Maharashtra

Nagpur

CC/826/2015

RAJIV VIJAY PANCHMATIYA - Complainant(s)

Versus

NATIONAL INSURANCE CO. LTD. - Opp.Party(s)

SHREE. S. B. SOLAT

17 Mar 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/826/2015
( Date of Filing : 21 Dec 2015 )
 
1. RAJIV VIJAY PANCHMATIYA
R/O. GULMOHAR BUILD., CIVIL LINES, NAGPUR-01
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. NATIONAL INSURANCE CO. LTD.
3, MEEDILTON STREET, KOLKATA-700071
KOLKATA
KOLKATA
2. NATIONAL INSURANCE CO. LTD.
DIVISIONAL OFF. NO.4, DURGA SADAN, PLOT NO. 40, BALRAJ MARG, DHANTOLI, NAGPUR-440012
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:SHREE. S. B. SOLAT, Advocate for the Complainant 1
 A.R.Godbole, Advocate for the Opp. Party 1
Dated : 17 Mar 2021
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा.आजने यांच्‍या आदेशान्‍वये -   

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, त्‍याचे वापरात असलेले  Jaguar XF, हे मोटर वाहन दि. 04.07.2013 ते 03.07.2014 या कालावधीकरिता पॉलिसी क्रं. 281800/31/14/6100003847 अन्‍वये विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे विमाकृत केले होते. तक्रारकर्ता वाहनाचा खाजगी कामाकरिता वापर करीत होता व इतर वेळी वाहन तक्रारकर्त्‍याच्‍या घरी गेटच्‍या आतील भागात व्‍यवस्थितपणे स्‍थानापन्‍न करुन ठेवण्‍यात येत होते. दि. 31.07.2013 रोजी तक्रारकर्ता राहत असलेल्‍या भागात मुसळधार पाऊस पडला व त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने दि. 01.09.2013 रोजी कार सुरु करण्‍याचा प्रयत्‍न केला असता कार सुरु होऊ शकली नाही. त्‍यामुळे दुस-या दिवशी तज्ञ कारागिराला बोलावून कार सुरु करण्‍याचा प्रयत्‍न केला. उपरोक्‍त कालावधीत तक्रारकर्त्‍याने मुंबई औरंगाबाद येथील तज्ञं व्‍यक्‍तीची कार सुरु करण्‍याबाबत मदत घेण्‍याचा प्रयत्‍न केला, परंतु तक्रारकर्त्‍याची मोटर कार सुरु होऊ शकली नाही.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, दि. 03.09.2013 रोजी विरुध्‍द पक्षाला कार सुरु होत नसल्‍याचे कळविले आणि कार सुरु करण्‍यास येणा-या खर्चाकरिता जबाबदारी राहील अशी जाणीव दिली. परंतु विरुध्‍द पक्षाने त्‍याबाबत ठोस कार्यवाही केली नाही, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दि. 27.09.2013 रोजी लेखी पत्र पाठवून मोटर कारच्‍या बिघाडाबाबत आणि त्‍याकरिता  प्रयत्‍नाबाबत कळविले. तक्रारकर्त्‍याने सतीश मोटर्स प्रा.लि. औरंगाबाद यांच्‍याकडून वाहन दुरुस्‍तीबाबतचे रुपये 3,15,726.56 इतक्‍या रक्‍कमेचे लेखी विवरण प्राप्‍त केले. तक्रारकर्त्‍याने सतीश मोटर्स प्रा.लि. औरंगाबाद यांच्‍याकडून वाहन दुरुस्‍तीकरिता आणि आवश्‍यक संपूर्ण तारयंत्रणा सुरळीत करण्‍यासंबंधी अंदाजित खर्चा संबंधीचे विवरण प्राप्‍त केले होते आणि त्‍यानुसार सतीश मोटर्स प्रा.लि.यांनी दि. 24.10.2013 रोजी तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाकरिता येणारा खर्च रु. 5,04,097/- बाबत लेखी विवरण दिले होते.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, विरुध्‍द पक्ष विमा कंपनीने दि. 08.10.2013 रोजी  श्री. सतीश टी. पटेल यांची तक्रारकर्त्‍याचे वाहन तपासणीकरिता सर्व्‍हेअर म्‍हणून नियुक्‍ती केली. त्‍याप्रमाणे सर्व्‍हेअरने तक्रारकर्त्‍याच्‍या मोटर वाहनाचे संपूर्णपणे निरीक्षण करुन एकूण खर्च रुपये 4,18,910/- अंदाजित असल्‍याबाबत संपूर्ण विवरणासह सर्व्‍हे रिपोर्ट संदर्भ पत्र क्रं. एफ.एस.5001/14, दिनांक 24.03.2014 रोजी विरुध्‍द पक्षाकडे सादर केला. विरुध्‍द पक्षाने सर्व्‍हे रिपोर्टची प्रत तक्रारकर्त्‍याला  न दिल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने सदरच्‍या रिपोर्टची प्रत माहिती अधिकार कायद्या अंतर्गत मागितली व ती विरुध्‍द पक्षाने संदर्भ क्रं.281800/आर.टी.आय./2015 अंतर्गत दि. 01.04.2014 रोजी पाठविली.  विरुध्‍द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याला दि. 05.01.2014 रोजी पत्र पाठवून त्‍या द्वारे तक्रारकर्त्‍याचा विमा दावा रक्‍कम देण्‍यास असमर्थता दर्शविली आणि पत्रात नमूद बाबीची पूर्तता करण्‍याचे सूचविले. तक्रारकर्त्‍याने मोटर वाहनाच्‍या अपघाताबाबत आणि ना-दुरुस्‍तीबाबत संपूर्ण दस्‍तावेज वि.प.च्‍या निदर्शनास आणून  दिले व मोटर वाहनाच्‍या खर्चाची रक्‍कम देण्‍याबाबत दि. 30.02.2015 आणि दि. 04.02.2015 ला रजिस्‍टर्ड पत्राद्वारे कळविले. विरुध्‍द पक्षाने दि. 12.02.2015 ला तक्रारकर्त्‍याला पत्र पाठवून तक्रारकर्त्‍याच्‍या मोटर वाहनाच्‍या खर्चाच्‍या रक्‍कमेचा क्‍लेम ना मंजूर केला, म्‍हणून तक्रारकर्त्‍याने  प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने तक्रारी अशी मागणी केली की, तक्रारकर्त्‍याची तक्रार मंजूर करावी व विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा सर्व्‍हे रिपोर्ट प्रमाणे रुपये 4,18,910/- तक्रारकर्त्‍याला अदा करावा व सदर रक्‍कमेवर क्‍लेम सादर केल्‍याच्‍या तारखेपासून 18 टक्‍के दराने व्‍याज देण्‍याचा ही आदेश द्यावा. तसेच शारीरिक मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा आदेश द्यावा.

 

  1.      विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी आपला लेखी जबाब एकत्रित दाखल केला असून त्‍यात नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या मोटर कारचा विमा दि. 04.07.2014 ते दि. 03.07.2015 या कालावधीकरिता विरुध्‍द पक्ष 2 कडून काढला होता. तक्रारकर्त्‍याच्‍या म्‍हणण्‍यानुसार दि. 31.07.2013 रोजी अतिवृष्‍टीमुळे तक्रारकर्त्‍याची कार खराब झाली व काहीही काम नसल्‍यामुळे जवळपास एक महिना कालावधीपर्यंत कार सुरु करुन पाहिली नाही किंवा पाऊसामुळे कारची परिस्थिती सुध्‍दा पाहण्‍याचा प्रयत्‍न केला नाही आणि तब्‍बल एक महिन्‍यानंतर दि. 01.09.2013 रोजी कार सुरु करण्‍याचा प्रयत्‍न केला असता कार सुरु होत नाही म्‍हणून मॅकनिकला बोलावून निरीक्षण केले असता सदरची कार ही पाऊसामुळे खराब झाली. तक्रारकर्त्‍याची सदरची विधाने ही निष्‍काळजीपणाची मर्यादा पूर्णपणे ओलांडून सदरचा क्‍लेम केलेला आहे. तक्रारकर्त्‍याच्‍या मोटर कारचे जे नुकसान झालेले आहे ते तक्रारकर्त्‍याच्‍या निष्‍काळजीपणाचे परिणाम असल्‍यामुळे सदरचा क्‍लेम विरुध्‍द पक्षाला देणे शक्‍य नाही.

 

  1.      विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने दि. 03.09.2013 रोजी कार सुरु होत नसल्‍याचे विरुध्‍द पक्षाला कळविले हे कथन खोटे असून तक्रारकर्त्‍याने प्रथमतः दि. 27.09.2013 चे पत्रानुसार कळविले होते. विमा दावा मागणीसाठी  कारण हे दि. 31.07.2013 रोजी घडले असून त्‍याबाबत विरुध्‍द पक्षाला दि. 27.09.2013 रोजी म्‍हणजेच अंदाजे 2 महिन्‍यात कळविले. म्‍हणून त्‍या एकमेव विलंब कारणास्‍तव तक्रारकर्त्‍याचा विमा दावा मंजूर करणे योग्‍य नसून  विरुध्‍द पक्षाने योग्‍य कारणाने विमा दावा नामंजूर केलेला आहे.  तक्रारकर्त्‍याने सतीश मोटर्स औरंगाबाद कडून अंदाजे रु.3,15,726.56 पै. चे दिनांक 04.10.2013 चे खर्चाचे विवरण प्राप्‍त केले. परंतु वाहनाचे कुठल्‍याही प्रकारचे नुकसान हे अंदाजपत्रकानुसार ग्राहय नाही. तक्रारकर्त्‍याने सतीश मोटर्स औरंगाबाद कडून अंदाजे रुपये 5,04,097/- चे दि. 24.10.2013 चे खर्चाचे विवरण प्राप्‍त केले. म्‍हणजे फक्‍त 20 दिवसामध्‍ये अंदाजे खर्चाचे विवरण साधारणपणे रुपये 1,88,370.44 पै. ने जास्‍त झाले. तक्रारकर्त्‍याने विमा दावा मिळविण्‍याकरिता जास्‍तीत जास्‍त रक्‍कमेचे अंदाजपत्रक प्राप्‍त केलेले आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाची तपासणी करिता व अहवाल सादर करण्‍याकरिता सर्वेअर म्‍हणून श्री.सतीश पटेल याची नियुक्‍ती केली होती. त्‍यानुसार सर्व्‍हेअरने वाहनाचे रुपये 4,18,310/- चे नुकसान ग्राहय धरले हे बरोबर नसून दाखल दस्‍तावेजावरुन ती रक्‍कम रुपये 4,16,910/- अशी आहे. तक्रारकर्त्‍याने दि. 03.02.2015 व दि. 04.02.2015  चे रजिस्‍टर्ड पत्रानुसार खर्चाची रक्‍कम देण्‍याची विनंती केली हे कथन अमान्‍य असून तक्रारकर्त्‍याने दि. 30.01.2015 चे पत्र दि. 04.02.2015 रोजी रजिस्‍टर्ड करुन पाठविलेले आहे. विरुध्‍द पक्षाने  तक्रारकर्त्‍याला दि. 12.02.2015 चे पत्रान्‍वये विमा पत्राचे क्‍लॉज 1 व 4 मधील शर्ती व अटीचे उल्‍लंघन केल्‍यामुळे नाकारला असल्‍याचे कळविले आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला कुठल्‍याही प्रकारची दोषपूर्ण सेवा दिलेली नसून त्‍याने अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही, म्‍हणून सदरची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केलेली आहे.

 

  1.      उभय पक्षांनी दाखल केलेले दस्‍तावेज व त्‍यांच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

    अ.क्रं.                          मुद्दे                                        उत्‍तर

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?          होय

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन

अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला काय ?होय

 

2. काय आदेश ?                                    अंतिम आदेशाप्रमाणे

 

  •                                                                                 निष्‍कर्ष

 

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत - तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 2 कडून दि. 04.07.2013 ते 03.07.2014 या कालावधीकरिता पॉलिसी क्रं. 281800/31/14/6100003657 अन्‍वये विमाकृत केली होती, यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक ठरतो याबाबत उभय पक्षात वाद नाही. तक्रारकर्त्‍याने दि. 31.07.2013 ला अपघात घडल्‍याच्‍या तारखेपासून एक महिना पेक्षा जास्‍त विलंबाने म्‍हणजेच दि. 03.09.2013 ला अपघाताबाबतची माहिती दिल्‍याच्‍या कारणाने विरुध्‍द पक्षाने  दि. 05.01.2014 च्‍या पत्रान्‍वये विमा दावा नाकारलेला असल्‍याचे नि.क्रं. 2(7) वरील दस्‍तावेजावरुन दिसून येते. परंतु  दि. 31.07.2013 रोजी तक्रारकर्ता राहत असलेल्‍या भागात मुसळधार पाऊस पडला व जवळपास तक्रारकर्त्‍याने सदरची मोटर कार दिनांक 01.09.2013 रोजी सुरु करण्‍याचा प्रयत्‍न केला असता कार सुरु न झाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने जवळपासच्‍या मॅकनिकला बोलावून गाडी सुरु करण्‍याचा प्रयत्‍न केला परंतु कार सुरु न झाल्‍यामुळे  तक्रारकर्त्‍याने मुंबई, औरंगाबाद येथील तज्‍ज्ञ व्‍यक्‍तींची कार सुरु करण्‍याबाबत मदत घेण्‍याचा बराच प्रयत्‍न  करुन ही तक्रारकर्त्‍याची मोटर कार सुरु होऊ शकली नाही. याबाबत तक्रारकर्त्‍याने दि. 27.09.2013 रोजी विरुध्‍द पक्षाला लेखी पत्र पाठवून मोटर कारच्‍या बिघाडाबाबत व त्‍याबाबत कराव्‍या  लागणा-या प्रयत्‍नाबाबत कळविले असल्‍याचे दस्‍तावेज नि.क्रं. 2(3) वर दाखल केलेले आहे. तसेच नि.क्रं. 16 सोबत दाखल केलेल्‍या पॉलिसीतील शर्ती व अट क्रं. 1 मध्‍ये नमूद आहे की, ...

Notice shall be given in writing to the company immediately upon the occurrence of any accidental loss of damage in the event of any claim and thereafter the insured shall give all such information and assistance as the company shall require.

 

तक्रारकर्तीची मोटर कार दि. 31.07.2013 रोजी झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे सुरु होत नसल्‍याची बाब तक्रारकर्त्‍याला दि. 01.09.2013 रोजी निदर्शनास येताच त्‍याने विरुध्‍द पक्ष विमा कंपनीला दि 03.09.2013 ला कळविलेले आहे व ही बाब विरुध्‍द पक्षाने विमा दावा नाकारल्‍याच्‍या पत्रात नमूद केले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तीचे उल्‍लंघन केले नाही असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

  1.      तक्रारकर्त्‍याने सतीश मोटर्स प्रा.लि. औरंगाबाद यांच्‍याकडून अंदाजे खर्चाबाबतचे विवरण प्राप्‍त केले होते आणि त्‍यानुसार सतीश मोटर्स प्रा.लि. यांनी दि. 04.10.2013 रोजी तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनास येणारा खर्च रुपये 3,15,726.56 पै. बाबत लेखी विवरण दिले होते. परंतु विरुध्‍द पक्षाच्‍या सर्वेअरच्‍या दाखल केलेल्‍या दस्‍तावेज अहवालाप्रमाणे तक्रारकर्त्‍याच्‍या मोटर कारचे रुपये 4,16,910/- चे नुकसान झालेले असल्‍याचे दिसून येते. म्‍हणून तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाच्‍या सर्वेअरने दाखल केलेल्‍या अहवालाप्रमाणे मोटर कारच्‍या नुकसानीकरिता रक्‍कम रुपये 4,16,910/- ही रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहे.

 

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

                        

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला सर्वेअर रिपोर्टप्रमाण विमा दावा रक्‍कम रुपये 4,16,910/- व त्‍यावर दि. 12.02.2015 पासून तर प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगी पर्यंत द.सा.द.शे. 6 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम अदा करावी.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- द्यावे.

 

  1. विरुध्‍द पक्षाने वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.