Maharashtra

Nagpur

CC/11/20

Hemant Chanchalmal Lodha - Complainant(s)

Versus

Nasiklub - Opp.Party(s)

Adv. S.S. Khandekar

16 Dec 2011

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/20
 
1. Hemant Chanchalmal Lodha
206, Himalaya Paradise, near GPO Chowk, Civil Lines,
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Nasiklub
Managing Director and Prop. Shri Rameshwar D. Sarda, Sarda Activity Centre, Nandini, Nashik Pune Road, Nashik
Nashik 422 011
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 HONABLE MR. N.V.Bansod MEMBER
 
PRESENT:Adv. S.S. Khandekar, Advocate for the Complainant 1
 
Adv. Suresh Dhole
......for the Opp. Party
ORDER

 

श्री नरेश बनसोड, सदस्‍य यांचे कथनांन्‍वये.
 
 
- आदेश -
 (पारित दिनांक – 16/12/2011)
1.                 तक्रारकर्त्‍यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. प्रस्‍तुत प्रकरणातील तक्रारकर्त्‍यांच्‍या तक्रारीचा आशय असा आहे की, त्‍याने गैरअर्जदारांचे माहिती पत्रकावरुन व वेबसाईटवरुन, त्‍यांची सदस्‍यता घेतली तर, भारतात आणि विदेशात 341 पेक्षा जास्‍त ठिकाणावर वेगवेगळया क्‍लबच्‍या सोई सुविधा प्राप्‍त होतील, तसेच ज्‍यामध्‍ये गोंडवाना क्‍लब, सी.पी.क्‍लब, महाराजबाग क्‍लब आणि वेस्‍टर्न स्‍पोटर्स क्‍लब यांचा समावेश होता. यावर विसंबून तक्रारकर्त्‍याने दि.01.04.2010 रोजी रु.2,02,757/- गैरअर्जदाराला अदा केले. त्‍याची पावतीही गैरअर्जदाराने दिली. परंतू गैरअर्जदाराने सदस्‍यता कार्ड दिले नाही व दि.20.07.2010 च्‍या पत्रात सदस्‍यता पत्र न पाठविण्‍याचे कारण कार्ड बनविणा-याजवळ आवश्‍यक सामग्री साधने उपलब्‍ध नसल्‍याचे नमूद करण्‍यात आले होते व त्‍यासोबत असलेल्‍या ओळखपत्राची मुदत 31.07.2010 पर्यंत होती. सदर रक्‍कम गैरअर्जदाराच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे परत मिळणारी होती. सदस्‍यता कार्ड उपलब्‍ध न झाल्‍याने, व गैरअर्जदार संस्‍थेद्वारा कोणत्‍याही सुविधेचा लाभ तक्रारकर्ता घेऊ शकत नसल्‍याने शेवटी दि.26.07.2010 रोजी पत्र पाठवून सदस्‍यता रद्द करुन त्‍याबाबत राशी परत करण्‍याची मागणी केली. परंतू यावर गैरअर्जदाराने तात्‍पुरते सांत्‍वन करण्‍याचा प्रयत्‍न पत्राद्वारे केला. गैरअर्जदाराने स्‍वतःच 15.09.2010 चे पत्रात त्‍यांचे दोन नामांकित क्‍लबमध्‍ये एफिलिएशेन 15.02.2010 ला संपुष्‍टात आल्‍याचे मान्‍य केले आणि हीच बाब  तक्रारकर्त्‍याने सदस्‍यत्‍व घेतांना त्‍यांचेपासून लपवून ठेवली होती. तक्रारकर्त्‍याकडून सदस्‍यतेच्‍या नावावर एवढी मोठी रक्कम घेऊनही गैरअर्जदार कोणतीही सुविधा पुरविण्‍यास असमर्थ ठरले, तसेच रक्‍कम परत देतही नसल्‍याने, तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदारावर कायदेशीर नोटीस बजावली. तिलाही त्‍यांनी प्रतिसाद दिला नाही, म्‍हणून तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदाराच्‍या सदर अनुचित व्‍यापारी प्रथेच्‍या अवलंबाबाबत मंचासमोर तक्रार दाखल करुन, गैरअर्जदारांनी सदस्‍यता फी व्‍याजासह परत करावी, नोटीस खर्च, मानसिक त्रासापोटी भरपाई व तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्‍या केलेल्‍या आहे. आपल्‍या तक्रारीच्‍या समर्थनार्थ 9 दस्‍तऐवज दाखल केलेले आहेत.  
 
2.          गैरअर्जदारांना सदर तक्रारीची नोटीस प्राप्‍त झाल्‍यावर, त्‍यांनी तक्रारीवर काही प्राथमिक आक्षेप घेतले. त्‍यांचे म्‍हणण्‍याप्रमाणे सदस्‍यता अर्जात नमूद पृष्‍ठ क्र. 15, अट क्र. 17 प्रमाणे गैरअर्जदार क्‍लबविषयी वाद या मंचासमोर चालविण्‍यायोग्‍य नाही व यामंचाचे कार्यक्षेत्रांतर्गत येत नाही. तक्रारकर्त्‍याच्‍या अर्जानुसार त्‍याला फक्‍त गैरअर्जदार क्‍लबची सुविधा उपलब्‍ध होती. तसेच बाहेरगावी जायचे असल्‍यास तात्‍पुरत्‍या देवाणघेवाण स्‍वरुपात सुविधा उपलब्‍ध होत्‍या, त्‍याबाबत सक्‍ती करता येत नाही. तसेच तक्रारकर्त्‍याला 30.07.2010 रोजी सदस्‍यत्‍व पत्र मिळाले असून ते 31.03.2015 पर्यंत कालावधीचे आहे. इतर क्‍लबची संलग्‍नता ही अतिरिक्‍त सोय आहे, ती हक्‍क होऊ शकत नाही. जर नाशिक येथे गैरअर्जदाराचे क्‍लबचे सेवेत त्रुटी केली तर त्‍यास ते व्‍यवस्‍थापन जबाबदार राहील. पण तशी तक्रारकर्त्‍याची तक्रार नाही. तक्रारकर्त्‍याचा नागपूर येथील महागडया क्‍लबची सेवा सभासदत्‍व फी न देता उपभोग घेण्‍याचा हेतू होता. तक्रारकर्त्‍याची तक्रार ही तथ्‍यावर आधारित नसून संदिग्‍ध स्‍वरुपाची आहे व तक्रारकर्ता हा ग्राहक नाही. म्‍हणून तक्रार खारीज करण्‍याची मागणी केलेली आहे.
3.          तक्रारकर्त्‍याने आपल्‍या प्रतिउत्‍तरात गैरअर्जदाराचे सर्व आक्षेप नाकारले असून सदर आक्षेप कसे खोटे आहे ह्याचे स्‍पष्‍ट विश्‍लेषण केले आहे. सदर प्रकरण युक्‍तीवादाकरीता आल्‍यानंतर मंचाने दोन्‍ही पक्षांचा युक्‍तीवाद त्‍यांच्‍या वकिलांमार्फत ऐकला. तसेच उपलब्‍ध दस्‍तऐवजांचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
-निष्‍कर्ष-
4.          तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदाराच्‍या क्‍लबची मोठी रक्‍कम भरुन सदस्‍यता प्राप्‍त केली, त्‍यामुळे तक्रारकर्ता गैरअर्जदारांचा ग्राहक ठरतो. दाखल दस्‍तऐवजांवरुन हे स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदारास रु.2,02,757/- नागपूर येथे भरुन सदस्‍यता घेतली आहे व अर्जानुसार तक्रारकर्त्‍यासोबत त्‍यांची पत्‍नीसुध्‍दा सेवा प्राप्‍त करणार होती. त्‍यामुळे part cause of action नागपूर येथे घडले आहे. तसेच गैरअर्जदाराचे संलग्‍न क्‍लबमध्‍ये नागपूर येथे सेवा प्राप्‍त न झाल्‍यामुळे पुन्‍हा part cause of action नागपूर येथे घडले, कारण नागपूर येथील क्‍लब संलग्‍न नव्‍हते. त्‍यामुळे या मंचास तक्रार चालविण्‍याचे अधिकार क्षेत्र आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजावरुन हे स्‍पष्‍ट होते की, गैरअर्जदाराने त्‍यांना सदस्‍यता कार्ड पाठविले नाही यावरुन असे दिसते की, गैरअर्जदाराचे सेवेत सुरुवातीपासूनच त्रुटी आहे आणि त्‍यांचे पत्रातील नमूद कारण सुध्‍दा पूर्णतः असंयुक्‍तीक स्‍वरुपाचे आहे. त्‍यानंतर तक्रार दाखल करेपर्यंत गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍यास सदस्‍यता कार्ड दिले नाही. तक्रारकर्त्‍याने दाखल दस्‍तऐवजावरुन असे स्‍पष्‍ट नमूद होते की, गैरअर्जदाराचे संलग्‍नीत क्‍लबशिवाय नागपूर येथील चारही क्‍लबची संलग्‍नता होती असे गैरअर्जदाराचे दस्‍तऐवजावरुन स्‍पष्‍ट होते. पृष्‍ठ क्र. 24 वरील गैरअर्जदाराचे दस्‍तऐवजावरुन हे स्‍पष्‍ट होते की, गोंडवाना क्‍लब व सी.पी.क्‍लबची संलग्‍नता ही 15.02.2010 ला संपुष्‍टात आलेली होती. असे असतांनासुध्‍दा गैरअर्जदाराने त्‍याच्‍या ब्रोशरमध्‍ये नागपूर येथील चारही क्‍लब संलग्‍न आहे अशी बतावणी करणे ही गैरअर्जदाराची कृती अनुचित व्‍यापार प्रथेत मोडते व तक्रारकर्त्‍यास खोटी माहिती पुरवून ऐनकेन प्रकारे सदस्‍यता घेण्‍यास बाध्‍य केले व त्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने सदस्‍यता स्विकारली आहे. या तक्रारकर्त्‍याच्‍या म्‍हणण्‍यास मंच पूर्णतः सहमत आहे. वरील ग्राहक सेवेतील त्रुटी, तसेच अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा गैरअर्जदाराने अवलंब केल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने 26.07.2010 च्‍या नोटीसद्वारे सदस्‍यताकरीता जमा केलेली रक्‍कम परत करण्‍याची मागणी केली होती. तरीहीसुध्‍दा गैरअर्जदाराने पूर्ण रक्‍कम परत न करणे ही गैरअर्जदाराच्‍या सेवेतील गंभीर स्‍वरुपाची त्रुटी आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
 
5.          तक्रारकर्त्‍याने पृष्‍ठ क्र. 14 वर दाखल गैरअर्जदाराचे सदस्‍यता कार्ड व (Membership Structure & Categories) या सदरात (ए) मध्‍ये “Regular Family Membership”  रु.2,00,000/- Admission fee रु.1,000/-, त्‍यापैकी रु.2,00,000/- परत करण्‍यायोग्‍य (Refundable) असल्‍याची पूर्णतः स्‍पष्‍ट नोंद आहे. ही स्‍पष्‍ट तरतूद असतांनासुध्‍दा गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याचे मागणीनुसार रु.2,00,000/- परत न करणे ही गैरअर्जदाराची कृती ग्राहक सेवेतील त्रुटी, तसेच अनुचित व्‍यापार पध्‍दतीत मोडते व ती रक्‍कम द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजासह परत करण्‍यास गैरअर्जदार बाध्‍य आहे, कारण की, तक्रारकर्त्‍यातर्फे रक्‍कम प्राप्‍त झाल्‍यानंतर, गैरअर्जदाराने त्‍या रकमेचा वापर स्‍वतःकरीता उपयोग करुन जास्‍तीत जास्‍त लाभ प्राप्‍त केलेला आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.Smt. Shanti V/s M/s. Ansari Housing & Construction etc. (NCDRC) Clause in the agreement limiting the jurisdiction- Inapplicable in a complaint under the Consumer Forum या निवाडयानुसारही गैरअर्जदाराची कृती ही अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केल्‍याचे दर्शविते. तक्रारकर्त्‍याने नमूद केल्‍यानुसार त्‍यास गैरअर्जदाराच्‍या कृतीमुळे शारिरीक आणि मानसिक त्रासाचे सहन करावा लागला, या म्‍हणण्‍यास मंच सहमत असून गैरअर्जदार रु.10,000/- नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च म्‍हणून रु.2,000/- देणे संयुक्‍तीक होईल असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे, म्‍हणून मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
 
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    गैरअर्जदाराला आदेश देण्‍यात येतो की, तक्रारकर्त्‍याने जमा केलेली रक्‍कम             रु.2,00,000/- दि.01.04.2010 पासून तक्रारकर्त्‍याचे हाती रक्‍कम पडेपर्यंत           द.सा.द.शे.9 टक्‍के व्‍याजाने परत करावी.
3)    गैरअर्जदाराच्‍या ग्राहक सेवेतील त्रुटीमुळे व अनुचित व्‍यापार प्रथेमुळे झालेल्‍या       मानसिक व शारिरीक त्रासापोटी तक्रारकर्त्‍याला रु.10,000/- व तक्रारीच्‍या            खर्चापोटी रु.2,000/- द्यावे.
4)    वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30  दिवसाचे आत करावे अन्‍यथा गैरअर्जदार आदेश क्र. 1 मधील रक्‍कम द.सा.द.शे.            9 टक्‍के ऐवजी 12 टक्‍के देण्‍यास बाध्‍य राहील.
 
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER
 
[HONABLE MR. N.V.Bansod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.