व्दारा श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे, अध्यक्षा.
तक्रारकर्ता श्रीमती योगीता योगेश्वर नेवारे, यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा थोडक्यात आशय असा की,
1. तक्रारकर्ता यांचे पती योगेश्वर दादू नेवारे हे शेतकरी होते व त्यांचा दिनांक 22/05/2007 रोजी बालाघाट जिल्हयातील जैतपुरी येथे हलोन नदी येथे स्नान करण्यास गेले असता पाय घसरुन नदीत पडल्यामूळे मृत्यू झाला. ..2..
..2..
2. तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष यांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमादावा कागदपत्रासह पाठविला मात्र दिनांक 12/02/2009 चे पत्रान्वये विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी आवश्यक त्या कागदपत्राच्या अभावी दाव्याची फाईल बंद करीत असल्याचे कळविले.
3. तक्रारकर्ता यांनी मागणी केली आहे की, त्यांना विमा रक्कम रुपये 1,00,000/- ही 18% व्याजासह मिळावी तसेच शारीरिक व मानसिक त्रासासाठी रुपये 10,000/- तर ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 5,000/- विरुध्दपक्ष यांचेकडून मिळावेत.
4. विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 3 हे हजर न झाल्यामुळे त्यांचे विरोधात दिनांक 30/06/2010 रोजी प्रकरण एकतर्फी पुढे चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
5. विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी त्यांच्या लेखी जबाबात ते सल्लागार कंपनी असल्यामुळे व विना मोबदला सहाय्य करीत असल्यामुळे त्यांच्या विरोधातील तक्रार ही खारीज करावी असे म्हटले आहे.
कारणे व निष्कर्ष
6. तक्रारकर्ता यांनी दाखल केलेले शपथपत्र, कागदपत्रे, इतर पुरावा व केलेला युक्तीवाद यावरुन असे निदर्शनास येते की,नोनीटोला,तहसिल गोरेगांव, जिल्हा गोंदिया येथे गट क्रमांक 1323/1 B, एरिया 0.40 एचआर या जमीनीवर भूमीधारक म्हणून तक्रारकर्ता यांच्या मृतक पतीचे नांव आहे..
7. पोस्टमॉर्टम रिपोर्ट वरुन तक्रारकर्ता यांच्या पतीचा मृत्यू बुडून झाला असे स्पष्ट होते.
8. विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी दिनांक 12/02/2009 च्या पत्रान्वये तक्रारकर्ता यांनी आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता न केल्यामुळे फाईल बंद करण्यात येत आहे असे कळविले असले तरी मात्र विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी विद्यमान मंचात हजर होवून याबाबतचे सबळ कारण न दिल्यामूळे तक्रारकर्ता यांना विमा दाव्याची रक्कम न मिळणे हे संयुक्तीक मानता येणार नाही.
असे तथ्य व परीस्थिती असतांना खालिल आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
1. विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारकर्ता यांना विमादाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- ही दिनांक 12/02/2009 पासून संपूर्ण रक्कम तक्रारकर्ता यांना प्राप्त होत पर्यंत 9% व्याजासह दयावी.
..3..
..3..
2. विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासासाठी रुपये
3,000/- तर ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 1,000/- दयावेत.
3. विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी आदेशाचे पालन हे आदेशाच्या तारखेपासून एक महिण्याचे आत करावे.