Maharashtra

Chandrapur

EA/11/51

Ajay Champalalji Jaiswal - Complainant(s)

Versus

National Insurance Co.Ltd through Branch Manager - Opp.Party(s)

Adv A.U.Kullarwar

11 Jan 2012

ORDER

 
Execution Application No. EA/11/51
 
1. Ajay Champalalji Jaiswal
R/o Sarkar Nagar,Mul Road,Chandrapur
Chandrapur
M.S.
...........Appellant(s)
Versus
1. National Insurance Co.Ltd through Branch Manager
Infront of Zilla Parishad,Main Road,Chandrapur
Chandrapur
M.S.
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HONORABLE Shri Anil. N.Kamble PRESIDENT
 HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar MEMBER
 
PRESENT:Adv A.U.Kullarwar, Advocate for the Appellant 1
 
ORDER

    :::  आदेश निशानी 1 वर   :::

          (मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्‍यक्ष)

                  (पारीत दिनांक : 11. 01 .2012)

 

1.           सदर दरखास्‍त ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 27 अन्‍वये दाखल केलेली आहे.  दरखास्‍त पडताळणी बयान घेतल्‍यानंतर प्राथमिक सुनावणीकरीता ठेवण्‍यात आले.

2           अर्जदाराचे वकिलाचा युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. गैरअर्जदार यांचे विरुध्‍द प्रोसेस काढण्‍यात यावे असे युक्‍तीवादात सांगितले.  अर्जदार यांनी दरखास्‍त सोबत      3 दस्‍तऐवज दाखल केले.  त्‍यामध्‍ये तक्रार क्रमांक 66/08 च्‍या आदेशाची प्रत, अपील क्रमांक 1029/08 च्‍या आदेशाची प्रत व गैरअर्जदारास दिलेल्‍या पञाची झेरॉक्‍स प्रत दाखल केलेली आहे. सदर दरखास्‍त पडताळणी बयानाकरीता असतांना गैरअर्जदारांनी मा.राज्‍य आयोगाने अपीलात पारीत केलेल्‍या आदेशानुसार रु.3,62,763/- दि.23/11/2011 ला मंचात जमा केले.  त्‍याची प्रत या दरखास्‍त सोबत नि. 5 वर जोडण्‍यात आलेली आहे. 

 

3           अर्जदार/फिर्यादी यांचे वकिलांनी केलेल्‍या युक्‍तीवादावरुन आणि उपलब्‍ध असलेल्‍या रेकॉर्डवरुन गैरअर्जदार यांचे विरुध्‍द फौजदारी न्‍यायसंहितेच्‍या कलम 190 नुसार दखल घेण्‍याजोगे दिसून येत नाही.  गैरअर्जदार यांनी अपीलाचा निकाल लागल्‍यानंतर, फिर्याद पडताळणी बयान होण्‍यापूर्वी मंचात, आदेशाची पूर्तता करण्‍याकरीता रक्‍कम जमा केलेली आहे.  त्‍यामुळे त्‍याचे विरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 27 नुसार प्रोसेस (समन्‍स) काढणे न्‍ययोचित होणार नाही.  अर्जदार व त्‍यांचे वकिल यांना आदेशाप्रमाणे फार मोठी रक्‍कम जमा केली असल्‍याचे रेकॉर्डवरुन दिसून येत आहे असे सांगितले.  गैरअर्जदार यांनी दि.23/11/2011 ला चेक क्रमांक 002712 रु.3,62,763/- दि.17/11/2011 चा जमा केलेला आहे. आणि फक्‍त सात-आठ दिवसाच्‍या व्‍याजाचे रकमेकरिता गैरअर्जदाराविरुध्‍द प्रोसेस काढण्‍याची विनंती अर्जदार करीत आहे.  वास्‍तविक गैरअर्जदार यांनी फार मोठी रक्‍कम आदेशानुसार जमा केलेली आहे.  अर्जदारास काही आठ ते दहा दिवसाच्‍या व्‍याजाची रक्‍कम घेणे असेल ती ग्राहक संरक्षण कायदयाच्‍या कलम 25 नुसार वसुलीस प्राप्‍त आहे.  परंतु गैरअर्जदार यांनी आदेशाची पूर्तता करण्‍याच्‍या दृष्टिने चेक व्‍दारे मंचात जमा केला असल्‍याने, त्‍याचे विरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 27 नुसार प्रोसेस/समन्‍स काढणे न्‍यायोचित होणार नाही.  अर्जदाराची दरखास्‍त सुनावणीतच दखल घेण्‍या योग्‍य नाही असे दाखल दस्‍तऐवजावरुन दिसून येतो.  सबब दरखास्‍त खारीज करण्‍यात येत आहे.

                       

चंद्रपूर,

‌दिनांक : 11/01/2012.

 
 
[HONORABLE Shri Anil. N.Kamble]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.