नि. २६
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ३७४/२०१०
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : ३०/०७/२०१०
तक्रार दाखल तारीख : ३१/०७/२०१०
निकाल तारीख : १५/१०/२०११
--------------------------------------------------------------
अशोक बाळासो बेडक्याळे
व.व. ३४, धंदा – शेती
रा.मु.पो. सिध्देवाडी, ता.मिरज जि. सांगली ..... तक्रारदारú
विरुध्दù
१. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि.
सांगली कार्यालय, जैन बोर्डींग कॉम्प्लेक्स,
हायस्कूल रोड, सांगली
२. शाखा व्यवस्थापक,
बॅंक ऑफ इंडिया, मालगाव शाखा
मालगाव, ता.मिरज जि. सांगली .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री.ए.एस.हजारे
जाबदार क्र.१ तर्फे : +ìb÷. श्री बी.बी.खेमलापुरे
जाबदार क्र.२ तर्फे : +ìb÷.श्री जे.एन.कोकाटे
नि का ल प त्र
द्वारा- अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज आपल्या म्हैशीच्या विमा दाव्याबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
अर्जदार यांनी जाबदार क्र.२ बॅंकेकडून म्हैस खरेदी करण्यासाठी रक्कम रु.२५,०००/- चे कर्ज घेतले. सदर कर्ज घेताना जाबदार बॅंकेने अर्जदार यांचे म्हैशीचा विमा जाबदार नं.१ यांचेकडे उतरविला. तक्रारदार यांनी म्हैस रक्कम रु.२९,०००/- ला खरेदी घेतली होती. सदर रकमेपैकी रक्कम रु.२५,०००/- जाबदार क्र.२ बॅंकेने म्हैस विकणा-यास अदा केले व तक्रारदार यांनी रक्कम रु.४,०००/- अदा केले. तक्रारदार यांनी सदरची म्हैस दि.३/३/२०१० रोजी खरेदी केली आहे. जाबदार बॅंकेने दि.५/३/२०१० रोजी विम्याची रक्कम रु.१,४५०/- कर्जात वर्ग करुन डी.डी.ने जाबदार कंपनीस अदा केली आहे. सदरची म्हैस ही दि.६/४/२०१० रोजी मयत झाली. सदर म्हैस मयत झालेनंतर जाबदार यांनी विम्याची रक्कम अदा केली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी सदरचा तक्रारअर्ज म्हैशीची किंमत रु.२९,०००/-, औषधपाण्यासाठी केलेला खर्च रु.६,०००/- मिळण्यासाठी व इतर तदनुषंगिक मागण्यांसाठी प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने ५ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार क्र.२ यांनी नि.११ वर आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांना म्हैस खरेदीसाठी कर्ज दिले होते. सदर म्हैशीचा अर्जदार यांनी विमा उतरविण्याचे ठरविले. जाबदार क्र.१ यांचेकडील वैद्यकीय अधिकारी बाजारात आले. त्यांनी म्हैशीची तपासणी करुन तिचे कानामध्ये टॅग बसविला व टॅगचा नंबर सर्टिफिकेटमध्ये नमूद करुन जाबदार क्र.२ यांना एक प्रत दिली. जाबदार क्र.१ यांनी वैद्यकीय दाखला पाहून खरेदी घेतलेल्या म्हैशीचा विमाहप्ता किती होतो हे अर्जदार व यातील जाबदार क्र.२ यांना सांगितले. जाबदार क्र.२ यांनी विमा हप्ता रक्कम रु.१,५९९/- अर्जदार यांचे खात्यावर खर्ची टाकून एकूण एकत्रित वेगवेगळया खात्यांच्या म्हैशींचा रक्कम रु.७,७७६/- चा डी.डी. दि.५/३/२०१० रोजी काढून सदरचा डी.डी. स्कायसिटी स्कायलाईन कुरिअर सर्व्हिस सांगली यांचेमार्फत जाबदार क्र.१ यांचेकडे दि.१३/३/२०१० रोजी पाठविले. सदरचे कुरिअर जाबदार क्र.१ यांना दि.१५/३/२०१० रोजी मिळाले. सदर कुरिअरवर जाबदार यांची पोहोच आहे. जाबदार क्र.१ यांनी डी.डी. मिळाला त्यावेळेस जर जमा केला असता तर तक्रारदारांना विमा पॉलिसी दि.१५/३/२०१० पासून मिळाली असती. परंतु जाबदार यांनी डी.डी. तात्काळ एनकॅश केला नाही. जाबदार क्र.१ यांनी विलंब केला असल्यामुळे तक्रारदार यांना विलंबाने पॉलिसी मिळाली. जाबदार क्र.२ यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिली नाही. सबब जाबदार क्र.२ विरुध्द प्रस्तुतचा अर्ज फेटाळणेत यावा. जाबदार क्र.२ यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.१२ ला प्रतिज्ञापत्र व नि.१५ च्या यादीने १० कागद दाखल केले आहेत.
४. जाबदार क्र.१ यांनी नि.१७ वर आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांच्या म्हैशीचा विमा उतरविला आहे ही बाब मान्य केली आहे. परंतु सदरचा विमा म्हैस खरेदी केली त्याचदिवशी उतरविला ही गोष्ट अमान्य केली आहे. सदर म्हैशीचा विमा हा दि.२६/३/२०१० रोजी उतरविला असून विम्याचा कालावधी हा दि.२३/३/२०१० ते २२/३/२०११ असा आहे. तक्रारदार यांची म्हैस दि.६/४/२०१० रोजी मयत झाली ही गोष्ट जाबदार यांनी अमान्य केली आहे. तक्रारदार यांची म्हैस विमा घेतल्यापासून १५ दिवसांचे आत मयत झाली असल्यामुळे पॉलिसीतील अटी व शर्तीनुसार तक्रारदार विमा रक्कम मिळणेस पात्र नाही. जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही दूषित सेवा दिली नाही. सबब तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा. जाबदार क्र.१ यांनी नि.१९ च्या यादीने २ कागद दाखल केले आहेत.
५. जाबदार क्र.२ यांनी नि.२० ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तसेच नि.२२ च्या यादीने कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती दाखल केल्या आहेत. तक्रारदार यांनी नि.२३ ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. जाबदार क्र.१ यांनी नि.२४ ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, दाखल करण्यात आलेली कागदपत्रे व दोन्ही बाजूंचा दाखल लेखी युक्तिवाद याचे अवलोकन केले. दोन्ही विधिज्ञांचा तोंडी युक्तिवाद ऐकला. तक्रारदार यांच्या म्हैशीचा जाबदार नं.१ यांचेकडे विमा उतरविला होता ही बाब उभयपक्षी मान्य आहे. सदर विमा पॉलिसीची प्रत नि.५/१ वर दाखल आहे. सदर विमा पॉलिसीचा कालावधी हा दि.२३/३/२०१० ते २२/३/२०११ असा आहे. विम्याची रक्कम ही रु.२९,०००/- आहे. सदर म्हैस घेण्यासाठी जाबदार क्र.१ यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.२५,०००/- कर्ज दिले होते ही गोष्टही उभयपक्षी मान्य आहे. तक्रारदार यांची म्हैस मयत झाल्यानंतर जाबदार क्र.१ यांनी जाबदार क्र.२ यांना दि.८/४/२०१० रोजी पत्र पाठवून कागदपत्रांची मागणी केलेचे दिसून येते. त्यानंतर दि.४/६/२०१० च्या नि.५/३ वरील पत्रानुसार तक्रारदार यांचा विमादावा नाकारला आहे. विमादावा नाकारण्यास जे कारण नमूद केले आहे, ते पॉलिसी कालावधी सुरु झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत म्हैस मयत झाली असल्यामुळे विमादावा मंजूर होणेस पात्र नाही असे नमूद केले आहे. तक्रारदार यांच्या खात्यावर दि.५/३/२०१० रोजी विमा पॉलिसीसाठी रक्कम नावे टाकण्यात आली आहे. सदरचे विमाहप्त्याचा डी.डी. जाबदार क्र.२ बॅंकेने जाबदार क्र.१ विमा कंपनीकडे दि.१३/३/२०१० रोजी पाठविला आहे. सदरचा डी.डी. जाबदार क्र.१ यांना दि.१५/३/२०१० रोजी प्राप्त झाला आहे असे जाबदार क्र.२ यांनी आपल्या म्हणण्यामध्ये स्पष्ट केले आहे व सदरचा डी.डी. ज्या कुरिअरने पाठविला त्या कुरिअरच्या पोहोचपावतीची प्रमाणीत प्रत याकामी नि.२२/१ वर दाखल केली आहे. सदर पावतीवरुन जाबदार इन्शुरन्स कंपनीस सदरचे कुरिअर दि.१५/३/२०१० रोजी प्राप्त झाले आहे. अशा परिस्थितीत जाबदार क्र.१ यांना विमाहप्त्याचा धनाकर्ष नेमका किती तारखेस मिळाला ही बाब याठिकाणी उपस्थित झाली आहे. तक्रारदार यांनी बॅंकेला दिलेले पत्र नि.१९/२ वर दाखल आहे. तक्रारदार यांनी आपल्या पत्रामध्ये माझी म्हैस दि.६/४/२०१० रोजी मेली व बॅंकेचा डी.डी. आपल्या कार्यालयात दि.२३/३/२०१० रोजी जमा झाला आहे असे नमूद केले आहे. तक्रारदार यांनी सदरच्या पत्रात असे नमूद केल्यामुळे आपल्याला डी.डी. दि.२३/३/२०१० रोजी प्राप्त झाला आहे असे जाबदार क्र.१ यांनी नमूद केले. वास्तविक सदरचा डी.डी. तक्रारदार यांनी स्वत: पाठविला नाही. सदरचा डी.डी. जाबदार क्र.२ बॅंकेने तक्रारदाराच्या कर्जखात्यात रक्कम नावे टाकून विमाहप्त्याचा डी.डी. जाबदार क्र.१ यांचेकडे वर्ग केला आहे. त्यामुळे नेमका डी.डी. जाबदार विमा कंपनीस किती तारखेस मिळाला हे ठरविण्यासाठी जाबदार क्र.२ यांचे शपथपत्रावरील कथन व सोबतची कुरिअरची पोहोचपावती महत्वपूर्ण ठरते. सदरची कुरिअरची पोहोचपावती ही विमारकमेसाठी नाही असे दर्शविणारा कोणताही पुरावा जाबदार क्र.१ यांनी दाखल केलेला नाही. जाबदार क्र.२ यांच्या शपथपत्रावरुन व कुरिअरच्या पावतीवरुन विमा रकमेचा धनाकर्ष जाबदार क्र.१ यांना दि.१५/३/२०१० रोजी प्राप्त झाला आहे. अशा परिस्थितीत जाबदार क्र.१ यांनी सदरचा धनाकर्ष जमा करुन घेण्यास व पॉलिसी देण्यास विलंब केला असेल तर जाबदार क्र.१ हे स्वत: दोषास पात्र ठरतात. सदरची रक्कम दि.१५/३/२०१० रोजी प्राप्त झाली असे मानले तर तिथून १५ दिवसानंतर म्हैस मयत झाली आहे. त्यामुळे पॉलिसीतील अटी व शर्ती बचाव जाबदार क्र.१ यांना घेता येणार नाही असे या मंचाचे मत झाले आहे. तक्रारदार यांचा विमा दावा जाबदार क्र.१ यांनी ज्या कारणास्तव नाकारला, ते कारण योग्य व संयुक्तिक वाटत नाही. पॉलिसी विलंबाने देण्यामध्ये तक्रारदारपेक्षा जाबदार क्र.१ यांचाच निष्काळजीपणा दिसून येतो. त्यामुळे तक्रारदार हे विम्याची रक्कम रु.२९,०००/- मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. सदरची रक्कम विमादावा नाकारले तारखेपासून म्हणजे दि. ४/६/२०१० पासून द.सा.द.शे. ९ टक्के व्याजासह मंजूर करणेत येत आहे.
६. तक्रारदार यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाच्या खर्चाची मागणी केली आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमादावा अयोग्य कारणास्तव नाकारुन तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे ही गोष्ट निश्चितच तक्रारदार यांना शारीरिक मानसिक ञास देणारी ठरते. त्यामुळे सदरची मागणी व तक्रार अर्जाच्या खर्चाची मागणी अंशत: मंजूर करणेत येत आहे. तक्रारदार यांनी इतर अन्य मागण्या केल्या आहेत. परंतु त्याबाबतचा कोणताही पुरावा याकामी दाखल नाही. त्यामुळे सदरच्या मागण्या अमान्य करण्यात येत आहेत.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहे.
२. जाबदार क्र.१ यांनी तक्रारदार यांना म्हैशीच्या विमा दाव्यापोटी रक्कम रु.२९,०००/-
(अक्षरी रुपये एकोणतीस हजार फक्त) दि.४/६/२०१० पासून द.सा.द.शे. ९
टक्के दराने व्याजासह अदा करावेत.
३. जाबदार क्र.१ यांनी तक्रारदार यांना शारीरिक, मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व
तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.२,०००/-( अक्षरी रुपये दोन हजार फक्त ) अदा
करावेत.
३. वर नमूद आदेशाची पूर्तता जाबदार क्र.१ यांनी दि.३०/११/२०११ पर्यंत करणेची आहे.
४. जाबदार क्र.१ यांनी विहित मुदतीत आदेशाची पूर्तता न केल्यास तक्रारदार
त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. १५/१०/२०११
(सुरेखा बिचकर) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११
जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११