निकालपत्र :- (दि.14/03/2011) ( सौ. वर्षा एन.शिंदे,सदस्या) (01) तक्रार स्विकृत करुन सामनेवालांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांना नोटीस लागू होऊन सामनेवाला हे त्यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले. उभय पक्षकारांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार ही तक्रारदाराचा योग्य व न्याय पशु विमा दावा नाकारुन सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवलेमुळे दाखल केली आहे. (02) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 बँकेकडून दि.10/12/2008 रोजी कर्ज घेऊन म्हैस खरेदी केली होती. सदर म्हैशीचा विमा सामनेवाला क्र.1 विमा कंपनीकडे सामनेवाला क्र.2 यांचेकरवी तक्रारदार व अन्य लोकांच्या म्हैशीचा उतरविलेला होता. नमुद म्हैशीचा बिल्ला नंबरNIC-270800/21027 असून म्हैशीची किंमत रु.18,000/- आहे. नमुद विम्याचा कालावधी दि.13/01/2009 ते 12/01/2012 चे मध्यरात्रीपर्यतचा आहे. दि.31/01/2009 रोजी नमुद म्हैस न्युमोनियाने मयत झाली. त्याची सुचना सामनेवाला क्र.1 यांना तातडीने दिलेली आहे. मयत म्हैशीचे शवविच्छेदन करुन त्याचा अहवाल घेतलेला आहे. दि.25/02/2009 रोजी सामनेवाला क्र.1 यांचेकडे विम्याचा दावा पत्रासोबत योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करुन विमा रक्कमेची मागणी केलेली आहे. सदर क्लेम मागणी केलेनंतर जवळजवळ एक वर्षाने म्हणजे दि.27/01/2010 रोजी सामनेवाला क्र.1 यांनी 15 दिवसांतचे आत जनावर मयत झाले कारणास्तव विमा दावा नाकारलेचे कळवले आहे. प्रस्तुतची म्हैस विमा सुरु झालेपासून 15 दिवसानंतर मयत झाली आहे. सामनेवाला यांनी खोटया कारणास्तव विमा नाकारुन सेवा त्रुटी केलेने प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल करावा लागला. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर होऊन तक्रारदारास सामनेवालांकडून विम्याची रक्कम रु.18,000/-, नुकसान भरपाईची रक्कम रु.25,000/- तसेच तक्रार अर्जाचा खर्च वकील फीसह वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (03) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टीप्रित्यर्थ तक्रारदार यांनी जनावर (म्हैस) खरेदी केलेल्या दाखल्याची प्रत, सामनेवाला क्र.1 यांचे बिल्ल्याची प्रत, तक्रारदाराचे जनावर मयत झालेबाबतचा श्री विठ्ठलदेव सह.दुध यांनी दिेलेला दाखला, समनेवाला यांनी क्लेम नाकारलेचे दिलेले पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (04) सामनेवाला क्र.1यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार अ) तक्रारदाराची तक्रार नाकारलेली आहे. तक्रारदाराने कोणत्या तारखेस म्हैस खरेदी केली याची माहिती सामनेवालांना नव्हती व नाही. तक्रार अर्जातील कलम 2 मधील मजकूर सर्वसाधारण बरोबर आहे. विमापत्रातील अटीनुसार विमाकृत जनावराची जोखीम तारीख सुरु झालेपासून 15 दिवसांचे आत विमाकृत जनावरास झाले रोगाचे निदान व उपचार सुरु झालेस व त्या रोगामुळे संबंधीत जनावराचा मृत्यू झालेस त्याची कोणतीही जाबबदारी सामनेवालांवर येत नाही. नमुद म्हैशीचा विमा दि.13/01/2009रोजी अस्तित्वात आला. त्यादिवसापासून जोखीम सुरु झाली. नमुद म्हैशीच्या रोगाचे निदान 15 दिवसांचे आत झालेले व त्याप्रमाणे दि.15/01/2009पासून औषधोपचार सुरु होते हे डॉक्टरांनी दिेलेल्या उपचारपत्रावरुन स्पष्ट होत आहे. सबब नियमाप्रमाणे सामनेवालांची कोणतीही जबाबदारी येत नाही. तक्रार अर्जास कोणतेही कारण घडलेले नाही. सबब प्रस्तुतचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा अशी विनंती सामनेवालांनी सदर मंचास केली आहे. (05) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ सामनेवाला यांनी तक्रारदारास पाठविलेले पत्र, सामनेवालांकडील स्क्रुटीनी फॉर्म, सर्टीफिकेट, विमा पॉलीसी, सदर पॉलीसीच्या अटी व शर्ती इत्यादी कागदपत्रे प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेली आहे. (06) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्हणणे, दाखल कागदपत्रे, उभय पक्षकारांच्या वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केल असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1) सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय. 2) तक्रारदार विमा रक्कम मिळणेस पात्र आहे काय ? --- होय. 3) काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे. मुद्दा क्र.1 व 2 :- तक्रारदाराचे नमुद म्हैशीच्या विमा पॉलीसीबाबत वाद नाही. दाखल कागदपत्रानुसार तक्रारदाराने दि.10/12/2008 रोजी गोविंद मसु पाटील यांचेकडून म्हैस खरेदी केली होती. सदर म्हैशीची किंमत रु.18,000/- आहे हे दाखल जनावरांचा दाखला क्र.1053 वरुन निर्विवाद आहे. तसेच तक्रारदारासह अन्य 9 जनांच्या म्हैशीचा विमा सामनेवालांकडे उतरविलेला होता. सदर अनुक्रमांक 7 वर तक्रारदाराचे नमुद म्हैशीचा विमा उतरविलेची नोंद आहे. यामध्ये म्हैशीचे वर्णन तसेच बिल्ला नंबर. NIC-270800/21027 ची नोंद असून विमा रक्कम रु.18,000/- ची नोंद आहे. नमुद म्हैस दि.31/01/2009 रोजी न्युमोनियाने मयत झालेली आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. सामनेवालांनी दि.27/01/2010 रोजीचे पत्राने पॉलीसीच्या अटी व शर्तीप्रमाणे नमुद म्हैशीस 15 दिवसांचे आत रोग होऊन मृत्यू पावलेली असलेने विमा जोखमीखाली सदर बाब समाविष्ट होत नसलेने विमा दावा नाकारला आहे. सामनेवालांनी दाखल केलेल्या नमुद पॉलीसीच्या एक्सेप्शन क्लॉज क्र.2 Diseases contracted prior to comensement of risk चा विचार करता सामनेवालाने आपल्या लेखी म्हणणेमध्ये दि.13/01/2009 रोजी नमुद म्हैशीचा विमा अस्तित्वात आला व तेथून जोखीम सुरु झाली. नमुद म्हैशीच्या आजाराचे रोग निदान दि.15/01/2009 रोजी म्हणजेच 15 दिवसांचे आत झालेले आहे व औषधोपचार केलेले आहेत या केलेल्या प्रतिपादनाचा विचार करता सामनेवालांनी दाखल केलेल्या नमुद पॉलीसीच्या एक्सेप्शन क्लॉज क्र.2 Diseases contracted prior to comensment of risk चा विचार करता नमुद म्हैशीस विमा उतरविलेनंतर रोग झालेला असून तो विमा उरतविण्यापूर्वी झालेला नाही हे निर्विवाद आहे. तसेच नमुद पॉलीसीच्या कंडिशन क्लॉज-8The company is not liable to pay the claim in the event of death of insured animal due to disease occurring within 15 days from comensment of risk चा विचार करता प्रस्तुत म्हैशीचा विमा दि.13/01/2009 रोजी सुरु झाला असून नमुद म्हैशीचा मृत्यू 31/01/2009 रोजी झालेला आहे. नमुद म्हैशीचा मृत्यू हा जोखीम स्विकारलेपासून 19 व्यास दिवशी झालेला आहे. सबब नमुद जनावराचा मृत्यू हा 15 दिवसांचे आत झालेला नाही ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता सामनेवाला कंपनीने विमा पॉलीसीचा मूळ हेतू विचारात न घेता तसेच नमुद नियमांचा चुकीचा लावलेला अर्थ लावून तक्रारदाराचा न्याययोग्य पशु विमा दावा नाकारुन सेवेत गंभीर त्रुटी ठेवलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच दावा दाखल झालेनंतर 3 महिन्याचे आत प्रस्तुत विमा दावा मंजूर अथवा नामंजूर हे कळवणे सामनेवाला कंपनीवर बंधनकारक आहे. असे असतानाही दावा दाखल केलेपासून दि.25/02/2009 पासून ते जवळपास एक वर्षानंतर म्हणजे दि.27/01/2010 रोजी दावा नाकारलेला आहे. सबब सामनेवाला क्र.1 यांचेसेवेतील गंभीर त्रुटी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदाराने सामनेवाला क्र.2 यांचेविरुध्द कोणतीही मागणी केलेली नाही. तसेच सामनेवाला क्र.2 यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेचे आढळून आलेले नाही. विमा रक्कम देणेसाठी सामनेवाला क्र.2 यांना जबाबदार धरता येणार नाही. विमा रक्कम देणेसाठी सामनेवाला क्र.1 हेच जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.3:- वरील मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदार हा विमा रक्कम रु.18,000/-व्याजासह मिळणेस पात्र आहेत. तक्रारदार यांचा क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेने तक्रारदार झालेल्या मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येते. 2) सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांना विमा दाव्याची रक्कम रु.18,000/-(रु. आठरा हजार फक्त) त्वरीत अदा करावी. सदर रक्कमेवर दि.27/01/2010 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत सदर रक्कमेवर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज अदा करावे. 3) सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |