Maharashtra

Kolhapur

CC/07/502

Smt. Hirabai S. Kusale and Others - Complainant(s)

Versus

National Insu. Co.Ltd.and Others - Opp.Party(s)

P.B.Jadhav, R.G.Shelake

20 Oct 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/07/502
1. Smt. Hirabai S. Kusale and OthersA/p Talgaon Tal, Radhanagari Dist. Kop. ...........Appellant(s)

Versus.
1. National Insu. Co.Ltd.and OthersNew Shahupuri Near Mera Hotel Kolhapur.2. Shri.Talgaon Vi.Ka.Sa. Seva Sanstha ltd.Talgaon.Tal-Radhanagri.Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBERHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :P.B.Jadhav, R.G.Shelake, Advocate for Complainant
A.D.Chaugule, Advocate for Opp.Party

Dated : 20 Oct 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

निकालपत्र :- (दि. 20/10/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या)
 
(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला हे त्‍यांचे वकीलांमार्फत सदर मंचापुढे हजर होऊन त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. उभय पक्षकारांचे वकीलांचा अंतिम युक्‍तीवाद ऐकणेत आला.
 
           सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने तक्रारदाराचा योग्‍य व न्‍याय क्‍लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवल्‍यामुळे सदरची तक्रार दाखल करणेत आली आहे.
                          
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी :- अ) तक्रारदार हे शेतकरी कुटूंबातील आहेत तर सामनेवाला ही ख्‍यातनाम विमा कंपनी आहे. तर सामनेवाला क्र.2 ही सहकार विकास सेवा संस्‍था आहे. सामनेवाला क्र.1 कंपनीने सामनेवाला क्र.2चे सभासदांकरिता शेतकरी अपघात विमा योजना जाहीर केली होती व सदर योजनेनुसार शेतक-याचा अपघाती मृत्‍यू झालेस रक्‍कम रु.1,00,000/- व अपंगत्‍व आल्‍यास 50 टक्‍के नुकसान भरपाई सामनेवाला क्र.1 कडून दिली जाते.
 
           ब) तक्रारदार क्र.1 चे पती व तक्रारदार क्र.2 चे वडील शंकर रामचंद्र कुसाळे हे दि.06/05/2005 रोजी त्‍यांचे शेतामध्‍ये जाळणी करणेकरिता कवळे फोडत होते व सदर कवळयाखाली असणा-या सापाने त्‍यांना दंश केला त्‍यावेळी तक्रारदार क.2 शेतामध्‍येच होता त्‍याने साप पाहिला व तो घाबरुन वडीलांना घरी घेऊन आला. तदनंतर पोलीस पाटील यांना वर्दी देऊन जखमी शंकर कुसाळे यांना डॉ. युवराज पोवार यांचेकडे नेले असता सर्पदंशाबाबत आवश्‍यक उपचार सुविधा नसलेने त्‍यांना तातडीने सी.पी.आर. हॉस्पिटल येथे जखमीस नेणेस सांगितले. त्‍यांना उपचारासाठी कोल्‍हापूर येथे घेऊन जात असताना वाटेतच तोंडाला फेस येऊन उलटी येऊन मृत्‍यू झालेला आहे.
 
           क) त्‍यानंतर तक्रारदार यांना पतीच्‍या विमा पॉलीसीबाबत सामनेवाला क्र.2 संस्‍थेकडून माहिती मिळाली व त्‍याप्रमाणे दि.16/10/2006 रोजी सामनेवाला क्र.1 कडे सामनेवाला क्र.2 मार्फत क्‍लेम फॉर्मसोबत योग्‍य ती कागदपत्रे दाखल करुन अपघाती मृत्‍यूबाबत विमा रक्‍कमेची मागणी केली. सदर कागदपत्रे प्राप्‍त होऊनही सामनेवाला क्र.1 कंपनीने तक्रारदाराचा क्‍लेम मंजूर केला नाही. त्‍यामुळे दि.20/08/2007 रोजी नोटीस पाठवून विमा रक्‍कमेची मागणी केली.मात्र विमा रक्‍कम देणेस सामनेवाला यांनी टाळाटाळ केलेने सदरची तक्रार दाखल करणे तक्रारदारास भाग पडले. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येऊन पॉलीसी विमा रक्‍कम रु.1,00,000/- दि.16/10/2006 पासून 15 टक्‍के व्‍याजासहीत मिळावेत. तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/-व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.5,000/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
 
(3)        तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ गाव कामगार पोलीस पाटील यांचा दाखला, सामनेवाला क्र.2 चे सामनेवाला क्र.1 यांना क्‍लेम कागदपत्र पाठवलेचे पत्र,डॉ.युवराज पोवार यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र,सामनेवाला यांना पाठविलेली वकील नोटीस व त्‍याची पोच पावती इत्‍यादीच्‍या सत्‍यप्रती दाखल केल्‍या आहेत. डॉ.युवराज पोवार च संजय वसंत तवणकर, दाऊद महंमद पन्‍हाळकर यांचे शपथपत्र दाखल केले आहेत.  
 
(4)        सामनेवाला क्र.2 यांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार तक्रारदारास तक्रार चुकीची व खोटी असलेने ती नामंजूर होणेस पात्र आहे. तक्रार अर्ज कलम 1 मधील विमा जखमेची रक्‍कम रु.1,00,000/- चुकीची असून शेतक-याचा मृत्‍यू झाल्‍यास रक्‍कम रु.80,000/- इतकी आहे. तक्रार अर्ज कलम 2 मधील मयत शंकर रामचंद्र कुसाळे यांचे सर्पदंशाने मृत्‍यू झालेचे कथन बरोबर आहे. तक्रारदारचे मयत पतीचा विमा मागणीचे सर्व कागदपत्रे सामनेवाला क्र.1 कडे पाठविलेली आहेत. नुकसान भरपाई देणेची जबाबदारी सामनेवाला क्र.1 ची आहे. प्रस्‍तुत सामनेवाला क्र.2 यांचेविरुध्‍द तक्रारीस कारण उदभवलेले नाही. सामनेवाला क्र.2 यांना विनाकारण पक्षकार केलेले आहे. सबब सामनेवाला क्र.2 यांचेविरुध्‍दची तक्रार काढून टाकणेत यावी अशी विनंती सामनेवाला क्र.2 यांनी सदर मंचास केली आहे.
 
(5)        सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार तक्रारदाराचा अर्ज खोटा व खोडसाळ आपमतलबी बिनबुडाचा बनावट व काल्‍पनीक व बेकायदेशीर असलेने तो सामनेवाला यांना मान्‍य व कबूल नाही. सामनेवाला त्‍याचा स्‍पष्‍ट शब्‍दात इन्‍कार करतात. सदर विमा पॉलीसीप्रमाणे विमा उतरविलेली रक्‍कम रु.80,000/- आहे. तक्रार अर्ज कलम 2, 4, 5, 6 मधील मजकूर अमान्‍य केलेला आहे. मयत शंकर रामचंद्र कुसाळे हे पोस्‍ट मार्टेम रिपोर्टवरुन सर्पदंशाने मयत झालेले नसून ते हार्टअटॅक ने मयत झालेचे दिसते. सबब प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज कायदयाने चालणेस पात्र नाही तो नामंजूर करणेत यावा तसेच तक्रारदाराकडून सामनेवाला यांना रक्‍कम रु.5,000/- कॉम्‍पेसेंटरी कॉस्‍ट देणेबाबत हुकूम व्‍हावा अशी विनंती केलेली आहे.
 
(6)        सामनेवाला क्र.1 यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेच्‍या पुष्‍टयर्थ पोस्‍ट मार्टेम, सामनेवाला क्र.2 चे पत्र, सामनेवाला क.2 यांना दिलेले पत्र, इत्‍यादीच्‍या सत्‍यप्रती दाखल केलेल्‍या आहेत. तसेच शपथपत्रही दाखल केलेले आहे. तसेच पारीख यांचे टेस्‍टबुक ऑफ मेडिकल ज्‍युरीसप्रुडन्‍स अन्‍ड टाक्‍सीकॉलॉजी फॉर क्‍लासरुम अन्‍ड कोर्टरुम पान क्र.800 ते 823 ची सत्‍यप्रत दाखल केलेली आहे.  
 
(7)        तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे व दाखल कागदपत्रे तसेच उभय पक्षांच्‍या वकीलांचा युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मद्दे निष्‍कर्षासाठी येतात.
1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय? --- नाही.  
2. काय आदेश                                                --- शेवटी दिलेप्रमाणे
 
मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदाराचे पतीचे नांवे सामनेवाला क्र.1 यांचेकडे शेतकरी अपघात‍ विमा योजनेअंतर्गत विमा उतरविलेला होता याबाबत वाद नाही व सदर पॉलीसीप्रमाणे अपघाती मृत्‍यूसाठी विमा रक्‍कम रु.80,000/-होती. वादाचा मुद्दा उपस्थित होतो की, तक्रारदारचे पतीचा मृत्‍यू सर्पदंशाने झाला आहे किंवा नाही?. तक्रारदाराने दाखल केलेल्‍या तक्रारीचे अवलोकन केले असता तक्रारदार क्र.1 चे पती शंकर रामचंद्र कुसाळे हे दि.06/05/2005 रोजी त्‍यांचे शेतामध्‍ये जाळणी करणेकरिता कोवळे फोडत होते व सदर कोवळयाखाली असणा-या सापाने त्‍यांना दंश केला. त्‍यावेळी तक्रारदार क्र.2 मयताचा मुलगा शेतामध्‍येच होता. त्‍याने साप पाहिला व घाबरुन तो वडीलांना घेऊन घरी आला. याचा विचार करता सापाने मयत शंकर कुसाळे यांना शरिराच्‍या कोणत्‍या अवयवाला दंश केला याबाबत वस्‍तुस्थिती तक्रारीत विशद केलेली नाही.
 
           सदर शंकर रामचंद्र कुसाळे यांना सर्पदंश झालेने त्‍यांना डॉ. युवराज पोवार यांचेकडे उपचारासाठी नेले असता सर्पदंशाची सुविधा त्‍यांचेकडे नसलेने त्‍यांनी कुसाळे यांना सी.पी.आर.हॉस्पिटल,कोल्‍हापूर येथे नेण्‍यास सांगितले. त्‍याप्रमाणे तक्रारदाराचे वतीने डॉक्‍टर युवराज पोवार यांनी शपथपत्र दाखल केलेले आहे. सदर शपथपत्राचे अवलोकन केले असता नमुद कुसाळे यांना सर्पदंश झालेने त्‍यांचे क्लिनीकमध्‍ये उपचाराकरिता आले होते. मात्र पुरेशी उपचारसामग्री नसलेने त्‍यांना तात्‍काळ सरकारी प्राथमिक आरोग्‍य केंद्रा नेण्‍यास सांगितले व तसे दि.21/07/2006 रोजी प्रमाणपत्र दिलेले आहे व ते बरोबर आहे असे नमुद केले आहे. सदर प्रमाणपत्राचे अवलोकन केले असता नमुद कुसाळे दु.12.30 वाजता त्‍यांचे दवाखान्‍यामध्‍ये आले होते. मात्र एएसव्‍ही ट्रिटमेंट उपलब्‍ध नसलेने प्रा‍थमिक आरोग्‍य केंद्रात उपचारासाठी नेणेबबात नमुद केलेले आहे. तसेच गावकामगार पोलीस पाटील यांनी कुसाळे यास दि.06/05/2005 रोजी सर्पदंश झाला व त्‍यांना सरकारी रुग्‍णालयात घेऊन जाण्‍याचा दाखला देण्‍यात आला व सदरचा दाखला हा‍ दि.27/10/2006 रोजी देणेत आलेला आहे. तसेच सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 यांना दि.06/05/2005 रोजी शंकर कुसाळे यांना सर्पदंश झालेमुळे दवाखान्‍यात नेत असताना वाटेतच मृत्‍यू झाला आहे व त्‍याबाबतीच कागदपत्रे सोबत जोडली असून क्‍लेम मंजूर होऊन क्‍लेम रक्‍कम संसथेच्‍या नांवे मिळावी अशी विनंती केलेली आहे सदरचे पत्र दि.16/10/2006 रोजीचे आहे. सदर कागदपत्रांचे अवलोकन केले असता घटना दि.06/05/2005 रोजी घडलेली असून सदरची कागदपत्रे दिड वर्षानंतरच्‍या तारखेची आहेत. संजय तवणकर व दाऊद पन्‍हाळकर हे मरणोत्‍तर पंचनामा करतेवेळी पंच म्‍हणून होते. त्‍यांनी दाखल केलेल्‍या शपथपत्रानुसार कुसाळे यास दि.06/05/2005 रोजी सर्पदंश झाला यास प्रथमत: युवराज पोवार यांचे दवाखान्‍यात व तदनंतर सी.पी.आर.हॉस्पिटल, कोल्‍हापूर येथे उपचाराकरिता दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वीचा त्‍याचा मृत्‍यू झालेला आहे व त्‍यांचे उपस्थितीतच मयताचे देहाचा पंचनामा केलेला असलेचे शपथपत्रात नमुद केले आहे. या तीन्‍ही शपथपत्रावरुन तक्रारदाराचा मृत्‍यू हा सर्पदंशानेच झाला आहे ही माहिती असून ते निर्णायक पुरावा नाही कारण डॉक्‍टर पोवार यांनी त्‍यांचेवर कोणतेही उपचार केलेले नाहीत. श्री शंकर कुसाळे यास सर्पदंश झालेचे सांगितलेवरुन त्‍यांचेकडे सदर उपचारासाठीची सामग्री नसलेने त्‍यांना सी.पी.आर.हॉस्पिटल येथे नेण्‍यास सांगितले तर उर्वरित दोघेजण हे पंच असून त्‍यांचे उपसिथतीत देहाचा पंचनामा झाला त्‍यांचा मृत्‍य सर्पदंशाने झाला हे त्‍यांचे मत विचारात घेता येणार नाही कारण ते वैद्यकीय तज्ञ नाहीत. सबब तक्रारदारांचे वतीने दाखल केलेली तीघांचीही शपथपत्रे ही तक्रारदाराचे पतीचा मृत्‍यू सर्पदंशाने झाला याबाबतचा निर्णायक पुरावा होऊ शकत नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.   
 
           मयत शंकर कुसाळे यांचे मृत्‍यू नंतर सी.पी.आर.हॉस्पिटल यांनी केलेल्‍या शवविच्‍छेदन अहवालाचे अवलोकन केले असता सदर शंकर कुसाळे या आणणेपूर्वीच मयत झालेला होता तसेच त्‍याचे शरिरावर कोणत्‍याही प्रकारच्‍या जखमा अथवा अन्‍य खुणा नव्‍हत्‍या. तसेच त्‍याचा मृत्‍यू हा Cardeomeqal Pencardians elusion Heptomgal  असे नमुद केलेले आहे. तसेच मयताचे पोटातील आतडयांमध्‍ये तसेच द्रावामध्‍ये कोणत्‍याही प्रकारचा वास नव्‍हता. तक्रारदाराचा मृत्‍यू हा हार्टअटॅक मुळे झालेचे स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे. तसेच शवविच्‍छेदन अहवाल दिलेले सी.पी.आर.हॉस्पिटल येथील डॉ. ए.एच. सडोलीकर यांना विस्‍तृत अहवाला देणेबाबत साक्षीसमन्‍स काढणेत यावे असा दि.23/05/2008 रोजी तक्रारदाराने दिलेला अर्ज मंजूर करणेत आलेला होता. सदर आदेशानुसार डॉ.सडोलीकर सदर मंचात उपस्थित राहून त्‍यांनी पुढील मुदत देणेबाबत अर्ज दिलेला होता व तो मंजूर करणेत आलेला होता. तदनंतर प्रस्‍तुतचे डॉक्‍टर सदर मंचासमोर उपस्थित राहिलेले नाहीत व तक्रारदारानेही त्‍याबाबत कोणत्‍याही स्‍टेप्‍स घेतलेल्‍या नाहीत.
 
           प्रस्‍तुत शवविच्‍छेदन अहवालाचे बारकाईने अवलोकन केले असता तसेच पारीख यांचे टेस्‍टबुक ऑफ मेडिकल ज्‍युरीसप्रुडन्‍स अन्‍ड टॉक्‍सीकॉलॉजी फॉर क्‍लासरुम अन्‍ड कोर्टरुम पान क्र.800 ते 823 चे अवलोकन केले असता कोणत्‍याही व्‍यक्‍तीस सर्पदंश झाल्‍यास सदरचा सर्प हा विषारी अथवा बिनविषारी असला तरी सर्पाने चावा घेतल्‍यावर त्‍यांचे दाताचे व्रण सदर दंशाचे जागी उमटतात. मात्र शवविच्‍छेदन अहवालाचे अवलोकन केले असता मयत शंकर कुसाळे यांचे शरिरावर क्‍लॉज 9 मधील पान 3 वरील Regar  Mortis-Wellmarked. Slight or Absent Whether present in the whole body or part only—absent all over body  याचा विचार करता तक्रारदारास साप चावला होता हे दिसून येत नाही. कारण साप चावला असता तर सदर सापाच्‍या चाव्‍यामध्‍ये दाताचे व्रण शरीरावर दिसले असते व ते सदर अहवालामध्‍ये नमुद असते.
 
           तसेच खरोखरच साप चावला असता तर त्‍याच्‍या विषाचा प्रभाव शरीरातंर्गत अवयवांवर झाला असता. यामध्‍ये प्रामुख्‍याने पोटातील आतडी व त्‍यामधील असणारे द्राव यांना कोणत्‍याही प्रकारचा वास नसलेचे नमुद श‍वविच्‍छेदन अहवालातील क्‍लॉज 21 मध्‍ये  स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे. वर नमुद पारीख यांचे दाखल असलेल्‍या पान क्र. 811 ते 821 चा विचार करता वैद्यकीय निरीक्षणांचा विचार करता साप चावल्‍यामुळे शरिरात होणारे बदल नमुद अहवालामध्‍ये मयताच्‍या शरिरावर दिसून आलेले नाहीत. सबब तक्रारदाराचे पतीचा मृत्‍यू हा सर्पदंशानेच झालेला आहे हे दर्शविणारा कोणताही सबळ वैद्यकीय पुरावा दिसून येत नाही. सबब तक्रारदारचे पतीचा मृत्‍यू हा सर्पदंशाने झालेला नाही तर तो हार्टअॅटॅकमुळे झालेला आहे ही वस्‍तुस्थिती दाखल शवविच्‍छेदन अहवालावरुन निर्विवाद आहे शवविच्‍छेदन अहवाल हा निर्णायक पुरावा आहे याचा विचार करता सामनेवाला क्र.1  विमा कंपनीने नाकारलेला क्‍लेम हा योग्‍य कारणास्‍तव नाकारलेला आहे. सबब सामनेवाला क्र.1 कंपनीची कोणतीही सेवात्रुटी दिसून येत नाही. तसेच सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदाराने कागदपत्रे दिल्‍यानंतर ताबडतोब क्‍लेम फॉर्म व कागदपत्रे सामनेवाला क्र.1 कडे पाठवून दिलेचे दिसून येते त्‍यामुळे त्‍यांचीही कोणतीही सेवात्रुटी दिसून येत नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.  
 
 
                     आदेश
 
1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्‍यात येते.
 
2) खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाहीत.

[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER