नि. २५
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १६७८/०९
-------------------------------------------
तक्रारनोंद तारीख : ९/३/२००९
तक्रार दाखल तारीख : २६/३/२००९
निकाल तारीख : २७/९/२०११
--------------------------------------------------------------
१. श्रीमती जयश्री महालिंगा वाली,
व.व.४४, व्यवसाय – शेती व घरकाम
रा.दरीकोणूर, ता.जत जि.सांगली ..... तक्रारदारú
विरुध्दù
१. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि.एम
जैन बोर्डींग, हायस्कूल रोड, सांगली
२. कार्यकारी अधिकारी,
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि.
सांगली, मुख्य कार्यालय –
कर्मवीर भाऊराव चौक, सांगली
३. सोरडी सर्व सेवा सह.सोसायटी लि.सोरडी
मु.पो.सोरडी, ता.जत जि.सांगली .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷श्री एम.एन.शेटे
जाबदार क्र.१ तर्फे : +ìb÷ श्री एम.डी.वाघ, श्री एस.पी.कुलकर्णी
जाबदार क्र.२ तर्फे: +ìb÷.श्री व्ही.जी.शेटे
जाबदार क्र.३ : एकतर्फा
नि का ल प त्र
द्वारा- अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज हा अपघात विमा दाव्याबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार हे जाबदार क्र.३ यांचे सभासद असून जाबदार क्र.२ व ३ यांचे कर्जदार आहेत. जाबदार क्र.३ यांच्या कर्जदार सभासदासाठी जाबदार क्र.२ यांनी जाबदार क्र.१ यांचेबरोबर विष्णूआण्णा शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यासाठी विमा करार केलाआहे. तक्रारदार यांचे पती यांचा दि.२२/१२/२००२ रोजी खून झाला आहे. तक्रारदार हे विष्णूआण्णा शेतकरी अपघात विमा योजनेचे लाभार्थी असल्याने त्यांनी जानेवारी २००३ मध्ये जाबदार क्र.३ यांचेकडे क्लेम प्रपोजल तयार करुन दिलेले आहे व त्याबाबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे दिली. सदर क्लेमबाबत जाबदार क्र.३ यांनी योग्य ती चौकशी करुन जाबदार क्र.२ यांचेमार्फत जाबदार क्र.१ यांचेकडे विमाप्रस्ताव पाठविला. जाबदार यांचेकडे विमा क्लेम दाखल करुनही जाबदार यांनी विमादाव्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने ६ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार क्र.२ यांनी याकामी नि.१२ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार क्र.२ यांनी तक्रारदार हे त्यांचे ग्राहक नाहीत. तसेच जाबदार क्र.३ यांचेकडून विमा प्रस्ताव आलेनंतर योग्य त्या कागदपत्रांसह जाबदार क्र.१ यांचेकडे विमादावा दाखल केला आहे. तक्रारदार यांना विमादाव्यापोटी रक्कम देण्याची जबाबदारी जाबदार क्र.१ यांची आहे. जाबदार क्र.२ यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिली नाही. त्यामुळे जाबदार क्र.२ विरुध्दचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.२ यांनी नमूद केले आहे. जाबदार क्र.२ यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.१३ ला प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
४. जाबदार क्र.३ यांना नोटीसची बजावणी होवूनही ते याकामी हजर झाले नसल्यामुळे त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.१ वर करण्यात आला.
५. जाबदार क्र.१ यांनी नि.१६ ला आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार क्र.१ यांनी तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी विमा पॉलिसीबाबतचा मजकूर मान्य केला आहे. परंतु तक्रारदार यांचे पती यांचा दि.२२/१२/२००२ रोजी खून झाला ही गोष्ट अमान्य केली आहे. सदर झालेल्या घटनेबाबत जाबदार यांना दि.६/२/२००३ पर्यंत काहीही कळविलेले नाही. जाबदार क्र.३ यांचेकडून माहिती मिळालेवर सदर जाबदार यांनी दि.१०/२/२००३ चे पत्राने सदर विमादाव्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील हे तात्काळ जाबदार क्र.३ यांना कळविले आहे. परंतु जाबदार क्र.२ व ३ यांनी मागणीप्रमाणे कागदपत्रे पाठविली नाहीत, त्यामुळे सदर क्लेमबाबत कोणताही निर्णय घेता आलेला नाही. जाबदार क्र.२ यांनी दि.१०/९/२००८ रोजी सदरील जाबदार यांना तक्रारदार यांचा विमादावा प्रलंबित आहे असे कळविले होते. सदरच्या पत्राला जाबदार यांनी दि.१६/९/२००८ रोजी उत्तर पाठविले आहे. तथापि, जाबदार यांनी त्याप्रमाणे पूर्तता केली नाही. अशा प्रकारे जाबदार क्र.२ व ३ यांना वेळोवेळी संधी देवूनही त्यांनी पूर्तता केली नाही. त्यामुळे सदरचा विमादावा मुदतबाहय झाला आहे. त्यामुळे तक्रारदार यांचा तक्रारअर्ज मंजूर होणेस पात्र नाही. जाबदार यांनी नि.१७ ला शपथपत्र व नि.१८ चे यादीने एक कागद दाखल केला आहे.
६. तक्रारदार यांनी नि.१९ ला आपले प्रतिउत्तर दाखल केले आहे व नि.२० ला प्रतिउत्तराच्या पुष्ठयर्थ शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदार यांनी त्यांचे प्रतिउत्तरामध्ये जाबदार क्र.१ यांचे म्हणण्यातील मजकूर नाकारला आहे. तक्रारदार यांनी नि.२२ ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे व नि.२३ च्या यादीने निवाडे दाखल केले आहेत. जाबदार क्र.२ यांनी नि.२४ ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. जाबदार क्र.१ यांनी आपला लेखी युक्तिवाद दाखल केलेला नाही व तोंडी युक्तिवादाचेवेळी जाबदार क्र.१ उपस्थित राहिले नाहीत.
७. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, दाखल करण्यात आलेली कागदपत्रे, दोन्ही बाजूंनी दाखल करण्यात आलेला लेखी युक्तिवाद व ऐकण्यात आलेला तोंडी युक्तिवाद यावरुन खालील मुद्दे मंचाचे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
१. तक्रारदार ग्राहक म्हणून सदरहू तक्रारअर्ज
दाखल करु शकतात का ? होय.
२. विमा कंपनीने तक्रारदार यांना सदोष सेवा
दिली आहे का ? व तक्रारदार मागणीप्रमाणे अनुतोष
मिळणेस पात्र आहे का ? होय.
३. तक्रारअर्ज मुदतबाहय झाला आहे का ? नाही.
४. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
विवेचन
८. मुद्दा क्र.१ –
तक्रारदार यांचा तक्रारअर्ज व दाखल कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता जाबदार क्र.२ यांनी जाबदार क्र.३ यांच्या सभासदांसाठी जाबदार क्र.१ यांचेबरोबर विमा करार केला आहे. तक्रारदार यांचे पती हे जाबदार क्र.३ यांचे सभासद आहेत. त्यामुळे सदर विमा योजनेनुसार तक्रारदार हे लाभार्थी होतात व ग्राहक संरक्षण कायद्यातील ग्राहक या शब्दाचे व्याख्येनुसार तक्रारदार हे जाबदार क्र.१ यांचे लाभार्थी या नात्याने ग्राहक ठरतात असा या मंचाचा निष्कर्ष आहे.
९. मुद्दा क्र.२ -
तक्रारदार व जाबदार क्र.२ व जाबदार क्र.१ यांचेमध्ये झालेल्या विमापॉलिसीची प्रत जाबदार क्र.१ यांनी नि.१८/१ ला दाखल केली आहे. सदर विमा पॉलिसीवरुन पॉलिसीचा कालावधी हा दि.२/१२/२००२ ते १/१२/२००७ असा आहे. सदर पॉलिसी कालावधीमध्ये तक्रारदार यांचे पती यांचा दि.२२/१२/२००२ रोजी खून झाला असे तक्रारदार यांनी नमूद केले आहे. जाबदार क्र.२ यांनी तक्रारदार यांचा विमाक्लेम जाबदार क्र.१ यांचेकडे वेळेत पाठविला आहे, असे जाबदार क्र.२ यांनी त्यांचे म्हणणेमध्ये नमूद केले आहे. जाबदार यांनी आपले म्हणण्यामध्ये तक्रारदाराचा खून झाला ही बाब नाकारली आहे. परंतु तक्रारदार यांनी याकामी दाखल केलेल्या शवविच्छेदन अहवालाची प्रत पाहता, मृत्यूचे कारण हे Death due to injuries sustained during assault असे नमूद केले आहे. त्यामुळे सदरचा पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट व तक्रारदार यांनी शपथेवर केलेले कथन विचारात घेता तक्रारदार यांचे पती यांचा खून झाला होता हे स्पष्ट होते. जाबदार क्र.१ यांनी सदरची बाब नाकारण्यापलिकडे कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर आणला नाही त्यामुळे जाबदार यांच्या सदरच्या कथनामध्ये कोणतेही तथ्य नाही असे या मंचाचे मत आहे. तक्रारदार यांनी सदरची योजना अपघातग्रस्तांसाठी आहे व खून हा अपघात या सदरात मोडतो हे दर्शविण्यासाठी सन्मा.राज्य आयोग छत्तीसगढ यांचा 2010 (1) CPR Page 152 हा निवाडा दाखल केला आहे. सदर निवाडयामध्ये सन्मा.राज्य आयोग यांनी All murders are accidental deaths as such deaths are not natural or suicidal असा निष्कर्ष काढला आहे. सदर निष्कर्षाचे अवलोकन केले असता व जाबदार क्र.१ यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये याबाबत कोणताही ऊहापोह केला नसल्याने तक्रारदार यांचे पती यांचा विमा मुदतीत अपघाती मृत्यू झाला ही गोष्ट प्रामुख्याने पुढे येते. दाखल पॉलिसीचे अवलोकन केले असता सदरची विमा पॉलिसी ही रक्कम रु.५०,०००/- साठी असल्याने व मयत महालिंगा वाली यांच्या तक्रारदार या कायदेशीर वारस असल्याने तक्रारदार हे रक्कम मिळणेस पात्र आहेत. जाबदार क्र.१ यांनी तक्रारदार यांचे विमादाव्याबाबत कोणताही निर्णय मुदतीत न घेतल्याने तक्रारदार यांचे पतीच्या मृत्यू तारखेपासून सदरची रक्कम व्याजासह मंजूर करणेत येत आहे.
१०. मुद्दा क्र.३
जाबदार क्र.१ यांनी याकामी मुदतीबाबत आक्षेप घेतला आहे. जाबदार क्र.१ यांनी तक्रारदार यांचे विमादाव्याबाबत आवश्यक त्या कागदपत्रांची मागणी केली होती परंतु कागदपत्रे जाबदार क्र.२ व ३ यांनी सादर केली नाही. जाबदार क्र.२ व ३ यांना लेखी पत्राने कळविले होते हे दर्शविण्यासाठी जाबदार क्र.१ यांनी कोणताही कागदोपत्री पुरावा सादर केलेला नाही किंवा तक्रारदार यांचा विमादावा नाकारला याबाबतही काही कळविले होते हे दर्शविण्यासाठी कोणताही पुरावा मंचासमोर आणलेला नाही. त्यामुळे जाबदार क्र.१ यांनी मुदतीबाबत घेतलेल्या आक्षेपामध्ये कोणतेही तथ्य नाही असे या मंचाचे मत आहे.
११. तक्रारदार यांनी शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चाची मागणी केली आहे. तक्रारदार यांचे विमादाव्याबाबत जाबदार यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे तक्रारदार यांना सदर मंचामध्ये धाव घ्यावी लागली, ही बाब विचारात घेता सदरची मागणी अंशत: मंजूर करणेत येत आहे. तक्रारदार हे जाबदार क्र.१ यांचे विमा सेवा मिळणेसाठी ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला असलेने सदरचा आदेश जाबदार क्र.१ यांचेविरुध्द करणेत येतो.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहेत.
२. तक्रारदार यांना जाबदार नं.१ यांनी विमा दाव्यापोटी रक्कम रुपये ५०,०००/-(अक्षरी रुपये पन्नास हजार माञ) तक्रारदार यांचे पतीचे मृत्यू तारखेपासून म्हणजे दि.२२/१२/२००२ पासून द.सा.द.शे.९% दराने व्याजासह अदा करावेत.
३. तक्रारदार यांना जाबदार क्र.१ यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रुपये ५,०००/- (अक्षरी रुपये पाच हजार माञ) अदा करावेत.
४. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार नं.१ यांनी दिनांक १०/११/२०११ पर्यंत करणेची आहे.
५. जाबदार नं.१ यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. २७/०९/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११
जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११