(मंचाचे निर्णयान्वये, श्री. सादिक मोहसिनभाई झवेरी, सदस्य)
तक्रारकर्तीने सदरची तक्रार विरुध्द पक्षाविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे...
1. तक्रारकर्ती ही राह. विहीरगाव, ताः वडसा देसाईगंज, जिल्हा गडचिरोली येथील रहीवासी असुन तिचे पती श्री. शामराव तुकाराम कुळमेथे यांच्या मालकीची मौजाः पोटगाव, ताः वडसा देसाईगंज, जिल्हा- गडचिरोली येथे भुमापन क्रमांक 223/1 ही शेतजमीन आहे. तक्रारकर्तीचे पती शेतीचे काम करीत असल्यामुळे तो शेतीच्या उत्पन्नावर आपल्या कुटूंबाचे पालन पोषन करीत होता. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 ही विमा कंपनी असून शासनाच्या वतीने विरुध्द पक्ष क्र.3 हे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दावे स्विकारतात. तसेच शासनाचे वतीने विरुध्द पक्ष क्र.3 व्दारे तक्रारकर्तीचे पतीने रु.2,00,000/- चा विमा उतरविला होता. त्यामुळे तक्रारकर्ती ही मयत श्री. शामराव तुकाराम कुळमेथे यांची पत्नी असल्याने सदर विम्याची लाभधारक आहे. तक्रारकर्तीचे पतीचा मृत्यू दि.28.10.2016 रोजी इलेक्ट्रीक शॉक लागल्याने जखमी होऊन झाला असल्याने तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्र.3 कडे दि.04.10.2017 रितसर अर्ज केला व त्यांनी वेळोवेळी मागितलेल्या दस्तावेजांची पुर्तता केली.
2. विरुध्द पक्षांकडे रितसर अर्ज केल्यानंतर विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्तीला पतीच्या विमा दाव्याबाबत काहीही न कळविल्याने तिने वकीला मार्फत दि.30.10.2017 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 व 3 ह्यांना नोटीस पाठविली. परंतु विरुध्द पक्ष क्र. 1 व 3 यांनी सदर दाव्याबाबत काहीही कळविले नाही. शासनाने मृत शेतक-यांच्या पत्नी व मुलांसाठी ही योजना ज्या उद्देशानेसुरु केली त्या उद्देशालाच विरुध्द पक्ष तडा देत असल्याने सदरची कृति ही विरुध्द पक्षांची सेवेतील कमतरता आहे. म्हणून तक्रारकर्तीने सदरची तक्रार मंचात दाखल करुन खालिल प्रमाणे मागणी केली आहे.
3. तक्रारकर्तीने आपल्या तक्रारीत विमा दाव्याची रक्कम रु.2,00,000/- दि.04.10.2017 पासुन 18% व्याजासह मिळावी तसेच तक्रारकर्तीस झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाईची रक्कम रु.30,000/- व तक्रारीचा खर्च रु.15,000/- मिळावा अश्या मागण्या केलेल्या आहेत.
4. तक्रारकर्तीने निशाणी क्र.3 नुसार 10 झेरॉक्स दस्तावेज दाखल केले. तक्रारकर्तीची तक्रार नोंदणीकरुन विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांना नोटीस काढण्यांत आली. विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर प्रकरणात हजर होऊन विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी आपले लेखीउत्तर दाखल केले.
5. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी निशाणी क्र.13 नुसार दाखल केलेल्या लेखीउत्तरात तक्रारकर्तीने खोटी त्यांचे विरुध्द खोटी तक्रार दाखल केलेली असल्यामुळे ती ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 26 अन्वये खारिज होण्यांस पात्र आहे, असे नमुद केले आहे. तसेच विरुध्द पक्षांना तक्रारकर्तीचा कोणताही विमा दावा मिळालेला नसुन असा कोणताही दावा भविष्यात विरुध्द पक्षांकडे आल्यास त्याबाबत सर्वतोपरी योग्य निर्णय घेण्यांत येईल.
6. विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी निशाणी क्र.10 नुसार दाखल केलेल्या लेखीउत्तरात नमुद केले आहे की, ते शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत प्राप्त प्रस्ताव स्विकारणे तसेच प्रस्तावातील कागदपत्रांची शहानिशा करुन परिपूर्ण पस्ताव विमा कंपनीस सादर करण्याचे काम तालुका कृषी अधिकारी, वडसा यांचे कार्यालयातील तांत्रिक कृषी पर्यवेक्षक यांचेमार्फत केले जाते. तसेच श्री. शामराव तुकाराम कुळमेथे यांचा दि.28.10.2016 रोजी इलेक्ट्रीक शॉक लागुन मृत्यू झाला असल्यामुळे त्यांचे वारसदार श्रीमती सरीता शामराव कुळमेथे यांनी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्कम मिळण्याकरीता दि.04.10.2017 रोजी अर्ज सादर केला असल्याचे शेतकरी जनता अपघात विमा नोंद वहीतील नोंदीवरुन दिसुन येते. परंतु अर्जाची छाननी केली असता सदर प्रस्ताव हा अपघात झाल्यापासुन 90 दिवसाच्या कालावधीनंतर व परिपूर्ण दस्तावेज नसल्यामुळे दि.11.10.2017 रोजी परत केला असल्याचे म्हटले आहे.
7. तक्रारकर्तीची तक्रार, शपथपत्र, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी दाखल केलेले बयान, तसेच दाखल दस्तावेज, शपथपत्र व तोंडी युक्तिवादावरून खालिल मुद्दे निघतात.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ती ही विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 ची ग्राहक आहे काय ? होय
2) विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्तीप्रती सेवेत न्युनतापूर्ण
व्यवहार केला आहे काय ? नाही
3) विरुध्द पक्ष क्र.3 ने तक्रारकर्तीप्रती सेवेत न्युनतापूर्ण व्यवहार
केला आहे काय ? होय
4) अंतिम आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
8. मुद्दा क्रमांक 1 बाबतः- तक्रारकर्ती ही राह. विहीरगाव, ताः वडसा देसाईगंज, जिल्हा गडचिरोली येथील रहीवासी असुन तिचे पती श्री. शामराव तुकाराम कुळमेथे यांच्या मालकीची मौजाः पोटगाव, ताः वडसा देसाईगंज, जिल्हा- गडचिरोली येथे भुमापन क्रमांक 223/1 ही शेतजमीन होती व त्यावर ते आपल्या कुटूंबाचे पालन पोषन करीत होते ही बाब निशाणी क्र.3 वर दाखल दस्त क्र.5 वरुन सिध्द होते. तसेच शासनातर्फे तक्रारकर्तीच्या पतीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा काढला असल्याने व तो शेतकरी असल्याने विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 चा ग्राहक आहे ही बाब सिध्द होते. म्हणून मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्योत येत आहे.
8. मुद्दा क्रमांक 2 बाबतः- विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना तक्रारकर्तीतर्फे कोणताही विमा दावा मिळाला नसल्यामुळे तक्रारकर्तीने दाखल निशाणी क्र.3 वरील दस्त क्र.2 वरुन सिध्द होत असल्यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी देण्यांत येत आहे.
9. मुद्दा क्रमांक 2 बाबतः- विरुध्द पक्ष क्र.3 ने त्याच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन तक्रारकर्तीने दाखल केलेला विमा दावा परत करुन तक्रारकर्तीस शारीरिक व मानसिक त्रास दिलेला आहे ही बाब तक्रारकर्तीचे निशाणी क्र.3 वरील दस्त क्र.2 वरुन स्पष्ट होते. विरुध्द पक्ष क्र.3 हे शासकीय अधिकारी असुन त्याचे कार्य फक्त त्यांचेकडे आलेल्या विमा दाव्यांची पडताळणी करुन विमा कंपनीकडे पाठविणे एवढेच असतांना सुध्दा विरुध्द पक्ष क्र.3 यांनी परस्पर दस्तावेज न घेता तक्रारकर्तीचा विमा दावा परत केलेला आहे. म्हणून विरुध्द पक्ष क्र.3 ने तक्रारकर्तीचा विमा दावा निकाली काढण्यासाठी तक्रारकर्तीस सहकार्य करणे गरजेचे आहे, असे या मंचाचे मत आहे. करीता मुद्दा क्र.3 चे उत्तर होकारार्थी देण्यांत येत आहे.
सबब हे मंच वरील विश्लेषनावरुन खालिल प्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहे.
- // अंतिम आदेश // -
1. तक्रारकर्तीची ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. विरुध्द पक्ष क्र.3 यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा विमा कंपनीकडे पाठवावा.
3. तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्र.3 यांना विमा दाव्यासंबंधीत कार्याकरीता सहकार्य करावे.
4. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी विमा दावा मिळाल्यानंतर तक्रारकर्तीचा विमा दावा मंजूर करुन निकाली काढावा.
5. दोन्ही पक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
6. वरील आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 45 दिवसांचे आंत करावी.
7. दोन्ही पक्षांना आदेशाची प्रथम प्रत विनामुल्य द्यावी.
8. तक्रारकर्तीस प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.