघाताचे दिवशी अर्जदाराचे नावे वाहनाची विमा पॉलिसी हस्‍तांतरीत झालेली नव्‍हती, ती पूर्वीच्‍या वाहन मालकाचे नावानेच होती, त्‍यामुळे मोटर वाहन कायद्दाचे कलम-50  आणि 157  अनुसार अपघातामुळे वाहनास झालेल्‍या नुकसानी संबधी अर्जदारास भरपाई देण्‍याची जबाबदारी विमा कंपनीवर येत नसल्‍याचे स्‍पष्‍ट नमुद केलेले आहे. हातातील प्रकरणात सुध्‍दा तक्रारकर्त्‍याचे नावे अपघाताचे दिवशी वाहनाची विमा पॉलिसी हस्‍तांतरीत झालेली नव्‍हती, त्‍यामुळे सदर तरतुद हातातील प्रकरणात सुध्‍दा तंतोतंत लागू होते.

13.     उपरोक्‍त नमुद मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयात मोटर वाहन कायद्दा-1998 च्‍या कलम-157 च्‍या तरतुदी दिलेल्‍या आहेत, त्‍याचा उल्‍लेख करणे आवश्‍यक आहे-

           157.Transfer of certificate of insurance”.

 

(1)        Where a person in whose favour the certificate of insurance has been issued in accordance with the provisions of this Chapter transfers to another person the ownership of the motor vehicle in respect of which such insurance was taken together with the policy of insurance relating thereto, the certificate of insurance and the policy described in the certificate shall be deemed to have been transferred in favour of the person to whom the motor vehicle is transferred with effect from the  date of transferred.

 

(2)      The transferee shall apply within fourteen days from the date of transfer in the prescribed form to the insurer for making necessary changes in regard to the fact of transfer in the certificate of insurance and the policy described in the certificate in his favour and the insurer shall make the necessary changes in the certificate and the policy of insurance in regard to the transfer of insurance”.

    उपरोक्‍त नमुद तरतुदी प्रमाणे ज्‍याचे नावाने वाहनाची मालकी हस्‍तांतरीत करण्‍यात आलेली आहे, त्‍याचे नावे वाहनाचा विमा हस्‍तांतरणाचे दिवशी हस्‍तांतरीत होईल या करीता वाहनाचे हस्‍तांतरण झालेल्‍या व्‍यक्‍तीने वाहत त्‍याचे नावे नोंदणीकृत झाल्‍या पासून 14 दिवसांचे आत विहित नमुन्‍यात विमा कंपनीकडे विमा प्रमाणपत्रातील वाहन मालकाचे नावातील बदला संबधी अर्ज करणे आवश्‍यक आहे आणि असा अर्ज विमा कंपनीला प्राप्‍त झाल्‍या नंतर त्‍यांनी विमा प्रमाणपत्र आणि विमा पॉलिसीमध्‍ये नविन वाहन मालकाचे नावे योग्‍य ते बदल करावेत अशी कायदेशीर तरतुद आहे.  परंतु हातातील प्रकरणात वाहनास अपघात झाल्‍याचा दिनांक-16.04.2016 पर्यंत तसेच वाहन त्‍याचे नावे नोंदविण्‍यात आले त्‍या दिवशी म्‍हणजे दि.-19.03.2016 पासून 14 दिवसांचे आत तक्रारकर्त्‍याने विकत घेतलेल्‍या वाहना संबधी विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला त्‍याचे नावाने विमा प्रमाणपत्र व विमा पॉलिसी मध्‍ये त्‍याचे नावाने बदल करण्‍या बाबत कळविलेले नव्‍हते तर वाहनाचा विमा तक्रारकर्त्‍याचे नावे हस्‍तांतरीत करण्‍या बाबत विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनीला दिनांक-23.05.2016 रोजी  म्‍हणजे वाहनाचे अपघाता नंतर उशिराने लेखी कळविले होते त्‍यामुळे  अपघाताचे वेळी वाहनाचा विमा तक्रारकर्त्‍याच्‍या नावे नसल्‍यामुळे उपरोक्‍त मोटर वाहन कायद्दा-1998 च्‍या कलम-157 च्‍या तरतुदी प्रमाणे तक्रारकर्त्‍याचे वाहनास झालेल्‍या नुकसानी संबधाने भरपाई देण्‍याची तरतुद विरुध्‍दपक्ष विमा कंपनीवर येत नाही असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  

 

14.   वरील तरतुदींचा विचार करता तक्रारकर्त्‍याने वाहन विकत घेतल्‍यानंतर 14 दिवसांचे आंत विमा कंपनीकडे अर्ज करुन उर्वरित कालावधीसाठी पॉलीसी स्‍वतःच्‍या नावाने ट्रॉन्‍स्‍फर करुन घेणे आवश्‍यक होते, परंतु तसे न केल्‍यामुळे जरी वाहनाची मालकी तक्रारकर्त्‍याचे नावाने ट्रॉन्‍स्‍फर झाली असली तरी मुळ मालकाने काढलेल्‍या पॉलीसीचे विमा संरक्षण तक्रारकर्त्‍यास मिळू शकत नाही. सदर कारणामुळे तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नामंजूरीची विरुध्‍दपक्ष विमा कंपनीची कृती मोटार वाहन कायदा व विमा पॉलीसीच्‍या तरतुदीस अनुसरुन असल्‍याने त्‍याव्‍दारे वि.प. विमा कंपनी कडून तक्रारकर्त्‍याच्‍या सेवेत कोणताही न्‍युनतापूर्ण व्‍यवहार किंवा अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब झालेला नाही.

15.  वरील निष्‍कर्षाप्रमाणे विरुध्‍दपक्षा कडून सेवेत न्‍युनतापूर्ण व्‍यवहार किंवा अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब झाला नसल्‍याने तक्रारकर्ता  कोणतीही दाद मिळण्‍यास पात्र नाही, त्‍यावरुन मंच तक्रारी मध्‍ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-

                                                                ::आदेश::

1)   तक्रारकर्त्‍याची विरुध्‍दपक्ष क्रं-1) व विरुध्‍दपक्ष क्रं-2) विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

2)    खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.

3)   निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.

4)    तक्रारकर्त्‍याला “ब” व “क” फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात.

 

 

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
[HON'BLE MS. SMITA N. CHANDEKAR]
MEMBER
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.