View 24222 Cases Against National Insurance
Ms. Jyoti Interprises through Partner Shantilal Khimaji Dediya filed a consumer case on 08 Apr 2015 against National Insurance Co. in the Akola Consumer Court. The case no is CC/14/60 and the judgment uploaded on 11 May 2015.
विद्यमान जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,
यांचे न्यायालयासमोर
अकोला, (महाराष्ट्र ) 444 001
प्रकरण क्रमांक 60/2014 दाखल दिनांक : 01/04/2014
नोटीस तामिल दि. 22/02/2014
निर्णय दिनांक : 08/04/2015
निर्णय कालावधी : 12म.07 दि.
अर्जदार / तक्रारकर्ते :- मे.ज्योती इंटरप्राईजेस,
पंजीकृत भागीदारी संस्था,
तर्फे भागीदार शांतीलाल खीमजी देडीया,
वय 65 वर्षे, धंदा व्यापार,
रा. द्वारा कांतीलाल खीमजी ॲन्ड
कंपनी,राजुरकर कंपाउंड, तिलक रोड,
अकोला, ता.जि. अकोला
//विरुध्द //
गैरअर्जदार/ विरुध्दपक्ष :- 1. नॅशनल इन्शुरंस कंपनी
गांधी रोड, खुले नाट्य गृहासमोर,
अकोला, ता.जि. अकोला,
मार्फत वरीष्ट विभागीय व्यवस्थापक,
2. नॅशनल इन्शुरंस कंपनी,
मार्फत जनरल मॅनेजर, हेड ऑफीस,
3, मिडलटन स्ट्रिट,कोलकत्ता 700071
- - - - - - - - - - - - - -
जिल्हा मंचाचे पदाधिकारी :- 1) आ.श्रीमती एस.एम.उंटवाले, अध्यक्ष
2) आ.श्री कैलास वानखडे, सदस्य
3) आ.श्रीमती भारती केतकर, सदस्या
तक्रारकर्ते यांचे तर्फे :- ॲङ आर.बी. सोमाणी
विरुध्दपक्ष यांचे तर्फे :- ॲङ.एस.के.सुरेका
::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 08/04/2015 )
आदरणीय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, …
तक्रारकर्ते ही भागीदारी संस्था आहे व त्यांचा दालमिल व्यवसाय एम.आय.डी.सी. अकोला येथे आहे. तक्रारकर्ते तुरडाळ बनवितात व ट्रकद्वारे 50 किलोचे कट्टे पॅक करुन व्यापा-यांना बाहेरगावी पाठवितात. या करिता विमा संरक्षण होण्याकरिता तक्रारकर्ते विरुध्दपक्षाकडून विमा पॉलिसी घेतात. अशाच प्रकारे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे दि. 17/05/2012 पासून दि. 16/7/2013 पर्यंत प्रत्येक वाहतुकीचे कमाल 18 लाख रुपयाचे असे एकुण तिन करोड रुपयांचा विमा विरुध्दपक्षाकडून पॉलिसी क्र. 281600/21/11/4400000033 नुसार मरीन कार्गो ओपन पॉलिसी विमा हप्ता भरुन घेतलेला आहे. तक्रारकर्त्याने दि. 12/07/2012 रोजी 50 किलो प्रत्येकी असे 320 कट्टयांमध्ये एकूण 16000/- किलो ( सोळा टन ) तुरडाळ अकोला ते अलुवा व कोचीन ( केरला ) करिता बालाजी ट्रान्सपोर्ट एजंन्सी अकोला मार्फत पाठविली. सदर माल ट्रक क्र. एम.एच. 35/1651 द्वारे एल.आर.क्र. 2020 दि. 12/07/2012 नुसार केरला तामीलनाडू रोड लाईनला भरला आणि सदर माल हैद्राबाद येथून लॉरी नं. के.ए 21/डी 6156 मध्ये क्रॉसींग होऊन दि. 19/07/2012 रोजी आलुवा तथा कोचीन करिता रवाना झाला . पावसाळा सुरु झाला होता व प्रवासादरम्यान पावसामुळे काही माल/कट्टे खराब झाल्याची सुचना तक्रारकर्त्याला मिळाली व त्याने लगेच या विषयी विरुध्दपक्षाला लेखी सुचना दिली व ट्रांसपोर्ट मार्फत कोणत्या पार्टीला किती माल गेलेला आहे, असे स्पष्ट कळविले. सदर बाब ही दि. 23/07/2012 रोजी लेखी स्वरुपात दिल्यावर तक्रारकर्त्याने त्यावर विरुध्दपक्षाची पोच घेतली. तक्रारकर्त्याच्या माहिती प्रमाणे तक्रारकर्त्याच्या लेखी सुचनेवरुन किन रिक्स इन्शुरंस कोची, सर्व्हेअरची नियुक्ती केली आणि सर्व्हेअरने तुर डाळीच्या मालाला झालेल्या नुकसानीची पाहणी करुन आकलन केले. तक्रारकर्त्याने किन रिक्स इन्शुरंस कोची यांचे दि. 23/01/2013 चे बिल रु. 3770/- देखील अदा केले. तक्रारकर्त्याला सर्व्हे रिपोर्ट दि. 04/01/2013 ची प्रत मिळाली, सदर सर्व्हेअरच्या अहवालावरुन स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याच्या मालाचे नुकसान झालेले आहे आणि ते अदा करण्याचे सर्व्हेअरने विमा कंपनीला सुचविले. दि. 21/03/2013 रोजी मरीन इन्शुरंस क्लेम फॉर्म पुर्ण भरुन सोबत संबंधीत ट्रान्सपोर्टच्या बिल्ट्या व इतर दस्तऐवज जोडून विरुध्दपक्षाकडे सादर केले. परंतु तक्रारकर्त्याला कोणतीही रक्कम अदा करण्यात आली नाही. विरुध्दपक्षाने दि. 13/3/2013 चे पत्रानुसार काही दस्तऐवजांची मागणी केली. तक्रारकर्त्याने त्वरीत सर्व दस्तऐवजांची पुर्तता करुन दि. 19/03/2013 रोजी सर्व दस्तऐवज पुन्हा सादर केले. तक्रारकर्त्याने दि. 17/04/2013 रोजी क्लेम त्वरीत सेटल करण्याची विनंती केली, पुन्हा दि. 30/04/2013 रोजी स्मरणपत्र पाठविले, या दरम्यान दि. 30/04/2013 चे विरुध्दपक्षाचे पत्र दि. 8/5/2013 ला मिळाल्यावर तक्रारकर्त्याने त्यातील सुचनेनुसार संपुर्ण दस्तऐवजांची पुन्हा दि. 17/5/2013 रोजी पुर्तता केली. त्यानंतर दि. 30/8/2013 चे पत्र विरुध्दपक्षाकडून मिळाले व त्याबद्दल तक्रारकर्त्याने दि. 19/9/2013 रोजी पुन्हा लेखी स्वरुपात आपली नाराजी दर्शविली. विरुध्दपक्षाने दर वेळेला काहीना काही नविन दस्तऐवजांची मागणी करुन तक्रारकर्त्याचा क्लेम रोखून धरला होता. तक्रारकर्त्याने वरीष्ठांकडे तक्रारी केल्यामुळे विरुध्दपक्षाचे अधिका-यांनी चिडून जाऊन तक्रारकर्त्याचा क्लेम “ नो क्लेम” म्हणून दि. 30/8/2013 चे पत्रानुसार बंद केल्याचे कळविले. या बाबत तक्रारकर्त्याने पुन्हा दि. 19/9/2013 रोजी पत्र पाठवले. अशा प्रकारे विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचा रास्त क्लेम विनाकारण पहीले वेठीस धरला व नंतर “ नो क्लेम” म्हणून बंद केला, विरुध्दपक्षाची ही कृती अनुचित व्यापार प्रथा या सदराखाली मोडते. विरुध्दपक्षाच्या सुचनेनुसार तक्रारकर्त्याने हैद्राबाद ते कोची चे ट्रान्सपोर्टरला वकीलामार्फत दि. 25/02/2013 रोजी नोटीस पाठविली व नुकसान भरपाईची मागणी केली. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करुन विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला पॉलिसी अंतर्गत “ नो क्लेम” म्हणून कळविले, ही विरुध्दपक्षाची कृती अनुचित व्यापार प्रथा व दोषपुर्ण सेवा आहे, असे जाहीर करावे. तक्रारकर्त्यास एकूण नुकसान भरपाई रु. 1,12,116/- विरुध्दपक्षाकडून मिळावी. प्रस्तुत तक्रारीचा खर्च रु. 10,000/- तक्रारकर्त्याला देण्याचा आदेश व्हावा.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 27 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांचा लेखीजवाब :-
2. सदर तक्रारीचे अनुषंगाने, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी आपला संयुक्त लेखीजवाब, शपथेवर दाखल केला त्यानुसार तक्रारकर्त्यांच्या तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबुल करुन असे नमुद केले आहे की,…
विरुध्दपक्ष ही राष्ट्रीयकृत विमा कंपनी आहे. विरुध्दपक्षाचे क्लेम मॅन्युअलनुसार वादग्रस्त प्रकरणामध्ये तक्रारकर्त्याला ट्रांसपोर्टर कडून शॉर्टेज / डॅमेज सर्टीफिकेट सादर करणे आवश्यक असते. सदरचे शार्टेज / डॅमेज सर्टीफिकेट तक्रारकर्त्याला मागणी करुनही त्याने सादर केलेले नाही. विरुध्दपक्षाने वारंवार तक्रारकर्त्याला आवश्यक दस्तऐवज दाखल करण्यासाठी दि. 28/5/2013, 30/8/2013, 21/11/2013, 30/4/2013, 15/3/2013, 21/1/2013, 28/9/2012 अन्वये वेळोवेळी कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी लेखी पत्रे पाठविली. तसेच इश्युरन्स सर्व्हेअर यांनी सुध्दा त्यांचे दि. 4/1/2013 चे अहवालामध्ये आवश्यक दस्तऐवज दाखल करण्याचा उल्लेख केलेला आहे. तरी सुध्दा तक्रारकर्त्याने सदरची आवश्यक दस्तऐवज दाखल केले नाहीत. त्यामुळे विरुध्दपक्षाकडून सेवा देण्यामध्ये कोणतीही न्युनता झालेली नाही.
सदर लेखी जवाब प्रतिज्ञालेखावर दाखल करण्यात आला आहे.
3. त्यानंतर तक्रारकर्त्यातर्फे प्रतीज्ञालेखावर पुरावा दाखल करण्यात आला व दोन्ही पक्षांतर्फे तोंडी युक्तीवाद करण्यात आला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. या प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचा संयुक्त लेखी जवाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्ते यांचा प्रतिज्ञालेखाद्वारे पुरावा व उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद याचे काळजीपुर्वक अवलोकन केल्यास असे निदर्शनास येते की, या प्रकरणात विरुध्दपक्ष यांच्या युक्तीवादानुसार व दाखल जबाबावरुन त्यांना तक्रारकर्ते यांच्या तक्रारीतील काही मजकुराबद्दल वाद नाही, जसे की, विरुध्दपक्षाला हे मान्य आहे की, तक्रारकर्ते संस्थेचा दालमिलचा व्यवसाय आहे व त्यांनी विरुध्दपक्षाकडून मरीन कार्गो ओपन पॉलिसी दि.17/5/2012 ते 16/7/2013 या कालावधी पर्यंत काढलेली होती. सदर पॉलिसीच्या विमाराशी व हप्त्यांबद्दल उभय पक्षात वाद नाही. तक्रारकर्ते यांनी त्यांचा माल, किचन क्विन नावाची डाळ अकोला ते अलुवा व कोचीन ( कोची) ( केरला ) करिता बालाजी ट्रान्सपोर्ट एजन्सी अकोला मार्फत पाठविली असता, पावसामुळे त्यातील काही माल / कट्टे प्रवासादरम्यान खराब झाले, अशी सुचना तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्षाला देवून, त्या बाबत विमा क्लेम रक्कम मिळण्यासाठी विरुध्दपक्षाकडे विमा दावा दाखल केला होता, या बद्दलही विरुध्दपक्षाचा आक्षेप नाही. तसेच हा विमा दावा सेटल करण्याकरिता सर्व्हेअरची नियुक्ती, ही तुर डाळीच्या मालाला झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता झालेली होती, हे ही उभय पक्षाला मान्य आहे. ह्या सर्व्हेअरने काढलेले नुकसानीचे आकलन रु. 32,946/- व सर्व्हेअरला तक्रारकर्त्याने अदा केलेली सर्व्हेअर फी रु. 3,770/- ह्या रकमेबाबत विरुध्दपक्षाने कोणताही लेखी / तोंडी आक्षेप मंचात नोंदविलेला नाही. विरुध्दपक्षाच्या मते त्यांच्या क्लेम मॅन्युअलनुसार तक्रारकर्त्याला ट्रान्पोर्टरकडून शॉर्टेज / डॅमेज सर्टीफिकेट सादर करणे आवश्यक असते, ते विरुध्दपक्षाने अनेकदा मागणी करुनही तक्रारकर्त्याने सादर केले नाही. तसेच इन्शुरन्स सर्व्हेअरने देखील त्यांच्या अहवालामध्ये हे दस्त तक्रारकर्त्याने सादर करावे, असा उल्लेख आहे. त्यामुळे विरुध्दपक्षाला मागणी केलेला क्लेम देता येणे शक्य नाही, असे आहे. विरुध्दपक्षाने रेकॉर्डवर “क्लेम गाईड” हा दस्त दाखल केला आहे. परंतु त्यात General documents व Other documents depending on the nature of claim ही जी यादी आहे, त्यानुसार आवश्यक ते कागदपत्रे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे पाठविलेले आहेत, असे दाखल दस्तांवरुन दिसून येते. शिवाय डॅमेज सर्टीफिकेट शिवाय सर्व्हेअरने झालेल्या नुकसानीचे जे आकलन काढलेले आहे, ते देण्यास विरुध्दपक्षाला हरकत नव्हती. कारण विमा दावा सेटल करण्यासाठी जरी कागदपत्रांची यादी उपलब्ध असली तरी, त्या यादीमधील असे दस्तऐवज की ज्यावरुन झालेल्या नुकसानीचे आकलन सहज होते, त्यावरुन क्लेम सेटल करण्यास हरकत नसावी, असे मंचाला वाटते. शिवाय सर्व्हेअरने वादातील नुकसानीची पाहणी करुन जे आकलन केले, या बाबत विरुध्दपक्षाला कोणताही आक्षेप नव्हता. त्यामुळे केवळ डॅमेज सर्टीफिकेट तक्रारकर्त्याने पुरविले नाही, म्हणून काहीच नुकसान झाले नाही, असे विरुध्दपक्षाचे जे मत आहे, ते अयोग्य आहे. तक्रारकर्ते यांनी रेकॉर्डवर उभय पक्षात झालेला सर्व पत्र व्यवहार दाखल केला आहे. त्यावरुन असे दिसते की, तक्रारकर्त्याच्या वादातील मालाचे नुकसान हे पावसामुळे झालेले आहे व सर्व्हे अहवालात त्या बद्दलचे योग्य स्पष्टीकरण नमुद आहे, शिवाय या सर्टीफिकेट शिवाय तक्रारकर्त्याचा क्लेम सेटल करा, असे विरुध्दपक्षाला कळविणारे पत्र तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला पाठविलेले आहे. तरी विरुध्दपक्षाने डॅमेज सर्टीफिकेटच पाहीजे, असे हेकेखोरपणाचे धोरण अवलंबुन, स्वत: सर्व्हेअरचा रिपोर्ट दुर्लक्षीत केला आहे. डॅमेज सर्टीफिकेट नसल्याने नुकसान भरपाई रक्कम असेस करण्यात सर्वेअरला कुठलीही अडचण आलेली नाही, त्यामुळे विरुध्दपक्षाने तक्रारकर्ते यांना सर्व्हेअरने केलेल्या नुकसानीचे आकलन रु. 32,946/- त्याबद्दलची तक्रारकर्त्याने अदा केलेली सर्व्हेअर फी रु. 3,770/- ईतकी रक्कम सव्याज, इतर नुकसान भरपाईसह तसेच प्रकरण खर्चासह तक्रारकर्ते यांना अदा केल्यास ते न्यायोचित होईल, या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे. तक्रारकर्ते यांनी मागणी केलेली इतर रक्कम, जी धरुनच सर्व्हेअरने लॉस असेस केला आहे, त्यामुळे ती नामंजुर केली आहे.
सबब अंतिम आदेश पारीत केला तो येणे प्रमाणे….
:::अं ति म आ दे श:::
( कैलास वानखडे ) (श्रीमती भारती केतकर ) (सौ.एस.एम.उंटवाले )
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,अकोला
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.