मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार अर्ज क्र. 90/2011 सौ.पुष्पाबेन पटेल रा. नांदलापूर, ता.कराड, जि. सातारा तक्रारदार विरूध्द नॅशनल इंन्शुरन्स कंपनी लि. जाबदार शाखा सातारा गणेश चंद्र चेंबर, 172, दुसरा मजला, पोवई नाका, रविवार पेठ, सातारा नि.1 खालील आदेश 1) तकारदाराचे वाहनाचा अपघात होवून देखील तक्रारदारास विरूध्द पक्षाचे कंपनीने विम्याची रक्कम अदा न केल्यामुळे सदरची तक्रार दाखल करण्यात आली आहे. 2) सदर तक्रारीची नोटीस नॅशनल इंन्शुरन्स कंपनीला पाठविण्यात आली असून त्यांनी उशीराने त्यांचे लेखी म्हणणे रू. 500/- च्या कॉस्टवर दाखल केले आहे त्यानुसार आज प्रकारण तक्रारदार यांच्या पुराव्यासाठी ठेवलेले आहे. 3) दरम्यान आज मंचासमोर तक्रारदार यांचे वकील व विरूध्द पक्षाच्या विमा कंपनीचे वरीष्ठ अधिकारी व त्यांचे वकील हजर आहेत. तक्रारदार व विरूध्द पक्षकार यांचे दरम्यान आपशी तडजोड होवून तक्रारादारचे वाहन दुरूस्तीसाठी येणारा संपूर्ण खर्च देण्याची तयारी विमा कंपनीचे वरीष्ठ अधिकारी यांनी मंचासमोर दिली. त्यानुसार तक्रारदार यांचे वकील व विरूध्द पक्षाचे वकील यांनी नि. 18 वर तडजोड पुरसिस दाखल केली व प्रकरण निकाली काढणेची विनंती केली. 4) त्यानुसार सदरचे प्रकरण निकाली काढणेच्या दृष्टीकोनातून मंच खालील आदेश पारित करीत आहे. आदेश 1) तक्रादार व विरूध्द पक्षाचे विमा कंपनी सोबत झालेल्या तडजोडीनुसार व त्यांनी दाखल केलेल्या नि. 18 वरील पुरसिसनुसार सदरचे प्रकरण निकाली काढणेत येत आहे. 2) विरूध्द पक्षाच्या नॅशनल इंन्शुरन्स कंपनीने नि. 18 वरील तडजोड पुरसिस नुसार तक्रादाराचे वाहनाच्या दुरूस्तीस येणारा सर्व खर्च अदा करावा. 3) सदरचे नि. 18 वरील तडजोड पुरसिस हे नि. 1 वरील आदेशाचा भाग समजण्यात यावा . 4) खर्चाबाबतकाही आदेश नाही. 5) तक्रार प्रकरण नस्तीबध्द करण्यात येते. सातारा दि. 15/9/2011 (श्री.महेंद्र एम. गोस्वामी) (श्रीमती सुचेता मलवाडे) अध्यक्ष सदस्या
| Smt.Sucheta A. Malwade, MEMBER | HONABLE MR. M.M.GOSWAMI, PRESIDENT | , | |