Maharashtra

DCF, South Mumbai

366/2006

Blue Fox Tyres - Complainant(s)

Versus

National Insurance Co. Ltd. - Opp.Party(s)

G.H. shukla

06 Apr 2011

ORDER

 
Complaint Case No. 366/2006
 
1. Blue Fox Tyres
A-10,singh industrial estate no. 1 ram mandir,Goregaon(W) mumbai- 104
Mumbai-01
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. National Insurance Co. Ltd.
M.C.B.O. 12 ,indian mercantile chambers,4th floor,ballard estate mumbai- 01 ,indian mumbai 23
Mumbai
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. SHRI.S.B.DHUMAL. HONORABLE PRESIDENT
  Shri S.S. Patil , HONORABLE MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

द्वारा - श्री.शि.भि.धुमाळ : मा.अध्यक्ष

1) ग्राहक वाद संक्षिप्‍त स्‍वरुपात खालील प्रमाणे -
    तक्रारदार हे नोंदणीकृत पार्टनरशिप असून ते टायर्स रिट्रेडर्स आणि वल्‍कनाझर्स म्‍हणून काम करतात. तक्रारदारांचीफॅक्‍टरी A-10, सिंग इंडस्‍ट्रीअल इस्‍टेट नं.1, राम मंदीर रोड, गोरेगांव (पश्चिम), मुंबई - 400 104 येथे आहे. तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून Standard Fire and Special PerilsPolicy Nos.260501/11/04/00490, 3100670, 3100669 & 3100388, 88 घेतली व त्‍यासाठी आवश्‍यक तो प्रिमिअम सामनेवाला यांना दिला. तक्रारदारांनी वरील पॉलिसीची छायांकित प्रती तक्रारअर्जासोबत नि.’A’ ला सादर केल्‍या. वरील पॉलिसी अंतर्गत तक्रारदारांना एकूण आश्‍वासित रक्‍कम रु.63,00,000/- देण्‍यात आले असून त्‍यापैकी 20,00,000/- आश्‍वासित रक्‍कम प्‍लांट, मशिनरी व त्‍यांचे पार्टसाठी देण्‍यात आले व रक्‍कम रु.43,00,000/- हे स्‍टॉकसाठी देण्‍यात आली होती.
 
2) दि.26/07/05 रोजी मुंबईत झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे तक्रारदारांच्‍या फॅक्‍टरीच्‍या परिसरात पुराचे पाणी साठले व तक्रारदारांचे प्‍लांट, मशिनरी, स्‍टॉक, फर्निचर, कच्‍चा माल यांचे पुराच्‍या पाण्‍यामुळे नुकसान झाले. तक्रारदारांनी दि.29/07/2005 चे पत्रात सामनेवाला यांना पुराच्‍या पाण्‍यामुळे त्‍यांच्‍या फॅक्‍टरीचे झालेल्‍या नुकसानीची माहिती दिली व किती नुकसान झाले आहे याचा अंदाज करण्‍यासाठी सर्व्‍हेअरची नेमणूक करावी असे पत्र सामनेवाला यांना दिले. सदर पत्राच्‍या स्‍थळप्रतीवर सामनेवाला यांनी सर्व्‍हेअर श्री.हंसराज मथूरादास यांचे नांव लिहून त्‍यांचे दुरध्‍वनी क्रमांक लिहून दिले. सामनेवाला यांनी श्री.हंसराज मथूरादास यांना तक्रारदारांच्‍या फॅक्‍टरीचे पुराच्‍या पाण्‍यामुळे झालेल्‍या नुकसानीची पाहणी करण्‍यासाठी सर्व्‍हेअर म्‍हणून नेमले होते. सर्व्‍हेअर श्री.हंसराज मथूरादास यांनी तक्रारदारांच्‍या फॅक्‍टरीला दि.30/07/05 रोजी भेट दिली त्‍यावेळी सामनेवाला यांनी त्‍यांना सर्व्‍हेअर म्‍हणून नेमल्‍यासंबंधीचे पत्र तक्रारदारांना दाखविले. सर्व्‍हेअर श्री.हंसराज मथूरादास यांनी दि.30/07/2005 रोजी तक्रारदारांच्‍या प्‍लांट, मशिनरी, स्‍टॉकची पाहणी केली. सर्व्‍हेअर श्री.हंसराज मथूरादास यांनी तक्रारदारांना मागितलेली सर्व माहिती व कागदपत्रे तक्रारदारांनी सर्व्‍हेअरला दिली. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे त्‍यानंतर ऑगस्‍ट, 05 मध्‍ये अचानकपणे श्री.जी.सतपथी यांनी तक्रारदारांच्‍या फॅक्‍टरीला भेट दिली व सामनेवाला यांनी सर्व्‍हेअर म्‍हणून नेमणूक केल्‍याने आपण पाहणीसाठी आलो आहोत असे तक्रारदारांना सांगितले. तक्रारदारांनी श्री.जी.सतपथी यांना सामनेवाला यांनी श्री.हंसराज मथूरादास यांची सर्व्‍हेअर म्‍हणून नेमणूक केल्‍याने सर्व्‍हेअर श्री.हंसराज मथूरादास यांनी दि.30/07/2005 रोजी त्‍यांच्‍या फॅक्‍टरीची पाहणी केल्‍याचे सांगितले.
 
3) तक्रारदारांनी दि.20/10/2005 रोजी श्री.हंसराज मथूरादास यांना पत्र पाठवून त्‍यांनी मागितलेली माहिती पुरविली. पुन्‍हा दि.11/11/05 रोजी श्री.हंसराज मथूरादास यांनी तक्रारदारांकडे आणखी माहिती मागितली. सदरची माहिती तक्रारदारांनी श्री.हंसराज मथूरादास यांनी पाठविली.
 
4) दि.02/12/2005 रोजी सामनेवाला यांनी तक्रारदारांना पत्र पाठवून तक्रारदारांनी त्‍यांचे सर्व्‍हेअर श्री.जी.सतपथी यांना आवश्‍यक ती माहिती पुरविली नाही असा आरोप करुन तक्रारदारांच्‍या क्‍लेमची फाईल बंद करण्‍यात आली आहे असे कळविले. तक्रारदारांनी ताबडतोब दि.10/12/2005 रोजी सामनेवाला यांना पत्र पाठवून खरी वस्‍तुस्थिती निदर्शनास आणली. दि.28/12/05 रोजी सामनेवाला यांनी तक्रारदारांना पत्र पाठवून तक्रारदारांच्‍या पत्रावर सर्व्‍हेरअर नेमणूकीचा शेरा मारलेला आहे तो बनावट असून त्‍यांनी या कामी श्री.जी.सतपथी यांची सर्व्‍हेअर म्‍हणून नेमणूक केल्‍याचे कळविले. तक्रारदारांनी दूरध्‍वनीवरुन सामनेवाला यांना पुन्‍हा खरी वस्‍तुस्थिती कथन केली परंतु सामनेवाला यांनी तक्रारदारांचे म्‍हणणे ऐकून घेतले नाही. तक्रारदारांनी दि.23/01/2006 रोजी पत्र पाठवून त्‍यांचेवर केलेले खोटे आरोप नाकारले. दि.07/02/2006 रोजी तक्रारदार सामनेवाला यांचे ऑफीसमध्‍ये स्‍वतः गेले व सामनेवाला यांचे अधिका-यांबरोबर चर्चा केली त्‍यावेळी सामनेवाला यांचे अधिका-यांनी त्‍यांची चुक झाली हे मान्‍य करुन श्री.हंसराज मथूरादास यांची सर्व्‍हेअर म्‍हणून केलेली नेमणूक बरोबर असल्‍याचे सांगितले. त्‍यानंतर तक्रारदारांनी सामनेवाला यांना दि.07/02/06 व 14/02/06 रोजी पत्र पाठवून समक्ष भेटीस जे बोलणे झाले त्‍याचा उल्‍लेख केला. वरील पत्रांना सामनेवाला यांनी अद्यापही कोणतेही उत्‍तर पाठविले नाही. 
 
5) तक्रारदारांनी दि.22/02/06 चे पत्राने सर्व्‍हेअर श्री.हंसराज मथूरादास यांना दि.28/10/05 चे धनादेशाने रु.1,68,770/- दिल्‍याचे कळविले. तथापि, तक्रारदारांच्‍या बॅंकेतील खात्‍यामध्‍ये रक्‍कम कमी असल्‍याने सदरचा धनादेश लवकर वठवू नका असे कळविल्‍याची माहिती सर्व्‍हेअर श्री.हंसराज मथूरादास यांनी दिली. मे.रोहित इंजिनिअर्सने सदर धनादेशाची पोहोच पावती दिली होती. सदर पोचपावतीची छायांकित प्रत तक्रारदारांनी हजर केली आहे.
 
6) तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे सर्व्‍हेअर श्री.हंसराज मथूरादास यांनी त्‍यांचा सर्व्‍हे पूर्ण करुन सर्व्‍हेरिपोर्ट सामनेवाला यांना सादर केला. तक्रारदारांनी त्‍यानंतर 3 पत्र सामनेवाला यांना पाठवून सर्व्‍हेअर रिपोर्टची प्रत त्‍यांना द्यावी अशी विनंती केली. तथापि, सामनेवाला यांनी किंवा सदर सर्व्‍हेअर श्री.हंसराज मथूरादास यांनी सर्व्‍हेरिपोर्टची प्रत तक्रारदारांना अद्यापही दिलेली नाही. सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या क्‍लेमपोटी निर्णय घ्‍यावा यासाठी तक्रारदारांनी सामनेवाला यांना अनेक पत्र पाठविले तथापि, सामनेवाला यांनी त्‍यास दाद दिली नाही. सरतेशेवटी सामनेवाला यांनी दि.10/07/06 च्‍या पत्राने तक्रारदारांचा क्‍लेम नामंजूर केल्‍याचे तक्रारदारांना कळविले.
 
7) तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे सामनेवाला यांनी त्‍यांचा क्‍लेम चुकीच्‍या कारणावरुन व बेकायदेशीपणे नाकारला आहे म्‍हणून तक्रारदारांनी सदरचा तक्रारअर्ज या मंचासमोर दाखल केला आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांना झालेल्‍या नुकसानीची भरपाई म्‍हणून रक्‍कम रु.2,21,727.80 पैसे व्‍याजासहितद्यावेत अशी विनंती केली आहे. तक्रारदारांनी त्‍यांना झालेल्‍या मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्‍हणून रक्‍कम रु.10,000/- व या अर्जाच्‍या खर्चाची मागणी सामनेवाला यांचेकडून केली आहे.
 
8) तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारअर्जाच्‍या पुष्‍टयर्थ प्रतिज्ञापत्र दाखल केले असून तक्रारअर्जासोबत यादीप्रमाणे कागदपत्रे दाखल केली आहेत.
 
9) सामनेवाला यांनी कैफीयत दाखल करुन तक्रारदारांची मागणी अमान्‍य केली आहे. तक्रारअर्ज खोटा असून तो रद्द होणेस पात्र आहे असे सामनेवाला यांचे म्‍हणणे आहे. सामनेवाला यांच्‍या सेवेत कसलीही कमतरता नसून तक्रारदारांनी केलेले आरोप पूर्णपणे खाटे असल्‍यामुळे तक्रारअर्ज काढून टाकण्‍यात यावा असे म्‍हटले आहे. कोर्ट फी ची रक्‍कम वाचविण्‍यासाठी फौजदारी गुन्‍हा दाखल न करता तक्रारदारांनी सदरचा तक्रारअर्ज या मंचासमोर दाखल केला आहे व तो रद्द होणेस पात्र आहे.
 
10) सामनेवाला यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे विमाधारकाचे नुकसान झाले त्‍या नुकसानीची माहिती घेण्‍यासाठी सर्व्‍हेअर नेमण्‍याचा अधिकार विमा कंपनीस असतो. या कामी तक्रारदारांनी दि.29/07/2005 चे पत्राने त्‍यांच्‍या झालेल्‍या नुकसानीची माहिती सामनेवाला यांना देवून सर्व्‍हेअरची नेमणूक करण्‍याची विनंती केली, त्‍याप्रमाणे सामनेवाला यांनी मे.जी.सतपथी यांची सर्व्‍हेअर म्‍हणून नेमणूक केली. तथापि, त्‍यानंतर सर्व्‍हेअर मे.जी.सतपथी यांचेकडून सामनेवाला यांना असे कळले की, तक्रारदारांनी मे.हंसराज मथूरादास यांची सर्व्‍हेअर म्‍हणून नेमणूक केली आहे व त्‍यांचेकडून सर्व्‍हे करुन घेतला आहे. तक्रारदारांनी केलेली सर्व्‍हेअरची नेमणूक मुळातच बेकायदेशीर असून सदर सर्व्‍हेरिपोर्ट सामनेवाला यांचेवर बंधनकारक नाही. सामनेवाला यांनी नेमलेल्‍या सर्व्‍हेअर मे.जी.सतपथी यांना तक्रारदारांनी कसलेही सहकार्य दिले नाही. सर्व्‍हेअरने मागितलेली सर्व कागदपत्रे किंवा माहिती दिली नाही. तक्रारदार व सर्व्‍हेअर श्री.हंसराज मथूरादास यांच्‍यातसंगनमत असून सर्व्‍हेअरश्री.हंसराज मथूरादास यांचा सर्व्‍हे रिपोर्ट वस्‍तुस्थितीला धरुन नाही. तक्रारदारांनी फॅक्‍टरीच्‍या बाहेर ठेवलेली 15 ड्रमची किंमत सुध्‍दा सर्व्‍हेअरने सर्व्‍हे रिपोर्टमध्‍ये नमूद केली आहे. वास्‍तविक तक्रारदारांनी ड्रम त्‍यांच्‍या फॅक्‍टरीच्‍या आत ठेवणे आवश्‍यक होते. सर्व्‍हेअर श्री.हंसराम मथूरादास यांनी लेबर चार्जेसची रक्‍कम चुकीने दाखविली असून पुन्‍हा पेन्‍सीलने खाडाखोड केली आहे. या कामी सामनेवाला यांनी नेमलेल्‍या इन्‍व्‍हेस्टिगेटरने मे.रोहित इंजिनिअर्स हे कंम्‍प्‍युटर्स/इलेक्‍ट्रॉनिक चिप्‍स्/सर्व्हिसिंग इ.चा व्‍यापार करतात ते प्‍लांट, मशिनरीजची दुरुस्‍ती करत नाहीत. मे.रोहित इंजिनिअर्स यांचा मित्र श्री.योगेश हा प्‍लांट, मशिनरीजची दुरुस्‍तीचे काम करतो व मे.रोहित इंजिनिअर्स यांचेकडील काम श्री.योगेश यांना दिली जातात. तक्रारदारांनी दिलेल्‍या बिलामध्‍ये कमिशनची रक्‍कम आहे याचा खुलासा मे.रोहित इंजिनिअर्स यांनी केलेला नाही. तक्रारदारांनी बनावट कागदपत्र दाखल करुन अवास्‍तव रकमेचा क्‍लेम सामनेवाला यांचेकडे दाखल केला. तक्रारदारांनी दाखल केलेला क्‍लेम बोगस असल्‍यामुळे तक्रारअर्ज खर्चासहित रद्द करण्‍यात यावा असे सामनेवाला यांचे म्‍हणणे आहे.
 
11) सामनेवाला यांनी तक्रारदारांनी तक्रारअर्जात नमूद केलेल्‍या Standard Fire and Special PerilsPolicy दिल्‍या होत्‍या ही बाब सामनेवाला यांना मान्‍य आहे. दि.26/07/2005 रोजी मुंबईत झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे तक्रारदारांच्‍या फॅक्‍टरीमध्‍ये प्‍लांट, मशिनरी, कच्‍चया मालाचे नुकसान झाले हा तक्रारदारांचा आरोप सामनेवाला यांनी नाकारला आहे. तक्रारअर्जात केलेले सर्व आरोप सामनेवाला यांनी नाकारलेले असून तक्रारअर्ज खर्चा‍सहित रद्द करणेत यावा असे सामनेवाला यांचे म्‍हणणे आहे.
 
12) सामनेवाला यांनी त्‍यांची इन्‍व्‍हेस्टिगेटर रेवती राजाराम यांचे प्रतिज्ञापत्र तसेच तक्रारदारांनी दि.29/07/05 रोजी सामनेवाला यांना नुकसानीसंबंधी माहिती दिल्‍याचे मूळ पत्र हजर केले आहे. तक्रारदारांनी त्‍यांचे दि.29/07/05 रोजीचे सामनेवाला यांना पाठविलेल्‍या पत्राची स्‍थळप्रत, सर्व्‍हेअर श्री.हंसराज मथूरादास यांचे सर्व्‍हे प्रतिज्ञापत्र, मे.रोहित इंजिनिअर्सने दिलेले एस्‍टीमेट बिल दाखल केले आहे. सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या इन्‍व्‍हेस्‍टीगेटरचा रिपोर्ट व त्‍यासोबत रेवती राजाराम यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. याकामी तक्रारदारांनी लेखी युक्तिवाद दाखल केला, तसेच सामनेवाला यांनी लेखी युक्तिवाद दाखल केला. तक्रारदारांच्‍या वतीने वकील जे.जी.शुक्‍ला व सामनेवाला यांचे वतीने वकील श्री.नितीन पाटील यांचा तोंडी युक्तिवाद ऐकण्‍यात आला. तक्रारदार व सामनेवाला यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले व सदर प्रकरण निकालासाठी ठेवण्‍यात आले. 
 
13) निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात -
 
मुद्दा क्र.1 - तक्रारदार हे सामनेवाला यांचे सेवेत कमतरता आहे हे सिध्‍द करतात काय
उत्तर      - होय. 
 
मुद्दा क्र.2 - तक्रारदार यांना तक्रारअर्जात मागितल्‍याप्रमाणे नुकसानभरपाई, व्‍याज व या अर्जाचा खर्च इत्‍यादी सामनेवाला यांचेकडून मागता येईल
                काय
उत्तर     - अंतिम आदेशाप्रमाणे.
 
कारणमिमांसा 
मुद्दा क्र.1 - तक्रारदार हे नोंदणीकृत पार्टनरशिप असून ते टायर्स रिट्रेडर्स आणि वल्‍कनाझर्स चा व्‍यवसाय करतात. तक्रारदारांची फॅक्‍टरीA-10, सिंग इंडस्‍ट्रीअल इस्‍टेट नं.1, राम मंदीर रोड, गोरेगांव (पश्चिम), मुंबई - 400 104 येथे आहे. तक्रारदारांनी तक्रारअर्जात नमूद केलेल्‍या Standard Fire and Special PerilsPolicy सामनेवाला यांचेकडून घेतल्‍या होत्‍या व त्‍यासाठी आवश्‍यक तोप्रिमिअम सामनेवाला यांना दिला याबाबी सामनेवाला यांना मान्‍य आहेत. वरील पॉलिसींसाठी तक्रारदारांना एकूण आश्‍वासित रक्‍कम रु.63,00,000/- देण्‍यात आले असून त्‍यापैकी 20,00,000/- आश्‍वासित रक्‍कम प्‍लांट, मशिनरी व त्‍यांचे पार्टसाठी देण्‍यात आले व रक्‍कम रु.43,00,000/-हे स्‍टॉकसाठी देण्‍यात आले आहेत ही बाब सुध्‍दा सामनेवाला यांना मान्‍य आहे. दि.26/07/2005 रोजी मुंबईत झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे अनेक ठिकाणी पुराचे पाणी साठले होते हे सुध्‍दा सामनेवाला यांनी नाकारलेले नाही.
 
तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे दि.26/07/2005 रोजीच्‍या अतिवृष्‍टीमुळे त्‍यांच्‍या फॅक्‍टरीच्‍या परिसरात पुराचे पाणी साठले व तक्रारदारांचे प्‍लांट, मशिनरी, स्‍टॉक, फर्निचर व कच्‍च्‍या मालाचे नुकसान झाले. याबाबतची माहिती त्‍यांनी सामनेवाला यांना दि.29/07/05 चे पत्राने दिली. सदर पत्राची छायांकित प्रत तक्रारदारांनी दाखल केली असून मूळ प्रत सामनेवाला यांनी दाखल केली आहे. तक्रारदारांनी वरील पत्रामध्‍ये त्‍यांच्‍या झालेल्‍या नुकसानीची पाहणी करण्‍यासाठी सर्व्‍हेअरची नेमणूक करावी अशी विनंती केली आहे व त्‍या विनंतीवरुन सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या पत्राच्‍या स्‍थळप्रतीवर सर्व्‍हेअर श्री.हंसराज मथूरादास यांचे नांव लिहून त्‍यांचे दुरध्‍वनी क्रमांक लिहून दिले. तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या दि.29/07/2005 चे पत्राचे स्‍थळप्र‍तीवर पेन्‍सीलने श्री.हंसराज मथूरादास व त्‍यांचे दुरध्‍वनी क्र.25126020/25112451 असे लिहीले आहेत. सामनेवाला यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे श्री.हंसराज मथूरादास यांची सर्व्‍हेअर म्‍हणून नेमणूक केली नव्‍हती. तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रावर श्री.हंसराज मथूरादास यांच्‍या नावाची नोंद बनावट असून तशी नोंद तक्रारदारांच्‍या मूळ पत्रावर नाही. सामनेवाला यांनी दाखल केलेल्‍या तक्रारदारांच्‍या मूळ पत्रावर श्री.हंसराज मथूरादास व त्‍यांच्‍या दुरध्‍वनीची नोंद नाही.
 
तक्रारदारांचे म्‍हणण्‍याप्रमाणे दि.30/07/05 रोजी सर्व्‍हेअर श्री.हंसराज मथूरादास यांनी त्‍यांच्‍या फॅक्‍टरीला भेट दिली व सामनेवाला यांनी त्‍यांची सर्व्‍हेअर म्‍हणून नेमणूक केल्‍याचे पत्र तक्रारदारांना दाखविले व नंतर तक्रारदारांच्‍या फॅक्‍टरीची पाहणी केली. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे सर्व्‍हेअर श्री.हंसराज मथूरादास यांनी त्‍यांच्‍याकडे वेळोवेळी कागदपत्रे व माहिती मागितली व त्‍याची पूर्तता तक्रारदारांनी केली. असे असताना सुध्‍दा ऑगस्‍ट, 2005 मध्‍ये अचानकपणे मे.जी.सतपथी यांनी तक्रारदारांच्‍या फॅक्‍टरीला भेट दिली व सामनेवाला विमा कंपनीने त्‍यांना त्‍यांचे सर्व्‍हेअर म्‍हणून नेमणूक केल्‍याचे तक्रारदारांना सांगितले. तक्रारदारांनी मे.जी.सतपथी यांना सामनेवाला यांनी यापूर्वीच श्री.हंसराज मथूरादास यांची सर्व्‍हेअर म्‍हणून नेमणूक केल्‍याने सर्व्‍हेअर श्री.हंसराज मथूरादास यांनी दि.30/07/2005 रोजी त्‍यांच्‍या फॅक्‍टरीच्‍या झालेल्‍या नुकसानीची पाहणी केल्‍याचे सांगितले. दि.02/12/2005 रोजी सामनेवाला यांनी तक्रारदारांना पाठविलेल्‍या पत्रामध्‍ये तक्रारदारांनी त्‍यांना नेमलेल्‍या मे.जी.सतपथी यांना आवश्‍यक ती माहिती दिली नाही असा आरोप करुन क्‍लेमची फाईल बंद केल्‍याचे कळविले. तक्रारदारांनी दि.10/12/05 रोजीचे पत्राने सामनेवाला यांना खरी वस्‍तुस्थिती कळविली. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे दि.07/02/06 रोजी ते स्‍वतः सामनेवाला यांचे ऑफीसमध्‍ये गेले व सामनेवाला यांच्‍या अधिका-यांशी चर्चा केली त्‍यावेळी सामनेवाला यांनी त्‍यांची चुकी मान्‍य करुन श्री.हंसराज मथूरादास यांची केलेली नेमणूक बरोबर असल्‍याचे त्‍यांना सांगितले. तक्रारदारांनी सामनेवाला यांना दि.07/02/06 रोजी व दि.14/02/06 रोजी पाठविलेल्‍या पत्रांमध्‍ये सामनेवाला यांनी श्री.हंसराज मथूरादास यांची नेमणूक सर्व्‍हेअर म्‍हणून केल्‍याचे मान्‍य आहे होते ही वस्‍तुस्थिती असल्‍याची नोंद केली. सामनेवाला यांनी वरील पत्रास उत्‍तर पाठविले नाही. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे श्री.हंसराज मथूरादास यांनी सर्व्‍हे रिपोर्ट सामनेवाला यांना सादरकेला असून त्‍याची प्रत तक्रारदारांनी मागणी करुनसुध्‍दा तक्रारदारांना देण्‍यात आलेली नाही. सामनेवाला यांनी दि.10/07/2006 चे पत्राने तक्रारदारांचा क्‍लेम नाकारला तसेच तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्‍ये वरील पत्र व्‍यवहाराच्‍या प्रती तक्रारदारांनी या कामी दाखल केल्‍या आहेत.
 
विमा कंपनीने ज्‍या मिळकतीवर संरक्षण दिलेले असते अशा मिळकतीचे नुकसान झाल्‍यास सदर नुकसानीची पाहणी करण्‍यासाठी सर्व्‍हेअर नेमणूकीचा अधिकार विमा कंपनीला असतो असे सामनेवाला यांचे वतीने सांगण्‍यात आले. सामनेवाला यांचे वतीने करण्‍यात आलेले विधान बरोबर असले तरी सामनेवाला यांनी या कामी मे.जी.सतपथी यांची सर्व्‍हेअर म्‍हणून नेमणूक केली होती हे आपले म्‍हणणे सिध्‍द करण्‍यासाठी त्‍यांनी मे.जी.सतपथी यांची नेमणूक केली असा आदेश किंवा पत्र या कामी दाखल केलेले नाही. तक्रारदारांनी त्‍यांच्‍या मि‍ळकतीचे झालेल्‍या नुकसानाची माहिती सामनेवाला यांना दि.29/07/05 रोजी दिली होती. त्‍यानंतर सामनेवाला यांनी मे.जी.सतपथी यांची कोणत्‍या तारखेला सर्व्‍हेअर म्‍हणून नेमणूक केली या संबंधीचे कागदपत्र, पुरावाही दाखल केले नाहीत. उपलब्‍ध पुराव्‍यावरुन असे दिसून येते की, श्री.हंसराज मथूरादास हे सामनेवाला यांचे पॅनेलवरील सर्व्‍हेअर आहेत हे तक्रारदारांचे म्‍हणणे सामनेवाला यांनी नाकारलेले नाही. श्री.हंसराज मथूरादास यांचा दि.14/12/05 चा सर्व्‍हे रिपोर्ट या कामी रेकॉर्डवर दाखल करण्‍यात आला आहे. त्‍यावरील मजकूरावरुन असे दिसून येते की, सामनेवाला विमा कंपनीने श्री.हंसराज मथूरादास यांचे सर्व्‍हेअर म्‍हणून नेमणूक केल्‍यानंतर त्‍यांनी तक्रारदारांच्‍या फॅक्‍टरीला भेट देवून झालेल्‍या नुकसानीची पाहणी केली. सर्व्‍हेअरने त्‍यांच्‍या रिपोर्टमध्‍ये तक्रारदारांनी घेतलेल्‍या पॉलिसीतील तपशीलाची पाहणी केली असून त्‍यामध्‍ये प्‍लांट, मशिनरी, स्‍टॉक, इत्‍यादी बाबतचा तपशिल दिला असून फॅक्‍टरीमध्‍ये पाच फूट उंचीपर्यंत पुराचे पाणी साठले असे नमूद करुन एकूण नुकसान रक्‍कम रु.2,02,623/- झाल्‍याचे नमूद केले आहे. याकामी सामनेवाला यांनी मे.जी.सतपथी यांचा सर्व्‍हेअर रिपोर्ट दाखल केला नाही. सामनेवाला यांच्‍या मते तक्रारदारांनी त्‍यांच्‍या सर्व्‍हेअरला कसलेही सहकार्य केले नाही. श्री.हंसराज मथूरादास यांची सर्व्‍हेअर नेमणूक केली आहे त्‍यामुळे सामनेवाला यांनी याकामी केलेल्‍या वरील आरोपामध्‍ये तथ्‍य वाटत नाही.
 
सामनेवाला यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रारदारांनी या कामी सर्व्‍हेअर श्री.हंसराज मथूरादास यांचेशी संगनमत करुन अवास्‍तव रकमेचा क्‍लेम सादर केला असून त्‍याच्‍या पुष्‍टयर्थ बनावट कागदपत्रे सादर केली. सामनेवाला यांनी दाखल केलेले मे.रोहित इंजिनिअर्सचे बिल व धनादेश मिळाल्‍याच्‍या पावत्‍या बनावट आहेत असे सामनेवाला यांचे म्‍हणणे आहे. सामनेवाला यांनी या कामी इन्‍व्‍हेस्टिगेटरची नेमणूक केली होती. त्‍या इन्‍व्‍हेस्‍टीगेटर- रेवती राजाराम यांचे प्रतिज्ञापत्र व त्‍यांचा रिपोर्ट दाखल केला आहे. सामनेवाला यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे मे.रोहित इंजिनिअर्स हे कंम्‍प्‍युटर्स/ईलेक्‍ट्रॉनिक‍ चिप्‍सचा व्‍यवसाय करतात. ते मोटर रिपेअरची कामे त्‍यांचा मित्र श्री.योगेश मेहता याचेकडून करुन घेतात व श्री.योगेश मेहता याचे बिले सादर करतात. तक्रारदारांनी मे.रोहित इंजिनिअर्सना पैसे दिले नाहीत असे म्‍हटले तरी मे.रोहित इंजिनिअर्सने तक्रारदारांकडून धनादेश मिळाल्‍याची पावती तक्रारदारांनी हजर केली आहे. सामनेवाला यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रारदारांनी दाखल केलेले वरील पुरावे बनावट असल्‍यामुळे विश्‍वासार्ह नाही, तसेच या कामी सामनेवाला यांना मिळालेल्‍या माहितीप्रमाणे तक्रारदारांनी फर्निस ऑईलचे 10 ड्रम पावसाळयात फॅक्‍टरीच्‍या बाहेर ठेवले होते ते पुराच्‍या पाण्‍यात वाहून गेले. याकामी तक्रारदारांनी नुकसानभरपाई मागितली आहे परंतु विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तींप्रमाणे तक्रारदारांना वरील नुकसानभरपाई मागता येत नाही. श्री.हंसराज मथूरादास यांनी दिलेल्‍या सर्व्‍हे रिपोर्टमध्‍ये फर्निस ऑईलचे ड्रम फॅक्‍टरीच्‍या बाहेरठेवले होते असा कोठेही उल्‍लेख केलेला नाही.सामनेवाला यांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टयर्थ विश्‍वासार्ह पुरावा दाखल केलेला नाही.
 
वर नमूद केल्‍याप्रमाणे याकामी सामनेवाला यांनी मे.जी.सतपथी यांची केव्‍हा सर्व्‍हेअर म्‍हणून नेमणूक केली होती त्‍यासंबंधी लेखी पुरावा सामनेवाला यांनी दाखल केलेला नाही. तक्रारदारांनी दि.29/07/05 रोजी त्‍यांनी नुकसानभरपाईची माहिती दिली होती त्‍या पत्राच्‍या स्‍थळप्रतीवरती श्री.हंसराज मथूरादास यांचे नांव व दुरध्‍वनी क्रमांक पेन्‍सीलने लिहिले आहे. श्री.हंसराज मथूरादास यांनी दाखल केलेल्‍या रिपोर्टमध्‍ये सामनेवाला यांच्‍या सुचनेप्रमाणे त्‍यांनी सर्व्‍हेअरचे काम केले असे नमूद केले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांना नंतर मे.जी.सतपथी यांची सर्व्‍हेअर म्‍हणून नेमणूक केली आहे असे पत्राने केळविले असले तरी तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे त्‍यांच्‍या ऑफीसमध्‍ये दि.07/02/06 रोजी जावून खरी वस्‍तुस्थिती निदर्शनास आणली त्‍यावेळी सामनेवाला यांच्‍या अधिका-यांनी त्‍यांची चुक मान्‍य करुन श्री.हंसराज मथूरादास हे सर्व्‍हेअर म्‍हणून नेमल्‍याचे मान्‍य केले. तक्रारदारांच्‍या दि.07/02/06 व 14/02/06 च्‍या पत्रांना सामनेवाला यांनी उत्‍तर सुध्‍दा पाठविले नाही. वरील वस्‍तुस्थिती विचारात घेता वास्‍तविक सामनेवाला यांनी श्री.हंसराज मथूरादास यांच्‍या सर्व्‍हेअर रिपोर्टच्‍या आधारे तक्रारदारांचा क्‍लेमसंबंधी निर्णय घेणे आवश्‍यक होते परंतु सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या क्‍लेमसंबंधी निर्णय घेण्‍याचे जाणूनबुजून टाळले असे दिसते त्‍यामुळे तक्रारदारांनी सामनेवाला यांचे सेवेतील कमतरता सिध्‍द केली आहे असे म्‍हणावे लागते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येते. 
 
मुद्दा क्र.2 - तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून त्‍यांच्‍या प्‍लांट, मशिनरी, फर्निचर व कच्‍च्‍या मालाचे पुरामुळे झालेल्‍या नुकसानीपोटी रक्‍कम रु.2,21,727.80 पैशांची व्‍याजासहित मागणी केली आहे. या कामी सर्व्‍हेअर श्री.हंसराज मथूरादास यांनी त्‍यांच्‍या सर्व्‍हेरिपोर्टमध्‍ये तक्रारदारांचे रक्‍कम रु.2,02,623/- चे नुकसान झाले असे म्‍हटले आहे. सबब सामनेवाला यांनी तक्रारदारांना रु.2,02,623/- द्यावेत असा आदेश करणे योग्‍य होईल. 
 
         तक्रारदारांनी वरील रक्‍कमेवर व्‍याजाची मागणी केली आहे. या प्रकरणातील वस्‍तुस्थिती विचार करता सामनेवाला यांनी वरील रक्‍कम रु.2,02,623/- यावर तक्रारदारांना दि.01/01/2006 पासून 9 टक्‍के दराने व्‍याज संपूर्ण रक्‍कम तक्रारदारांना मिळेपर्यंत द्यावी असा आदेश करणे योग्‍य होईल.
 
तक्रारदारांनी त्‍यांना झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- व या अर्जाच्‍या खर्चाची मागणी सामनेवाला यांचेकडून केली आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/- व या अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.2,000/- द्यावेत असा आदेश करणे योग्‍य होईल त्‍यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्‍तर त्‍याप्रमाणे देण्‍यात येते.
 
         सबब वर नमूद केलेल्‍या कारणास्‍तव तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येवून खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहे.
 
अं ति म आ दे श


 

1.तक्रार क्रमांक 366/2006 अंशतः मंजूर करणेत येतो. 
 
2.सामनेवाला यांनी तक्रारदारांना रक्‍कम रु.2,02,623/-(रु.दोन लाख दोन हजार सहाशे तेवीस मात्र) द्यावेत व सदर रकमेवर दि.01/01/2006
    पासून द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याज संपूर्ण रक्‍कम तक्रारदारांना मिळेपर्यंत द्यावी.
 
3. सामनेवाला यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्‍हणून रक्‍कम रु.5,000/-(रु.पाच हजार मात्र) व या अर्जाच्‍या
    खर्चापोटी रक्‍कम रु.2,000/- (रु.दोन हजार मात्र) द्यावेत.
 
4. सामनेवाला यांनी वरील आदेशाची अंमलबजावणी प्रस्‍तुत आदेशाची प्रत त्‍यांना मिळाल्‍यापासून 30 दिवसांचे आत करावी.
 
5. सदर आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षकारांना देणेत यावी.

 

 
 
[HON'ABLE MR. SHRI.S.B.DHUMAL. HONORABLE]
PRESIDENT
 
[ Shri S.S. Patil , HONORABLE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.