Maharashtra

Nagpur

CC/630/2018

SHRI DNYANESHWAR NARAYANRAO KHADSE - Complainant(s)

Versus

NATIONAL INSURANCE CO. LTD THROUGH BRANCH OFFICER - Opp.Party(s)

ADV. UDAY P. KSHIRSAGAR

26 Aug 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/630/2018
( Date of Filing : 17 Oct 2018 )
 
1. SHRI DNYANESHWAR NARAYANRAO KHADSE
PLOT NO 192, A PANDE LAYOUT, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. NATIONAL INSURANCE CO. LTD THROUGH BRANCH OFFICER
4, DURGA SADAN, PLOT NO 40, BALRAJ MARG, DHANTOLI, NAGPUR 440012
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. UDAY P. KSHIRSAGAR, Advocate for the Complainant 1
 ADV. COLLIN C. ANTHONY, Advocate for the Opp. Party 1
Dated : 26 Aug 2021
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये -

 

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून वाहन  क्रं. MH.40 AC-7065 या वाहनाचा दि. 11.08.2017 ते 10.08.2018 या कालावधीकरिता पॉलिसी क्रं. 281800311710003767, विमा मुल्‍य रक्‍कम रुपये 4,87,500/- करिता विमा काढला होता.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, तो दि. 06.07.2018 ला महाविद्यालयातून घरी परत येत असतांना त्‍याच्‍या वाहनात बिघाड आल्‍याने त्‍याबाबतची माहिती विरुध्‍द पक्षाला टोल फ्री नं. वरुन दिली असता विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला वाहनाच्‍या अधिकृत सर्विस स्‍टेशन येथे वाहन नेण्‍यास सांगितले. त्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाची तपासणीकरता डी.एफ.विजयकर याची सर्वेअर म्‍हणून नेमणूक केली. त्‍यानुसार सर्वेअरने दि. 11.07.2018 रोजी गॅरेज मध्‍ये ना-दुरुस्‍त वाहनाची तपासणी केली व सर्व बाजुने फोटो घेऊन अहवाल सादर केला, परंतु सर्वेअरने अहवालाची प्रत तक्रारकर्त्‍याला त्‍यावेळीच दिली नाही. मे. श्री. ऑटो रिस्‍टोरर्स रामदास पेठ, नागपूर सर्विस स्‍टेशन यांनी तक्रारकर्त्‍याला वाहन दुरुस्‍तीकरिता रुपये 3,13,070/- एवढा अंदाजित खर्च येण्‍याचे अंदाजपत्रक  दिले होते व वाहनाचे आवश्‍यक कागदपत्रे विरुध्‍द पक्षाला देऊन अंतिम निर्णयाकरिता परत सर्वेअर नियुक्‍त करण्‍यास सांगितले होते. विरुध्‍द पक्षाने परत सर्वेअरला अधिकृत सर्विस स्‍टेशन श्री. ऑटो रिस्‍टोरर्स रामदास पेठ नागपूर यांच्‍याकडे पाठविले व  संबंधित सर्वेअरने सर्विस स्‍टेशनला भेट दिली व इंजिनिअरशी चर्चा केली व परत गेला.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, विरुध्‍द पक्षाने दि. 07.09.2018 ला पत्र पाठवून त्‍याचा विमा दावा मंजूर केल्‍याचे कळविले व काही कागदपत्र पाठविण्‍याबाबत ही कळविले होते, त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दस्‍तावेज पाठविले होते. त्‍यानंतर दि. 10.09.2018 ला विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला रुपये 1,21,700/- चा विमा दावा मंजूर केले असल्‍याचे कळविले, तेव्‍हा तक्रारकर्त्‍याने आक्षेप नोंदवून सदरची रक्‍कम स्‍वीकारली असल्‍याचे विरुध्‍द पक्षाला कळविले व वाहन दुरुस्‍तीची पूर्ण रक्‍कम रुपये 3,13,070/- देण्‍याबाबत विनंती केली. परंतु विरुध्‍द पक्षाने उर्वरित रक्‍कम देण्‍यास असमर्थता दर्शविली. तक्रारकर्त्‍याने स्‍वतःची गैरसोय टाळण्‍याकरिता वाहन दुरुस्‍तीचे संपूर्ण बिल अदा करुन वाहन घरी आणले. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा पूर्ण विमा दावा मंजूर न केल्‍यामुळे त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाचे दुरुस्‍त पोटी देय असलेली उर्वरित रक्‍कम रुपये 1,91,370/- विमा दावा दाखल केल्‍याच्‍या तारखेपासून म्‍हणजे दि. 11.07.2018 पासून द.सा.द.शे. 18 टक्‍के दराने व्‍याजासह देण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश द्यावा.

 

  1.      विरुध्‍द पक्षाने आपल्‍या लेखी जबाबात नमूद केले की,  तक्रारकर्त्‍याचा विमा दावा हा सर्वेअरच्‍या अहवालानुसार अदा केलेला आहे. तक्रारकर्त्‍याने विमा दाव्‍याबाबत सर्वेअरने दिलेल्‍या अहवालावर कोणताही आक्षेप न नोंदविता आणि  Certificate of satisfaction वर सही करुन दावा स्‍वीकारला आहे.

 

  1.      विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की,  दि. 06.07.2018 ला त.क.च्‍या वाहनात बिघाड आल्‍यामुळे वाहन बंद पडले आणि त्‍याप्रमाणे त.क.ने त्‍याचे वाहन सर्विस स्‍टेशन , श्री. ऑटो रिस्‍टोरर्स रामदासपेठ,  नागपूर येथे दुरुस्‍तीकरिता घेऊन गेला होता. विरुध्‍द पक्षाला मिळालेल्‍या सूचनेनुसार व त्‍यांच्‍या पध्‍दतीनुसार त्‍यांनी सर्वेअर म्‍हणून डी.एफ.विजयकर याची वाहन तपासणीकरिता व अहवाल सादर करण्‍याकरिता नेमणूक केली होती. सर्वेअरने दि. 04.09.2018 ला वाहनाची तपासणी केल्‍यानंतर सर्वे अहवाल सादर केला. तक्रारकर्त्‍याने सांगितल्‍यानुसार आणि सर्वेअरच्‍या अहवालानुसार तक्रारकर्त्‍याचे वाहन रोडवर जमा झालेल्‍या पाण्‍यातून वाहन चालविल्‍यामुळे बंद झाले. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने वाहन सुरु करण्‍याचा प्रयत्‍न केला तेव्‍हा वाहन सुरु झाले नाही, म्‍हणून तक्रारकर्त्‍याने वाहन मॅकनिकला कळविले व त्‍याने तक्रारकर्त्‍याचे बंद पडलेले वाहन (टो करुन) बांधून सर्विस स्‍टेशनला नेले. त्‍यानंतर सदरचे वाहन उघडून त्‍यातील इंजिन उघडण्‍यात आले. वाहन उघडल्‍यानंतर लक्षात आले की, सिलेंडर ब्‍लॉक हा आतील दोन्‍ही बाजुने तुटलेला आढळला आणि इंजिन मध्‍ये पिस्‍टन हेडच्‍या वर पाणी आढळले. जेव्‍हा वाहन रस्‍त्‍यावर साठलेल्‍या पाण्‍यातून चालविण्‍यात आले, त्‍यावेळी पाणी इंजिन मध्‍ये शिरले आणि पाण्‍याच्‍या शिरकाव झाल्‍याने hydrostatic lock मुळे इंजिन बंद पडले. इंजिनचे combustion chamber  मध्‍ये पाणी शिरल्‍याने इंजिनच्‍या कोणत्‍याही भागाचे नुकसान होत नाही आणि इंजिनच्‍या दुरुस्‍तीमध्‍ये पाणी काढल्‍या जाऊ शकते. परंतु तक्रारकर्त्‍याने सदरचे वाहन पुन्‍हा सुरु केल्‍यामुळे वाहनात ना-दुरुस्‍ती आली.  विरुध्‍द पक्षाने सर्व बाजुचा विचार करुन (वाहनाच्‍या नुकसानीचे मुल्‍यांकन करणे) depreciation and salvage value, assessed the loss to the tune of रुपये 1,26,082/- चे काढले.

 

  1.          तक्रारकर्त्‍याला सर्वे अहवालानुसार वि.प.ने त्‍याचे दि. 07.09.2018 च्‍या ई-मेल द्वारे रुपये 1,21,700/- एवढया रक्‍कमेचा विमा दावा मंजूर केला असल्‍याचे कळविले आहे आणि त्‍या द्वारे त.क.ला श्री. ऑटो रिस्‍टोरर्स यांना अदा करावयाचे आणि उर्वरित रक्‍कमेचे दस्‍तावेज सादर करण्‍यास सांगितले. तक्रारकर्त्‍याने  फरकाच्‍या रक्‍कमेची पावती सादर करुन डिस्‍चार्ज व्‍हाऊचरवर सही केली आणि त्‍याप्रमाणे रक्‍कम रुपये 1,21,700/- चा विमा दावा तक्रारकर्त्‍याला अदा करण्‍यात आलेला आहे. तक्रारकर्त्‍याने satisfaction Claim Settlement amount रुपये 1,21,700/- असे लिहून दिले आहे. तक्रारकर्त्‍याने सदरची रक्‍कम स्‍वेच्‍छेने स्‍वीकारलेली असून  प्रस्‍तुत  तक्रार दाखल करण्‍यापूर्वी सर्वेअरच्‍या अहवालाला कधीही आक्षेप नोंदविलेला नाही व विमा दावा रक्‍कम स्‍वीकारेपर्यंत ही कुठलाही आक्षेप घेतलेला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला कुठल्‍याही प्रकारची दोषपूर्ण सेवा दिलेली नाही म्‍हणून प्रस्‍तुत तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केलेली आहे.    

 

  1.         उभय पक्षांनी दाखल केलेली दस्‍तावेज, लेखी युक्तिवाद व त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर व दाखल न्‍यायनिवाडयाचे अवलोकन केल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.     

अ.क्रं.       मुद्दा                                   उत्‍तर

1.   तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?         होय 

2.   विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय?   नाही

3.   काय आदेश?                                      अंतिम आदेशानुसार

 

निष्‍कर्ष

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून Hyundai Verna, . MH.40 AC-7065 या वाहनाचा दि. 11.08.2017 ते 10.08.2018 या कालावधीकरिता विमा मुल्‍य रक्‍कम रुपये 4,87,500/- करिता  पॉलिसी क्रं. 281800311710003767  अन्‍वये विमा काढला होता, याबाबत उभय पक्षात वाद नसल्‍याने  तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्ता दि. 06.07.2018 ला महाविद्यालयातून घरी परत असतांना त्‍याच्‍या वाहनात  बिघाड आल्‍याने त्‍याने वाहन बंद पडल्‍याची सूचना वि.प.ला टोल फ्री नं. वरुन दिली होती व विरुध्‍द पक्षाच्‍या निर्देशानुसार तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वाहन वाहन अधिकृत सर्विस स्‍टेशन श्री. ऑटो रिस्‍टोरर्स रामदासपेठ नागपूर  यांच्‍याकडे दुरुस्‍तीकरिता पाठविले होते व तिथे जाऊन विरुध्‍द पक्षाने नियुक्‍त केलेले सर्वेअर,  डी.एफ.विजयकर यांनी वाहनाची तपासणी केली व सदरचा सर्वे अहवाल विरुध्‍द पक्षाकडे दाखल केला. नि.क्रं. 9(1) वर दाखल सर्वे अहवालात नमूद आहे की,   

On  Inspection of the vehicle no external damages to the vehicle were found. However, the insured reported that the vehicle stopped while running on the water logged road and when he tried to re-start the vehicle it did not start. He then informed the repairers who towed the vehicle to their workshop.

       Subject insured vehicle was dismantled and its engine was stripped. On dismantling/ stripping of engine its cylinder block found broken from inside out on its both side at No. 1 Cylinder. Water was found inside the engine over the piston head.

       From the type of damages to engine and as reported by the insured/ repairers it appears that while the vehicle was running on the water logged road water entered inside the engine over the piston head inside cylinder block ( Combustion chamber) and due to this water ingression engine  stopped due to hydrostatic lock. Entry of water in combustion chamber  of an engine will not create any mechanical defect in any part of engine. Water could have been removed by overhauling of an engine and the insurers liability could have been restricted to  overhauling  of an engine ( labor plus engine overhauling kit). But an attempt to re-start the vehicle by the insured has caused consequential and aggravated damages/loss to connecting rod which got bent and hit the side wall of cylinder block breaking block from inside out. Earlier, in the original estimate, repairers/ insured have claimed child parts of an engine instead of engine assy. Later on, since engine got damaged, they have claimed engine assy short of supplementary estimate.

      तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वाहन रोडवर जमा झालेल्‍या पाण्‍यातून चालविल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाच्‍या इंजिनमधील combustion chamber मध्‍ये पाणी  शिरले व  त्‍यामुळे hydrostatic lock झाल्‍याने  इंजिन बंद पडले. इंजिनच्‍या combustion chamber मध्‍ये पाणी  शिरल्‍याने इंजिन mechanical damage होत नाही व  इंजिन मधील पाणी काढता येते, परंतु तक्रारकर्त्‍याने त्‍याचे बंद पडलेले वाहन पुनश्‍चः सुरु केल्‍याने वाहन damage झाले.

       सर्वेअर विजयकर यांनी दिलेल्‍या अहवालाशी तक्रारकर्ता समाधानी नसल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला  दुस-या सर्वेअरची नियुक्‍ती करुन वाहन तपासणीकरिता विनंती केली. परंतु तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या विजयकर या सर्वेअरने दिलेल्‍या सर्वे अहवालावर कुठलाही आक्षेप नोंदविलेला नाही, तसेच त्‍यांनी कोणत्‍याही तज्ञाचा अहवाल दाखल केलेला नाही.  तसेच तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या सर्वेअरने दाखल केलेला सर्वे अहवालाचे खंडन केलेले नाही. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला सर्वेअरच्‍या अहवालाप्रमाणे वाहनाचे मुल्‍यांकनची नुकसान भरपाई अदा केलेली आहे, त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला कुठल्‍याही प्रकारची दोषपूर्ण सेवा दिलेली नाही असे आयोगाचे मत आहे.

 

 

       सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

अंतिम आदेश

  1.  तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज.
  2.  उभय पक्षांनी खर्चाचे वहन स्‍वतः सोसावे.
  3.  उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.