Maharashtra

Nagpur

CC/446/2018

DR. SANJAY RAMPRAKASH SOOD - Complainant(s)

Versus

NATIONAL INSURANCE CO. LTD. NAGPUR DIVISIONAL OFFICE, THROUGH SENIOR DIVISIONAL MANAGER - Opp.Party(s)

ADV. A.M. GHARE

04 Jan 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/446/2018
( Date of Filing : 03 Jul 2018 )
 
1. DR. SANJAY RAMPRAKASH SOOD
R/O. 504, SHREEMAN PALACE, DHANTOLI, NAGPUR
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. NATIONAL INSURANCE CO. LTD. NAGPUR DIVISIONAL OFFICE, THROUGH SENIOR DIVISIONAL MANAGER
DIV.OFF. NO. 5, 13, GIJRE BHAVAN, S.A. ROAD, NAGPUR-440022
Nagpur
Maharashtra
2. SMT. JYOTI SAHARE, SR. DIVISIONAL MANAGER, NATIONAL INSURANCE CO. LTD. NAGPUR DIVISIONAL OFFICE
DIV.OFF. NO. 5, 13, GIJRE BHAVAN, S.A. ROAD, NAGPUR-440022
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 04 Jan 2020
Final Order / Judgement

 

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. अध्‍यक्ष)

  1. तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे अन्‍वये दाखल केलेली आहे.
  2. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडुन विमा पॉलिसी क्रमांक २८२२००४४१७१००००००३ अन्‍वये त्‍याचा वापरात असलेल्‍या ईलेक्‍ट्रॉनिक ईक्‍वीमेंट चा विमा उतरविला होता. व सदरची पॉलिसी विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला निर्गमीत केली होती. जेव्‍हा तक्रारकर्त्‍याचे ताब्‍यात असलेली वरील नमुद पॉलिसी माहे एप्रिल २०१७ मध्‍ये नुतनीकरणाकरीता देय होती. त्‍यावेळी श्री सावरकर विमा कंपनीचे विकास अधिकारी यांनी तक्रारकर्त्‍याला I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular चा समावेश विमा पॉलिसीमध्‍ये करण्‍याबाबत सुचविले आणि त्‍यांचे विनंतीवरुन तक्रारकर्त्‍याने रुपये २,३३६/- दोन्‍ही पॉलिसीचे नुतनीकरण करण्‍याकरीता दिले आणि तक्रारकर्त्‍याने रुपये ७७०/- नगदी I Pad Pro 9.7 Rose Gold Cellular चा विम्‍या हप्‍त्‍यापोटी दिले. जेव्‍हा श्री सावरकर यांनी तक्रारकर्त्‍याला विमा पॉलिसीचे दस्‍ताऐवज हस्‍तांतरीत केले त्‍यावेळी तक्रारकर्त्‍याचे लक्षात आले की, सदर पॉलिसीमध्‍ये I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular ला संमती देण्‍यात आली नाही आणि त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने त्‍याप्रमाणे विनंती केली. श्री सावरकर यांनी तक्रारकर्त्‍याला उपदेश केला की, त्‍यांनी विरुध्‍द पक्षाचे कार्यालयात तक्रार करावी परंतू त्‍याचा काहीही उपयोग झाला नाही. त्‍यानंतर श्री सावरकर यांचे उपदेशावरुन त्‍यांनी पुरविलेल्‍या ईमेल अॅड्रेस वर ईमेल करण्‍यात आला परंतू त्‍याचा काहीही उपयोग झाला नाही व तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्षाकडुन काहीही प्रतिसाद मिळाला नाही. श्री सावरकर यांनी I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular  ENDORSE  केलेले आणि दिनांक २६/०४/२०१७ ला खर्ची घातलेली विरुध्‍दपक्षाने निर्गमीत केलेले दस्‍ताऐवज तक्रारकर्त्‍याला हस्‍तांतरीत केले.
  3. जानेवारी २०१८ ला तक्रारकर्त्‍याने त्‍याचे क्षतीग्रस्‍त झालेल्‍या I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular  ची विमा मागणी विरुध्‍द पक्षाकडे सादर केली. विरुध्‍द पक्षाने तपासणी करीता सर्वेअर ची नियुक्‍ती केली व सर्वेअर ने तक्रारकर्त्‍याचे क्षतीग्रस्‍त I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular   ची तपासणी केली आणि विमा मागणी रुपये २०९५०/- काढली. तक्रारकर्त्‍याची विमा मागणी देण्‍याऐवजी विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दिनांक २६/०२/२०१८ ला पञ पाठवून व त्‍याव्‍दारे काही आरोप दाखवून कळविले की, विमा पॉलिसी अंतर्गत लबाडीने फायदा घेण्‍याचा प्रयत्‍न केला आहे आणि तक्रारकर्त्‍याची विमा मागणी नाकारली. तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्षाकडुन मिळालेल्‍या  अपमानास्‍पद पञाने तक्रारकर्त्‍याला  धक्‍का बसला. तक्रारकर्ता हा मागील १७ वर्षापासुन विरुध्‍द पक्षाचा प्रामाणिक ग्राहक आहे तरीही तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दिनांक ३/३/२०१८ ला पञ पाठवून तक्रारकर्त्‍याच्‍या विमा मागणी मध्‍ये काहीही कमतरता नसल्‍याचे कळविले. दिनांक २६/०४/२०१७ ची डेबीट नोट हे दर्शविते की,  विमा हप्‍ता हा दिनांक २६/०४/२०१७ किंवा त्‍यापूर्वी अदा करण्‍यात आला. दिनांक २६/०२/२०१८ चे विरुध्‍द पक्षाचे पञ प्राप्‍त झाल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने बारकाईने बघितले तेव्‍हा निर्दशनास आले की, विमा पॉलिसी ही दिनांक २२/०८/२०१७ पासुन सुरु केल्‍याचे दाखविण्‍यात आले. जेव्‍हा की डेबीट नोट ही दिनांक २६/०४/२०१७ ला निर्गमीत करण्‍यात आली. इथे नमुद करावेसे वाटते की, विरुध्‍द पक्षाची कृती ही अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब करणारी आणि दोषपूर्ण सेवा आहे. विरुध्‍द पक्षाचे म्‍हणण्‍यानूसार I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular  चा समावेश इलेक्‍ट्रॉनिक इक्‍वीमेंट इन्‍शुरन्‍स अंतर्गत कव्‍हर होत नाही. ग्राहकाला पॉलिसी च्‍या छोट्या छोट्या अटीबाबत माहिती नसते आणि विरुध्‍द पक्ष यांनी पॉलिसी मध्‍ये अंतर्भुत होते किंवा नाही याबाबत तपासणी करावयास पाहिजे होती. विरुध्‍द पक्षाचे म्‍हणण्‍यानूसार तक्रारकर्त्‍याने चूकीने I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular  हा कॅम्‍युटर म्‍हणून दाखविला आहे. परंतू विरुध्‍द पक्षाचे अधिकारी I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular  हा कॅम्‍युटर म्‍हणून चुकीने दाखविला असे म्‍हणू शकत नाही. कारण विमा पॉलिसी कव्‍हरेज करीता अर्ज करतांना खरेदी ईनव्‍हॉइस दस्‍ताऐवज जोडुन सादर करण्‍यात आले होते व इलेक्‍ट्रॉनिक इक्‍वीमेंट विमा पॉलिसी अंतर्गत I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular   हे वगळण्‍यात आले आहे तर विरुध्‍दपक्षाने I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular  विमा कव्‍हरेज हप्‍ता स्विकारण्‍यापूर्वी सदरची बाब निर्दशनास आणावयास पाहिजे होती. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडुन विमा हप्‍ता स्विकारुन आणि तदनंतर तक्रारकर्त्‍याचा विमा नाकारला आहे. विरुध्‍द पक्षाचे म्‍हणण्‍यानूसार I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular   हा जुलै २०१७ मध्‍ये क्षतीग्रस्‍त झाला आणि तक्रारकर्ता I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular  हा क्षतीग्रस्‍त I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular  चा विमा उतरवून त्‍याचा लाभ घेण्‍याचा प्रयत्‍न करीत आहे. विरुध्‍द पक्षाचे म्‍हणण्‍यानूसार तक्रारकर्त्‍याने जरी  I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular  सन २०१६ मध्‍ये खरेदी केला तरी त्‍याने मुद्दामुन त्‍याचा समावेश आधीचा विमा पॉलिसीमध्‍ये केला नाही. परंतू I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular  हा मे २०१६ मध्‍ये खरेदी करण्‍यात आला व विमा पॉलिसी एप्रिल २०१६ मध्‍ये सुरु झाली. विरुध्‍द पक्षाची कार्यवाही ही तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा व अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब करणारी कृती आहे. तक्रारकर्त्‍याने दिनांक २६/०४/२०१८ ला कायदेशीर नोटीस विरुध्‍द पक्षाला बजावली व ती विरुध्‍द पक्षाला दिनांक २/५/२०१८ ला प्राप्‍त झाली. तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्षाकडुन कोणतेही नोटीस चे उत्‍तर प्राप्‍त झाले नाही करीता तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर प्रकरण दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली आहे असे घोषित करावे.
  2. तक्रारकर्त्‍याची विमा मागणी मंजूर करुन विमा रुपये २०९४०/-, १८ टक्‍के व्‍याजासह देण्‍याबाबत विरुध्‍द पक्षाला निर्देश द्यावे.
  3. मानसिक व शारिरीक ञासाकरीता व नुकसान भरपाई देण्‍याबाबत निर्देश देण्‍यात यावे.
  1. विरुध्‍द पक्षाचे कथनानूसार तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या ताब्‍यात असलेल्‍या विमा पॉलिसीचे दिनांक २७/०४/२०१७ ते दिनांक २६/०४/२०१८ या कालावधीकरीता विमा हप्‍ता रुपये १६०३/- सर्व करासहीत भरुन नुतणीकरण केले जिचा विमा पॉलिसी क्रमांक २८२२००४४१७१०००००३ हा आहे. सदर पॉलिसी जिवीत असतांना तक्रारकर्त्‍याने ईमेल व्‍दारे विरुध्‍द पक्षाला सदर पॉलिसीमध्‍ये I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular   ला विमा संरक्षण देण्‍याबाबत सुचित केले व आधिचे पॉलिसीमध्‍ये I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular   ला विमा संरक्षण देण्‍याबाबत दिनांक २२/८/२०१७ ला स्विकार करण्‍यात आले.
  2. इथे नमुद करावेसे वाटते की, आधीची विमा पॉलिसी जी तक्रारकर्त्‍याला निर्गमीत करण्‍यात आली होती तिथे विशेष करुन नमुद करण्‍यात आले होते की आय पॅड आणि इतर वस्‍तु या इलेक्‍ट्रॉनिक इक्‍वीमेंट पासुन वगळण्‍यात आले आहेत. तक्रारकर्त्‍याने कोणताही फॉर्म दिनांक २/८/२०१७ ला सादर न करता श्री एन.पी.साखरे यांना दिनांक २५/०७/२०१७ ला विमा पॉलिसी मध्‍ये I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular   ची नोंद घेण्‍याबाबत ईमेल पाठविला असा आरोप केला आणि त्‍याव्‍दारे I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular   ची नोंद घेण्‍याबाबत सांगितले. परंतू अनावधानाने आणि अनेक प्रस्‍ताव प्रलंबित असल्‍याकारणाने आणि विरुध्‍द पक्षाचे कर्मचा-यांच्‍या कामाच्‍या गर्दीमुळे जरी पॉलिसी च्‍या शर्ती व अटी नूसार ग्राह्य जरी नसले तरी I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular   ला दिनांक २२/०८/२०१७ पासुन विमा संरक्षण दिल्‍याचे स्विकार करण्‍यात आले.
  3. तक्रारकर्त्‍याने चुकीच्‍या पद्धतीने सादर करुन I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular   ला विमा संरक्षण चालु विमा पॉलिसी मध्‍ये घेतल्‍यावर दिनांक १२/०१/२०१८ ला विरुध्‍द पक्षाचे विभागीय व्‍यवस्‍थापकाला पञ पाठवून कळविले की,  विमा संरक्षण घेतलेला I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular   हा क्षतीग्रस्‍त (फुटला) झाला आणि अधिकृत दुरुस्‍ती सेवा यांनी रुपये २९३००/- ची निवीदा दिली आणि त्‍याचवेळेस विमा मागणी फॉर्म सुद्धा सादर करण्‍यात आला. विरुध्‍द पक्षाने विमा संरक्षण कायद्यानूसार श्री संतोष कुलकर्णी यांची सर्वेअर म्‍हणून नेमणूक केली. सर्वेअर नी I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular   ची तपासणी व चौकशी करुन आणि अधिकृत दुरुस्‍ती सर्विस सेंटर शी भेटुन त्‍यांनी त्‍यांचा I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular   बाबतचा तपासणी अहवाल दिनांक १९/०२/२०१८ ला सादर केला. सर्वेअरने त्‍यांच्‍या अहवालात नमुद केले की, आय पॅड हा दिनांक २२/०७/२०१७ पूर्वी क्षतीग्रस्‍त झाला आणि सदर I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular   दिनांक २२/०८/२०१७ अन्‍वये समाविष्‍ट करुन विमा संरक्षण देण्‍यात आले. I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular  हा क्षतीग्रस्‍त अवस्‍थेत आहे आणि विमा धारकाचे झालेले नुकसान हे विमा पॉलिसी सुरु होण्‍याच्‍या पूर्वी झालेले आहे. त्‍यामुळे विमा पॉलिसी अन्‍वये तक्रारकर्त्‍याच्‍या झालेल्‍या नुकसानाची भरपाई होत नाही.  विरुध्‍द पक्षाने दिनांक २६/०२/२०१८ अन्‍वये तक्रारकर्त्‍याला त्‍याची विमा मागणी पञामध्‍ये नमुद कारणास्‍तव देता येणार नाही असे कळविले तसेच विमा मागणी का नाकारण्‍यात येऊ नये याबाबत तक्रारकर्त्‍याला विचारणा करुन पञ मिळाले तारखेपासून सात दिवसाचे आत स्‍पष्‍टीकरण देण्‍याबाबत विचारणा करण्‍यात आली. तक्रारकर्त्‍याने दिनांक ३/३/२०१८ चे पञान्‍वये विरुध्‍द पक्षाला उत्‍तर पाठविले परंतू तक्रारकर्ता सर्वेअर ने दिलेल्‍या शे-यावर व अधिकृत दुरुस्‍ती केंद्राचे रिपोर्टवर उत्‍तर देण्‍यात अपयशी ठरला. विमा पॉलिसीमध्‍ये I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular  ला विमा सुरक्षा समाविष्‍ट करण्‍याआधी तक्रारकर्ता दिनांक २२/०७/२०१७ ला सर्विस सेंटर ला I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular   दुरुस्‍ती करीता भेटला आणि कोणतीही दुरुस्‍ती न करता आय पॅड परत घेतला. तक्रारकर्त्‍याच्‍या उत्‍तराने समाधान न झाल्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने त्‍यांचे पञ दिनांक १२/०३/२०१८ अन्‍वये तक्रारकर्त्‍याची विमा मागणी नाकारली आणि विमा मागणी देण्‍यात आली नाही. तक्रारकर्त्‍याची तक्रार गुणवत्‍ता बिना आहे कारण विरुध्‍द पक्षाने कोणतीही दोषपूर्ण सेवा तक्रारकर्त्‍याला दिली नाही. त्‍यामुळे सदरची तक्रार खारीज करण्‍यात आली.
  4. उभयपक्षाने मंचाचे अभिलेखावर दाखल केलेले दस्‍ताऐवज तसेच उभयपक्षांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर निकालीकामी खालिलप्रमाणे मुद्दे उपस्थित करुन त्‍यावरील निष्‍कर्षे खालिलप्रमाणे नोंदविले आहे.

  अ.क्र.                           मुद्दे                                                         उत्‍तर

I.      तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?             होय

II.     विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा

             दिली काय ?                                                                       होय

III.   काय आदेश ?                                                      अंतिम आदेशाप्रमाणे

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडुन त्‍याचे वापरात असलेल्‍या ईलेक्‍ट्रॉनिक इक्‍वीमेंट ची विमा पॉलिसी क्रमांक २८२२ ००४४१७१००००००३ घेतली होती व ती तक्रारकर्त्‍याच्‍या ताब्‍यात होती. सदर विमा पॉलिसी जिवीत असतांना तिचे नुतनीकरणाच्‍या वेळी श्री सावरकर विमा कंपनीचे विकास अधिकारी यांनी तक्रारकर्त्‍याला त्‍याचे वापरात असलेल्‍या I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular  चा समावेश विमा पॉलिसीमध्‍ये समाविष्‍ट करण्‍याबाबत सुचविले. श्री सावरकर यांनी सुचित केल्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने रुपये २३३६/- दोन पॉलिसीचे हप्‍ते नुतनीकरणासोबत दिले व रुपये ७७०/- नगदी I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular  च्‍या विमा संरक्षण हप्‍त्‍यापोटी दिले. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक २ वर सादर केलेल्‍या दस्‍ताऐवजावरुन तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे हे सिद्ध होते. श्री सावरकर यांनी विमा हप्‍त्‍यापोटी खर्ची घातलेली डेबीट नोट तक्रारकर्त्‍याला हस्‍तांतरीत केली. तक्रारकर्त्‍याने I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular ची विमा सुरक्षीत करीता विमा हप्‍ता रुपये ७७०/- विरुध्‍द पक्षाला देऊनही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular ला विमा सुरक्षा दिनांक २७/४/२०१७ ते २६/०४/२०१८ या कालावधीकरीता न देता दिनांक २२/८/२०१७ पासुन दिनांक २६/०४/२०१८ पर्यंत दिली.  I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular  हे कंम्‍युटर नसुन ते इलेक्‍ट्रॉनिक इक्‍वीमेंट पॉलिसी मधुन वगळण्‍यात आले आहे असा आधार घेऊन तक्रारकर्त्‍याची विमा मागणी नामंजूर केली आहे ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्ता प्रती दोषपूर्ण सेवा असुन अनुचित व्‍यापार पद्धतीचा वापर करणारी कृती आहे. जर I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular   यास इलेक्‍ट्रॉनिक इक्‍वीमेंट पॉलिसी मधुन वगळण्‍यात आले आहे तर I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular   विमा सुरक्षित कव्‍हरेज पॉलिसी मध्‍ये समाविष्‍ट करण्‍याकरीता विरुध्‍द पक्षाने विमा हप्‍ता रक्‍कम रुपये ७७०/- ही स्विकारावयास पाहिजे नव्‍हती. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडुन I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular चे विमा संरक्षण स्विकारण्‍यापोटी रुपये ७७०/- स्विकारुन तक्रारकर्त्‍याला रुपये ७७०/- ची खर्ची घातलेली डेबीट नोट निर्गमीत केली आहे. मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या Ashatai Anand Duparte Vs. Shriram City Union Finance Limited, Civil Appeal No. 3962/2019, decided on 16/04/2019 या न्‍यायनिवाड्यातील निरीक्षणाप्रमाणे तक्रारकर्त्‍याच्‍या I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular ला दिनांक २६/०४/२०१७ पासुन विमा संरक्षण द्यावयास पाहीजे सबब विरुध्‍द पक्षाने विमा दावा नाकारुन सेवेत ञुटी केली आहे. त्‍यामुळे तक्रारकर्ता I Pad Pro 9.7 Rose  Gold Cellular  चे क्षतीग्रस्‍त विमा मागणीपोटी देय असलेली विमा रक्‍कम रुपये २०,९४०/- मिळण्‍यास पाञ आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे व खालिलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.
  2. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला विमा मागणी रक्‍कम रुपये २०,९४०/- अदा करावे व त्‍यावर विमा नाकारलेल्‍या तारखेपासुन म्‍हणजे दिनांक २६/०२/२०१८ पासुन ८ टक्‍के दराने व्‍याज तक्रारकर्त्‍याला रक्‍कम प्रत्‍यक्ष अदा होईपर्यंत अदा करावे.
  3. मानसिक व शारिरीक ञासाकरीता व नुकसान भरपाईपोटी रुपये १०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- अदा करावा.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  5. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.