जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 209/2008. प्रकरण दाखल तारीख - 09/06/2008 प्रकरण निकाल तारीख - 11/09/2008 समक्ष – मा.श्री.सतीश सामते - अध्यक्ष (प्र.) मा.श्रीमती.सुजाता पाटणकर - सदस्या. शेख खदीर शेख हसन वय 39 वर्षे धंदा काहीच नाही. अर्जदार. रा. हजरत पिरबू-हान नगर, नांदेड जि. नांदेड. विरुध्द. नॅशनल इन्शूरन्स कंपनी लि. मार्फत शाखा व्यवस्थापक, नॅशनल इन्शूरन्स कंपनी लि. गैरअर्जदार नगीना घाट रोड, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड. अशफाक अहमद गैरअर्जदार तर्फे वकील - अड.जी.एस.औढेंकर. निकालपञ (द्वारा - मा.सतीश सामते, अध्यक्ष (प्र.) ) अर्जदार यांनी गैरअर्जदार नॅशनल इन्शूरन्स कंपनी यांनी अर्जदाराचा क्लेम नाकारल्या बददल तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची पॉलिसी नंबर 270601/47/51/9601431/98 अशी असून त्यांचा कालावधी दि.03.02.1999 ते 02.02.2014 असा आहे, पॉलिसी रु.1,00,000/- ची आहे. अर्जदार हे मजूरीचे काम करतात. त्यांनी दि.24.06.2006 रोजी मोबाईलच्या लोंखडी टावरवर काम करीत असताना अचानक पाय घसरुन खाली पडून त्यामूळे त्यांचे पायास फ्रक्चंर झाले. अशा प्रकारचा तक्रार अर्ज दाखल केला आहे. यावीषयी खाजगी तक्रार आरसीएस नंबर 925/2006 इस्माईल खान विरुध्द एम. राजेश दाखल केलेली आहे व प्रस्तूत प्रकरण हे आधी या मंचात दाखल करुन तक्रार क्र.318/2007 दाखल केलेले होते.परंतु ती प्रिमॅच्यूअर तक्रार असल्याकारणाने मंचाने फेटाळली होती, म्हणून अर्जदाराने नवीन तक्रार दाखल केली आहे. त्यामूळे अर्जदाराने रु.1,00,000/- विम्याचे मिळावेत अशी मागणी केली आहे. यावर गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले, त्यांनी आपले म्हणणे दाखल केले आहे. त्यांनी सर्वप्रथम लिमिटेशनचा मूददा उपस्थित केला आहे. दूसरा मूददा उपस्थित केला की, तक्रार ही या मंचात चालविण्यात आली होती तिचा निकाल झालेला आहे म्हणून ती रेसज्यूडिकेटा होते या कायदयाच्या आधारे खारीज करण्यात यावी असा आक्षेप घेतला आहे. दूसरी बाब अर्जदार यांनी एफ.आय.आर., स्पॉट पंचनामा, व फॉर्म बी प्रमाणपञ त्यांचेकडे दिले नाही व गैरअर्जदार यांनी दिलेल्या पॉलिसीप्रमाणे 12 महिन्याचे आंत त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडे क्लेम दाखल केला पाहिजे. तसेच पॉलिसीमधील नियम व अटीप्रमाणे सेक्शन VIII वैयक्तीक अपघात विमा याप्रमाणे दोन डोळे, एक हात, एक पाय किंवा दोन्ही हात किंवा दोन्ही पाय अशी 100 टक्के इन्जूंरी असेल तर त्यांची पूर्णपणे रक्कम मिळते परंतु कायमचा एक हात किंवा एक डोळा किंवा एक पाय यात कायमचे अपंगत्व आले असेल तर विम्याची अर्धी रक्कम मिळते असे म्हटले आहे. यापेक्षा कमी अपंगत्व असेल तर कोणतीही रक्कम देय नाही असे म्हटले आहे. म्हणून त्यांने या आधारावर व कागदपञे मिळाले नसल्याच्या कारणावरुन क्लेम नाकारला आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केले आहे, दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार यांचा तक्रार अर्ज रेसज्यूडिकेटा या कायदयाखाली रदद होईल काय नाही. 2. गैरअर्जदार यांच्या सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय नाही. 3. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी यापूर्वी या मंचात प्रकरण नंबर 318/2007 दाखल केले होते परंतु हे प्रकरण निकाली काढीत असताना यांचा निकाल मेरिटवर झाला नाही व प्रिमॅच्यूअरर्ड स्वरुपाचा क्लेम असल्याकारणाने गैरअर्जदार यांनी क्लेम सेंटलच केला नाही, त्यामूळे निकालपञात अर्जदार हे विमा कंपनीकडे आवश्यक कागदपञासह आपला क्लेम परत दाखल करु शकतील असे म्हटले आहे. तक्रार अर्ज हा आदेशाप्रमाणेच परत दाखल झालेला आहे. गैरअर्जदार यांचा आक्षेपाप्रमाणे तक्रार अर्ज हा रेसज्यूडिकेटा या कायदयाखाली येणार नाही. यावर आम्ही Res-judicata :- Applicability- matter not finally decided on merit filing on fresh complaint not mit by resjudicata order-2, Rule-2 not applicable to consumer proceedings Goa-UJrban C0-op. Bank Ltd. Vs. Iramklin Norousha Vol. III (2008) CPJ -12 (NC) यांचा आधार घेऊन हे प्रकरण रेसज्यूडीकेटा होणार नाही हे ठरवित आहोत. मूददा क्र. 2 ः- अर्जदार यांनी दाखल केलेले प्रकरण नंबर 318/2007 यांचा निकाल दि.01.04.2008 रोजी झालेला आहे. त्यामूळे हे प्रकरण मूदतबाहय नाही हे स्पष्ट होते. गैरअर्जदार यांनी दि.6.6.2008 रोजी अर्जदाराच्या नांवे पञ लिहून एफ.आय.आर., स्पॉट पंचनामा, व प्रमाणपञ दाखल केलेले नाही असे म्हटले आहे व त्यांनी दाखल केलेलया कागदपञावरुन त्यांचा दावा हा जनता वैयक्तीक अपघात विमा यात यात नाही. शिवाय अर्जदार शेख खदीर यांनी झालेली दूखापत पूर्ण अपंगत्वामध्ये येत नाही. म्हणून पक्षकाराचा दावा नामंजूर करण्यारत आलेला आहे असे पञ पाठविले आहे. मूख्यतः अर्जदाराने फॉर्म-बी जो दाखल केलेला आहे यावर 40 टक्के permanent disability असा उल्लेख केलेला आहे व पायाची हालचाल ही Calcaneum c Rerfrictul movements of leg fort. असे म्हटले आहे. अर्जदाराने ही पॉलिसी दाखल केलेली आहे त्यात रुल नंबर डि याप्रमाणे जर एखादया अर्जदारास कायमचे 100 टक्के अंपगत्व आले असेल तरच विम्याची अर्धी रक्कम देय होऊ शकते व दोन अवयवास कायमचे अपंगत्व 100 टक्के आले असेल तर विम्याची पूर्ण रक्कम मिळते. यात अर्जदार यांनी पायाला फक्त 40 टक्के अपंगत्व आहे. त्यामूळे पॉलिसीतील नियम व अटीप्रमाणे एक अवयवाला 100 टक्के अपंगत्व नसल्या कारणाने विमा पॉलिसीतील नियम नंबर डि प्रमाणे ही रक्कम त्यांना मिळणार नाही. यामध्ये गैरअर्जदार यांनी घेतलेला आक्षेप व नामंजूर केलेला क्लेम या त्यांनी योग्य नियमाच्या आधारावर नामंजूर केलेला आहे व तो योग्य आहे असे आम्ही ठरवित आहोत. म्हणून अर्जदाराचा क्लेम नामंजूर करुन गैरअर्जदारांनी सेवेत ञूटी केलेली नाही हे सिध्द होते. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांची तक्रार खारीज करण्यात येते. 2. पक्षकारानी खर्च आपआपला सोसावा. 3. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते सदस्या अध्यक्ष (प्र.) जे. यु. पारवेकर लघूलेखक |