सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
वसुली प्रकरण क्र. 18/2009
मे.ड्रीम होम करीता
प्रोप्रा.श्री सुशिल दिनकर आळवे,
नाथ पै नगर, नम्रता कॉम्प्लेक्स,
रेल्वे स्टेशन रोड, ता.कणकवली,
जिल्हा सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
नॅशनल इंश्युरंस कंपनी लि.
द्वारा 2811, सुभाष रोड, रत्नागिरी,
जि.रत्नागिरी ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. महेन्द्र म. गोस्वामी, अध्यक्ष
2) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या
3) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
तक्रारदारातर्फेः- विधिज्ञ श्री दीपक अंधारी
विरुद्धपक्षातर्फे- विधिज्ञ श्री एस. एम. देसाई, श्री एस.जी. सामंत.
आदेश निशाणी 1 वर
(दिनांक 23/07/2010)
1) मुळ तक्रार क्रमांक 202/2008 मध्ये पारीत आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्षाच्या नॅशनल इंश्युरंस कंपनी लि.ने न केल्यामुळे ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 27 अंतर्गत सदरची दरखास्त दाखल करण्यात आली आहे.
2) सदर दरखास्तीचे नोटीस विरुध्द पक्षाच्या नॅशनल इंश्युरंस कंपनी लि. यांना बजावण्यात आले. त्यानुसार विरुध्द पक्ष हे त्यांच्या वकील प्रतिनिधीमार्फत मंचात हजर होऊन त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मंचाचे निकालपत्राविरुध्द मा.राज्य आयोग, मुंबई यांचेकडे अपिल क्र.832/2009 अन्वये अपिल दाखल केल्याची प्रत नि.8 वर दाखल केली. त्यामुळे प्रकरण मा.राज्य आयोगाचे आदेश येणेसाठी ठेवण्यात आले होते.
3) दरम्यान मा.राज्य आयोग, मुंबई यांनी, विरुध्द पक्षाने दाखल केलेली अपिल फेटाळल्याच्या निर्णयाची प्रत तक्रारदाराने नि.16 वर दाखल केली व नि.17 वर अर्ज दाखल करुन विरुध्द पक्षाने मा.राज्य आयोगाकडे एकुण 2,32,104/- जमा केल्याचे स्पष्ट करुन एकूण व्याजासह येणे रक्कम रु.2,40,749/- असल्यामुळे उर्वरित रक्कम रु.8,645/- आपणांस मिळावेत व विरुध्द पक्षास याबाबत नोटीस पाठवावी अशी विनंती केली. त्यानुसार मंचाने विरुध्द पक्षास नोटीस बजावणी केली; परंतु विरुध्द पक्षातर्फे कुणीही हजर न झाल्याने त्यांचेविरुध्द जमानती वॉरंट काढण्यात आले
4) त्यानुसार नॅशनल इंश्युरंस कंपनीचे व्यवस्थापक हे मंचासमोर हजर होऊन वॉरंट रद्द करणेसाठी अर्ज केला व येणे बाकी रक्कम रु.8,645/- धनाकर्षाद्वारे जमा करीत असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार मंचाने वॉरंट रद्द करण्याचे आदेश पारीत करुन धनाकर्ष दाखल करुन घेतला. दरम्यान तक्रारदाराचे वकीलांनी धनाकर्ष स्वीकारण्याची तयारी नि.20 वरील अर्जाद्वारे दर्शविली तसेच नि.21 वर पुरसीस दाखल करुन आदेशित रक्कम प्राप्त झाल्यामुळे अर्ज निकाली करणेची विनंती केली. त्यानुसार आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1) तक्रार क्रमांक 202/2008 मधील आदेशाची पूर्ण अंमलबजावणी विरुध्द पक्षाने केली असल्यामुळे, तक्रारदाराने दाखल केलेल्या नि.24 वरील पुरसीसनुसार सदरचे दरखास्त प्रकरण निकाली करणेत येते.
2) खर्चाबद्दल काही हुकूम नाही.
3) विरुध्द पक्षाचे बेलबॉंड रद्द करणेत येतात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 23/07/2010
(उल्का गावकर) (महेन्द्र म.गोस्वामी) ( वफा खान)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.
Ars/-